‘टोटल धमाल’चं धमाल ट्रेलर, अजय - अनिल- माधुरीचा तडका

‘टोटल धमाल’चं धमाल ट्रेलर, अजय - अनिल- माधुरीचा तडका

मोस्ट अवेटेड ‘टोटल धमाल’ (Total Dhamaal) या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं असून ‘धमाल’ची ही तिसरी सिरीज आहे. ट्रेलर प्रदर्शित होऊन काही तास उलटले नाहीत तर प्रेक्षकांनी हे ट्रेलर अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. माधुरी आणि अनिल कपूर बऱ्याच वर्षांनी एकत्र या चित्रपटात दिसणार असून दिग्दर्शक इंदर कुमारबरोबरही बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत. शिवाय अजय देवगण, जॉनी लिव्हर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्राची अफलातून केमिस्ट्री या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येत आहे. तिसरी सिरीज असून तीनपट धमाल या चित्रपटामध्ये असणार असं ट्रेलर पाहून वाटत आहे. या कॉमेडी चित्रपटामध्ये अगदी वाघ, सापापासून ते माकडापर्यंत बऱ्याच प्राण्यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचं दिसून येत आहे.

Subscribe to POPxoTV

वाचा - हॉलीवूड सेलिब्रिटी दिसणार अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’मध्ये


पहिल्यांदा माधुरी, अनिल आणि अजय एकत्र


‘टोटल धमाल’ (Total Dhamaal) मध्ये माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अजय देवगण (Ajay Devgan) हे एकत्र पहिल्यांदाच काम करत आहेत. यापूर्वी माधुरीने या दोन्ही कलाकरांबरोबर काम केलं आहे. मात्र कॉमेडीमध्ये ही तिकडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणार असून प्रेक्षकांमध्ये खूपच  उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नावाप्रमाणेच टोटल धमाल आहे. शिवाय प्रत्येक कलाकार त्या त्या कॅरेक्टरमध्ये अगदी परफेक्ट असल्याचा फीलही येत आहे. यावेळी पन्नास कोटी रूपयांच्या मागे सर्व लागणार आहेत. हे पन्नास कोटी रुपये मिळवण्यासाठी प्रत्येक जण मागे लागलेला दिसून येत आहे आणि ते मिळवताना काय काय कसरत करावी लागली आहे ते सर्व ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातील कॉमेडी संवादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अतिशय साधे पण चेहऱ्यावर सहज हसू आणणारे हे संवाद आहेत. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एक गुजराती कपल असून मध्येमध्ये माधुरीचे मराठी संवादही ऐकू येत आहेत. त्यामुळे हे डेडली कॉंबिनेशन अजून काय काय धमाल घडवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना नक्कीच चित्रपटाची वाट अजून थोडा वेळ पाहावी लागणार आहे.


वाचा - ‘ठाकरे’ चित्रपटाचं ट्रेलर लाँच


हॉलीवूड सेन्सेशन क्रिस्टलदेखील करणार टोटल धमाल


ajay and crystal


यावेळी ‘टोटल धमाल’मध्ये अजय, अनिल, माधुरी, रितेश, अर्शद, जावेद यांच्याबरोबरच हॉलीवूड सेन्सेशन क्रिस्टलदेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. क्रिस्टलचा पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये प्रवेश होणार आहे. गेल्या तेवीस वर्षांपासून क्रिस्टल हॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये काम करत आहे. क्रिस्टल ही कॅपुचिन जातीची माकडीण आहे. हॉलीवूडमध्ये ती खूपच प्रसिद्ध असून तिने अनेक चित्रपट गाजवले आहेत. मात्र पहिल्यांदाच ‘टोटल धमाल’मधून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अजय देवगणबरोबर ही क्रिस्टल माकडीण प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिस्टल ही ट्रेंड माकडीण आहे. ती माणसांप्रमाणेच वावरते. तिला सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरता येतं. इतकंच नाही तर आपण रोज जी कामे करतो ती कामंदेखील ती सराईतपणे करू शकते. आश्चर्याची बाब म्हणजे माणसांनी बोललेलं तिला सर्व काही कळतं आणि ती त्यावर आपल्या प्रतिक्रियादेखील देते. तिच्या याच वेगळेपणामुळे तिची अमेरिकेतील एका न्यूज चॅनेलकडून मुलाखतही घेण्यात आली होती. क्रिस्टल ही अशी पहिलीच अॅनिमल सेलिब्रिटी आहे जिची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी सर्वांनाच क्रिस्टलचं कौतुक वाटलं होतं.


वाचा - मणिकर्णिका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला खास ऐतिहासिक टच