मराठी प्रेक्षकांना मिळणार 'करोडपती' होण्याची संधी

मराठी प्रेक्षकांना मिळणार 'करोडपती' होण्याची संधी

तुम्हाला पुन्हा एकदा करोडपती करण्यासाठी मराठी करोडपती सुरु होणार आहे. कारण याचा एक छोटासा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनी मराठी हे नवे सीझन घेऊन सज्ज झाली आहे.पण आता या सीझनमध्ये काय वेगळे पाहायला मिळणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण तुर्तास तरी या टीझरवरुन हा रिअॅलिटी शो तुम्हाला करोडपती करायला येणार आहे. आता ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर तयारीला लागा.

कसा असणार 'लकी' चित्रपट 


यंदा कोण बसवेल हॉटसीटवर?


आतापर्यंत कोण होईल मराठी करोडपतीचे तीन सीझन सुरु आहेत. पहिल्या  दोन सीझनचे होस्टिंग सचिन खेडेकर यांनी केले होते. तर तिसऱ्या सीझनचे अँकरींग स्वप्निल जोशी याने केले होते. आता या चौथ्या नव्या कोऱ्या सीझनचे होस्टिंग कोण करणार?  हॉटसीटवर कोण बसवणार याची उत्सुकता आहे. पण अद्याप या संदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यासाठीही थोडी वाट पाहावी लागणार आहे.


marathi crorepati


पहिला सीझन दमदार 


हिंदीत करोडपती हा शो ओळखला जातो तो अमिताभ बच्चन यांच्यामुळे. कारण आतापर्यंत जितके सीझन झाले ते अमिताभ यांच्या अँकरींगमुळे चांगलेच रंगले होते. त्यामुळे २०१३ साली जेव्हा कोण होईल मराठी करोडपती? या शोची घोषणा झाल्यानंतर हे धनुष्य कोण पेलू शकेल अशी चर्चा होती. अखेर हे शिवधनुष्य सचिन खेडेकर यांनी पेलले आणि मराठी करोडपतीची दमदार सुरुवात झाली. सचिन खेडेकर यांनी या शोच्या दोन सीझनचे अँकरींग केले आणि तिसऱ्या सीझनला एक नवा अँकर या शोला लाभला तो स्वप्निल जोशी. मितवा स्वप्निल जोशीनेही या शोचे खुमासदार अँकरींग करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यामुळे आता या नव्या सीझनचे अँकरीग कोण करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.


मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्रांच्या या डीझाईन्स


तयारीला लागा


जर तुमचे सामान्यज्ञान चांगले असेल आणि तुम्हाला अशा कार्यक्रमात जाण्याची इच्छा असेल. तर हा शो खास तुमच्यासाठी आहे. ज्ञानात भर घालणारा असा हा कार्यक्रम असल्यामुळे तुम्हाला अगदी तयारीनिशी जाणे गरजेचे आहे.त्यामुळे आता पुढील माहिती येईपर्यंत अभ्यासाला लागा असेच म्हणावे लागेल.


तुम्हाला नक्कीच घाबरवेल नाईकांचा वाडा


 सेलिब्रिटींची मांदियाळी


कोण होईल मराठी करोडपती ? या शोमध्ये  आतापर्यंत अनेक मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी राहिली आहे. माधुरी दिक्षित, सई ताम्हणकर,प्रिया बापट,मुक्ता वर्बे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कानिटकर, केतकी माटेगावकर, आदर्श शिंदे असे कलाकार येऊन गेले आहेत. राजकारणींनी देखील या शोमध्ये सहभाग घेतला होता. यात सगळ्यात चांगला एपिसोड झाला तो रामदास आठवले यांचा… त्यांच्या कवितांनी या शोला चार चाँद लावले.


 यंदा मान सोनी मराठीला


आतापर्यंत मराठी करोडपतीचे तीन सीझन झाले आहेत. पण यंदा हा शो सोनी मराठीवर लागणार आहे. आता कलर्सपेक्षा सोनी मराठी या शोमध्ये काय रंगत आणणार ते देखील कळेलच. शो संदर्भातील कोणतीही माहिती सोनी मराठीने अद्याप संकेतस्थळावर दिली नाही. पण लवकरच ही माहिती देण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.