दैनंदिन जीवनात आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात, ज्यांच्याबद्दल आपलं ही एक मत बनतं. पण आपण याबाबत पुरेसा विचार न करता त्यावर विश्वास ठेवतो. या गोष्टींना म्हणतात मिथ किंवा मिथ्य आणि आपल्यातील बहुतांश लोक या ऐकिवात आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ज्यांचा खरंतर सत्याशी काहीही संबंध नसतो. चला जाणून घेऊया अशीच काही मिथ आणि त्यांच्याशी निगडीत तथ्य.
1. मिथ – उजवा डोळा फडफडणं अशुभ संकेत आहे
फॅक्ट – असं मानलं जातं की, जर एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडू लागला तर ते अशुभ मानलं जातं पण एखाद्या पुरूषाबाबत हे झालं तर शुभ मानलं जातं. पण हा अंधविश्वास आहे. मात्र डोळा फडफडण्याला ‘मायोकेमिया’ असं म्हणतात. जर डोळ्याच्या मांसपेशीवर ताण आल्यामुळे हा परिणाम होतो.
2. मिथ – प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा
फॅक्ट – हा एक खूप मोठा गैरसमज आहे. जर एखाद्या मुलीने किंवा महिलेने तिच्या मासिक पाळीच्या 14 दिवसानंतर जर सेक्स केला तर ती प्रेग्नंट होऊ शकते.
3. मिथ – केस चांगले राहण्यासाठी रोज शॅम्पू करावा
फॅक्ट – केसांना नियमित शॅम्पू केल्याने काहीही फरक पडत नाही. आठवड्यातून दोनदा बोटांनी केसाच्या मुळांना मसाज करावा किंवा गरम पाण्यात टॉवेल बूडवून त्याने केसांना स्टीम द्यावं. घरगुती उपाय म्हणून लिंबू,संत्र, किवी, सफरचंद, मोसंब आणि अननस यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. ज्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहील.
वाचा – गर्भ राहू नये म्हणून काय करावे
4. मिथ – मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणा होत नाही
फॅक्ट – बहुतांश लोकांना असं वाटतं की, मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्यास गर्भधारणा होत नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की, असं नाहीये. खरंतर स्पर्म योनीच्या आत 5 दिवसांपर्यंत राहतात, जर या दरम्यान असुरक्षित सेक्स करण्यात आला आणि ऑव्ह्युलेशन लवकर झाल्यास गर्भधारणा होऊ शकते.
5. मिथ – जास्त मीठ खाल्ल्यास मधुमेह होतो
फॅक्ट – जास्त मीठ किंवा कमी मीठ खाण्याचा मधुमेहाशी काहीही संबंध नाही. मधुमेह होण्याला हेरिडीटी म्हणजेच अनुवंशिकता आणि इतर कारण जवाबदार असतात. मात्र हे सत्य आहे की, जर मधुमेह झाल्यावर जास्त मीठ खाल्ल्यास शुगर अजून वाढते.
6. मिथ – प्रेग्नंसीदरम्यान जास्त तूप खाल्ल्यास प्रसूती सहज होते
फॅक्ट – प्रत्येक गरोदर महिलेला घरातील अनुभवी आणि ज्येष्ठ लोकं तूप खाण्याचा सल्ला देतात. मात्र यात तथ्य नाही. तूपाला चांगलं ल्यूब्रीकंट मानलं जातं, ज्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. पण याचा अर्थ हा नाही की, जास्त तूप खाल्ल्यास प्रसूतीदरम्यान त्रास होणार नाही.
7. मिथ – रात्री जास्त खाल्ल्यास वजन वाढते
फॅक्ट – खरंतर वजन वाढणं हे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. दिवसभरात आहाराच्या माध्यमातून जेवढ्या कॅलरीज घेता त्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो. मग दिवसभरात तुम्ही कोणत्या वेळेला खाता याचा काहीही संबंध नाही.
8. मिथ – दिवसांतून 8 ग्लास पाणी प्यावं
फॅक्ट – दिवसांतून किती वेळा पाणी प्यावं हे मोजण्याची गरज नाही. एका सर्वेक्षणानुसार, तहान लागल्यावर पाणी प्यायलास ते तुमच्या शरीराच्या पाण्याच्या गरजेसाठी पुरेसं असतं. तसंच दिवसभरात तुम्ही सूप, फळं, भाज्या आणि चहा-कॉफी घेतल्यास त्यातूनही शरीरातील पाण्याची गरज भागवली जाते. फक्त जर तुमच्या युरीनचा रंग गडद पिवळा असल्यास तुम्ही प्रकर्षाने जास्त पाणी पिण्याची गरज असते.
9. मिथ – वजन कमी करायचं असल्यास नाश्ता करावा
फॅक्ट – व्यवस्थित नाश्ता केल्यास तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. कारण नाश्ता झाल्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही व वजन आटोक्यात राहते. पण वजन कमी करण्यासाठी नाश्ता करायलाच हवा असं नाही.
10. मिथ – बोटं मोडल्यास आर्थरायटीस होतो
फॅक्ट – बोटं मोडण्याची सवय ही चांगली नसली तरी त्यामुळे आर्थरायटीस नक्कीच होत नाही. मात्र यामुळे तुमच्या हाताची पकडीवर परिणाम होणं किंवा हाताला घाम जास्त येणं अशी लक्षणं दिसू शकतात.
11. मिथ – मल्टी-व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्यास तुम्ही निरोगी राहता
फॅक्ट – मल्टी-व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याचे ही काही दुष्परिणाम लगेच नाही पण उतारवयात दिसू शकतात. त्यामुळे शक्यतो शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वं गोळ्यांऐवजी फळं, भाज्या आणि इतर स्त्रोतांतून मिळवावीत.
12. मिथ – गर्भावस्थेत कधीतरी वाईन प्यायल्यास अपाय होत नाही
फॅक्ट – कोणत्याही परिस्थितीत गर्भावस्थेत अल्कोहोल टाळलंच पाहिजे. कारण गर्भावस्थेत किती प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास त्याचा परिणाम होत नाही, याबाबत कोणताही निष्कर्ष अजून समोर आलेला नाही. त्यामुळे वाईन घेतल्यास त्याचा दुष्पपरिणामही गर्भावर होऊ शकतो.
13. मिथ – जेव्हा लहान मुलांना दात येतात तेव्हा त्यांना ताप येतो
फॅक्ट – पालकांमध्ये असा गैरसमज आढळतो की, जेव्हा लहान मुलांना दात येत असतात तेव्हा त्यांना ताप येतो. पण हे खरं नाहीये. तापाचा आणि दात येण्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तुमच्या मुलाला ताप येत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
14. मिथ – पपई किंवा अननस खाल्ल्यास गर्भपात होतो
फॅक्ट – कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतातच. पण याचा अर्थ हा नाही की ती अपायकारकच असेल. त्यामुळे पपई आणि अननस जर तुम्ही थोड्या प्रमाणात खाल्ल्यास त्याचा अपाय होणार नाही. कारण दोन्ही फळातून चांगली जीवनसत्त्व गर्भाला मिळतील मात्र या फळांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.
15. मिथ – डिओड्रंट वापरल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो
फॅक्ट – डिओड्रंट काखेत लावल्यास त्यातील केमिकल्समुळे कॅन्सर होतो, हा गैरसमज आहे. कॅन्सर होण्याचा आणि डिओड्रंट वापरण्याचा काहीही संबंध नाही.