व्हॅलेंटाईन्स डे काही दिवसांवर आला आहे, मग झाला की नाही तुमचा काही प्लॅन अजून. जर तुमचा प्लॅन झाला असेल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कारण प्रेमाच्या भरात उगाच गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसमोर उगाच फजिती नको व्हायला. नाहीतर व्हॅलेंटाईन्स डे चा फनी मेमरी डे व्हायचा. कारण जे चित्रपटात होतं तसंच खऱ्या आयुष्यातही होईलच असं नाही. असो...या काहीही झालं तरी आम्ही पुढे सांगत असलेल्या या गोष्टींचा नक्की विचार करा आणि हॅपी व्हॅलेटाईन्स डे इन अॅडव्हान्स.
पहिल्याच डेटवर गेल्यावर ते तीन शब्द म्हणू नका
दुसऱ्या कोणत्या मुलीच्या जास्त जवळ जाऊ नका
सलमान खान सगळ्यांनाच आवडत नाही
तुमच्या मनात कितीही असलं तरी पहिल्यांदाच तिच्या किंवा त्याच्याबरोबर डेटवर गेला असाल तर ते तीन शब्द त्याच दिवशी म्हणायची घाई करू नका. हा दिवस एन्जॉय करा. मस्तपैकी मेमरीज बनवा. प्रपोज करा किंवा मनातलं सांगा पण या दिवशी नको. कारण जे तुमच्या मनात आहे ते समोरच्या व्यक्तीच्या मनात नसेल तर उगाच दोघांचा मूड ऑफ होईल आणि जर प्रेम असेल तर मग हा दिवस नक्कीच मेमोरेबल होईल. काय माहीत नकळत दोघांच्या ओठांवर ते मॅजिकल शब्द येतील.
Also Read Love Poems For Valentines Day In Marathi
तुम्हाला तिच्याबद्दल खूप काही वाटतं असलं तरी या दिवशी भावनेच्या भरात वाहू नका आणि तुमच्या कल्पनाशक्तीच्या घोड्यांना आवर्जून लगाम घाला. नाहीतर इंप्रेशन मारायच्या नादात फालुदा व्हायचा. तिच्या मनातल्या भावनाही व्यक्त होतीलच पण थोडा वेळ द्या. तिच्यावर कवितांचा किंवा तुमच्या फ्युचर प्लॅन्सचा मारा करू नका.
जर फ्रेंड्सच्या ग्रुपसोबत फिरायला गेला असाल तर तिला जलस करण्यासाठी उगाच दुसऱ्या मुलीशी जवळीक करू नका किंवा इतर मुलींसाठी जास्त हेल्पफुल होऊ नका. कारण तिला ते नक्कीच आवडणार नाही. ती तसं दाखवणार नाही, पण परिणाम तुम्हाला नंतर लगेचच दिसतील.
वाचा : व्हॅलेंटाईन डे वर होम कसे सजवायचे
आम्हाला माहित्येय मुलींना गप्पा मारायला खूप आवडतं. मग कोणताही विषय त्यांना चालतो. पण पहिल्याच डेटवर त्याला जास्त पकवू नका. त्यालाही बोलायची संधी द्या. तुमच्या गप्पाची सगळी एनर्जी सेव्ह करून पहिली डेट झाल्यावर डेटची गंमत आपल्या गर्ल्स गँगला सांगण्यासाठी जपून ठेवा.
गर्लफ्रेंडसोबत डेट फिक्स झाली म्हणून नको ते स्टंट करून तिला इंप्रेस करायला जाऊ नका. तिचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या स्टंटबाजीवर नाही हे लक्षात असू द्या. कारण जे बॉलीवूड फिल्म्समध्ये दिसतं तेच खऱ्या आयुष्यात होईल असं नाही.
Also Read Dress For Valentines Day In Marathi
तुम्ही कितीही मेहनतीने तुमची बॉडी बिल्ड केलेली असली तरी तिच्यासमोर सलमान खान बनायला जाऊ नका. कारण तिला ते आवडेलच असं नाही आणि चार लोकांमध्ये ते चांगलंही दिसणार नाही.
तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी त्याचा जास्त शो ऑफ करू नका. प्रत्येक मुलीला किंवा मुलाला ते आवडेलच असं नाही. कदाचित नंतर तुम्हाला ते महागही पडू शकतं.
Also Read Tips For Valentines Day In Marathi
व्हॅलेंटाईन डे ला प्लीज कोणतंही प्रँक करू नका. डीडीएलजेमध्ये जसं शाहरूखने काजोलबरोबर केलं तसं तुम्ही तिच्याबरोबर करू नका. हे चित्रपटात बघायला बरं वाटतं पण तुम्हाला माहीत पाहिजे की, तिने या डेटवर येण्यासाठी कितीतरी तास तयारीवर करण्यासाठी घातले असतील. मग तुम्ही का त्याचा विचका करताय. तुमचे सर्व पीजे तुमच्या मित्रांसमोर मारायला चांगले आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही फनी असलात तरी तुमचे जोक तिला आवडतीलच असं नाही. सो कंट्रोल.
माहित्येय तुमच्या आवडत्या मुलांसोबत किंवा मुलीसोबत तुम्हाला डेटवर जाता आलं. तुमचा व्हॅलेंटाईन डे सत्कारणी लागला. पण म्हणून आनंदाच्या भरात तिच्या किंवा त्याच्यासमोरच डान्स करायला सुरूवात करू नका. घरी पोहचा आणि मग नाचून आनंद साजरा करा.
ती डेटला हो म्हणाली. तुम्हाला आवडता रंग लक्षात ठेवून त्याच कलरचा टॉप किंवा ड्रेस घालून भेटायला आली. म्हणून तुम्ही ती आल्या आल्या तिच्याकडे डोळे फाडून बघत राहू नका की, तिला ऑकवर्ड होईल. भावनांना जरा कंट्रोल करा. मग ती पण हळूच लाजेल.
हे झालं व्हॅलेंटाईन डे ला प्रेम करणाऱ्यांच पण सिंगल असलेल्यांनी काय करणं टाळावं.
सिंगल आहात म्हणून निराश होण्याची गरज नाही आणि भावनांच्या भरात वाहूनही जाऊ नका. कारण एका दिवसाने तुमच्या आयुष्यातील सगळी मजा संपणार नाही. असे कित्येक व्हॅलेंटाईन डे तुम्हाला भविष्यात नक्कीच साजरे करता येतील.
आता त्याचं किंवा तिचं एफबी किंवा इन्स्टा अकाउंट पाहून स्वतःला त्रास करून घेऊ नका किंवा त्यावर कोणतीही कमेंटही करू नका. त्यापेक्षा एखादं चांगलं पुस्तक वाचा किंवा आवडता मूव्ही बघा. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा.
जेव्हा एखादं नातं संपतं तेव्हा त्यामागे नक्कीच काही चांगली वाईट कारण असतात. एकमेकांचे जुने फोटोज आणि गिफ्ट्सकडे बघणं आणि मग असं का झालं याचा विचार करणं ही एक न संपणारी गोष्ट आहे. जर तुमचं त्याच्याशी किंवा त्याच्याशी ब्रेकअप झालं असेल तर तिचं किंवा त्याचंही काहीतरी चुकलं असेलच. त्यामुळे व्हॅलेंटाईनला जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा भविष्याचा विचार करा.
तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी शॉपिंग करता मॉलमध्ये जाणार असाल तर थांबा. कारण मॉलमध्ये जेवढं दिवाळीला नसतं तेवढं डेकोरेशन खास व्हॅलेंटाईन डे ला करण्यात येतं. तसंच व्हॅलेंटाईन डे साजरे करणारे अनेक कपल्सही तुम्हाला इकडे दिसतील. त्यामुळे शॉपिंगला जाण्याआधी या गोष्टी लक्षात घ्या.
ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही, फक्त अॅपवर मॅच मेकिंग झालं म्हणून भेटायला जाणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेसाठी टींडर किंवा इतर मॅच मेकिंग अॅप डाऊनलोड करण्याआधी थोडा विचार करा. व्हॅलेंटाईन डे ला आलेल्या मेसेजेसना रिप्लाय देणं वेगळं. पण फक्त स्वाईप करून मिळालेल्या न्यू मॅचला भेटणं योग्य नाही.
सिंगल आहात आणि व्हॅलेंटाईन डेला कॅज्युअल डेटवर जाण्याची संधी मिळालीच तर उत्साहाला थोडा लगाम घाला. तुम्ही व्हॅलेंटाईन डेला नक्कीच कॅज्युअल डेटवर जाऊ शकता पण म्हणून त्याला किंवा तिला लगेच गिफ्ट घेऊन जाऊ नका. कारण नंतर कॅज्युअल डेट चांगली झाली नाहीतर… मग समजून जा.
सर्वात शेवटी एवढंच सांगेन की, हा दिवस साजरा करा पण ‘करायलाच हवा’ असंही नाही. अगदीच फ्रेंड्ससोबत जमत नसल्यास तुमच्या आयुष्यातील खरोखर महत्त्वाच्या असणाऱ्या व्यक्ती म्हणजेच आई-बाबांबरोबर हा दिवस साजरा करा. कारण त्यांचं तुमच्यावर जितकं प्रेम असतं तितकं प्रेम तुमच्यावर कोणीच करत नाही.
हॅपी व्हॅलेटाईन्स वीक.
हेही वाचा -
Valentines day: तुमच्या व्हेलेंटाईनला द्या युजफुल गिफ्टस
Valentines Day: खास दिवशी करायचं आहे प्रपोज...तर या खास टीप्स
Valentines Day: व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या प्रेयसीला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट