Valentines Day: व्हॅलेंटाईन वीकमध्ये सेलिब्रेट करा हे ‘स्पेशल’ डेज (Celebrate Valentine's Day In Marathi)

Valentines Day: व्हॅलेंटाईन वीकमध्ये सेलिब्रेट करा हे ‘स्पेशल’ डेज (Celebrate Valentine's Day In Marathi)

14 फेब्रुवारी संपूर्ण देशभरात ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाला एक 'विशेष' स्थान असतं. त्यामुळे प्रेम या अव्यक्त भावनेला आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ सेलिब्रेशन करणं अगदी उत्तम साधन आहे. दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ खास करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करत असतो. एवढंच नाही तर जगभरात फेब्रुवारी महिन्याती हा संपूर्ण आठवडा ‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणून साजरा करण्यात येतो. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमवीरांसाठी खरंतर प्रत्येक दिवस हा प्रेमाचाच असतो. मात्र व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने प्रेमयुगूलांना हे स्पेशल दिवस अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट करता येतात.


रोझ डे


चॉकलेट डे


प्रॉमिस डे


व्हॅलेंटाईन डे


जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकला कधी पासून सुरूवात होते? (When Does Valentine's Week Start)


7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो.


1. Valentine's Day In Marathi


7 फेब्रुवारी - रोझ डे (Rose Day)


‘रोझ डे’ ला आपल्या जिवलग व्यक्तीला गुलाबाचं फुल देण्यात एक वेगळीच मौज असते. 'रोझ डे' ने व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात होते. त्यामुळे रोझ डे ला प्रेमवीरांच्या प्रेमाला अक्षरशः उधाण आलेलं असतं. कॉलेजवयीन मुलं- मुली रोज डेच्या निमित्ताने त्यांच्या आवडत्या मित्रमैत्रिणींना गुलाबाची फुलं देतात. सर्वात जास्त 'रोझ' मिळणाऱ्या व्यक्तीला 'रोझ किंग' आणि 'रोझ क्वीन' म्हणून घोषित केलं जातं. खरंतर व्हॅलेंटाईन डे ला एखाद्याजवळ प्रेम व्यक्त करण्याआधी त्याच्या मनातील भावनांचा अंदाज घेण्यासाठी 'रोझ डे' एक चांगलं माध्यम ठरू शकतं. कारण फुल स्विकारताना त्या व्यक्तीच्या हाव-भावांवरून तुम्हाला त्यांच्या मनातील भावनांची ओळख होऊ शकते. प्राचीन काळापासून प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून फुलांचा वापर केला जातो. चित्रपटातील अनेक प्रेमगीते आणि रोमॅंटिक सीन्ससाठी गुलाबांचा वापर केला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये लाल रंगाच्या गुलांबांना चांगलीच मागणी असते. त्यामुळे या काळात लाल रंगाचे गुलाब आणि बुके यांची किंमत वाढलेली असते. तुम्ही समोरच्या व्यक्तीला कोणत्या रंगाचं गुलाबाचं फुल देता यावरून तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल काय भावना आहेत हे जाहीर होत असतं.


Also Read Love Poems For Valentines Day In Marathi


2. Valentine's Day In Marathi


रेड रोझ (Red Rose) - आपल्या सर्वांनाच माहित असेल की लाल रंग हे प्रेमाचं प्रतिक आहे. त्यामुळे या रोझ डेला ज्या व्यक्तीवर तुमचं मनापासून प्रेम आहे अशा खास व्यक्तीला लाल रंगाचं गुलाब द्या. प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचं गुलाब देणं हा एक उत्तम पर्याय ठरेल. ज्यामुळे प्रपोज करण्याआधीच तुम्हाला तिच्या अथवा त्याच्या मनातील भावना कळू शकतील.


पिंक रोझ (Pink Rose) - जर तुमच्या मनात एखाद्या बद्दल प्रेमाच्या भावना असतील मात्र ते प्रेम व्यक्त करायची तुम्हाला घाई करायची नसेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.


पर्पल रोझ (Purple Rose) - आजकाल बाजारात विविध रंगाचे गुलाब उपलब्ध असतात. जर तुम्हाला 'लव्ह अॅट फर्स्ट साईट' झालं असेल मात्र विचार करण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा असेल तर या रोझ डेला तिला अथवा त्याला पर्पल रोझ द्या.


पीच रोझ (Peech Rose) - गुलाबाची फुलं फक्त लाईफ पार्टनरसोबत प्रेम व्यक्त करण्यासाठीच वापरली जातात असे नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत असेल. तर अशा एखाद्या खास व्यक्तीला तुम्ही पीच कलरचं रोझ नक्कीच देऊ शकता.


व्हाईट रोझ (White Rose) - सफेद रंग शांतीचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्याची माफी मागायची असेल तर त्या व्यक्तीला या रोझ डेला व्हाईट रोज द्या. ज्यामुळे तुमच्या मनाला आत्मिक शांती मिळेल.


यलो रोझ (Yellow Rose) - असं म्हणतात प्रेमाची सुरूवात मैत्री पासून होते. तुमचा बेस्ट फ्रेंड अथवा तुमची बेस्ट फ्रेंड भविष्यात तुमची लाईफ पार्टनरदेखील होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही कोणाच्या प्रेमात पडला नसाल तर तुमच्या बेस्ट फ्रेंड्सनां या रोझ डे ला पिवळ्या रंगाचं रोझ नक्की द्या.


वाचा : व्हॅलेंटाईन डे वर होम कसे सजवायचे


8 फेब्रुवारी - प्रपोज डे (Propose Day)


प्रेमात पडल्यावर ते व्यक्त करणंही खूप गरजेचं असतं. कारण ही वेळ निघून गेली तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे जर तुमचं एखाद्यावर अथवा एखादीवर खरंच मनापासून प्रेम असेल तर ते या आठवड्यातच व्यक्त करा. व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजेच ‘प्रपोज डे’ प्रेम व्यक्त करण्यासाठी उत्तम ठरेल.


मात्र त्याआधी तुम्ही ज्याच्या अथवा जिच्या प्रेमात आहात त्यांना समजून घ्या. ज्यामुळे तुम्हाला प्रपोज करणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. उदा. जर त्याला अथवा तिला ट्रेकींग अथवा कॅम्पला जाण्याची आवड असेल तर त्यासाठी एखाद्या अॅडव्हेन्चर ठिकाणी घेऊन जावून त्या व्यक्तीला करणं तुम्हाला सोपं जाईल. तो अथवा ती फारच ‘फिल्मी’ वगैरे असेल तर एखादं आवडतं ‘चॉकलेट’, ‘फुल’ अथवा रिंग देऊन तुम्ही अगदी सिनेमात दाखविल्याप्रमाणे या दिवशी प्रपोज करु शकता


3. Valentine's Day In Marathi


या काही हटके पद्धतीने तुम्ही तिला अथवा त्याला प्रपोज करू शकता.


1.रोमॅंटिक डिनर डेट प्लॅन करून प्रपोज करा


2.एखादी साहसी ट्रीप प्लॅन करा आणि प्रपोज करा


3.सरप्राईज मुव्ही नाईट प्लॅन करा आणि इंटरव्हलमध्ये प्रपोज करा


4.एखादा फन डे प्लॅन करा आणि एखाद्या मजेशीर वेळी प्रपोज करा


5.दिवसभर इंटीमेट मेसेज करा आणि संध्याकाळी अगदी भावनिक पद्धतीने प्रपोज करा


बॉयफ्रेंडला प्रपोज करण्याचे 'हे' हटके प्रकार तुम्ही पाहिलेत का ?


9 फेब्रुवारी - चॉकलेट डे (Chocolate Day)


4. Valentine's Day In Marathi


चांगल्या कामाची सुरूवात नेहमी गोड खाऊन केली जाते. चॉकलेट बघून प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस हा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. चॉकलेट ह्रदयासाठीदेखील चांगलं असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्याच्या अथवा जिच्या अस्तित्वाने तुमच्या ह्रदयाची स्पदनं वाढतात अशा तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देणं नक्कीच रोमांचक असू शकेल. चॉकलेटच्या गोडव्या प्रमाणे प्रेमाचा गोडवा वाढण्यासाठी तुम्ही त्याला अथवा तिला चॉकलेट देवून हा दिवस साजरा करू शकता. शिवाय तुमच्या आवडत्या आणि जवळच्या अशा सर्व लोकांना या दिवशी चॉकलेट देऊन आनंद व्यक्त करा. या दिवशी तिला अथवा त्याला एखादं खास डिझाईन अथवा फ्लेवरचं चॉकलेट देणं ही छान कल्पना ठरू शकेल. बाजारात व्हॅलेंटाईन डे निमित्त हार्ट शेपमधील चॉकलेट्स उपलब्ध असतात. एखाद्या खास व्यक्तीसोबत निखळ मैत्रीचा हात पुढे करण्यासाठीही चॉकलेट एक चांगलं माध्यम ठरू शकेल.


वाचा : व्हॅलेंटाईन डे साठी ड्रेस


10 फेब्रुवारी - टेडी डे (Teddy Day)


प्रेमात पडल्यावर प्रिय व्यक्तीला टेटी बिअर भेट देण्याची पद्धत आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. रोज प्रमाणे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचा टेडी देता यावरून तुमच्या मनातील त्या व्यक्तीबाबतच्या भावना व्यक्त होत असतात.


5. Valentine's Day In Marathi


Also Read Tips For Valentines Day In Marathi


रेड टेडी (Red Teddy)


आधीच सांगितल्याप्रमाणे लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक आहे. त्यामुळे लाल रंगाचा टेडी देऊन तुम्ही तुमच्या मनातील प्रेमभावना एखाद्या जवळ अथवा एखादी जवळ व्यक्त करू शकता.


पिंक टेडी (Pink Teddy)


फेब्रुवारीच्या थंडीत हवेतदेखील प्रेमाचे गुलाबी वारे वाहत असतात. अशा गुलाबी थंडीत तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी पिंक टेडी अगदी मस्त ठरेल. शिवाय मुलींना पिंक टेडी फारच आवडतो.


ब्ल्यू टेडी (Blue Teddy)  


निळा रंग अनंताचं प्रतिक आहे. जर या व्हेलेंटाईन वीकमध्ये तुम्हाला ब्ल्यू कलरचा टेडी मिळाला तर देणाऱ्या व्यक्तीचं तुमच्यावर निस्सीम प्रेम आहे असं समजा.


यलो टेडी (Yellow Teddy)


यलो टेडी या प्रेमाच्या आठवड्यात मिळणं मुळीच चांगलं नाही कारण याचा अर्थ समोरची व्यक्ती तुमच्यासोबत ब्रेक - अप करत आहे असा होतो. त्यामुळे चुकूनही तुमच्या आवडत्या व्यक्तीला या आठवड्यात पिवळ्या रंगाचा टेडी देऊ नका.


काळा टेडी (Black Teddy)


व्हॅलेंटाईन वीकमध्ये काळा टेडीदेखील कुणाला देऊ नये. कारण काळा रंग नकारात्मकतेचं प्रतिक आहे. काळा टेडी मिळाल्यास तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून नकार मिळाला आहे असं  समजा.


वाचा - जम सूटमुळे मिळेल ट्रेंडी लुक


11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे (Promise Day)


6. Valentine's Day In Marathi


व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो. रोज, चॉकलेट आणि टेडी गिफ्ट केल्यावर आता एकमेकांना प्रेमात आश्वासन देण्याचा हा काळ असतो. लग्नसोहळ्यात ज्याप्रमाणे एकमेकांना वचन देऊन लग्नगाठ बांधली जाते. अगदी त्याचप्रमाणे प्रेमात पडल्यावर या दिवसाला महत्त्व असतं. कारण प्रत्येक रिलेशनशिपमध्ये प्रॉमिसला फार महत्त्व असतं. रिलेशनशिप म्हटलं की रुसवे - फुगवे हे असणारच शिवाय नात्यातील इतर आव्हानांनाही भविष्यात सतत तोंड द्यावं लागणार असतं. त्यामुळे कोणत्याही रिलेशनशिपमध्ये सुरूवातीलाच कमीटमेंट अथवा बांधीलकी असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रॉमिस डेला तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रेमात वचन देता तेव्हा त्यांचा तुमच्यावरील विश्वास आणखी दृढ होतो आणि नातं मजबूत होत जातं.


या प्रॉमिस डे ला द्या ही प्रेमवचनं (Promise Day As Your Love Story)


1. कोणत्याही प्रसंगी मी तुझ्यासोबत सदैव असेन


2. मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन


3.आपल्या नात्यात मी नेहमी प्रामाणिक राहीन


4. प्रत्येक क्षणी मी तुझी काळजी घेईन


5. आयुष्यात मी आपल्या नात्याला प्रथम प्राधान्य देईन


6. कामात कितीही व्यस्त असताना दररोज काही क्षण हे फक्त तुझेच असतील12 फेब्रुवारी - हग डे (Hug Day)


7. Valentine's Day In Marathi


वाचा - मित्रांसाठी व्हॅलेंटाईन डे मेसेजेस


'हग करणे' म्हणजे मिठी मारणे. प्रेमात एकमेकांना मारलेली घट्ट मिठी फार महत्त्वाची असते. कारण प्रेम व्यक्त करण्याचं ते एक सुंदर माध्यम असतं. शिवाय एकमेकांना मिठी मारल्याने तुमच्या शरीरावर आणि पर्यायाने आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. मिठी मारल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि तुमच्यामध्ये सळसळता उत्साह निर्माण होतो. चिंता -काळजी दूर करण्यासाठी किंवा प्रेमामधील ताण - तणाव दूर करण्यासाठी हग केल्याने चांगला फायदा होऊ शकतो. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांनी एकमेकांना हग केल्याने त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एकमेकांना सुरक्षित वाटणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कुशीत असता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त शांत आणि निवांत वाटत असते. त्यामुळे कितीही व्यस्त असला तरी दररोज एकमेकांना भेटल्यावर हग करायला मुळीच विसरू नका. आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी हग डे अवश्य सेलिब्रेट करा.13 फेब्रुवारी - किस डे (Kiss Day)


व्हॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्त्वाचा आणि रोमॅंटिक दिवस म्हणजे किस डे. कारण या दिवशी प्रेमीयुगूल किस करून त्यांच्या मनातील प्रेमभावना एकमेकांना व्यक्त करत असतात. मिठी प्रमाणेच किस केल्यावरही त्याचे शरीरावर खूप चांगले परिणाम होतात. किस केल्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहतात. शिवाय किस केल्यामुळे तुमच्या प्रेमाच्या भावनेमध्ये अधिक वाढही होते. किस करून तुम्ही एकमेकांना प्रेमामध्ये योग्य तो सन्मान देत असता. व्हॅलेंटाईन वीक अधिक रोमॅंटिक करण्यासाठी किस डे ला तुमच्या प्रिय व्यक्तीला किस करायला मुळीच विसरू नका.


8. Valentine's Day In Marathi


किस करण्याचे निरनिराळे प्रकार (Types Of Kisses)


1. एस्किमो किस


2. फ्रेंच किस


3. व्हॅम्पायर किस


4. ईअरलोब किस


5. सिंगल - लिप किस


6. अपसाईड डाऊन किस


7. एंजेल किस


8. बॅक ऑफ द नेक किस


9. टीझर किस


10. फोरहेड किस


किस घेताय ना...किस घेण्यालाही असतात अर्थ


14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (Valentine  Day)


प्रत्येक प्रेम करण्याऱ्या व्यक्तीसाठी 'व्हॅलेंटाईन डे' हा एक स्पेशल दिवस असतो. रोज डे पासून सुरू झालेल्या प्रेम आठवड्याची जरी व्हॅलेंटाईन डेने समाप्ती होत असली तरी प्रेमवीरांसाठी त्यानंतरचा प्रत्येक दिवस तितकाच खास असतो. तरूण मुलं -मुली हा दिवस अगदी जल्लोषात साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणत्या दिवसाचं काय महत्त्व आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगितलं आहेच. या टीप्सचा वापर करून तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देण्यासाठी काहीतरी मस्त प्लॅन  करा आणि हा वीक जल्लोषात सेलिब्रेट करा.


9. Valentine's Day In Marathi


अधिक वाचा


प्रेमात त्याने / तिने ‘गृहीत’ धरणं कितपत योग्य


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम