ADVERTISEMENT
home / Budget Trips
रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी – Valentines Day With Your Partner In Marathi

रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा ‘रोमँटिक’ ठिकाणी – Valentines Day With Your Partner In Marathi

प्रेम म्हणजे केवळ भावना नाहीत तर, दोन मनांना जोडणारी अशी ही भाषा आहे. कितीही वेळा आपल्याला प्रेम व्यक्त करायला लागलं असलं तरीही आपण आपल्या प्रेमळ आणि आवडत्या माणसावर प्रेम व्यक्त करण्याची संधी शोधत असतो. खरंतर आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करत राहणं गरेजचं असतं. असं असेल तरच तुमच्या आयुष्यात प्रेम टिकून राहतं आणि रोज नव्याने जगता येतं. अर्थात उठता बसता प्रेम व्यक्त करायची गरज नाही. पण निदान काहीतरी काळजीचे दोन शब्द बोलून दिवसातून आपलं प्रेम आहे हे जाणवून दिलं तरीही खूप काही नात्यामध्ये मिळवता येतं हे नक्की. यासाठी हल्ली बरेच व्हॅलेंटाईन कोट्स वा स्टेटसही आपण पाठवतो. फेब्रुवारी महिना सुरु झाल्यावर खरंतर प्रेमाचे वारे जास्त वाहू लागतात. केवळ माणसांमध्येच नाही तर अगदी निसर्गही खूप रम्य असतो यावेळी. हलकीशी थंडी आणि थोडीसं दमट असं काहीसं वातावरण असतं आणि या निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर दिवस आणि रात्र घालवणं म्हणजे सर्वात मोठा आनंद. या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आणि जर त्यादिवशी जमत नसेल तर, येणाऱ्या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला घेऊन कुठे जाणार आहात? काही ठरवलं आहे का? आणि जर ठरवलं नसेल तर लागलीच ठरवायला घ्या, आम्ही तुम्हाला काही खास रोमँटिक ठिकाणं सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमचे प्रेमाचे क्षण आपल्या जोडीदाराबरोबर घालवून ते क्षण अविस्मरणीय करू शकता. पुन्हा एकदा नव्याने तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात पडू शकता.

फिरण्यासाठी अप्रतिम रोमँटिक ठिकाणं (Romantic Places To Visit In Maharashtra)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणं अशी आहेत जी तुम्हाला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी फिरता येतील. तुम्हाला एकमेकांच्या बरोबर एकांतात आणि सुंदर वेळ घालवता येईल. तसंंच तुम्हाला तितकाच निसर्गाचाही आस्वाद घेता येईल. आपण इथे अशीच काही ठिकाणं जाणून घेणार आहोत. 

1. मालवण, महाराष्ट्र (Malvan, Maharashtra)

प्रेम म्हटलं की, निसर्गाच्या रम्य ठिकाणी एकत्र असणं ही प्रत्येकाची रोमँटिकपणाची फँटसी असते. तुम्ही यावर्षी महाराष्ट्रातील मालवणमध्ये तुमचा व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता. मालवणचे समुद्रकिनारे आणि तिथलं वातावरण फेब्रुवारी महिन्यात अतिशय रम्य असतं. शिवाय काही ठिकाणं इतकी फिरून झालेली असतात की, त्याच ठिकाणी पुन्हा जायची इच्छा नसते. सुट्ट्यांच्यादेखील अडचणी असतात. असं असताना अगदी तीन ते चार दिवसात तुमची मालवणची मस्त ट्रीप होते. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. तुम्हाला जर निसर्गाची आवड असेल आणि चांगल्या वातावरणात तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याची इच्छा असेल तर मालवण हा उत्कृष्ट पर्याय आहे. शिवाय मालवणमध्ये आता वॉटर स्पोर्ट्सदेखील चालू करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर व्हॅलेंटाईनच्या वेळी आपल्या जोडीदाराबरोबर अॅडव्हेंचर ट्राय करायचे असतील तर मालवणला नक्की भेट द्यायला हवी.

Waterboat - Romantic Places To Visit In Maharashtra

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 15 ते 16 हजार

वाचा – व्हॅलेंटाईन डे पतीसाठी उद्धरण

2. गणेशगुळे, महाराष्ट्र (Ganeshgule, Maharashtra)

गणपतीपुळे हे ठिकाण तसं तर सर्वांनाच माहीत आहे. पण महाराष्ट्रातील काही समुद्रकिनाऱ्यांवर आजही पर्यटक जात नाहीत. पण हे किनारे अतिशय सुंदर आहेत. त्यापैकीच एक समुद्रकिनारा म्हणजे गणेशगुळे. कोकणातील रत्नागिरीमध्ये असलेला हा समुद्रकिनारा लहान पण अतिशय स्वच्छ आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी हवा असणारा एकांत आणि शांतता याठिकाणी जोडप्यांना नक्कीच मिळते. शिवाय इथे खाण्यापिण्याचीही अतिशय चांगली सोय आहे. पावसच्या अगदी जवळ असणारा हा समुद्रकिनारा एक खूपच चांगला पर्याय आहे. मुळात इथे जास्त गर्दी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येतो. इथे जाण्यासाठी तुम्हाला रत्नागिरीपर्यंत ट्रेन आणि नंतर रिक्षा हा पर्याय आहे. अथवा तुम्ही तुमचं खासगी वाहन घेऊन जाणार असाल तर जास्त चांगलं. स्वच्छ समुद्रकिनारे फार कमी ठिकाणी मुंबईत पाहायला मिळतात. पण कोकण किनाऱ्यावरील असा स्वच्छ समुद्रकिनारा, आपल्या आवडत्या माणसाची साथ आणि व्हॅलेंटाईन डे हे कॉम्बिनेशन म्हणजे सोने पे सुहागा आहे.

ADVERTISEMENT

Ganeshgule beach

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 15 ते 16 हजार

3. सिल्व्हासा (Silvassa)

मुंबईपासून तुम्हाला जास्त लांब जायचं नसेल तर सिल्व्हासा हा पर्याय अप्रतिम आहे. महत्त्वाचं म्हणजे कमी प्रवास आणि लगेच पोहचून तुम्हाला एकमेकांना जास्त चांगला वेळ देता येतो. सिल्व्हासामध्ये असणारी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, बटरफ्लाय गार्डन, लायन सफारी आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण असणारी धरणं तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर सिल्व्हासाच्या वातावरणाची तुम्ही मजा घेऊ शकता. सिल्व्हासा हे शहर पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी खूपच चांगले असल्यामुळे तुमच्या व्हॅलेंटाईनबरोबर स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. तसंच अंतर कमी असल्यामुळे तुम्हाला जायला आणि यायला खासगी वाहनाचा उपयोग करता येतो. तसं करायचं नसल्यास, तुम्हाला ट्रेनचाही पर्याय उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 10 ते 13 हजार

व्हॅलेंटाईन डे साठी जंपसूट

ADVERTISEMENT

4. कर्जत (Karjat)

कर्जत हे मुंबईपासून जास्त लांब नाही. त्यामुळे अगदी तुम्हाला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सुट्टी मिळत नसली. तरीही तुम्ही हाफ डे घेऊन अथवा अगदी संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत ऑफिसमधून निघून आपल्या जोडीदाराबरोबर कर्जतला जाऊ शकता. कर्जतमधील वातावरण माथेरानप्रमाणेच असतं. फेब्रुवारी महिना असल्यामुळे साधारण फ्रेबुवारी संपेपर्यंत या ठिकाणी थंडी असते. शिवाय कर्जतमध्ये राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि तिथल्या रिसॉर्ट्समध्ये चांगल्या सुविधादेखील उपलब्ध आहेत. कर्जतमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला धरणं आहेत. पण त्याहीपेक्षा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर एकत्र क्षण घालवायचे असतील तर तिथल्या रिसॉर्टमध्येदेखील तुमची चांगली सोय करण्यात येते. त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवा तसा एक किंवा दोन दिवसाचा व्यवस्थित प्लॅन करू शकता. शिवाय कर्जतला जाण्यासाठी सतत ट्रेन्स उपलब्ध असल्यामुळे जास्त खर्चही येत नाही. प्रवासाचे तासही वाचतात. तुम्हाला ट्रेनने जायला आवडत नसेल आणि तुमच्या जोडीदाराबरोबर खासगी वाहनातही क्षण एकत्र घालवायचे असतील तर तुम्ही तसा प्लॅनदेखील करू शकता. जास्तीत जास्त तीन ते साडेतीन तासात तुम्ही कर्जतला पोहचता.

Karjat Lake

राहण्याचा कालावधी – एक ते दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 10 ते 13 हजार

ADVERTISEMENT

5. राजमाची (Rajmachi)

कोकणचा एक भाग असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं एक सुंदर गाव. पुण्याजवळील एक रोमँटिक स्थळ. लोणावळ आणि खंड्याळ्याच्या मध्ये असलेले हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते खरं तर ट्रेकिंगसाठी. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्हाला ट्रेकिंग करायचं असेल तर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही हा प्लॅन नक्कीच करू शकता. श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन जुने गड याठिकाणी आहेत. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला जर ट्रेकिंगची आवड असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी नक्कीच चांगला आहे. शिवाय या ठिकाणचं वातावरण नेहमीच ताजंतवानं आणि हवहवंसं वाटणारं असतं. त्यामुळे थकवा येत नाही. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी असल्यामुळे तुम्हाला एकमेकांबरोबर अशा वातावरणामध्ये चांगला वेळ घालवता येऊ शकतो.

Rajmachi

राहण्याचा कालावधी – एक ते दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 10 ते 13 हजार

ADVERTISEMENT

6. कामशेत (Kaamshet)

वास्तविक बऱ्याचदा सुट्ट्यांची अडचण होत असते. अशावेळी आपल्याला जोडीदाराबरोबर तर राहायचं असतं पण नोकरीचादेखील प्रॉब्लेम नको असतो. त्यावेळी मुंबईच्या आसपास पण तरीही शांतता असणारी ठिकाणं आपण शोधतो. कामशेत हे त्यातील एक ठिकाण. लोणावळाच्या अलीकडे असणारा कामशेत हा फिरण्याासाठी आणि आपल्या जोडीदाराबरोबर व्हॅलेंटाईन साजरं करण्यासाठीचा उत्कृष्ट पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी जास्त खर्च येत नाही. दुसरं म्हणजे ट्रेन आणि खासगी वाहन हे दोन्ही पर्याय असतात. तिसरं म्हणजे खिशाला परवडणारं हे ठिकाण आहे. त्याशिवाय आता या ठिकाणी चालू झालेले पॅराग्लायडिंग हा आकर्षणाचा विषय आहे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला निसर्गाच्या सान्निध्यात एकमेकांबरोबर राहण्यासाठी कामशेतला नक्की भेट द्यायला हवी. इथली हिरवळ तुमच्या मनातील थकवा एकदम दूर करते. शिवाय येथील पवना तलाव, शिंदे वाडी हिल्स, कोंडेश्वर मंदीर, बेडसा आणि भैरी लेण्या ही फिरण्याची अप्रतिम ठिकाणं आहेत. त्यामुळे दोन दिवस तुम्ही या ठिकाणी खूप फिरूही शकता आणि मजा करू शकता. एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी कामशेत हा नक्कीच चांगला पर्याय आहे.

Paragliding - Romantic Places To Visit In Maharashtra

राहण्याचा कालावधी – एक ते दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 12 ते 15 हजार

ADVERTISEMENT

7. पाचगणी (Panchgani)

मुंबईपासून साधारण पाच तासांच्या अंतरावर असणारं हे ठिकाण निसर्गाने पुरेपूर असं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपल्ससाठीच हे ठिकाण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निसर्गाने भारलेलं असं हे हिल स्टेशन व्हॅलेंटाईन साजरं करण्यासाठी छान ठिकाण आहे. प्रेमाच्या आणाभाका घेत इथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं म्हणजे प्रत्येक कपल्ससाठी एक स्वप्नंच. पाचगणीमध्ये फिरण्यासाठी अनेक पॉईंट्स असल्यामुळे इथे निसर्गाचा आस्वाद घेत तुम्ही खूप फिरू शकता आणि आपल्या जोडीदाराबरोबर अविस्मरणीय क्षण घालवू शकता. हिल स्टेशन असल्यामुळे इथे नेहमीच थंडी असते. अगदी कडाक्याची नसली तरीही हवेत कायम गारवा जाणवत असतो. त्यामुळे कपल्सनादेखील इथे जाणं खूप आवडतं. टेबल लँड, राजपुरी लेण्या, कमालगड, डेव्हिल्स किचन, पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट अशी अनेक ठिकाणं तुम्ही इथे पाहू शकता.

Panchgani

राहण्याचा कालावधी – एक ते दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 15 ते 17 हजार

ADVERTISEMENT

8. बटरफ्लाय बीच, गोवा (Butterfly Beach, Goa)

काय नेहमी गोव्यालाच जायचं? असा प्रश्न सहसा सगळेच म्हणतात. काहीही असो सर्व उठसूठ गोव्याला जात असतात. पण गोव्यातही अशी अनेक ठिकाणं आहेत जी रोमँटिक आहेत आणि त्याठिकाणांबद्दल फारच कमी लोकांना माहीत असतं. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे बटरफ्लाय बीच. खरं तर या ठिकाणी समुद्रकिनारा असूनही जास्त गरम होत नाही. शिवाय हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनाऱ्यावरील मंद हवा आणि तुमचा आवडता जोडीदार हे अफलातून काँम्बिनेशन तुम्ही इथे अनुभवू शकता.

Butterfly Beach Goa

राहण्याचा कालावधी – दोन ते तीन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 22 ते 25 हजार

ADVERTISEMENT

9. ताम्हीणी घाट हिल स्टेशन (Tammani Ghat Hill Station)

सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले ताम्हीणी घाट हिल स्टेशन हे व्हॅलेंटाईन डे साठी आणि अगदी कोणत्याही विकेंडला जाण्यासाठी चांगले आहे. हिरवळत, तलाव आणि धबधब्यांनी नटलेला असा ताम्हीणी घाट कोणालाही आवडले असा आहे. तर प्रेमात असणाऱ्या जोडप्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. अशा नैसर्गिक आणि नयनरम्य वातावरणामध्ये अगदी प्रेम फुलायलाही मदत होते. शिवाय एकमेकांच्या अधिक जवळ येण्यासाठी अशा वातावरणाचाही फायदा होतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साठी याच्याइतका चांगला पर्याय नक्कीच असू शकत नाही. रोमँटिक ठिकाणांपैकी उत्कृष्ट रोमँटिक ठिकाण असलेला एक ताम्हीणी घाट हिल स्टेशन हा परिसर आहे.

Tammani Ghat Hill Station

राहण्याचा कालावधी – दोन ते तीन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 10 ते 13 हजार

ADVERTISEMENT

10. कोलाड (Kolad)

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला बेस्ट व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा असेल तर कोलाडला नक्की जा. या ठिकाणी जगातील उत्कृष्ट रिव्हर राफ्टिंग असून तुम्हाला जर निसर्ग खूप आवडत असेल तर तुम्हाला नक्की मजा येईल. निसर्गाचा आनंद घ्यायला आणि एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण चांगलं आहे. शिवाय हे ठिकाण मुंबईपासून फक्त 130 किलोमीटवर असल्यामुळे तिथे पोहचायला जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही तुमच्या खासगी वाहनानेदेखील कमी वेळामध्ये इथे पोहचू शकता. तुम्ही तुमचे रोमँटिक क्षण या ठिकाणी जास्त काळ व्यतित करू शकता. शिवाय तुम्हाला जर अॅडव्हेंचर करण्याची इच्छा असेल तर त्यासाठीदेखील तुम्हाला या ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Legs In A Boat - Romantic Places To Visit In Maharasthtra

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 15 ते 17 हजार

ADVERTISEMENT

11. भंडारदरा (Bhandardara)

खळखळते झरे आणि धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा भंडारदरा हे ठिकाण व्हॅलेंटाईनसाठी अप्रतिम ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीत असणारं हे ठिकाण हिरवळीने आणि सौंदर्याने नटलेलं आहे. भंडारदराला जाण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. शिवाय हे ठिकाण मुंबईहून जवळ असून साधारण चार तास लागतात. तुमच्या व्हॅलेंटाईला अर्थात तुमच्या भागीदाराला सरप्राईज देण्यासाठी हे नक्कीच अप्रतिम ठिकाण आहे.  

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 15 ते 17 हजार

12. लोणार (Lonar)

जगातील आश्चर्यांपैकी असणारं एक ठिकाण म्हणजे लोणार. 6000 फूट रूंद आणि 500 फूट खोली असणारं हे सरोवर फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुमच्या प्रेमाच्या दिवसासाठी हे मनमोहक ठिकाण नक्कीच सुंदर आहे. हे एकमेव असं सरोवर आहे ज्याचं पाणी खारट आहे. मुंबईच्या जवळील रोमँटिक ठिकाणांपैकी हे एक आहे. तसंच इथे फिरण्यासारखी बरीच काही ठिकाणं आहेत. ऑक्टोबर ते मार्च हा इथे फिरण्याचा काळ आहे. याशिवाय तुम्ही गोमुख मंदीरदेखील बघू शकता. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – एक दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 10 ते 12 हजार

13. काशीद बीच (Kashid Beach) 

Kashid Beach

अलिबागमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत जे तुम्ही फिरू शकता. पण त्यापैकी काशीद बीच हा व्हॅलेंटाईन डे साठी खास ठरतो. पांढऱ्या वाळूचा हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि फिरण्यासाठी सुंदर आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर या ठिकाणी एकांतात वेळ घालवू शकता. व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता. शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य याने नटलेला हा समुद्रकिनारा प्रेमाचे क्षण घालवण्यासाठी खूपच छान ठरतो. रोमँटिक ठिकाणांमध्ये याची गणती होते. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 17 ते 20 हजार

14. लवासा (Lavasa)

Lavasa - Romantic Places To Visit In Maharashtra

लवासा हे  खरं तर मुंबईपासून चार तासावर आहे. अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण. रोमँटिक दिवस घालवण्यासाठी खूपच सुंदर ठिकाण असून इथे तुम्हाला बरीच कपल्स दिसतील. व्हॅलेंटाईन डे साठी हे ठिकाण बरेच जण बुक करतात. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला गाडी हाच पर्याय आहे. अन्यथा ट्रेनने गेल्यास, तुम्हाला पुन्हा गाडी करून जावं लागतं. थोडंसं महाग हे ठिकाण असलं तरीही तुम्हाला जर मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून काही क्षण आपल्या जोडीदाराबरोबर मजेत घालवायचे असतील तर हे ठिकाण नक्कीच चांगला पर्याय आहे. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – दोन दिवस 

ट्रीपचा साधारण खर्च – 25 ते 30 हजार

15. माथेरान (Matheran) 

Matheran

मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर असणारं माथेरान हे प्रत्येकासाठी खरं तर मनाजवळचं ठिकाण. माथेरानला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. फेब्रुवारी महिन्यात इथे असणारी थंडी आणि तिथलं वातावरण हे तुम्हाला खूपच आनंद देते. त्याशिवाय इथली शांतता जोडप्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. माथेरानमधील वातावरण हे प्रेमासाठी नेहमीच उत्तम ठरतं. त्यामुळे तुम्ही व्हॅलेंटाईनसाठी नक्कीच माथेरान हा पर्यायही उत्तम आहे. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – एक अथवा दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 10 ते 12 हजार

16. सापुतारा (Saputara)

Saputara

सह्याद्रीच्या कुशीतील सापुतारा हादेखील एक मस्त पर्याय व्हॅलेंंटाईन डे साठी तुमच्यारडे उपलब्ध आहे. गुजरातच्या वेशीजवळ असणारं सापुतारा हे डोंगर दऱ्यांनी वसलेले आहे. स्वर्गाप्रमाणेच सुंदर इथला निसर्ग आहे. इथे येऊन सूर्योदय आणि सूर्यास्त पाहून तुमचं मन उत्साहित राहातं. तसंच कपल्स एकमेकांबरोबर खूप चांगला वेळ घालवू शकता. हे ठिकाण गुजरातमध्ये येत असलं तरीही मुंबईपासून जवळ आहे. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – एक अथवा दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 16 ते 20 हजार

17. कर्नाळा (Karnal)

Karnal

कर्नाळा हे अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. पण कपल्ससाठीही हे ठिकाण खूपच सुंदर आहे. व्हॅलेंटाईन डे साठी तुम्हाला इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. तुम्हाला साहस करायला आवडत असेल तर तुमच्या जोडीदारासह तुम्ही दोन दिवसाचा ट्रेकही कर्नाळ्याला तुम्ही करू शकता. कर्नाळा हे निसर्गरम्य ठिकाण असून तुमच्या धकाधकीच्या आयुष्यातून एक वेगळा आनंद तुम्हाला इथे मिळतो. इथलं पक्षी अभयारण्य हे अप्रतिम आहे. तुम्ही जर नेचर लव्हर असाल तर तुम्हाला हे ठिकाण नक्कीच समाधान देईल. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – एक अथवा दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 16 ते 20 हजार

18. भाट्ये, रत्नागिरी (Bhatye, Ratnagiri)

Bhatye Ratnagiri

समुद्रकिनारा आणि तोदेखील अगदी स्वच्छ आणि एकांत देणारा असेल असं तुम्हाला कोणी सांगितलं तर. हो असा समुद्रकिनारा आहे रत्नागिरीतील भाट्ये येथे. तुम्हाला हवी असणारी शातंता आणि एकांत तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. कोणत्याही प्रकारची गर्दी नाही. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या जोडीदाराबरोबर आपल्याला हवा तसा एकांत घालवायला मिळणं यासारखं दुसरं सुख ते काय असू शकतं. फक्त मुंबईपासून थोड्या अंतरावर ही जागा आहे. पण इथे गेल्यानंतर तुम्ही सगळं विसराल हे नक्की. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – एक अथवा दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 13 ते 16 हजार

19. मुळशी (Mulshi)

Mulshi

मुंबईपासून साधारण चार तासांच्या अंतरावर असणारं मुळशी हे ठिकाण. पुण्याजवळ असणारं मुळशी हे निसर्गरम्य ठिकाण असून इथे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. इथे तुम्हाला राहण्यासाठीही खूपच पर्याय उपलब्ध आहेत. मुळात पावसाळा असो अथवा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये इथलं वातावरण अतिशय निसर्गरम्य असतं. व्हॅलेंटाईनच्या वेळी तर तुम्ही हे ठिकाण निवडलंत तर तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल. निसर्ग आणि त्यातही आपल्या मनाला हवी असणारी शांतता याचं मिश्रण याठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळतं. इथे येणं थोडं खर्चिक असलं तरीही इथे दोन दिवसाचं वास्तव्य हे जन्मभर लक्षात राहणारं ठरतं. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – एक अथवा दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 25 ते 30 हजार

20. पवना लेक (Pavana Lake)

Pavana Lake

पवना लेकवर जाणं हा एक वेगळाच अनुभव आहे. टेंटमध्ये नदीच्या किनारी राहून निसर्गाचा अनुभव घेणं. कपल्ससाठी तर हा नक्कीच एक वेगळा अनुभव ठरेल. इथे तुम्ही एकांतात वेळही घालवू शकता किंवा कॅम्पेनही करू शकता. आपल्या जोडीदाराबरोबर खास दिवशी अशा ठिकाणी जाण्याची आणि तिथला अनुभव घेण्याची मजा काही औरच. 

ADVERTISEMENT

राहण्याचा कालावधी – दोन दिवस

ट्रीपचा साधारण खर्च – 25 ते 30 हजार

नेहमीच्या पर्यायापेक्षा आणि इतर ठिकाणी जाऊन अधिक पैसे घालण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणांचा विचार करू शकता. शिवाय या ठिकाणी कमी गर्दी आणि निसर्गामध्येही तुम्ही रमू शकता.  त्यामुळे तुम्हाला जर यावेळी कुठे नक्की जायचं हा प्रश्न असेल आणि नेहमीचे पर्याय नको असतील या पर्यायांचा तुम्ही नक्की विचार करा.

प्रश्नोत्तरं (FAQs)

1. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अशा ठिकाणी जाताना नक्की काय काळजी घ्यायला हवी? 

ADVERTISEMENT

तुम्ही एकतर कोणत्या ठिकाणी जात आहात याची व्यवस्थित माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तसंच ज्या ठिकाणी राहणार आहात ते हॉटेल अथवा घर व्यवस्थित आहे की नाही, त्याचं रेटिंग व्यवस्थित आहे की नाही याचा तपास करून मगच बुकिंग करा.

2. कपल फ्रेंडली हॉटेल्स कशी शोधायची?

हॉटेल शोधताना तुम्ही त्याचे नियम वाचून घ्यावेत. ऑनलाईन बुकिंग करताना तुम्ही फोन करून व्यवस्थित माहिती विचारून घ्या. तसंच तुम्ही तिथे किती दिवसांसाठी जाणार आणि तुमचं योग्य आधार कार्ड अथवा योग्य माहिती असलेल्या गोष्टी तुमच्या बरोबर ठेवा. 

3. जोडीदारासाठी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे ला हॉटेल्सकडून मदत मिळते का?

ADVERTISEMENT

हो तुम्ही जर तुमचा काही सरप्राईज प्लॅन असेल तर बुकिंगच्या वेळी हॉटेलला कल्पना देऊन ठेवू शकता. त्याचवेळी  तुम्ही स्पेशल केक अथवा इतर गोष्टींची ऑर्डरही देऊ शकता. जेणेकरून तुमचा हा दिवस अधिक खास बनेल. 

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा – 

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

ADVERTISEMENT

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

New Year Plans: ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

06 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT