निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी 'नारळाचे तेल' (Benefits Of Coconut Oil In Marathi)

निरोगी आरोग्य आणि सौंदर्यासाठी वापरा बहुगुणी 'नारळाचे तेल' (Benefits Of Coconut Oil In Marathi)

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्य आणि सौंदर्याबाबत अनेक समस्या निर्माण होत असतात. कधी कधी छोट्या-छोट्या समस्यांसाठी डॉक्टर आणि पार्लरमध्ये जाण्याची गरज असतेच असं नाहा.कारण या समस्यांना दूर करण्याचे उपाय आपल्या घरातच दडलेले असतात. जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आणि काही घरगुती उपचारा करुन  तुम्ही निरोगी आयुष्य आणि सदाबहार सौंदर्य मिळवू शकता.


आपल्या सर्वांच्या घरात नारळाचे तेल असतेच. कारण नारळाचे तेल अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरते. या नारळाच्या  तेलाचा तुम्ही आरोग्य सुधारण्यासाठी आणि सौंदर्य वाढविण्यासाठी वापर करू शकता. यासाठी जाणून घेऊयात नारळाच्या तेलाचा आपल्या आरोग्य  आणि सौंदर्यावर काय परिणाम होतो.


नारळाचे तेलाचे सौंदर्य फायदे


केसांसाठी उपयुक्त नारळाचे तेल


नारळाच्या तेलाचा लहान मुलांवर होणारे परिणाम


नारळाच्या तेलाचे आरोग्या फायदे


coconut-oil-benefits-for-skin-in_marathi


नारळाचे तेलाचे सौंदर्य वाढविण्यासाठी फायदे (Benefits of Coconut Oil for Skin)


बाह्य सौंदर्यांपेक्षा खरंतर तुमचं मन आणि विचार किती सुंदर आहेत हे फार महत्त्वाचं असतं. पण असं असलं तरी तुमच्या बाह्यसौदर्यांकडे दुर्लंक्ष करून मुळीच चालणार नाही. कारण सर्वात आधी तुमची ओळख तुमचं सौंदर्यच करून देत असतं. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी मुली अनेक प्रयत्न करत असतात. काहीजणी तासनतास पार्लरमध्ये वेळ घालवतात तर काहीजणी निरनिराळे प्रयोग घरीच करत बसतात. काहीही करण्याआधी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवा की, बाजारातील केमिकलयुक्त उत्पादनांचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो. शिवाय जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला बाजाारातील उत्पादने काळजीपूर्वकच वापरावी लागतात. पण याऐवजी तुम्ही नारळाच्या तेलाचा सौंदर्य वाढविण्यासाठी वापर केला तर तुम्हाला काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. कारण नारळाच्या तेलाचे तुमच्या सौदर्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.


क्रीम ब्लश (Cream Blush)


ब्लशींग करण्यासाठी चेहऱ्यावर क्रीम लावा आणि हाताच्या बोटांनी चीकबोन्सवर थोडसं नारळाचं तेल लावा. त्यानंतर अगदी हलक्या हाताने त्यावर थोडंसं मसाज करा. तेल त्वचेवर मुरल्यावर गालांवर थोडीशी लिपस्टिक लावा आणि ती व्यवस्थित मर्ज करा. तुमचे ब्लश चीक तयार आहेत.


स्क्रबर (Scrub)


हिवाळ्यात तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर एखाद्या स्क्रबरप्रमाणे केला जाऊ शकतो.. कारण नारळाच्या तेलातील गुणधर्मांमुळे त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते. यासाठी नारळाच्या तेलात साखर मिसळून तुम्ही घरीच हा स्क्रब तयार करू शकता.


मेकअप रिमूव्हर (Makeup Remover)


ज्यांची त्वचा अती संवेदनशील आहे असे लोक बाजारातील कोणतेही उत्पादन त्वचेवर लावण्यास घाबरतात. त्यामुळे जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर नारळाचे तेल तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरेल. तुम्ही मेकअप रिमूव्हल म्हणुन नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. हिवाळ्यात नारळाच्या तेलाने मेकअप काढल्यामुळे त्वचा कोरडी होत नाही.


डोळ्यांच्या खालील त्चचा खूपच नाजूक असते. नारळाच्या तेलामुळे या त्वचेचे चांगले पोषण होते. डोळ्यांच्या खाली सुरुकुत्या येऊ नये यासाठी त्या भागावर नारळाचे तेल लावून मसाज करा.


नैसर्गिक मॉश्चराईझर (Natural Moisturizer)


नारळाच्या तेलामुळे डेड स्कीन कमी होते आणि त्वचा नितळ दिसू लागते. शिवाय याचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्यामुळे कोणत्याही त्वचा समस्येवर नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाचे तेल एक उत्तम मॉश्चराईझर आहे.


वाचा - आरोग्यासाठी दालचिनी चे फायदे (Health Benefits Of Cinnamon)


नखांची काळजी घेण्यासाठी (For Nails)


महिलांमध्ये नखे तुटण्याची समस्या वारंवार दिसून येते. जर तुम्हाला ही समस्या दूर करायची असेल तर नखांना नियमित नारळाचे तेल लावा. ज्यामुळे तुमची नखे तुटणार तर नाहीतच शिवाय ती सुंदरही दिसतील.


coconut-oil-benefits-for-hair-in_marathi


डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी (Dark Circles)


रात्रीचं जागरण आणि ताण यामुळे तुम्हाला डार्क सर्कल्सची समस्या होत असेल तर कापसाच्या मदतीने डोळ्यांच्या खाली नारळाचे तेल लावा. या उपायामुळे तुमचे डार्क सर्कल्स कमी होतील.


लिप बाम (Use as Lip Balm)


हिवाळ्यात ओठांना मऊ ठेवण्यासाठी लिप बाम वापरणं खूपच गरजेचं आहे. नारळाच्या तेलापासून लिप बाम तयार करण्यासाठी एका छोट्या बरणीत अथवा डबीत  नारळाचं तेल भरून ठेवा आणि नियमित ते ओठांना लावा.


लिप ग्लॉस (Use as Lip Gloss)


जेव्हा तुम्ही मॅट लिपस्टिक ओठांवर लावता तेव्हा ओठ कोरडे दिसण्याची शक्यता असते. यासाठी लिपस्टिक लावल्यावर बोटांच्या मदतीने थोडंसं नारळाचं तेल ओठांवर लावा. नारळाच्या तेलात कोणतंही केमिकल नसल्याने त्यामुळे तुमच्या ओठांना एक नैसर्गिक चमक मिळेल.


केसांसाठी उपयुक्त नारळाचे तेल (Benefits of Coconut Oil for Hair)


वाढते प्रदूषण आणि बदलेली जीवनशैली याचा थेट परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांवर होतो. यामुळे अकाली पांढरे होणे, केस गळणे, केसांना फाटे फुटणे अशा केसांच्या समस्या निर्माण होतात. जर तुम्हालादेखील या समस्या जाणवत असतील तर नारळाच्या तेलाच्या वापरामुळे त्या कमी होऊ शकतात.


coconut-oil-benefits-for-health-in_marathi


निरोगी केस (Healthy Hair)


नारळाच्या तेलामु्ळे केस लांब, घनदाट आणि चमकदार होतात. नियमित केसांना नारळाच्या तेलाने मसाज केल्यामुळे कोंड्याची समस्याही हळूहळू कमी होते. नारळाच्या तेलामुळे तुमच्या केसांच्या त्वचेचे योग्य पोषण होते.


हेअर कंडीशनर (Hair Conditioner)


नारळाचे तेल, ऑर्गन ऑईल आणि शीया बटर समप्रमाणात घेऊन ते व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून पाच मिनीटे मसाज करा. वीस मिनीटांनी केस धुवून टाका. या मिक्स हेअर कंडीशनरमुळे केसांच्या त्वचेखाली रक्तप्रवाह सुधारतो. केसांचे योग्य पोषण झाल्यामुळे केस निरोगी आणि चमकदार दिसू लागतात.


हेअर मास्क (Hair Mask)


1) नारळाचे तेल आणि स्टॉबेरी (Cocnut Oil & Strawberry)


नारळाच्या तेलामध्ये स्टॉबेरी स्मॅश करा आणि त्याचा एक हेअर माक्स तयार करा. केसांच्या मुळांना हा मास्क लावा आणि वीस मिनीटे मसाज करा. यामुळे तुमचे केस निरोगी, सुंदर आणि मजबूत होतील. स्टॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे केसांच्या त्वचेचे पीएच (pH) संतुलित राहते.


वाचा - कोरड्या केसांची काळजी घेणं आता अजून सोपं


2) नारळाचे तेल आणि अंडे (Coconut Oil & Egg)


नारळाचे तेल आणि अंडे यांच्या हेअर मास्कमुळे केसांना आवश्यक प्रोटीन्स मिळतात. यासाठी नारळाचे तेल, अंडे आणि मध मिसळून हेअर मास्क तयार करा आणि तो केसांच्या मुळांना लावून मसाज करा. वीस मिनीटांनी केस धुवून टाका.


3) नारळाचे तेल आणि मध (Coconut Oil & Honey)


एका भांड्यामध्ये मध आणि नारळाचे तेल घ्या. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. थंड झाल्यावर ते केसांच्या मुळांना लावा. काही मिनीटं केसांना मसाज करा आणि केस धुवून टाका.


benefits_of_coconut_oil_in_marathi


4) नारळाचे तेल आणि एॅव्होकॅडो आणि रोजमेरी (Coconut Oil, Avocado & Rosemary)


नारळाचे  तेल, एॅव्होकॅडो आणि रोजमेरी समप्रमाणात घेऊन ते मिक्सरमध्ये मिक्स करा. हे  मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि पाच मिनीटे मसाज करा. वीस ते पंचवीस मिनीटांनी केस धुवून टाका.


नारळाच्या तेलाचा लहान मुलांवर होणारे परिणाम (Benefits of Coconut Oil for Kids)


लहान मुलांना मालिश करताना खूप काळजी घेण्याची गरज असते. कारण बाळाची त्वचा नाजूक असते. नारळाच्या तेलामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे ते लहान मुलांना मालिशसाठी वापरणे अगदी योग्य आहे. यासाठी जाणून घ्या बाळाला नारळाच्या तेलाने मालिश केल्याचे काय परिणाम होतात.


ऑक्सिजनचे योग्य पुरवठा होतो (Maintain Oxygen Level In Body)


नारळाच्या तेलात लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतं. बाळाच्या नाजूक शरीराची वाढ होण्यासाठी त्याच्या त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होणं फार गरजेचं असतं. यासाठी तुमच्या बाळाच्या नाजूक त्वचेला नारळाच्या तेलाने मालिश करा.


बाळाची त्वचेचं पोषण होतं (Coconut Oil for Moisturised Skin)


बाळाची त्वचा नाजूक आणि मुलायम असते. त्यामुळे बाळाच्या त्वचेचं योग्य पोषण होणं गरजेचं असतं. नारळाच्या तेलामधील नैसर्गिक मॉश्चराईझर गुणधर्मांमुळे बाळाची त्वचा दिवसभर मऊ राहते.


coconut-oil-benefits-in-marathi


बाळाला चांगली झोप लागते (For Good Sleep)


नारळाच्या तेलाने बाळाला नियमित मालिश केल्यामुळे त्याचा चांगल्याप्रकारे  शारिरीक आणि मानसिक विकास होतो. नारळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे ते पुरेशी झोप घेते आणि सहाजिकच तंदरूस्त राहते.


बाळाचा इंन्फेक्शन पासून बचाव होतो (Fights Infections)


नारळाच्या तेलात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे सामर्थ्य असते. त्यातील अॅंटी फंगल आणि अॅंटी बॅक्टेरिएल गुणधर्मांमुळे बाळाचे बाहेरील इनफेक्शनपासून संरक्षण होते. यासाठी स्तनपान करण्याऱ्या महिलांनी नारळाच्या तेलात तयार केलेले पदार्थ खाणं फार गरजेचं आहे.


बाळाला नारळाच्या तेलाने मालिश कसे कराल? (Massage With Coconut Oil)


हिवाळ्यात नारळाचे तेल गोठतं त्यामुळे बाळाला मालिश करण्याआधी त्याला कोमट होईपर्यंत गरम करा. कोमट तेल त्वचेमध्ये चांगलं मुरतं. मात्र मालिश करण्यापूर्वी तेल फार गरम नाही याची काळजी घ्या कारण बाळाची त्वचा  नाजूक असल्याने गरम तेलामुळे त्याची त्वचा पोळू शकते.


नारळाच्या तेलाचे आरोग्यावर काय परिणाम होतात (Health Benefits of Coconut Oil)


नारळाच्या तेलात अनेक पोषकतत्व असतात ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. सौंदर्याप्रमाणेच आरोग्यावरही नारळाच्या तेलाचे चांगले फायदे होतात.


नारळाच्या तेलाचे दातांवर काय परिणाम होतात (Coconut Oil for Teeth)


दात स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टूथपेस्ट उपलब्ध असतात. महागड्या  टूथपेस्ट आणि टूथब्रशच्या वापरानेही दातांच्या समस्या काही कमी होत नाहीत. पण जर तुम्हाला दातांची काळजी घ्यायची असेल तर नारळाचे तेल दातांच्या समस्या दूर करण्यासाठी उत्तम ठरू शकते.


यासाठी दात किडण्यापासून वाचविण्यासाठी तुम्ही ऑईल पुलींग करू शकता.यासाठी एक चमचा नारळाचे तेल घ्या आणि कमीत कमी दहा मिनीटे तोंडांमध्ये चुळ भरत रहा. नारळाच्या तेलाला वीस मिनीटे तोंडामध्ये ठेवा आणि मग थुंकून टाका. या प्रक्रियेमुळे तुमच्या तोंडातील जीवजंतू त्या तेलाबरोबर बाहेर फेकले जातील. दातांच्या आरोग्यासाठी  तुम्ही ऑईल पुलिंग आठवड्यातून कमीत कमी तीनदा करू शकता. नारळाच्या तेलामध्ये अॅंटी फंगल गुणधर्म असतात. तसेच यामुळे तोंडाला दुर्गंध येण्याची समस्याही कमी होते.


coconut-oil-for-skin-hair-in-marathi


स्ट्रेच मार्क (Stretch Marks)


प्रेगन्सीनंतर स्त्रीयांना पोट आणि कंबरेवर स्ट्रेच मार्क्स होतात. बाळंतपणाच्या या खुणा कमी करण्यासाठी नियमित नारळाचे तेल लावा.


Also Read Home Remedies For Stretch Marks In Marathi


मधूमेह (Diabetes)


मधूमेह हा आजार आजकाल अनेकांना होत  आहे. मधूमेहींनी आहारात नियमित नारळाच्या तेलाचा वापर केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.


हाडांच्या समस्या कमी होतात (Improves Bone Health)


आहारातील कॅल्शियच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात आणि दुखू लागतात. नारळाच्या तेलात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ज्यामुळे तुमच्या हाडांचा विकास होतो. हाडे मजबूत झाल्यामुळे हाडांच्या समस्या कमी होतात.


ताण - तणाव कमी होतो (Helps To Reduce Stree)


coconut-oil-for-skin-in-marathi


दररोज घर आणि ऑफिसमधील धावपळ आणि ताण - तणावामुळे तुम्ही हैराण होता. अशा वेळी नारळाचे तेल डोक्यावर लावून मसाज करा. नारळाच्या तेलामुळे तुम्हाला निवांतपणा मिळू शकतो.


वजन कमी होत (Coconut Oil For Weight Loss)


नारळाच्या तेलात फॅट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर स्वयंपातामध्ये नारळाच्या तेलाचा वापर करा. नारळाच्या तेलात केलेल्या खाद्यपदार्थांमुळे चयापचय आणि मेटाबॉलिझम सुधारते आणि तुम्ही निरोगी राहते.


अधिक वाचाः


‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या


Beauty and Health Benefits of Lemon : बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे


Castor Oil Benefits For Skin and Health In Marathi


मसूर डाळीचे सोपे आणि घरगुती फेसपॅक्स


ब्रोकोली खायला आवडते का, मग हे वाचाच


Coconut Oil Benefits for Hair in Hindi