डबलचीनचा त्रास? सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका

डबलचीनचा त्रास? सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका

आलिया, करीना, दीपिका, सारा, जान्हवी यांचा परफेक्ट फेस पाहिला की असा परफेक्ट फेस मला सुद्धा हवा असे अनेकांना वाटते. शरीरावरील अतिरिक्त चरबीप्रमाणे चेहऱ्यावरही चरबी जमा होते. मग ती वर आलेल्या गालातून आणि हनुवटी खाली वाढलेल्या मासांतून दिसू लागते. तुमचा चेहरा नुसताच गोल गरगरीत झाला आहे त्याला काहीच सुडौलपणा नाही असे  वाटते का? तुम्हाला डबलचीन आली आहे का? मग आता आम्ही देणार आहोत त्या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. कारण अगदी काही मिनिटे शांत बसून साधा -सोपा व्यायाम केला तर तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन तुमच्या चेहऱ्यालाही चांगला आकार आणि कट मिळेल. मग करायची का सुरुवात?


तेच तेच खाऊन कंटाळा आला आहे का? मग ट्राय करा या रेसिपीज


 तर सगळ्यात आधी तुम्ही व्यायाम ऑफिसमध्ये बसल्या जागी करणार आहात की, घरी येऊन व्यायाम करणार ते ठरवा. दाखवलेले सगळे व्यायाम प्रकार हे अगदी ४ ते ५ मिनिटे करण्यासारखे आहेत. त्यामुळे तेवढा वेळ काढायला काहीच हरकत नाही. आता तुम्हाला लागणार आहे फक्त एक खुर्ची. समोर घड्याळ ठेवून सुरुवातीला प्रत्येक व्यायाम हा केवळ ३० सेंकदासाठी करायचा आहे. प्रत्येक व्यायामामध्ये १० सेंकदाची विश्रांती घेणे आवश्यक आहे.


 नेक लिफ्ट


ताठ बसून तुम्हाला मान  वर करायची आहे. मान वर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जबडा बाहेर बाजूला ओढायचा आहे. मान वर केल्यामुळे तुमच्या मानेवर थोडासा ताण येईल. तो ताण येण्यासाठीच हा व्यायाम करायचा आहे.


nack lift


जर तुम्ही तुमची मान नीट पाहिलीत तर तुम्हाला त्यावर रेषा दिसतील. वयपरत्वे या रेषा अधिक वाढत असतात. हा व्यायाम केल्याने मानेला ताण पडतो आणि त्या रेषा कमी होतात. शिवाय हनुवटीखालील त्वचाही ताणली जाते.


अंडरचीन डक


पहिल्या व्यायामात आपण जबडा बाहेरच्या दिशेला ओढला होता. आता आपल्याया मान वर करुन ओठ ताणायचे आहेत. म्हणजे स्मित करायचे आहे. पण हे करताना ओठ बंद हवे. असे करताना मान आणि जबड्यावर ताण येईल.


नोझ टचिंग


जीभ काढून नाकाला लावण्याच्या अनेक वाकुल्या तुम्ही केल्या असतील. पण त्याचा फायदा चेहऱ्यासाठी होऊ शकतो हे तुम्हाला माहीत होते का? नाही ना?  तुम्हाला आता हा प्रकार व्यायाम म्हणून करायचा आहे. जीभ काढून नाकाला लावायची आहे. असे करताना ओठ जास्त हलवायचे नाही. तुम्ही जीभ बाहेर काढल्यानंतर नाकाला लावताना तुम्हाला हनुवटीजवळील त्वचा ताणलेली जाणवेल. साधारण सेंकदभर जीभ नाकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे.  


nose touching


टीप- हे करताना तुम्हाला तुमचा चेहरा जास्त हलवायचा नाही.तुमची जीभ वर नेताना वरचा ओठ थोडासा ताणला जाईल. पण तुम्ही त्या ओठाची खूप हालचाल करु नका.


परफेक्ट फिगर हवी असेल तर करा हा परफेक्ट डाएट


ड्रॉन चिक्स


 मान डाव्या- उजव्या बाजूला वळवून तुम्हाला प्रत्येकवेळी जबडा बाहेर काढायचा आहे. नेक लिफ्ट प्रमाणेच हा व्यायाम आहे. पण त्या ठिकाणी आपण मान वर-खाली केली होती.  आता आपण ती डाव्या आणि उजव्या बाजूला वळवणार आहोत. त्यामुळे तुमच्या मानेवर ताण येतो आणि जॉ लाईनकडे असलेली त्वचा ताणली जाते. तुमच्या हनुवटीला चांगला आकार येतो. तुम्ही आरशात तुमचा हा बदल टिपू शकता.  


झटपट वजन कमी करायचे असेल तर या सवयी तुम्ही बदलायला हव्यात


स्माईल


हसणे हा सगळ्याच आजारांवरील इलाज आहे. त्यामुळे  डबलचीन कमी करण्यासाठी देखील तुम्हाला हसायचे आहे. हा पण हे हसणे थोडे वेगळेे आहे. तुम्हाला हसताना तुमचे दात एकमेकांवर ठेवायचे आहे.थोडं तोंड उघडून हसायचे आहे. ही स्माईल १ मिनिटासाठी  तशीच ठेवायची आहे. पुन्हा चेहरा पूर्ववत करुन पुन्हा स्मित करायचे आहे. असे करताना तुमचे गाल, हनुवटीकडील त्वचा ताणत असल्याचे तुम्हाला जाणवेल.


smile


पफी चीक


गालात हवा भरुन त्यावर जोरात हात मारुन आवाज काढण्याचा खेळही आपण खेळला असेलच.आता तो प्रकारही व्यायातील महत्वाचा प्रकार आहे. गालात हवा भरुन तुम्हाला हाताने गालावर दाब द्यायचा आहे. असे करताना तोंडातून हवा जाईल पण हसू नका. गालात भरलेली हवा संपल्यानंतर पुन्हा एकदा हवा भरुन पुन्हा तसेच करायचे आहे. असे करताना तुमच्या चेहऱ्यावरील नसा ताणल्या जातील आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त चरबी आहे ती देखील कमी होण्यास मदत होईल.


 का येते डबलचीन?


डबलचीन म्हणजे तुमच्या हनुवटीखाली वाढलेली अतिरिक्त चरबी. तुम्ही हनुवटी मानेला टेकवताना हनुवटीखाली लोंबकळणारी त्वचा म्हणजे डबलचीन तुमचे वजन वाढत असल्याची ही खूण आहे. तुमचे वजन वाढत असेत तर तुमच्या चेहऱ्यावर त्याचा परीणाम सगळ्यात आधी होत असतो. तुमचे गाल वाढू लागतात आणि साहजिकच तुमच्या हनुवटीखाली चरबी वाढू लागते. परिणामी तुमचा चेहरा वयापेक्षा जास्त थोराड वाटू लागतो. त्यामुळे असा चेहरा आकर्षक वाटत नाही.


double chin


चेहऱ्यावर मसाज करणे तितकेच आवश्यक असते.रक्तप्रवाह सुधारावा आणि त्वचा चांगली व्हावी यासाठी जसा आपण फेस मसाज करतो. अगदी तसाच आपल्याला हनुवटीखाली तुम्हाला करायचा आहे. मान वर करुन तुम्हाला बोटांनी अगदी फेशिअल मसाजसारखा उलट दिशेने मसाज करायचा आहे. तुम्ही ज्यावेळी मॉश्चरायजर लावता त्यावेळी तुम्ही अगदी काही मिनिटांसाठी हा मसाज मानेवर करु शकता.


 वयोमानानुसारही चेहऱ्यामध्ये अनेक बदल होत असतात. त्वचा सैल पडत असते. जर शरीर स्थुल असेल तर हनुवटीखालील त्वचा अधिक सैल दिसायला लागते. तुम्ही कोणत्याही वयात हा व्यायाम करु शकता.


व्यायाम करताना घ्या काळजी


जर तुम्हाला मानेचे काही त्रास असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही व्यायाम करु नका. कारण कधी कधी मानेचे असे व्यायामप्रकार करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या


सध्या अनेक अॅप आहेत जे तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकतात. त्यातीलही काही व्यायामप्रकार तुम्ही करुन पाहून शकता. वर दाखवलेले हे प्रकार अगदी सहज करण्यासारखे आहेत.


एका महिन्यात दिसेल फरक


एखादी गोष्ट सुरु केल्यानंतर बदल व्हायला थोडा वेळ लागतोच. डबलचीन जायलाही तेवढा वेळ लागणारच. साधारण महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवू लागेल. तुमच्या जबड्याचा आकार तुम्हाला दिसू  लागले. शिवाय चेहऱ्याचा आकारही अधिक आकर्षक दिसू लागेल.


फक्त या व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. या व्यायामासोबत इतर व्यायामही आवश्यक आहे.  जर तुम्ही इतर व्यायाम प्रकारही केले तर हा फरक तुम्हाला लवकर जाणवेल.


मग हे सोपे व्यायाम करा आणि डबलचीनपासून तुमची होईल सुटका


फेशिअल एक्सरसाईजमुळे तुमच्या स्कीनवर ग्लोसुद्धा येतो. त्यामुळे हा व्यायाम नुसता डबलचीन कमी करत नाही तर तुम्हाला इतरही फायदा मिळवून देतो. त्यामुळे डबलचीन नसेल तरी चेहऱ्याचा आकार चांगला राहण्यासाठी हा व्यायाम मदत करतो. त्यामुळे हा व्यायाम रोज करायला काहीच हरकत नाही. 


व्यायाम सुरु करण्याआधी आणि एक महिन्यानंतरचा एक फोटो नक्की काढा कारण एक महिन्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळेल तो तुमच्या परफेक्ट फोटोमधून झळकेलच.


(फोटो सौजन्य-Instagram)