ADVERTISEMENT
home / Budget Trips
फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात – Essentials You Should Always Keep While Travelling

फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात – Essentials You Should Always Keep While Travelling

यार, ट्रीपला जायचंय पण कळतंच नाहीये की काय बरोबर घेऊ आणि काय नाही?, अशी प्रत्येकाचीच स्थिती होते नाही का? तुम्ही नियमितपणे फिरणाऱ्या असाल किंवा कधीतरी ट्रॅव्हल करण्याऱ्या असलात तरी पॅकींग करताना कोणतं सामान सोबत घ्यायचं आणि कोणतं नाही, हा निर्णय घेणं कठीण असतं. प्रत्येक मुलगी ट्रीपला जाताना हा प्रश्न ओळखीतला अगदी प्रत्येकाला विचारतेच. फिरायला तर सगळ्यांना आवडतं, पण ट्रीप चांगली होण्यासाठी कोणतं सामान जास्त उपयोगी पडेल हा आपल्यासाठी गहन प्रश्न असतो. आता आपली रोजचीच बॅग बघा ना, जी आपण ऑफिस किंवा कॉलेजला घेऊन जातो. आपल्याला जे जे उपयोगी आहे ते त्या बॅगेत ठेवलेलं असतं. आपली एक जगच त्या बॅगेत असतं. असो तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आजच्या काळात तुमची ट्रीप चांगली आणि आरामदायी व्हावी यासाठी तुमच्यासोबत या वस्तू न्यायलाच हव्यात.

34392584 222275198502906 8341835814736494592 n

1. मिनी इमर्जन्सी कीट

 travelling-essential-sewing-kit

ADVERTISEMENT

बाहेर जाताना तुमच्यासोबत मिनी इमर्जन्सी कीट असलंच पाहिजे. शक्य असल्यास तुमच्या हँडबॅगमध्येच ते कॅरी करा. ज्यामध्ये सॅनिटायझर, पेन कीलर, स्टेन रिमूव्हर, मिनी Sewing कीट, हेअर स्प्रे यासारख्या गोष्टी तुम्ही कॅरी करू शकता.

2. स्कार्फ किंवा शाल

52779084 267270707508302 750006600791156341 n

हो… स्कार्फ किंवा शाल या गोष्टी फिरायला जाताना फार महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही विमान आणि ट्रेन दोन्हीने प्रवास करणार असाल तर याची गरज लागेलच. कारण प्लेनमध्येही एसी असतो आणि ट्रेनमध्येही शाल तुम्हाला पांघरूण म्हणून उपयोगी पडेल. जर काहीच नाहीतर उशी म्हणून डोक्याशी तरी ठेवता येईलच.

ADVERTISEMENT

3. वायफाय हॉटस्पॉट

47581571 328266087780803 2688321157053702784 n

जर तुम्हाला फिरायला गेल्यावर एखादा ब्लॉग किंवा ट्रॅव्हल पोस्ट लिहण्याची इच्छा झाली किंवा सेल्फी सोशल मीडियावर टाकायचा असल्यास याचा नक्कीच उपयोग होईल. कारण जर तुमच्या हॉटेलमध्ये इंटरनेट सेवा आहे की नाही हे माहीत नसल्यास स्वतःचा हॉटस्पॉट कॅरी करणं कधीही चांगल.

4. लगेज ट्रॅकर

ADVERTISEMENT

23416528 144994609585877 5481259163193442304 n

आजच्या आधुनिक युगात टूरला जाताना नेण्यासाठी हे सर्वोत्तम डिव्हाईस आहे. ज्यामुळे तुमच्या सामानाची चिंता दूर होईल. हे फक्त चार्ज करून घ्या आणि तुमच्या बॅगेत ठेवा. तसंच यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये याची अॅप डाऊनलोड करावी लागेल. लगेज ट्रॅकर हे 15 दिवसांपर्यंत चार्ज राहतं आणि GSM ट्रॅकींगच्या मदतीने तुमच्या सामानाचं लोकेशन शोधतं.  

5. ट्रॅव्हल कीट

या बॅगमध्ये तुम्ही हेअर-केअरचं सामान, हेअर रिमूव्हल, सेनेटरी नॅपकिन्स यांसारखं सामान ठेऊ शकता. ज्यामुळे या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी राहतील आणि तुम्हाला बॅगेत वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये शोधाव्या लागणार नाहीत. गरज असल्यास तुमच्या हॉटेलच्या बाथरूममध्येही टांगून ठेऊ शकता.

ADVERTISEMENT

travelling-essential-laundry-bag

6. लाँड्री बॅग किंवा लाँजरी बॅग
तुमचे मळलेले आणि स्वच्छ कपडे, अंडर गार्मेंटस् आणि चपला वेगळ्यावेगळ्या ठेवण्यासाठी तुम्ही या बॅग्सचा वापर करू शकता.

7. फोन बॅटरी चार्जर किंवा पॉवर बँक

52684750 564311284065863 8988929168793430968 n

ADVERTISEMENT

आजकाल फिरताना लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल फोन. कॅमेरा, मॅप आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही मोबाईलचा वापर करत असता. ज्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे तुमच्यासोबत पोर्टेबल मोबाईल चार्जर किंवा पॉवर बँक असायलाच हवाच

8. ट्रॅव्हल मॅप अॅप

51935346 2224930577746930 7715482444322654975 n
तुम्ही कुठेही बाहेर फिरायला जाताना तुमच्यासोबत मॅप अॅप असणं गरजेच आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ट्रॅव्हल मॅप ठेवा. गुगल मॅप आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये असतो. पण याशिवाय इतरही अॅप आहेत, ज्यांचा वापर तुम्ही करू शकता. टूरमध्ये एखाद्या वेळेस तुम्ही मागे राहिलात किंवा रस्ता चुकलात तर याचा नक्कीच उपयोग होईल.

9. पेपर स्प्रे

ADVERTISEMENT

travelling-essential-pepper-spray
कारण मुलींसाठी सेफ्टी फार महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्यासोबत पेपर स्प्रे नक्की कॅरी करा. हा स्प्रे तुमच्या इमर्जन्सी बॅग किंवा हँडबॅगमध्ये ठेवा. ज्यामुळे गरज लागल्यास तुम्हाला तो लगेच बाहेर काढता येईल. तर या होत्या महत्त्वपूर्ण गोष्टी.

lipstick-guide-8

पण बरेचदा आपण फिरायला जाताना हँडबॅग जड होऊ नये म्हणून कमीत कमी सामान नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात सर्वात आधी कमी होणारी गोष्ट म्हणजे मेकअप प्रोडक्ट्स. पण असं कशाला करायचं? जर तुम्ही फिरायला जाणार आहात तर चांगलं दिसायला काय हरकत आहे आणि चांगले फोटो नाही आले तर सोशल मीडियावर अपलोड कसे करणार. त्यामुळे तुमच्यासोबत ही ब्युटी प्रोडक्ट्स असायलाच हवेत. पण म्हणून पूर्ण मेकअप कीटच कॅरी करायला हवं, असं काही नाही. पाहूया मग फिरायला जाताना कोणते मेकअप प्रोडक्ट्स कॅरी करणं मस्ट आहे.    

सनस्क्रीन (Sun Cream)

ADVERTISEMENT

Sunscreen

उन्हाळ्यात सर्वात जास्त नुकसान होतं ते त्वचेचं. तसंच सनबर्न होण्याचीही शक्यता असते. हे टाळण्यासाठी तुमच्या बॅगमध्ये चांगलं एसपीएफ असलेलं सनस्क्रीन जरूर ठेवा. उन्हातून उत्सर्जित होणाऱ्या अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावायला विसरू नका.

बीबी क्रीम (BB Cream)

faces-1
बेस, फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट, कन्सीलर यांऐवजी फक्त बीबी क्रीम कॅरी करा. तुमच्या त्वचेच्या रंगानुसार बीबी क्रीम खरेदी करा. बीबी क्रीममध्ये तुमच्या चेहऱ्यावरील डार्क सर्कल आणि इतर डाग लपवण्याची क्षमता असते. तसंच निर्जीव त्वचेला ग्लो देण्याचं आणि मॉईश्चरायजिंगचं काम ही बीबी क्रीम करतं. त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर हेवी मेकअप केल्यासारखं जाणवत नाही.  

ADVERTISEMENT

लिपस्टिक (Lipstick)

lipstick-guide-7

लिपस्टिकमुळे तुमच्या चेहऱ्याचा लुक पूर्ण होतो. त्यामुळे तुमच्या आवडत्या लिपस्टिक शेड्ससोबत घेऊन जायला विसरू नका. हवं असल्यास तुम्ही क्रिमी लिपस्टीकसुद्धा कॅरी करू शकता. ज्यामुळे तुमच्या ब्लशरची कमतरता पूर्ण होईल. जर तुम्ही तुमच्यासोबत ब्लशर ठेवणार नसाल तर क्रिमी लिपस्टिकचा वापर गालावर ब्लशर म्हणून करू शकता.  

काजळ आणि आयलाईनर (Kajal & Eyeliner)

ADVERTISEMENT

Eye liner

डोळ्यांच्या सौदर्यासाठी या दोन गोष्टी मस्ट आहेत. जेव्हा कधी तुम्ही काजळ लावायचं विसरता तेव्हा लोकांनी नक्कीच विचारलं असेल की, तुम्ही आजारी आहात का? मग तर फोटोतही तसंच दिसाल ना. काजळ आणि बारीक आयलाईनर तुमच्या डोळ्याची सुंदरता वाढवतं.

बॉडी लोशन (Body Lotion)

Body lotion

ADVERTISEMENT

हो.. तुमच्या ब्युटी कीटमधील हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर बॉडी लोशन लागणारच. जर तुम्हाल मोठी बाटली कॅरी करणं शक्य नसेल तर छोटी बाटली सोबत न्या.

मग पुढच्या वेळी फिरायला जाताना या गोष्टी तुमच्यासोबत नक्की कॅरी करा. 

हॅपी जर्नी !!!

फोटो सौजन्य – Instagram

ADVERTISEMENT

हेही वाचा –

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

ADVERTISEMENT
21 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT