मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल In Marathi | POPxo

मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल

मेकअपचं साहित्य एक्स्पायर्ड झालं आहे हे कसं ओळखाल

सौंदर्याचं स्त्रीच्या जीवनात एक वेगळंच स्थान आहे. मेकअप केल्यामुळे स्त्रीचं मुळ सौंदर्य अधिक खुलून दिसतं. आजकाल प्रत्येक स्त्रीकडे बेसिक मेकअप करण्यासाठी लागणारं साहित्य असतंच.  एखादं कॉम्पॅक्ट, लिपस्टीक, आयलायनर आणि काजळ तुम्हाला नेहमीपेक्षा हटके लुक देण्यासाठी पुरेसे असतात. मात्र काहीजणी मेकअप कलेक्शनच्या नावाखाली मेकअपचं खूप साहित्य जमा करून ठेवतात. काहीजणींकडे तर लिपस्टीकच्या विविध रंगातील शेड्स असतात. पण प्रत्येक सौंदर्य उत्पादनाची एक विशिष्ठ एक्स्पायरी डेट असते. त्याच काळात ते वापरणं गरजेचं असतं.


make up


तुम्ही तुमचं मेकअप किट शेवटचं कधी साफ केलं होतं हे तुम्हाला आठवत आहे का ?  कारण तुमच्या मेकअप किटमधील कोणतं सौंदर्य उत्पादनं कधी एक्स्पायर्ड होतं याविषयी तुम्हाला वेळीच माहित असणं गरजेचं आहे. तुमच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक, आयलायनर, मस्कारा, काजळ, कॉम्पक्ट असं कितीतरी सामान भरलेलं असेल. त्यातील कोणतं सामान कधी एक्स्पायर्ड झालं आहे हे समजणं तसं थोडं अवघडच आहे. कारण एकतर मेकअपसाठी लागणाऱ्या अनेक उत्पादनांवर एक्स्पायरी डेटच दिलेली नसते. शिवाय त्यातील एखादी लिपस्टिक तुमच्या खूपच आवडीची असते त्यामुळे ती टाकून देणं तुमच्या जीवावर येतं. एखादी वस्तू तुम्हाला तुमच्या प्रियकराने भेट दिलेली असते त्यामुळे त्या वस्तूला तुम्ही अगदी जीवापाड जपत असता. पण लक्षात ठेवा जर तुमच्या मेकअपचं साहित्य खरेदी करून काही महिने अथवा वर्ष झालं असेल तर ते तपासून बघणं आता फार महत्वाचं आहे. खराब झालेलं मेकअपचं साहित्य वापरल्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.


यासाठी जाणून घ्या मेकअपचं साहित्य खराब झालं आहे हे कसं ओळखावं


एक्सपर्टच्या सल्लानुसार मेकअपचं साहित्य खराब झालं आहे का हे तपासण्यासाठी आधी त्या सौंदर्य प्रसाधनाचा वास घ्यावा. जर तुमच्या मेकअप साहित्याला नेहमीचा सुंगध येत नसेल तर ते उत्पादन आता मेकअप किटमधून बाहेर टाकून देण्याची वेळ जवळ आली आहे असं समजा. कारण जर तुम्हाला आता या उत्पादनाला टाकून देण्याचा मोह आवरता नाही आला तर नंतर कदाचित तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. खराब झालेलं मेकअपचं साहित्य वापरण्याचे दुष्परिणाम तुम्हाला महगात पडू शकतात. यासाठी आम्ही तुम्हाला मेकअपसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचा एक्स्पायरी पिरिएड सांगत आहोत. ज्या माहितीचा मेकअप कीट स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.


एखाद्या अचानक ठरलेल्या पार्टीला जाताना  Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क


आयलानर - सहा महिने ते एक वर्ष


Makeup Products Expiry Date- Eyeliner for marathi


आयलायनरमुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलते. पण यासाठी जर तुम्ही जेल आयलायनर वापरत असाल तर ते तुम्ही केवळ सहा ते आठ महिनेच वापरू शकता. कारण तुम्ही ते जितक्या वेळा ओपन करता तितक्या वेळा त्याचा  हवेशी संपर्क येतो. लिक्विड आयलायनरदेखील लवकर खराब होऊ शकते. आय पेन्सिल मात्र एक वर्ष चांगली टिकते. त्यानुसार तुमच्या आयलायनरचा प्रकार ओळखून ते एक्स्पायर्ड झाले आहे का हे अवश्य तपासा.


मस्कारा- तीन ते सहा महिने


Makeup Products Expiry Date- Mascara for marathi


मस्कारामुळे तुमच्या डोळ्यांच्या पापण्या दाट दिसू लागतात. पण जर तुमच्या कडील मस्कारा न वापरल्यामुळे सुकून गेला असेल तर त्यामध्ये पाणी अथवा लिक्वीड टाकून ते पुन्हा वापरू नका. यापेक्षा कोणतेही वापरात असलेलं मस्कारा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ न वापरणं  हेच योग्य ठरेल. कारण जर तुम्ही खराब झालेलं मस्कारा वापरलं तर तुमच्या आयलॅशेसवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.


ब्लश, आय शॅडो आणि इतर कॉस्टमॅटिक्स पावडर - एक ते दोन वर्ष


Makeup Products Expiry Date blush Eye Shadow for marathi


लिक्वीड मेकअप प्रॉडक्ट पेक्षा पावडर मेकअप प्रॉडक्ट्स जास्त काळ टिकतात. त्यामुळे पावडर बेस असलेली उत्पादने तुम्ही एक ते दोन वर्षे वापरू शकता. या काळात जर या उत्पादनांचा रंग बदलला किंवा त्यांच्या गंधामध्ये बदल झाला तर ते खराब झाले आहेत हे ओळखा. कारण एक्स्पायर्ड झालेलं कोणतंही मेकअपचं साहित्य वापरणं हे नुकसानकारक ठरू शकतं.


कोरड्या त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यासाठी वापरा 'हे' ब्रॅंडेड आणि होममेड मॉश्चराईझर


फाऊंडेशन - सहा महिने ते दोन वर्ष


Makeup Products Expiry Date- Foundation for marathi


काचेच्या बाटलीमधील लिक्वीड फाऊंडेशन सहा महिने टिकतात. मात्र पंपाच्या मदतीने लावण्यात येणारे फाऊंडेशन दोन वर्ष चांगले राहू शकतात. एखादं फाऊंडेशन तुमच्या त्वचेवर खूप छान दिसू शकतं पण जर ते खराब झालं असेल तर ते टाकून देण्यातच शहाणपण आहे.


कन्सिलर - एक ते दोन वर्ष


concealer FI


कन्सिलर तुमच्या चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी खूप गरजेचं असतं. पण जर ते खराब झालं असेल ते वापरणं त्वरीत थांबवा नाहीतर तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणखी वाढू शकतात.


Concealers: तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल


लिपस्टीक - दोन  वर्ष


Makeup Products Expiry Date- Lipstick for marathi


लिपस्टीक हा अनेकींसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. तुमच्याकडे प्रत्येक ड्रेसवर मॅच करणारी अशा अनेक लिपस्टीकचं कलेक्शनचं असतं. मात्र जर तुमची लिपस्टीक खराब झाली असेल तर त्यामुळे तुमचे गुलाबी ओठ काळवंडू शकतात. मेकअपच्या इतर साहित्यापेक्षा तुमची लिपस्टिक खराब झाली आहे ओळखणं फार सोपं असू शकतं. खराब झाल्यावर लिपस्टीकचा रंग, सुगंध आणि आकार बदलू लागतो. जर तुमची लिपस्टीक नेहमीपेक्षा जास्तच चिकट झाली असेल तर ती आता टाकून देण्याची वेळ आली आहे.


नव्यानेच लिपस्टीक लावणाऱ्यांसाठी लिपस्टीक गाईड


आम्ही तुम्हाला मेकअप किटमध्ये असणारी बेसिक सौंदर्य प्रसाधने वापरण्याचा योग्य काळ सांगितला आहे. त्यानुसार आजच तुमचं मेकअप किट स्वच्छ करा. कारण खराब मेकअपचं साहित्य वापरणं धोकादायक असू शकतं.


You Might Like These:


त्यासोबतच  ‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या


स्वतःचा मेकओव्हर स्वतः करा, 'ह्या' खास मेकअप टीप्सने


भारतातील सर्वोत्तम पॅराबेन फ्री (Paraben Free) आणि सल्फेट फ्री (Sulphate Free) उत्पादने


मेकअप साहित्य आणि मेकअप करण्याची पद्धत


फोटोसौजन्य : इंन्स्टाग्राम आणि शटर स्टॉक

SHIPPING
We offer free shipping on all orders (Terms & Conditions apply). The orders are usually delivered within 4-6 business days.
REPLACEMENT
Your item is eligible for a free replacement within 15 days of delivery, in an unlikely event of damaged, defective or different/wrong item delivered to you. All the beauty products are non-returnable due to hygiene and personal care nature of the product. Please send an email to  care@popxo.com to have your order replaced.
HELP & ADVICE
For questions regarding any product or your order(s), please mail us at  care@popxo.com and we will get back to you with a resolution within 48 hours. Working Hours: Monday to Friday, from 10 AM to 6 PM.