1 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, आज सिंह राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचे संकेत

1 फेब्रुवारी  2019 चं राशीफळ, आज सिंह राशीच्या लोकांना धनलाभ होण्याचे संकेत

मेष : कागदपत्रे सांभाळा


महत्त्वाची कागदपत्रे ही नेहमी लागत नसतात. मात्र त्यांचे काम ज्यावेळी असते त्यावेळी शोधकार्य करीत बसण्यापेक्षा त्यांना सांभाळून ठेवा. बोलतांना विचारपूर्वक बोलून अचूक संवाद साधा. त्यात फायदाच होईल. जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिकाही करण्याचा अधिकार नाही. तशी तुमची अवस्था असेल तर आज इतरांवर टिका अजिबात नको. नुकसान होऊ शकतं.


कुंभ : सांधेदुखीचा त्रास वाढेल


सांधेदुखीचा त्रास असलेल्यासाठी आजचा दिवस त्रासदायक ठरणार आहे. कारण आज तुमचा त्रास वाढू शकतो. म्हणून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. सुयोग्य कर्मचा-यांना आज बढती मिळू शकते. तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर प्रयत्न करायला चुकू नका. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खांचा भागाकार करावा लागतो, हे लक्षात घ्या.


मीन : संपत्तीचा वाद मिटेल


तुमच्या घरात, परिवारात जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटू शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. तडजोडीचे धोरण ठेवा. झटपट कुठलीच गोष्ट मिळत नाही. पैसा तर अजिबात नाही हे लक्षात घ्या. स्वत:वर विश्वास ठेवून परिश्रम करीत राहा. ते करीत असतांना धोका पत्करावा लागला तरी चांगेल. जीवनात धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो.


वृषभ : जबाबदारी टाळू नका


जबाबदारी  टाळण्याकडे आज तुमचा कल राहिल. त्यामुळे किमान ज्यांचा संबंध थेट तुमच्याशी आहे, अशा जबादा-या तरी आज टाळू नका. आपल्या राशीला चंद्र आठवा असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. छोटे दुखणेही त्रासदायक होऊ शकतं. खोटं बोलून वेळ मारुन नेली तरी एक दिवस सत्य समोर येतचं. त्याचा सत्याची कास धरा. काही मिळविण्यासाठी सहन करावंच लागे. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.


मिथुन : संधीवात वाढेल


संधीवाताचा त्रास असणा-यांसाठी काळजी करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांचा संधीवात वाढू शकतो. आज फुकटच्या गप्पा टप्पा अजिबात नकोत. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी तुमची अवस्था होऊ शकते. कोणतीही कृती करण्यापूर्वीविचार करा. समजून उमजून घ्या. नाही तर नुकसान होऊ शकतं. स्वत:चा फायदा लक्षात घ्या.


कर्क : मनोरंजनासाठी वेळ काढा


एखाद्या विचारातून बाहेर पडायचे असल्यास मनोरंजन हा त्यावरील सोपा उपाय आहे. आज तुम्ही कुठल्या गोष्टीवर अतिविचार करीत असाल तर मनोरंजनासाठी वेळ काढा. अतिविचार घातक असतात. म्हणून त्यातून बाहेर निघा. एखादा अविस्मरणीय क्षण आज प्राप्त होऊ शकतो. टिका किंवा तक्रार करीत बसण्यामध्ये वेळ घालवू नका. जे पदरात पडले आहे, त्याला पवित्र मानून घ्या.


सिंह : अर्थलाभाची शक्यता


आपण जर कुटुंबवत्सल असाल, परिवाराची काळजी घेणारे असाल तर आज तुम्हाला अर्थलाभ होऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न केलेत तर संपूर्ण कुटुंबाला तुम्ही आनंद देऊ शकाल. मार्ग सापडत नसला तरी चालायला सुरुवात करा. परिश्रम करीत राहा. भाग्य तुमच्या मागे येईल. प्रयत्नांनीच परमे·ाराची प्राप्ती होत असते, हे लक्षात घेऊन कर्म करा.


कन्या : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.


आपल्या ज्याही महत्त्वाकांक्षा असतील त्या पूर्ण करणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात कमी पडू नका. आपल्या राशीला चौथा असलेला चंद्र मनाला अस्वस्थता देऊ शकतो. म्हणून विचलित होऊ नका. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. या अनिश्चित जगामध्ये निश्चितता शोधणे म्हणजे वेळ वाया घालविणे आहे, ही बाब लक्षात घ्या.


तूळ : संगीत ऐका


मनावरचा ताण घालविण्यासाठी संगीत ऐकणे हा खूप चांगला उपाय आहे. आज तुम्हाला त्याची गरज आहे. म्हणून संगीत ऐकण्याचा प्रयत्न करुन सुरु असलेल्या विचारांमधुन बाहेर निघा. प्रकृतीही आज नरम-गरम राहू शकते. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. आपला फायदा कशात आहे, यावर आज लक्ष केंद्रीत करा. ज्याचा तुमच्याशी संबंध नाही त्यात आज पडू नका.


वृश्चिक : पथ्य पाळा


तुम्ही जर कुठले पथ्य पाळत असाल, विशेत: आहाराची पथ्य असतील तर आज ते अगदी तंतोतंत पाळा. म्हणजे त्रास होणार नाही. इच्छित कार्याला उशीर होऊ शकतो. म्हणून लक्ष विचलित होऊ देऊ नका. प्रयत्न करुनही उद्दिष्ट्य साध्य होत नसेल तर पर्यायी साधने तयार करण्यावर भर द्या. एकावरच विसंबून राहू नका. मार्ग बदलविण्याची गरज असेल, करायला हरकत नाही.


धनु : विसंबून राहू नका


एखाद्यावर विसंबून राहून नुकसान करुन घेण्यापेक्षा, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येण्यापेक्षा स्वत:कडे पर्याय तयार ठेवा. वैवाहिक आयुष्य आज अधिक सुरेख होऊ शकतं. म्हणून त्या दृष्टीने आज प्रयत्न करण्यात कमी पडू नका. जोडीराच्या मर्जीनुसार वागा. त्यामुळे घरात आनंदी आनंद राहिल. आज स्वत:साठी जगायला वेळ मिळेल. म्हणून मनसोक्त आनंद घ्या.


मकर : विरोध होईल


जीवनात आपल्या कृतीला, आपल्या भूमिकेला विरोध होत असतो. कधी कधी तो अनोळखी लोकांकडूनही होतो. याची प्रचिती आज तुम्हाला मिळेल. आपल्या राशीला चंद्र बारावा असल्याने खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. जो तुम्ही टाळू शकणार नाहीत. कुणाच्याही व्यंगावर हसू नका. आज तर अजिबात नको. त्यात तुमचेच नुकसान होऊ शकतं.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद