10 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या लोकांनी आज बोलताना सावध राहण्याची गरज

10 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मीन राशीच्या लोकांनी आज बोलताना सावध राहण्याची गरज

 


मेष : जबाबदारी टाळाल


आज तुम्ही जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न कराल. मात्र हे करीत असतांना काही कामे ही आज नाही तर उद्या आपल्यालाच करावी लागणार आहेत, ही बाब लक्षात घ्या. आयुष्यात झटपट काहीच मिळत नाही. त्यामुळे झटपट पैशांच्या मागे लागू नका. अतिहव्यास हा चांगला नसतो. कुणाच्याही व्यंगावर हसणे चांगले नसते. किमान तरी ती गोष्ट अजिबात नको.


कुंभ : संगीत ऐका


तणाव घालवि­ण्यासाठी संगीत हे खूप चांगले माध्यम आहे. आज तुम्ही थोडे तणावात राहणार आहात. त्यामुळे तो घालविण्यासाठी संगित ऐका. मार्ग सापडत नसेल तर स्वस्थ बसू नका. चालायला सुरुवात करा, भाग्य मागे येईल. प्रयत्नांनी परमे·ार असतो यावर विश्वास ठेवून कार्य केल्याने आज तुम्ही एखाद्या संकटातून बाहेर पडणार आहात. देव तारी त्याला कोण मारी, याची प्रचिती लाभेल.


मीन : शब्दांवर नियंत्रण ठेवा


आज तुम्हाला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागणा आहे. फुकटच्या गप्पा टप्पा नको. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, अशी तुमची अवस्था होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास असणा-यांसाठी आज काळजी करण्याचा दिवस असून त्यांचा त्रास वाढू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करावा लागतो, हे लक्षात घ्या.  


वृषभ : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील


आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे. त्यामुळे आनंदी आनंद राहून आत्मविश्वासही वाढलेला असेल. वैवाहिक आयुष्य आज अधिक सुरेख होण्याच मदत मिळणार आहे. त्यामुळे आज तुम्ही पूर्णपणे जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज वाट्याला येतील. त्यामुळे आलीया भोगासी असावे सादर.


मिथुन : मनोरंजनासाठी वेळ


जीवनात काम प्रत्येक दिवशी कारायचेच असते. कधी तरी थोडा वेळ मोनरंजासाठीही काढायला हवा, हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज इच्छित कार्य उशीरा होईल. म्हणून विचलित होऊ नका. चिकाटीने प्रयत्न करीत राहा. आपलं हित लक्षात घेऊन स्वत:च्या भरभराटीवर लक्ष केंद्रित करा. मात्र हे करीत असातंना थेंबे थेंबे तळे साचे, ही लक्षात घ्या.


कर्क : आर्थिक लाभ


 जे लोक कुटुंबाची काळजी घेणारे कुटुंबवत्सल अशा अस्वाभावाचे असतील आज त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे आनंदी आनंदी असेल. जीवनात कुठलाच धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. म्हणून स्वत:ला फसवू नका. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कुणावर किंवा एकाच साधनावर अवलंबून राहू नका. पर्यायी साधन तयार करा.


सिंह : बढती मिळेल


आज कामाप्रती प्रामाणिक असणा­-या सुयोग्य कर्मचा-यांना बढती मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी आज प्रयत्न करायला हवेत. आत्मवि·ाासही वाढलेला असेल. शक्य झाल्यास आज मनोरंजनासाठी वेळ काढा. त्यात मन रमवून विचारांमधून बाहेर निघा. संधी मनसोक्त जगण्याची जगण्याची संधीही मिळेल. म्हणून पुरेपुर आनंद घ्या.


कन्या : संधीवात वाढेल


संधीवात असणा­-यासाठी आज काळजी घेण्याचा दिवस आहे. कारण आज त्यांचा त्रास वाढू शकतो. म्हणून आहार, आचार, विचारांवर नियंत्रण ठेवून आरोग्याकडे लक्ष द्या. कुणाही बोलतांना अचुक संवाद साधा. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच कृती करण्यापूर्वी विचार करा.


तूळ : विसंबून राहू नका


एखादे काम पूर्ण करण्यासाठी कुणावरही विनंसूब राहू नका. तुमची निराशा होऊ शकते किंवा फसगत होऊ शकते. पर्यायी साधने तयार करुन ठेवा. आज संध्याकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होईल. टिका व तक्रार यात वेळ घालवू नका. झाले गेले तिथेच सोडून आता पुढे काय याचा विचार करा व चालायला लागा. पदरी पडले अन् पवित्र झाले, ही भावना ठेवा.


वृश्चिक : पथ्य पाळा


जीवनात काही पथ्य पाळलीच पाहिजेत. विशेषत: आहार विहारादी पथ्य जर तुम्ही पाळत असाल तर आज ते तंतोतंत पाळा. नाही तर त्रास होऊ शकतो. जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिका करण्याचा अधिकार नाही. यापैकी जर तुम्ही असाल तर आज दुस-यावर टिका अजिबात नको. जीवनात सर्वकाही आपल्याला मिळालं पाहिजे, ही अपेक्षा चुकीची आहे. सैतानालाही त्याचा वाटा द्यायला हवा.


धनु : विरोध होईल


आज तुम्हाला अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. आकस्मिक झालेल्या विरोधाने तुमचे लक्ष विचलित होऊ शकतं. मात्र आपल्या मतावर, प्रयत्नांवर ठाम राहा. त्यातच तुमचा फायदा आहे. सत्याची कास धरा. टाकीचे धाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सोसावेच लागेल. अनिश्चित जगात निश्चितता शोधण्यात काही अर्थ नाही.


मकर : मनोरंजनासाठी वेळ


जीवनात काम प्रत्येक दिवशी कारायचेच असते. कधी तरी थोडा वेळ मोनरंजासाठीही काढायला हवा, हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. प्रकृती थोडीसी आरोग्य नरम-गरमच राहिल. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. जे पथ्य असतील ते तंतोतंत पाळा. वरकरणी कनवाळू आतून कठोर अशा दुतोंडी व्यक्तींपासून सावध राहा. ते तुमचं नुकसान करु शकतात.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र


फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या