मेष - आरोग्याची काळजी घ्या.
नकारात्मक विचार आणि बिघडलेलं आरोग्य यामुळे मन निराश होईल. दिवसभर चिडचिड जाणवेल. उत्पन्नातून आनंद मिळेल. मात्र जमा आणि खर्चामध्ये संतुलन राखा. सासरच्या व्यक्तींकडून धनप्राप्ती होईल. जोडीदारासोबत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल.
कुंभ - अधिकारी वर्गाचा ताण वाढेल.
कामाच्या ठिकाणी ताण- तणाव वाढल्याने निराश व्हाल. विरोधकांचा विरोध वाढेल. वाद-विवादांपासून दूर रहा. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. अचानक मित्रांची भेट होईल. लहान- सहान आरोग्य तक्रारी सतावतील.
मीन - जोडीदाराशी नाते मजबूत होईल.
मित्र आणि नातेवाईकांमुळे मन प्रसन्न राहील. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता. घरातील वातावरण आनंदी असेल. कुंटूंबासोबत वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. व्यवसायात राजकीय सहकार्यांमुळे लाभ होण्याची शक्यता.
वृषभ - उच्च शिक्षणाची संधी मिळेल
संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आज उच्च शिक्षणाची संधी मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. वैवाहिक जीवन सुखाचे असेल. मुलांकडून आनंदवार्ता कानी पडेल. राजकीय सहयोग मिळेल. चांगल्या कार्यात मन गुंतवाल.
मिथुन - खर्चात वाढ होण्याची शक्यता
महत्त्वाचे कागदपत्र हरविण्याची शक्यता आहे. अचानक खर्चामध्ये वाढ झाल्याने चिंताग्रस्त व्हाल. पैशांची चणचण जाणवेल. कुटूंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याबाबत लहान-सहान कुरबूरी जाणवतील.
कर्क - रक्तप्रवाह सुधारेल
ब्लडप्रेशरच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. मात्र आहाराबाबत योग्य ती काळजी घ्या. आई-वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्या.आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. कौटुबिक जीवन सुखाचे असेल. अनोळखी लोकांपासून सावध रहा.
सिंह - जोडीदाराची काळजी घ्या.
कामाच्या ताणामुळे जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये वाढ होईल. विरोधक तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. वाहन चालवताना सावध रहा.
कन्या - धनप्राप्ती होईल
संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून धन मिळण्याची शक्यता आहे. जोजीदारासह सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. कौटुंबिक जीवनामध्ये सुख आणि शांती मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
तूळ - वडीलाधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या
घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यसमस्या वाढणार आहेत. आहाराबाबत काळजी घ्या. राजकीय सहकार्य मिळेल. ज्यामुळे व्यवसायामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.अधिकारी वर्गाकडून मदत मिळण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल
वृश्चिक - नवीन प्रेमसबंध निर्माण जुळतील
आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच आनंदाचा असेल. कारण आज जोडीदारासोबत चांगला वेळ घालविण्याची संधी मिळेल. जीवनाचा आनंद लुटाल. नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल. विवेकबुद्धीने रखडलेली कामे मार्गी लागतील.
धनु - व्यवसायामध्ये सावध रहा.
कामात वेळ गेल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. वैचारिक मतभेद झाल्याने कामाच्या ठिकाणी निराश व्हाल. विचारपूर्वक निर्णय घ्या. यश निश्चित मिळेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी होतील.
मकर- एखादं मोठं प्रोजेक्ट मिळेल
आज तुम्हाला एखादी खुशखबर मिळेल. एखादं मोठं प्रोजेक्ट हाती येणार आहे. आयात - निर्यातीच्या व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवनात मानसन्मान मिळेल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.