13 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, सिंह राशीचे वैवाहिक जीवन आज सुख-समाधानाचे

13 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, सिंह राशीचे वैवाहिक जीवन आज सुख-समाधानाचे

मेष : जेष्ठ नागरीकांसाठी काळजीदायक


आज जेष्ठ नागरीकांसाठी काळजी करण्याचा दिवस आहे. त्यांची दुखणी वाढू शकतात. एखाद्या कामाला पूर्ण होण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो. म्हणून निराश होऊ नका. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. झटपझट काहीच मिळत नाही. पैसा तर अजिबात नाही. म्हणून त्यामागे लागू नका.


कुंभ : संताप होईल


कुठल्या तरी गोष्टीवर आज तुमचा विनाकारण संताप होईल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होणार नाही, याचा काळजी घ्या. स्त्री पक्षाकडून आज तुम्हाला सहयोग प्राप्त होऊ शकतो. म्हणून आनंदाचे वातावरण असेल. असत्य एक दिवस समोर येतच, म्हणून सत्याची कास धरा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.


मीन : वास्तूवर खर्च


आज तुम्ही आनंदाने वास्तूवर खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकते. म्हणून त्यादृष्टीने प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून प्रयत्न करीत राहा. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.


वृषभ : बढती मिळेल


आज सरकारी कर्मचा-यांसाठी लाभाचा दिवस आहे. कारण सुयोग्य कर्मचा-यांना बढती आज बढती मिळू शकते. घरात शीतयुद्ध सुरु असेल तर ते वेळीच संपविण्याचा प्रयत्न करा. एखादे काम अपूर्ण असेल तर चिकाटी कायम ठेवून ते पूर्ण करण्यावर भर द्या. यश नक्की मिळेल.


मिथुन : नवीन ओळखी होतील


आज तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत. त्यामुळे सकारात्मकता अंगी ठेवून त्याचा लाभ घ्या. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदाच होऊ शकतो.  कुणाशीही बोलतांना मोजके व अचुक बोला. फुकटच्या गप्पा टप्पा नकोत. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं होऊ शकतो. आज वास्तुतून लाभ मिळू शकतो.


कर्क : वाद निर्माण होईल


आज तुमचा सासरच्या मंडळींशी वाद होऊ शकतो. त्यामुळे सामंजस्याची भुमिका घेऊन वाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी स्वत:ची अवस्था करु नका. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढेल. म्हणून सकारात्मक राहा. संध्याकाळपर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होईल.


सिंह : वैवाहिक जीवन आनंदमय


आज तुमचे वैवाहिक जीवन अधिक आनंदमय, सुरेख होऊ शकतं. म्हणून आज त्या दृष्टीने प्रयत्न करायला चुकू नका. काही गैससमजुतीमधून वडिलांशी मदभेद होऊन संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करुन संघर्ष टाळा. भुतकाळातील एखाद्या आनंददायी गोष्टीचा आज पुन्हा आनंद प्राप्त होऊ शकतो.


कन्या : सुरुवात करा


मार्ग सापडत नाही, म्हणून निराश होऊन एका ठिकाणी थांबू नका. चालायला सुरुवात करा. भाग्य तुमच्या मागे येईल. प्रयत्नांनीच परमेश्वराची प्राप्त होऊ शकते. एखाद्या लहान फायद्यासाठी मोठं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणून सामंजस्याची भूमिका घ्या.


तूळ : नुकसान चालेल


भविष्यात एखादा मोठा फायदा होणार असेल तर आज लहान नुकसान झालेलं चालेल. ती तुमची आजची गुंतवणूक समजा. चार दिवस तर चार दिवस सुनेचेही असतात, ही बाब लक्षात घेऊन घरात लक्ष द्या. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होऊन आनंदाच्या विविध रंगांचा अनुभव मिळेल. इच्छित कार्य उशिरा होईल.


वृश्चिक : लाभाची शक्यता


आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदी आनंद असेल. एखादे काम पूर्ण होण्यामध्ये आज अडचणी निर्माण होऊ शकतात. आरोग्य थोडं नरम - गरमच राहील. म्हणून आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्रास वाढणार नाही याची काळजी घ्या.


धनु : टीका नकोच


जो प्रशंसा करु शकत नाही त्याला टिका करण्याचा अधिकार नाही. अशी तुमची अवस्था असेल तर आज कुणावरही टीका अजिबात नकोच. आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शन, मोलाचा सल्ला मिळेल. त्याचा आपल्या कामामध्ये उपयोग करुन घ्या. फायदा होऊ शकतो. महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रयत्न वाढवा.


मकर : धोका पत्करा


जीवनामध्ये कुठलाच धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो. म्हणून भिती दूर करुन धाडस करा. आयुष्याविषयी विचार करण्यासाठी आज तुम्हाला एकांताची आवश्यकता भासेल. एकातांता जाऊन चिंतन करण्यावर भर द्या. नवीन मार्ग गवसतील. स्त्रियांना आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र