15 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना वास्तूलाभ होण्याची शक्यता

15 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ,  मेष राशीच्या लोकांना वास्तूलाभ होण्याची शक्यता

मेष : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला चुकू नका. एखादे यश प्राप्त केल्यामुळे आज तुम्ही शत्रुला नामोहरम करु शकाल. एखाद्याविषयी मनात वैरभावना असेल तर आज तिचा त्याग करा. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये.


कुंभ : शत्रू पराभूत होतील


कधी कधी यशाच्या आनंदापेक्षा शत्रु पराभूत झाल्याचा आनंद मोठा असतो. याची अनुभूती आज तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. मनस्वास्थ बिघडवणा-या घटनाही आज घडू शकतात. म्हणून शक्यतोवर शांत राहण्याचा प्रयत्न करा. तोलून मापून बोलणेच आज हिताचे राहिल.


मीन : शत्रू वरचढ होतील


प्रत्येक गोष्टीत नेहमीच आपल्या मर्जीप्रमाणे घडत नसतं. आज तुमचे शत्रु वरचढ होणार आहेत. मात्र त्यामुळे विचलित होऊ नका. स्वत:मधील लवचिकता वाढवा. अगोदर श्रम नंतरच भाग्याची साथ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रयत्न सुरु ठेवा व त्या प्रयत्नांवर विश्वासही ठेवा.


वृषभ : यश मिळेल


आज विशेषत: व्यावसायिकांसाठी शुभ दिवस असून त्यांना यश मिळणार आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा आज जास्त मिळू शकतं. म्हणून आळस किंवा प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. आजचा दिवस उत्तम आहे. जे मिळतंय ते सर्व पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त बोलतांना जीभ सांभाळा. कुणावरही तडका-फडकी शेरेबाजी नको.


मिथुन : संधीचा लाभ घ्या


आज नोकरी व व्यवसायामध्ये संधी चालून येणार आहे. फक्त त्या संधीला ओळखुन तिचा योग्य तो लाभ कसा घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून राहिल. आज थोडीशी बेशिस्त नुकसानकारक ठरु शकते. एक ना धड भराभर चिंध्या अशी स्वत:ची अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. भित्या पोटी ब्रम्हराक्षस असतो, म्हणून धाडस करा.


कर्क : विद्यार्थ्यांना लाभ


विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लाभदायी असून त्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहणार आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. मानसन्मानात वाढ होण्याचे संकते आहेत. एखाद्या गोष्टीवर चिंता करीत बसण्यापेक्षा चिंतन करण्यात वेळ घालवा. मार्ग सापडेल.


सिंह : आळस कराल


आजचा दिवस तुमच्यासाठी आळस करणारा, कंटाळा करणारा असेल. विद्यार्थी अभ्यासात आळस करुन तो टाळण्याचा प्रयत्न करतील. तसेच कार्य टाळण्याकडे लक्ष राहिल. न कत्र्याचा वार शनिवार असतो. म्हणून कंटाळवाणा दिवस असला तरी त्याने आपले नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.


कन्या : विद्यार्थ्यांना यश


आज विशेषत: स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस असून त्यांना यश मिळणार आहे. एखाद्या संकटातून तुम्ही आज बाहेर पडणार आहात. देव तारी त्याला कोण मारी याची अनुभूती तुम्हाला मिळेल. आज जेष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळविण्याचा प्रयत्न करा. ते तुमच्या कामी येईल.


तूळ : सोशल मीडियापासून लांब राहा


भयंकररीत्या फोफावलेल्या सोशल मीडियाने आपली सोशकता कमी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी फक्त आजच नव्हे तर कायमस्वरुपी सोशल मीडिया व टीव्हीपासून लांब राहिले पाहिजे. आज सायंकाळपर्यंत आकस्मिकरीत्या एखादी आनंददायी घटना घडू शकते. संतती सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल.


वृश्चिक : गुरुंचे आशीर्वाद मिळवा


आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ किंवा गुरुंचे आशीर्वाद, मार्गदर्शन नेहमी मिळवायला पाहिजेत. त्याचा आपल्याला लाभच होत असतो. कोणतीच गोष्ट सहज मिळत नाही. म्हणून यश मिळवायचे असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतील. सासरकडील मंडळींकडून लाभची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही परिवरांमध्ये आनंदाचे वातावरण राहिल.


धनु : गैरसमज होईल


आज एखाद्याबद्दल तुमचा गैरसमज होऊ शकतो. म्हणून कुणाविषयीही समज बनवितांना, बोलतांना विचार करा. घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे विशेषत: आपल्या जोडीदारासोबत गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. महत्त्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज नको. त्यांना शक्यतोवर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.  


मकर : विरोध होईल


आज तुम्हाला अनोळखी लोकांचा विरोध होऊ शकतो. म्हणून लक्षही विचलित होऊ शकतं. प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल. तसे करीत असल्यास विचारपूर्वकच करा. विद्यार्थी संपूर्ण लक्ष अभ्यासात आज देणार आहेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र