16 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृषभ राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल

16 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृषभ राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल

 


मेष : आरोग्याकडे लक्ष द्या


आज आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. छोटे दुखणेही त्रासदायक ठरु शकते. म्हणून काळजी घ्या. आज तुम्ही आनंदाने वास्तूवर खर्च करणार आहात. काही प्रसंगांमध्ये शत्रू वरचढ होऊ शकतात. म्हणून आत्मविश्वास कमी होऊन लक्ष विचलित होऊ शकतं.


कुंभ : भावंडांची काळजी


लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची आस्थेने विचारपुस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल. स्वत:मधील लवचिकता वाढवा. तडजोडीचे धोरण स्विकारा. सरकारी कर्मचा-यांसाठी आज दिवस गोंधळाचा असल्याने विचार करुन निर्णय घ्या. आपल्याकडून कुठलीच चुक होणार नाही, याची काळजी घ्या.


मीन : धैर्याने राखा


आज तुम्ही कुटुंबातील एखादा निर्णय घेणार असाल तर धैर्य राखावे लागेल. विचारपूर्वकच निर्णय घ्या. त्या निर्णयाचे स्वागतही होऊ शकते. व्यवसायात आज गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कुटुंबात धैर्याने निर्णय. व्यवसायात गोंधळ सरकारी कर्मचारी गोंधळात पडतील.


वृषभ : शत्रू पराभूत होतील


कधी कधी मिळालेल्या यशाच्या आनंदापेक्षा शत्रू पराभूत झाल्याचा आनंद मोठा असतो. आज तुम्ही शत्रूला पराभूत करुन नामोहरम करणार आहात. आरोग्य चांगले राहून दिवसभर ताजेतवाणे राहाल. आज प्रवासाचाही योग असून त्यात जोडीदाराची साथ मिळणार आहे. त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल.


मिथुन : व्यायाम करा


शरीरासह मनही स्वस्थ राखण्यासाठी वेळोवेळी व्यायाम करणे गरजेचे असते, हे आपल्याला शिकविणारा आजचा दिवस असेल. त्यामुळे व्यायामाची सवय करुन घ्या. जोडीदाराच्या प्रवाभाव आज तुम्ही राहणार आहात. जोडीदाराच्या मनानुसार वागण्याचा प्रयत्न कराल. फक्त कुणाशीही बोलतांना सांभाळून बोला.


कर्क : जंक फूड टाळा


जंक फूड हे आरोग्याची हानिकारकच असतात. आज ते अजिबात नकोच. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. मात्र त्यामुळे खर्चही वाढणार आहे. जो तुम्ही आनंदाने करणार आहात. मानसन्मानात वाढ होऊन आज तुमची योग्यता योग्य उंची गाठणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात कमी पडू नका.


सिंह : अपचनाचा त्रास


आज तुम्हाला अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवून पथ्य असतील तर तंतोतंत पाळण्याकडे लक्ष द्या. प्रेमवीरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण आज प्रेयसीशी संपर्क होऊ शकतो. आज तुमच्या योग्यतेला योग्य अशी उंची प्राप्त होणार आहे.


कन्या : अन्नबाधा होईल


आज तुम्हाला अन्नबाधा होऊ शकते. त्यामुळे आहाराविषयी कुठली पथ्य तुम्हाला सांगितलेली असतील ते पाळण्यावर भर देऊन आरोग्याची काळजी घ्या. आज जोडीदाराशी मनमुटाव होऊ शकतो. घराघरी मातीच्या चुली असतात. म्हणून सामंजस्याची भुमिका घ्या. अब पछताये क्या होत जब चिडीया चुग गई खेत. त्यामुळे नंतर पश्चाताप करुन उपयोग नाही.


तूळ : आरोग्याची काळजी घ्या


आज दिवस आरोग्याची काळजी करण्याचा दिवस आहे. विशेषत: रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून कुठलीच तडका फडकी शेरेबाजी करु नका. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल कर्मात बदल करा. भाग्यही बदलण्याची शक्यता आहे.


वृश्चिक : मुलांकडून अपेक्षा नको


आज मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे ती अपेक्षाही आज तुम्ही करायला नको. निराशा हाती येईल. व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद असा राहणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ घ्या. कतीही घाई असली तरी वाहतुकीचे नियम पाळून वाहन सावकाश चालवा.


धनु : संततीला यश


आज तुमच्या संततीला यश मिळू शकते. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांचा योग्य ते कौतुक करुन प्रोत्साहन द्यायला विसरु नका. खर्चाकडे लक्ष ठेवा. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. अंथरुन पाहूनच पाय पसरायचे असतात, हे लक्षात घ्या. प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे.


मकर : संततीचं कौतुक


आज तुमची संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्याचं कौतुक झाल्यामुळे तुम्हाला अभिमान त्यांचा अभिमान वाटणार आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवा. नाही तर आर्थिक गणिते बिघडू शकतात. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यातुन संधी लाभतील.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र