17 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या जीवनात शांतीचे वातावरण

17 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या जीवनात शांतीचे वातावरण

मेष : जेष्ठांना आजार


आज जेष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस आहे. कारण आज ते आजारी पडू शकतात. तुम्ही जोड व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. मात्र हातचे सोडून पळत्याचे मागे लागणे बरोबर नाही. लेखकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून त्यांना लेखन कार्यात यश मिळेल.


कुंभ : नुकसान चालेल


आज एखाद्या लहान नुकसानाने भविष्यात जर मोठा फायदा होणार असेल तर नुकसान चालेल. त्याला गुंतवणूक समजा. मोठ्या फायद्यासाठी लहन नुकसान चालेल. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. अनोळखी लोकांडून विरोध. स्त्री पक्षाकडून सहयोग.


मीन : वास्तूवर खर्च


आज तुम्ही आनंदाने वास्तूवर आवश्यक तो खर्च करणार आहात. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. एखाद्या कामात अडचणी येऊ शकतील. मात्र हतबल न होता प्रयत्न सुरु ठेवा. काम पूर्ण झाल्याने यश तर मिळलेलच सोबतच तुमचे शत्रुही पराभुत होणार असल्यामुळे यशाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.  


वृषभ : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभाचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात कमी पडू नका. घरामध्ये जर शितयुद्ध सुरु असेल तर ते वेळीच थांबविण्याचा प्रयत्न करा व घरात लक्ष घाला. आज तुम्हाला मित्रांकडून आनंद प्राप्त होऊ शकतो. तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घावून एखाद्या गोष्टीचे नियोजनही करु शकतात.


मिथुन : शांतीचे वातावरण


मानसिक सुखशांती प्रत्येकाला हवीहवी वाटते. आज तुम्ही त्यांचा आनंद घेणार आहात. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस यशदायी असून विशेष यश प्राप्त होऊ शकतं. म्हणून प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. वास्तुतुन लाभाचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा.


कर्क : वादाची शक्यता


आज तुमचे सासरच्या मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी स्वत:ची अवस्था होणार नाही, याची काळजी घ्या. कल्पक व सर्जनशील कार्यात प्रगती आज होऊ शकते. म्हणून आपल्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, हे लक्षात ठेवा. नौकरी व व्यवसायात मिळणा-या संधीचा लाभ घ्या.


सिंह : अभ्यासात यश


विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशदायी असून त्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहणार आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. आज तुमचा वडिलांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून सामजंस्याशी भुमिका घेणे कधीही चांगले. एखाद्या कामाला वेळ जास्त लागेल.


कन्या : कंटाळा येईल


आजचा दिवस तुमच्यासाठी कंटाळवाणा ठरु शकतो. परिणामी विद्यार्थी अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण असेल तर चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एका हाताने टाळी वाजत नाही, ही सतत्य लक्षात घ्या.


तूळ : वैवाहिक जीवन सुकर


आज तुमचे वैवाहिक जीनव अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यात विविध रंग आज तुम्हाला बघावयास मिळू शकतात. नवीन ओळखी होतील. त्यामुळे सकारात्मकता अंगी बाळगुण त्यांना सामोरे जा. स्पर्धा परिक्षेच्या विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यामुळे अभ्यासात लक्ष द्या.


वृश्चिक : सोशल मीडिया घातक


सोशल मीडियाचा अतिवापर हा सर्वांसाठीच घातक आहे. मात्र किमान विद्याथ्र्यांसाठी तरी त्यापासून लांब राहायला हवे. सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. ओळखीच्या लोकांबरोबर सामजंस्य वाढू शकते. म्हणून आज ऋणानुबंध अधिक घट्ट करुन घ्या.


धनु : आनंद वाढेल


भुतकाळात घडून गेलेल्या आज एखाद्या आनंददायी घटनेचा आनंद आज पुन्हा वाढणार आहे. गुरु किंवा आपल्या जेष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन घ्यायला आज विसरु नका. तसेच ते आपल्या कामामध्ये, जीवनामध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा. त्यातच तुमचा फायदा आहे.


मकर : मानसिक तणाव


स्त्रियांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे शांत राहून आवडत्या गोष्टींमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करा. लहान फायदा मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये आपलं मोठं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. ऐकावे जनाचे करावे मनाचे. आज एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे कृती करतांना किंवा बोलतांना काळजी घ्या.


 लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र