मेष : कलाकारांना यश
आजचा दिवस कलाकारासाठी यशदायक आहे. त्यामुळे लौकिकातही भर पडणार आहे. कुणावरही विसंबून राहू नका. त्यात तुमचे नुकसान होऊ शकते. असत्याची बाजु धरुन तात्पुरता फायदा करुन घेण्यापेक्षा सत्याची कास धरा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर सहन करावेच लागेल.
कुंभ : अपेक्षा नको
अनिश्चित जगात निश्चितता मिळेल, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे आज कुठलीच अपेक्षा नको. स्वत:मधील लवचिकता वाढवा. तडजोडीचे धोरण स्विकारा. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्याच आज मदत मिळणार आहे. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.
मीन : वैरभावनेचा त्याग करा
एखाद्या विषयी मनामध्ये वैरभावना असेल तर तिचा त्याग करा. त्यातच तुमचा फायदा आहे. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये. मार्ग सापडत नसला तरी थांबू नका. चालायला सुरु वात करा, भाग्य आपोआप मागे येईल. प्रयत्नांनीच परमेश्वराची प्राप्ती होत असते. जीवनामध्ये धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका असतो.
वृषभ : अर्थलाभ होईल
तुम्ही जर कुटुंबवत्सल असाल, कुटुंबाची काळजी घेणारे असाल तर आज तुम्हाला अर्थलाभ होऊ शकतो. त्याचा आनंद सर्वांसोबत वाटण्यास चुकू नका. उथळ पाण्याला खळखळात फार असतो. म्हणून आज अतिआत्मविश्वास नको. तो घातक ठरु शकतो. सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : कृतीपूर्वी विचार
कृती पूर्वी विचार करणे नेहमीच चांगले असते. आज तर नक्की करा. तरच लाभ होईल. आहार विहारादी कुठली पथ्य तुम्ही पाळत असाल तर आज त्याचे तंतोतंत पालन करा. कुणाशीही बोलतांना शब्दांवर नियंत्रण ठेवून मुद्देसुद बोला. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करु नका.
कर्क : बेशिस्तपणा नको
आज थोडीशीही बेशिस्त नको. नाही तर एक ना धड भराभर चिंध्या, अशी तुमची अवस्था होऊ शकते. कुणाच्याही व्यंगावर हसणे हे कधीही वाईटच आहे. आज तर अजिबातच नको. नुकसान होऊ शकतं. कुठल्या महत्त्वाकांक्षा ठेवून तुम्ही कार्यरत असाल तर आज त्या पूर्ण होऊ शकतात.
सिंह : संगीत ऐका
तणाव घालवण्यासाठी संगीत हा सर्वाेत्तम उपाय आहे. त्यामुळे आज जर तुम्ही तणावात असाल तर संगीत ऐकून त्यात मन रमविण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या मानसन्मानात वाढ होऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वासही वाढू शकतो. मात्र टिका किंवा तक्रार करण्यामध्ये वेळ घालवू नका. जे पदरी पडले आहे ते पवित्र मानुन घ्या.
कन्या : आनंद घ्या
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा, लाभाचा आह. त्यामुळे आज मनसोक्त जगुन जास्तीत जास्त आनंद घेण्याचा प्रयत्न करा. कुणाशीही बोलतांना अचुक संवाद साधा. आपल्या बोलण्याने कुणी दुखावला जाणार नाही, याची काळजी घ्या. संध्याकाळपर्यंत एखादा आकस्मिक आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो.
तूळ : हट्ट सोडा
सर्वकाही आपल्यालाच मिळेल हा हट्ट सोडा. शैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो. यश हे कठोर परिश्रमानंतर मिळतं. म्हणून यशाला उशीर होतोय म्हणून परिश्रमांमध्ये कमी पडू नका. झटपट काहीच मिळत नाही. पैसा तर अजिबात नाही. म्हणून त्यामागे लागू नका. तो क्षणिक आनंद असतो.
वृश्चिक : आज निर्णय नको
कुठल्याच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज घेऊ नका. शक्य होईल तितके त्याला टाळ्याचा प्रयत्न करा. आज फुकटच्या गप्पा टप्पाही नको. नाही तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, अशी तुमची अवस्था होईल. उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी पर्यायी साधने तयार करा. एकावरच अवलंबून राहू नका.
धनु : बढती मिळेल
नोकरदार मंडळीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. कारण आज सुयोग्य कर्मचा-यांना बढती मिळू शकते. यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. थोडं स्वार्थी होऊन स्वत:च्या भरभराटीवर लक्ष केंद्रित करा. मात्र ते करीत असतांना थेंबे थेंबे तळे साचे, हे लक्षात घ्या.
मकर : सावध राहा
वरकरणी कनवाळू आतून कठोर अशा दोन तोंडी व्यक्तींपासून सावध राहा. ते तुमचं नुकसान करु शकतात किंवा तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. संध्याकापर्यंत एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होईल. त्याचा मनस्वी आनंद होऊ शकतो. मात्र मनस्वास्थ बिघडण्याचे योग आहेत. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.
लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र