20 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला आज वास्तूलाभ

20 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मिथुन राशीला आज वास्तूलाभ

मेष : जोड व्यवसायाचा विचार


तुमच्या मनात जर जोड व्यवसायाचा विचार सुरु असेल तर निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्या. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. चिंतन करण्यावर भर द्या. आज तुमच्या संततीला यश मिळणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असेल. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. इच्छित गोष्ट साध्य झाल्याने शत्रु पराभुत होऊ शकतात. त्याचा मनस्वी आनंद होईल.


कुंभ : लवचिकता वाढवा


मोडेन पण वाकणार नाही, हे धोरण बरे नव्हे. म्हणून स्वत: मधील लवचिकता वाढवा. विनम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा. मोठ्या फायद्यासाठी आज लहान नुकसान चालेल. त्याला गुंतवणूक समजा. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे. त्यामुळे इतरांचा, त्यांच्या मताचा सन्मान करा. नवीन ओळखीही आज होऊ शकतात. आत्मविश्वास वाढवा.


मीन : मनस्वास्थ बिघडेल


एखादी बाब मनाला लावून घेतल्याने किंवा आकस्मिक संकट आल्याने आज तुमचे मनस्वास्थ बिघडणार आहे. चिंता कर­ण्यापेक्षा चिंतन करण्यावर भर द्या. कुटुंबात जर एखादा निर्णय आज घेत असाल तर धैर्य राखणे गरजेचे आहे. नाही तर निर्णय चुकून तुम्ही टीकेचे धनी व्हाल. स्त्रियांना मानसिक तणाव जाणवेल. म्हणून आवडत्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा.


वृषभ : मनाला अस्वस्थता जाणवेल


आपल्या राशीला चंद्र चौथा आहे. त्यामुळे मनाला थोडी अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आज आवडणा­-या गोष्टी करण्यावर भर द्या. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या विद्याथ्र्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्याचं दुखणं वाढणार आहे. म्हणून स्वत:ची काळजी घ्या. काही पथ्य दिलेले असतील तर आज तंतोतंत पाळा.


मिथुन : वास्तूतून लाभ


तुमचा आजचा दिवस वास्तूतून लाभ मिळविण्याचा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण प्रयत्न वाढविले पाहिजे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. त्यामुळे काही निर्णय घ्यायचा असेल, कुठले नवीन काम सुरु करायचे असेल, नियोजन करायचे असेल, कुणाशी बोलायचे असेल किंवा याशिवाय जेही करायचे असेल तर सर्व आज करुन घ्या. सांधेदुखीचा त्रास वाढेल. स्वत:ची काळजी घ्या.


कर्क : सुख स्विकारा, दु:ख दूर सारा


जीवन जगत असतांना सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार करायचा असतो. त्यामुळे सदैव सुखाचा स्विकार करुन दु:खाला दूर करण्याचा प्रयत्न करण्यावर भर द्या. परिश्रम आणि भाग्य याचं अतूट नातं आहे. भाग्याची साथ नसेल तरीही श्रम करण्यावर भर द्या, भाग्य आपोआप चालत येईल. स्वत:वर विश्वास ठेवा. आध्यात्मिक गोष्टीतून तुम्हाला आज आनंद प्राप्त होणार आहे.


सिंह : अतिआत्मविश्वास घातक


अतिआत्मविश्वास हा कधीही घातक असतो. त्यामुळे कधी कधी होणारे सोपे कामही कठिण होऊन बसते किंवा नुकसान होते. आज अतिआत्मविश्वास नको. नाहीतर उथळ पाण्याला खळखळाट फार,अशी तुमची अवस्था होईल. ­आज तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. त्यामुळे अपूर्ण असलेली कामे आज पूर्ण करुन घ्या. प्रॉपर्टीतून लाभ होण्याची शक्यता आहे.


कन्या : व्यापार, व्यवसायात यश


व्यावसायिक, व्यापा-यांची आजचा दिवस आनंददायी आहे. कारण आज त्यांना यश मिळणार आहे. त्यामुळे मिळणा-या संधीला ओळखून उपयोग करुन घ्या. यश मिळविल्याने तुमचे शत्रु पराभुत होऊ शकतात. त्याचा मनस्वी आनंद होईल. आज तुम्हाला आपल्या आरोग्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. छोटे दुखणेही मोठा त्रास देऊ शकतात.


तूळ : पथ्य पाळा


तुम्हाला जर कुठले पथ्य सांगितलेले असतील तर आज त्याचे अगदी तंतोतंत पालन करा. विशेषत: आहाराचे पथ्य असतील तर कंटाळा करु नका. नाही तर त्रास होऊ शकतो. आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. त्याला शक्य तेवढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. जबाबदा-या टाळण्याकडे तुमचा कल राहिल.


वृश्चिक : चिकाटी कायम ठेवा


भाग्याची साथ असल्याशिवाय यश मिळत नाही. मात्र भाग्याची साथ नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका. चिकाटी कायम ठेवून परिश्रम करीत राहा. भाग्य आपोआप चालत येईल. हातात घेतले काम अपूर्ण असेल तर आज पूर्ण करुन घ्या. नवीन ओळखी होण्याचा दिवस आहे. त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा. मनमुराद जगण्याची आज संधी मिळाली तर जगून घ्या. स्वत:साठी वेळ काढा.


धनु : कंटाळा येईल


रोजच्या दिनचर्येचा कंटाळा येईल. न कत्र्याचा वार शनिवार! त्यामुळे कामे टाळण्याकडे लक्ष राहिल. एखाद्या गोष्टीवर आज विनाकरण संताप येईल. त्याचा नंतर पश्चातपही होईल. मात्र तोपर्यंत संबंध खराब झालेले असतील. म्हणून संतापाला आज आवर घाला. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा मनस्वी आनंद प्राप्त होईल.


मकर : अविस्मरणीय क्षण


आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होईल. त्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज राहा. आज तुमचा प्रवास करण्याचाही योग आहे. मात्र त्यात नुकसान होण्याचा धोका आहे. कुणाशीही बोलतांना अचूक संवाद साधा. मुद्देसुद बोला. आपल्या बोलण्याने कुणी दुखावून संबंध खराब होणार नाही, याची काळजी घ्या.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र