21 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, आज तूळ राशीच्या लोकांना प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता

21 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, आज तूळ राशीच्या लोकांना प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता

 


मेष : व्यवसायात यश


व्यापारी, व्यावसायिकांसाठी आज आनंदाचा दिवस असेल. खरं आज मिळणा-या यशातून तुमचं कौशल्य दाखवि­ण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नका. आजार बळावू शकतो. जोडीदाराशी कसल्या तरी कारणावरुन आज मनमुटाव होईल. संसार म्हटलं की हे आलंच. त्यामुळे कोत्याच गोष्टीला आज जास्त ताणू नका. सामंजस्याची भूमिका घ्या.


कुंभ : विचार करुनच निर्णय


आज विशेत: सरकारी कर्मचा-यांनी विचार करुनच निर्णय घ्यावा. आपल्या निर्णयाने नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. संधीवात वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक आयुष्यातील विविध रंग आज अनुभवायला मिळतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. त्यामुळे आनंदी आनंद असेल.


मीन : गोंधळात पडाल


कामाचा ताण किंवा अतिरीक्त काम याच आज सरकारी कर्मचारी गोंधळात पडतील. त्यामुळे सावध राहा. आज थोडीशी कणकण जाणवून आरोग्य नरम-गरम राहिल. कंटाळाही येईल. त्यामुळे जाबाबदा-या टाळण्याकडे कल राहिल. मात्र घरात वैवाहिक आयुष्यातील विविध रंग अनुवण्याचा आजचा दिवस असेल. संबंध सुधरवून प्रेम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग करुन घ्या.


वृषभ : व्यवसायात गोंधळ


व्यावसायिकांची आजचा दिवस चिंतेचा असेल. कारण आज व्यवसायात गोंधळ उडण्याचे योग आहेत. आरोग्य चांगले राहिल. ते सदैव असेच राहावे, यासाठी प्रयत्न करा. जोडीदाराबद्दल आज गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे कुठलाही समज करुन घेतांना आधी विचार करा. घरोघरी मातीच्या चुली असतात. त्यामुळे वाद वाढवू नका.


मिथुन : खर्चाकडे लक्ष ठेवा


आवश्यक त्या ठिकाणी खर्च करणे आवश्यकच असते. मात्र तो खर्च आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त होता कामा नये. म्हणून आज खर्चाकडे लक्ष ठेवावे. अंथरुन पाहून पाय पसरावे. आरोग्य चांगले राहिल. त्यामुळे दिवसभर ताजेतणावे व आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. मात्र घरात जोडीदाराबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत बसणेच तुमच्या हिताचे राहिल.


कर्क : जंक फूड टाळा


जंक फूड आरोग्यासाठी कधीही वाईटच, किमान आज तरी तुम्ही ते टाळले पाहिजे. नाही तर त्रास होण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक गणिते बिघडण्याआधी सावध व्हा. स्त्रियांना मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे आवडत्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा.


सिंह : नफ्याकडे लक्ष ठेवा


उदारमतवादी असणे चांगलेच असते. मात्र त्यामुळे आपले नुकसान होता कामा नये. तसेच व्यावसायिक असाल तर बेसावधही राहता कामा नये. आज आपण नफ्याकडे लक्ष ठेवणे हिताचे राहिल. अपचनाचा त्रास होण्याचा संभव आहे. म्हणून आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. स्त्री पक्षाकडून आज तुम्हाला सहयोग प्राप्त होणार आहे.


कन्या : जोड व्यवसायाचा विचार


तुमच्या मनात जर जोड व्यवसायाचा विचार सुरु असेल तर निर्णय घेतांना विचारपूर्वक घ्या. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे योग्य नाही. अन्नबाधेचा त्रास होण्याची संभावना आहे. म्हणून आहारावर नियंत्रण ठेवा. पथ्य पाळण्यावर भर द्या. लहान भावडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल.


तूळ : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ होण्याचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज विशेष काळजी घ्यावी. कुठल्याच गोष्टीचा ताण घेऊ नका. चिंता तर अजिबात नको. तुमच्या प्रकृतीला ती मानवणार नाही. कुटूंबातील निर्णय घेतांना धैर्य ठेवणे हिताचे राहिल. नाही तर टीकेचे धनी व्हाल.


वृश्चिक : व्यवसायात यश


व्यावसायिकांसाठी आज आनंदाचा दिवस असून व्यवसायात दैदिप्यमान यश मिळू शकते. इच्छेपेक्षा, अपेक्षेपेक्षा आज तुम्हाला जास्त मिळणार आहे. त्यामुळे भरभरुन घेण्यासाठी सज्ज राहा. सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे पथ्य पाळून आरोग्याची काळजी घ्या. घरात जर शितयुद्ध सुरु असेल तर ते वाढविण्याआधी थांबविण्याचा प्रयत्न करा.


धनु : कागदपत्रे सांभाळा


महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. ते व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करा. संधीवात वाढू शकतो. पथ्य पाळून आरोग्याची काळजी घ्या. सासुरवाडीशी होणारा आजाच वाद कौटुंबिक समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अशी तुमची अवस्था होणार नाही याची काळजी घ्या. संयम व शांतता ठेवा.


मकर : प्रयत्नांना यश


अधिकारी वर्गाच्या हातात जर एखादे महत्त्वपूर्ण काम अडकलेले असेल तर आज प्रयत्न वाढवायला हवेत. तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस आहे. सांधेदुखीचा त्रास वाढेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतात. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा. एका हाताने टाळी वाजत नाही. आपण कुठे चुकतोय याचा शोध घ्या.


 लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र