22 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांना मिळणार नोकरीत यश

22 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, कन्या राशीच्या लोकांना मिळणार नोकरीत यश

 


मेष : आशीर्वाद मिळवावे


गुरुजन किंवा जेष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळविणे कधीही चांगले असते. तुम्ही कितीही तज्ज्ञ असलात तरी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. आहारविहारादी पथ्य पाळा. त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबवत्सल लोकांना अर्थलाभ होऊ शकतो. परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे.


कुंभ : सोशल मीडिया घातक


सोशल मीडियाचा अतिवापर घातक आहे. विद्याथ्र्यांनी तर सोशल मीडियापासून लांबच राहावे. जेष्ठ नागरीकांना आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. छोटे दुखणेही त्रासदायक ठरु शकते. आज तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत. आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा.


मीन : आशीर्वाद मिळवा


गुरु तसेच जेष्ठांच्या आशीर्वाद, मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या कामात उपयोग करा. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे आज त्यांच्याकडून कुठली अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. सासुरवाडीकडून लाभ होण्याची शक्यत आहे.


वृषभ : चिकाटी कायम ठेवा


यश मिळत नसेल तरीही चिकाटी कायम ठेवून प्रयत्न करीत राहा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यावर भर द्या. कदाचित आज ते पूर्ण होऊ शकतं. संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यांना अभिमान वाटेल. घरात मानसिक सुख शांतीचे वातावरण राहिल.


मिथुन : विद्यार्थांसाठी उत्तम


आजचा दिवस विद्यार्थांसाठी उत्तम असून त्यातही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थांसाठी अतिशय चांगला आहे. आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शन मिळेल. त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घ्या. अनोखळी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून थोडं विचलित व्हाल.


कर्क : अभ्यासात लक्ष


आज विद्याथ्र्यांचे संपूर्ण लक्ष अभ्यासात राहिल. त्याची सवय करुन घ्या. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर तुम्हाला सहन करावेच लागेल. आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहिल. जोडीदराच्या मर्जीप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न कराल. प्रियकरांसाठी आजचा दिवस उत्तम असून प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे.


सिंह : बढती मिळेल


नोकरदार मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे. सुयोग्य कर्मचा-यांना आज बढती मिळू शकते. आपण त्यात बसत असाल तर प्रयत्न वाढवायला हवेत. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. मात्र त्याचबरोबर खर्छही वाढणार आहे. विशेषत: आज तुम्ही वास्तुवर आनंदाने खर्च करणार आहात.


कन्या : संधीचा लाभ घ्या


नोकरी सह आज व्यवसायातही संधी उपलब्द होतील. त्यामुळे नोकरदार व व्यावसायिक मंडळींनी त्याचा लाभ घ्यायला चुकू नये. तुमच्या घरात जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो निवळू शकतो. त्यासाठी तडजोडीचे धोरण स्विकारा. लाभ होईल. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होईल.


तूळ : गोंधळ उडेल


आज विशेषत: सरकारी कर्मचारी गोंधळात पडतील. त्यामुळे कोणतंही काम करतांना सावध राहा. तणावात चुका करु नका. संतती यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांना प्रोत्साहन द्या. ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य आज वाढू शकतं. संबंध सुरधरविण्यासाठी त्याचा लाभ करुन घ्या.


वृश्चिक : लालच बुरी बला


लालच बुरी बला होती है. म्हणून आज लालसेपासून दूर राहा. झटपट मिळणा-या पैशांच्या मागे लागू नका. तुम्ही चुकीचा मार्गावर आहात हे लक्षात असू द्या. वडिलांशी आज संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे शांत राहून विषय वाढणार नाही याची काळजी घ्या. शत्रु आज वरचढ होऊ शकतात.


धनु : आर्थिक ओढाताण


पैसा जितका कमवाल तितके खर्चही वाढत राहतात. आज तुम्हाला आर्थिक ओढातानीचा सामना करावा लागेल. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत, अशी अवस्था असेल. आज जोडीदाराशी मनमुटाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणच माघार घेणे कधीही योग्य. विषय वाढवू नका. वास्तुतून लाभ मिळू शकतो.


मकर : अभ्यासाचा कंटाळा येईल


विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे मन दुस-या कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकलेले असेल. तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहणार आहे. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे तुम्ही वागणार आहात. अगोदर श्रम करा नंतरच तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. स्वत:वर विश्वास ठेवा.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र