23 फेबुवारी चं 2019 राशीफळ, वृश्चिक राशीसाठी आज दिवस आनंदाचा

23 फेबुवारी चं 2019 राशीफळ, वृश्चिक राशीसाठी आज  दिवस आनंदाचा

मेष : वडिलांशी संघर्ष


आज तुमचा वडिलांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहून वाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्याविषयी समज व त्यातून गैरसमज करुन घेण्याआधी विचार करा. कदाचित तुम्ही चुकीचेही असू शकाल. कोणतीही कृती कर­ण्यापूर्वी विचार करणे आज हिताचे राहिल. कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या.


कुंभ : प्रवासाचा आनंद


आज तुमचा प्रवासाचा योग असून तो तुम्ही जोडीदारासोबत करणार आहात. त्यामुळे त्या प्रवासाचा आनंद तुम्ही घेणार आहात. सैतानालाही त्याचा वाटा द्यावा लागतो. म्हणून सर्व आपल्यालाच मिळेल ही अपेक्षा व्यर्थ आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकाच साधनावर अवलंबून राहू नका. पर्यायी साधन तयार करा.


मीन : वडीलांकडून मार्गदर्शन


वडीलांकडून आज तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. अनुभवातून आलेल्या त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य तो लाभ आपल्या कामात करुन घ्या. फायदा होईल. शत्रूला नामोहरम करण्याचा आजचा दिवस आहे. फक्त कुणाच्याही व्यंगावर हसू नका. ते तुमच्या हिताचे नाही आणि तुम्हाला शोभतही नाही.


वृषभ : जेष्ठांना काळजी


जेष्ठ नागरीकांसाठी आज काळजी करण्याचा दिवस असून त्यांना आपले आरोग्य सांभाळावे लागणार आहे. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यातून तुम्हाला संधी प्राप्त होणार आहेत. संधीचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहा. आज थोडा वेळ मिळेल स्वत:साठी जगण्याचा, तेव्हा जगून घ्या.


मिथुन : जोडीदाराचा प्रभाव


आपल्यावर जोडीदाराचा प्राभाव असणं आनंददायक असतं. तो आनंद आज तुम्हाला मिळेल. एखाद्या संकटातून सुटाका होईल. त्यामुळे ईश्वराचे आपल्यावर आशीर्वाद असल्याची भावना मनात दाटेल. अनिश्चित जगात निश्चितता शोधणे व्यर्थ आहे. वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा. चिंतन करण्यावर भर द्या.


कर्क : मानसिक तणाव


आज तुमच्यासाठी तणावाचा दिवस असून विशेषत: स्त्रियांना मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे आवडत्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मनाला आनंद प्राप्त होणार आहे. सुखाचा गुणाकार व दु:खाचा भागाकार या सूत्राचा जीवनात अंगिकार करा.


सिंह : भावंडांची काळजी घ्या


तुमच्या लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना गरज असेल. इच्छित कार्य उशीरा होईल. कामाला वेळ जास्त लागेल. म्हणून विचलित होऊ नका. भाग्य तुमची परिक्षा घेत आहे. चिकाटीने प्रयत्न सुरु ठेवा. यशही मिळेल व भाग्याची साथही मिळेल.


कन्या : गैरसमज होतील


कुटुंबात कलह निर्माण करणारा दिवस आहे. विशेषत: आज जोडीदाराबद्दल गैरसमज होण्याची संभावना आहे. घरोघरी मातीच्या चुली, म्हणून वाद वाढवू नका. आज एखाद्या संकटातून सुखरुपपणे बाहेर पडाल. देव तारी त्याला कोण मारी, याची प्रचिती येईल. वरकरणी कनवाळू आतून कठोर अशा द्विस्वभावी व्यक्तीपासून सावध राहा.


तूळ : वाद मिटेल


तुमच्या घरात जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर तो आज मिटू शकतो. त्यादृष्टीने प्रयत्न वाढवून तडजोडीचे धोरण स्विकारा. फायदा तुमचाच होईल. वाहन सावकाश चालवा. वाहतूकीच्या नियमांचे पालन करा. कोणत्याच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज नको. ते पुढे ढकलण्यासाठी प्रयत्नशील राहा.


वृश्चिक : सहयोग मिळेल


आज तुम्हाला स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने आज मनस्वी आनंद प्राप्त होईल. अध्यात्म्यात आज तुमचे मन रमणार आहे. आज तुमच्या योग्यतेला योग्य उंची प्राप्त होईल. त्यामुळे आत्मविश्वासाने आज तुम्ही परिपूर्ण राहणार आहात.


धनु : कौटुंबिक सौख्य


आज तुमच्यासाठी कौटुंबिक सौख्याचा दिवस असून वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्याच मदत होईल. प्रयत्न करुनही जर यश मिळत नसेल,भाग्याची साथ नसेल तर कर्मात बदल करा. भाग्यही आपोआप बदलेल. भुतकाळात घडून गेलेली एखादी घटना आज पुन्हा आनंद प्राप्त करुन देईल.


मकर : जोडीदाराशी वाद


संसार म्हटला की रुसवे-फुगवे आलेच. जोडीदाराशी आज तुमचा वाद होऊन मनमुटाव होण्याची शक्यता आहे. घरोघरी मातीच्या चुली. त्यामुळे वाद वाढवू नका. सामंजस्याशी भूमिका घ्या. आत्मविश्वासाने आज तुम्ही परिपूर्ण राहाल. त्याचा लाभ घेऊन स्वत:च्या भरभराटीवर लक्ष केंद्रित करा. मात्र थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र