25 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मकर राशीला वास्तूलाभाचा योग

25 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मकर राशीला वास्तूलाभाचा योग

 


मेष : महत्त्वकांक्षा पूर्ण होतील


आज तुमचा यश मिळवि­ण्याचा दिवस असून इच्छित सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी मात्र आज गोंधळाची स्थिती असेल. त्यामुळे आपले नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. व्यवसायात गोंधळ विद्यार्थी अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील.


कुंभ : सावध राहा


वरकरणी कठोर आतून कनवाळू स्वभावाचे तुम्ही आहात. त्यामुळे लोक तुमच्या स्वभावाचा गैरफायदा आज घेऊन शकतात. म्हणून सावध राहा. आपल्या नफ्याकडे, फायद्याकडे लक्ष ठेवा. सोशल मीडियाचा अतिरेक आजची प्रमुख समस्या आहे. विद्याथ्र्यांनी तर त्यापासून लांबच राहायला हवे. त्यातच त्यांचे हित आहे.


मीन : अविस्मरणीय क्षण


आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादा अविस्मरणीय क्षण प्राप्त होईल. त्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज राहा. व्यापार व्यवसायात सुखद वातावरण राहिल. विद्याथ्र्यांनी संपूर्ण लक्ष अभ्यासात देणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून परिक्षेत यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतील.


वृषभ : सत्याची कास धरा


असत्याचे आयुष्य फार कमी असल्याने सत्य एक दिवस समोर येतंच. म्हणून सत्याची कास धरा. टाकीचे धाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. त्यामुळे काही प्राप्त करण्याची मनिषा असेल तर सहन करावेच लागेल. उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवा. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.


मिथुन : कामे टाळाल


कंटाळा आल्याने किंवा तणावामुळे आज तुमचे कामे टाळण्याकडे लक्ष राहिल. न कत्र्याचा वार शनिवार असतो. जोड व्यवसायाचा विचार जर आज तुम्ही करणार असाल तर विचारपूर्वकच निर्णय घ्या. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करा.


कर्क : नुकसान चालेल


भविष्यात होणा-या मोठ्या फायद्यासाठी लहान नुकसान चालेल. त्याला गुंतवणूक समजा. चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे असतात. त्यामुळे दुस-यांच्या मतांचा सन्मान करा. व्यवसायात दैदिप्यमान यश मिळू शकतं. संधीवर लक्ष ठेवा. आज आरोग्य उत्तम राहिल. सोबतच मनस्वास्थही टिकून राहिल.


सिंह : चिंतन करा


चितेला जाळते ती चिंता. म्हणून चिंता नको चिंतन करा. त्यातून नवीन मार्ग सापडू शकतात. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले एखादे महत्त्वपूर्ण काम आज पूर्ण होऊ शकेल. म्हणून प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नी शेपूट राहिले, अशी अवस्था होईल. जंक फूड टाळावे. अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो.


कन्या : मुर्खपणाची फळे मिळतील


आधी केलेल्या मुर्खपणाची फळे आज तुमच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे ते जास्त मनाला लावून न घेता  आलीया भोगासी असावे सादर. सरकारी कर्मचारी गोंधळात पडतील. कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्या. गुरुंचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळवून त्याचा उपयोग आपल्या कामात करुन घ्या.


तूळ : लहान फायदा नको


आज होणाऱ्या लहान फायद्यामुळे भविष्यात मोठं नुकसान होणार असेल तर आजचा लहान फायदा नको. ऐकावे जनाचे करावे मनाचे, या जीवनसूत्राचा अवलंब करा. नाही तर नुकसान होऊ शकतं. खर्चाकडे लक्ष ठेवावे. अंथरुन पाहून पाय पसरावे. अपचानाचा त्रास संभवतो.


वृश्चिक : मनोरंजनासाठी वेळ काढा


रोजीची व्यस्त दिनचर्या, कामाचा ताणतणाव आदी गोष्टींनी तुम्ही त्रस्त असाल तर आज मनोरंजनासाठी वेळ काढा. मनाला खूप बरं वाटेल. सरकारी कर्मचारी विचार करुन निर्णय घ्या. गोंधळ उड्याची शक्यता आहे. वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. आरोग्यासाठी ते उत्तम राहिल.


धनु : निर्णय आज नको


आज तुमचा आत्मविश्वास कमी राहणार आहे. त्यामुळे कोणत्याच महत्त्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज घेऊ नका. शक्य ते सर्व प्रयत्न करुन त्याला पुढे ढकला. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. गरजेच्या वेळी शोधाशोध करायला नको. आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द्या. दुखणे वाढणार नाहीत याची काळजी घ्या.


मकर : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न वाढवा. दिव्यातील राक्षस तुमच्यासाठी हात जोडून उभा आहे. त्यामुळे आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळू शकतं. फक्त प्रयत्न मनापासून करा. गुरुजन व जेष्ठांचे आशीर्वाद मिळवा. त्यातूनही लाभ मिळेल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र