26 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

26 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, मेष राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता

मेष : बढती मिळेल


नोकरदार मंडळींसाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण बढतीस प्राप्त असणा-या कर्मचा-यांना आज बढती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे व्यथ्र्य ठरेल. वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होण्यास आज मदत मिळणार आहे. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल.


क़ुंभ : काळजी घ्या


आपल्याला जर रक्तदाबाचा त्रास असेल तर आज आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दे­ण्यात येत आहे. आज आपला रक्तदाब वाढू शकतो. संतती सामाजिक कार्यात सहभागी होऊन त्याचं व पर्यायाने तुमचं नाव मोठं करणार आहे. त्यांचा अभिमान वाटेल. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. कुटुंबात जर कुठला महत्त्वपूर्ण निर्णय घेत असेल तर तो धैर्याने व सर्वांना विश्वासात घेऊनच घ्या.


मीन : लालसा नको


लालच बुरी बला होती है. झटपट पैशे मिळविण्याची लालसा अंगलट येऊ शकते. चुकीच्या मार्गाला जाऊ नका. मुलं आज तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यांच्याकडून ती अपेक्षाही करणे आज व्यर्थ ठरेल. स्त्रियांना आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून शांत राहून आवडत्या गोष्टीत मन रमविण्याचा प्रयत्न करा.


वृषभ : अन्नबाधेचा त्रास


तुम्हाला आहाराविषयी कुठले पथ्य सांगितलेले असतील, आज अगदी तंतोतंत पाळा. कारण आज तुम्हाला अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. जेष्ठ नागरीकांसाठीही आज काळजी करण्याचा दिवस असून त्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. जुने दुखणे आज तोंड वर काढू शकतात. स्त्री पक्षाकडून तुम्हाला आज सहयोग प्राप्त होईल. त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल.


मिथुन : सांधेदुखीचा त्रास


सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. कारण आपला त्रास वाढू शकतो. आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या. वडीलांशी संघर्ष होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शक्यतोवर संघर्ष टाळाच आणि झाला तर जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. तेच तुमच्या हिताचे राहिल. घरातील शितयुद्ध, मतभेद मनभेद होण्याआधी दूर करा. घरात लक्ष द्या.


कर्क : आरोग्याची काळजी घ्या


आज तुम्हाला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण आज थोडी कणकण जाणवू शकते. काळजी घेतली नाही ती वाढू शकते. घरातही आज तणाव राहिल. जोडीदाराशी कुठल्यातरी कारणावरुन मतभेद होऊ शकतात. संसार म्हटलं हे आलंच. म्हणून विषय वाढवू नका. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणून आपलीही चुक शोधण्याचा प्रयत्न करा.


सिंह : संधी लाभ घ्या


आज नोकरदार मंडळींसह व्यावसायिकांसाठी यशदायक दिवस आहे. मात्र त्यासाठी आज मिळणा-या संधींना ओळखून त्यांचा योग्य तो लाभ तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आज तुम्ही जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात. त्यांच्याच मर्जीप्रमाणे वागणार आहात. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील विविध रंगाशी आज तुमचा परिचय होणार आहे.


कन्या : काळजी घ्या


आज खास करुन रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. ताण-तणावापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कुठलीच चिंता न करता आनंदी राहा. आज वडीलांकडून तुम्हाला मार्गदर्शनही मिळू शकते. त्याचा आपल्या कामात उपयोग करुन घ्या. फायदाच होईल. लहान भावंडांची काळजी घ्या. त्यांची विचारपूस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल.


तूळ : आर्थिक ओढाताण


आज आपला खिसा तपासण्याचा दिवस आहे. कारण आज तुम्हाला आर्थिक ओढाताण सहन करावी लागेल. एका गोष्टीची उपलब्धता असतांना तिचा आनंद घेण्यासाठी आवश्यकत असणा-या दुस-या गोष्टी उणीव राहिल. आज तुम्ही जोडीदारासोबत प्रवास करणार आहात. त्यामुळे आनंदी आनंद असेल. वैवाहिक आयुष्य अधिक सुरेख होण्यास आज मदत मिळेल.


वृश्चिक : अन्नबाधेचा त्रास


आहारावर नियंत्रण ठेवून पथ्याचे पालन करणे आज तुमच्यासाठी आवश्यक आहे. कारण आज तुम्हाला अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो. जोडीदराबद्दलही आज गैरसमज होऊ शकतो. गोष्टी छोटी मात्र भांडण मोठं अशी परिस्थिती राहिल. म्हणून शांत राहा. विषय वाढवू नका. सामंजस्याशी भुमिका घ्या. कुटुंबवत्सल लोकांना आज आर्थिक लाभाचे योग आहेत.


धनु : पथ्य पाळा


जीवनात काही गोष्टींचे पथ्य स्वत:हून पाळावेच लागतात. त्यात आपल्याला जर ते सांगितलेले असतील तर पाळलेच पाहिजेत. हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज तुम्हाला जोडीदराचे सहकार्य   मिळणार आहे. त्यामुळे घरात आनंदी आनंद असेल. याच आनंदात आज तुम्ही खर्चही भरपूर करणार आहात. सासुरवाडीकडून लाभाची शक्यता आहे.


मकर : संधीवात वाढेल


तुम्हाला जर संधीवात असेल तर दिलेले पथ्य पाळण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचा संधीवात आज वाढणार आहे. आपल्या परिवारात जर वारसा हक्काच्या संपत्तीचा एखादा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याचे योग आहे. म्हणून तडजोडीचे धोरण स्विकारुन त्या दृष्टीने प्रयत्न करा. सासरच्या मंडळींशी आज वाद होण्याची शक्यता आहे. शांत राहा. वाद वाढवू नका.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र