28 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ: धनु, कुंभ, मिथुन आणि मकर राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता

28 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ:  धनु, कुंभ, मिथुन आणि मकर राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता

मेष : व्यवसायात संधी


व्यापारी व व्यावसायिकांसाठी आज जागरुक राहण्याचा दिवस असून आज तुम्हाला संधी प्राप्त होणार आहेत. कारण आपला राशी स्वामी दशमात विराजमान आहे. त्यामुळे मिळणा-या संधीचं सोनं करण्याचा निश्चय करा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. गरज पडेल तेव्हा शोधत बसण्यापेक्षा आजच खात्री करा.


कुंभ : खर्चावर नियंत्रण


उत्त्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवणे आज आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नाही तर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडतील. म्हणून कोणतंही काम किंवा निर्णय विचारपूर्वकच घ्या. अन्नबाधेचा त्रास होण्याची शक्यता आहे. पथ्य पाळण्यावर भर द्या.


मीन : व्यवसायात गोंधळ


व्यावसायिकांसाठी आज चिंतेचा दिवस असून व्यवसायात गोंधळ उडू शकतो. म्हणून सावध राहा. नुकसान व्हायला नको. अधिकारी वर्गाच्या हातात एखादे महत्त्वपूर्ण काम अडकलेले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवा. नाही तर हत्ती गेला नी शेपूट राहिले अशी अवस्था होईल. राशी स्वामी व्ययात असल्याने विविध कारणांनी खर्च होण्याची शक्यता आहे.


वृषभ : आरोग्याची काळजी


आपल्या राशीला चंद्र आठवा असल्यामुळे आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. छोटी दुखणीही त्रासदायक होऊ शकतात. कर्मचा-यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. कारण आज सुयोग्य कर्मचा-यांना बढती मिळण्याचे योग आहेत. संधी उपलब्ध होत असेल तर लाभ घ्यायला विसरु नका. नाही तर नंतर पश्चाताप करत बसण्यात काहीच अर्थ असतो.


मिथुन : खर्चाकडे लक्ष ठेवा


आवश्यक आहे, त्या ठिकाणी खर्च करावाच लागतो. मात्र तो करीत असतांना आपले आर्थिक गणित बिघडणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अंथरुन पाहूनच पाय पसरायचे असतात. सोशल मीडियाचा अतिरेक घातक ठरतोय. विद्याथ्र्यांसाठी तर त्यापासून लांबच राहावे. तरच तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकणार आहात. जंक फूडपासून लांब राहा.


कर्क : व्यवसायात यश


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस संधीचा व यश मिळवून देणारा आहे. आज व्यवसायात दैदिप्यमान यश मिळू शकतं. आपल्या इच्छेपेक्षा, अपेक्षापेक्षा जास्त मिळवि­ण्याचा दिसव आहे. त्यामुळे आनंदासह आत्मविश्वासही वाढेल. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थायांसाठीही आजचा दिवस उत्तम आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. अन्नबाधेचा त्रास होऊ शकतो.


सिंह : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतून लाभ मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. यश नक्की मिळेल. आर्थिक ओढतानही आज सहन करावी लागू शकते. चने आहेत तर दात नाहीत व दात आहेत तर चने नाहीत, अशा परिस्थितीचा अनुभव येईल. रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज विशेष काळजी घ्यावी. त्रास वाढण्याची शक्यता आहे.


कन्या : अवस्थता जाणवेल


आपल्या राशीला चौथा असलेला चंद्र मनाला अवस्थता देईल. त्यामुळे आत्मवि·ाासातही कमी जाणवेल. कामाचा कंटाळा येईल. त्यातच साधेदुखीचा त्रास असलेल्यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीसह व्यवसायातही आज संधी प्राप्त होण्याचे योग आहेत. त्यामुळे कंटाळा, आळस दूर सारुन संधी लाभ घेण्याचा प्रयत्न करा.


तूळ : नफ्याकडे लक्ष ठेवा


कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असतं. आज बाकीच्या सर्व गोष्टी सोडून आपला फायदा साधुन घ्या. नफ्याकडे लक्ष ठेवा. सरकारी कर्मचा-यांसाठी आज गोंधळाचा दिवस आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतांना विचारपूर्वकच घ्या. अपचनाचा त्रास होऊ शकतो. आहाराच्या पथ्यांचे पालन करुन आरोग्याची काळजी घ्या.


वृश्चिक : जोड व्यवसायाचा विचार


प्रगती कर­ण्यासाठी तुम्ही जर जोड व्यवसायाचा विचार करीत असाल तर विचारपूर्वकच निर्णय घ्या. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. जीवनात झटपट काहीच मिळत नसतं. तुम्ही जर झटपट पैसे कमवि­ण्याच्या मार्गावर असाल तर सावधान तुम्ही चुकीचं काम करीत आहात. सुदृढ आरोग्य राहावं म्हणून व्यायामासाठी वेळ काढा. त्याची सवय लावून घ्या.


धनु : खर्च होईल


आपल्या राशीत राशी स्वामी व्ययात असल्याने विविध कारणांनी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. जो तुम्हाला करावाच लागेल. फक्त अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. विद्याथ्र्यांना संपूर्ण लक्ष अभ्यासात द्यावे लागणार आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही, हे लक्षात घ्यावं. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.


मकर : खर्च वाढेल


आपल्या राशीला चंद्र बारावा असल्यामुळे खर्च वाढणार आहे. अंथरुन पाहुनच पाय पसरायला हवे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही, याची काळजी घ्या. विद्याथ्र्यांचे आज अभ्यासात मन रमनार नाही. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्रास वाढू शकतो.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद्र