3 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना आज अचानक आनंद मिळण्याची शक्यता

3 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृषभ राशीच्या लोकांना आज अचानक आनंद मिळण्याची शक्यता

मेष : बेशिस्तपणा नको


आज थोडेही बेशिस्त राहू नका. नाही तर नुकसान होऊ शकते. जे काम करीत असाल त्यावरच लक्ष केंद्रित करा. "एक ना धड भराभर चिंध्या' अशी अवस्था होण्यापासून स्वत:ला वाचवा. आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळवायचे प्रयत्न करा. त्याची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे. वेळोवेळी व्यायाम करा व त्याची सवय लावून घ्या.


कुंभ : परिश्रमानंतरच यश


कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेच लागतात. हे तुम्हाला समजविणारा आजचा दिवस असेल. आज तुम्ही जबाबदा-याचा टाळण्याचा प्रयत्न कराल. तरीही काही गोष्टीपासून तुम्ही स्वत:ची सुटका करुन घेऊ शकत नाही. म्हणून जबाबदारी टाळून काही उपयोग नाही. आज अन्नाबाधाही तुम्हाला होऊ शकते. म्हणून आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्या.


मीन : मानसन्मान वाढेल


आज दिवस तुमच्यासाठी उत्तम असून यश देणारा आहे. यश मिळविल्याने आज तुमच्या मानसन्मातही वाढ होऊ शकते. म्हणून आजच्या दिवसाचा सदुपयोग करुन त्या दृष्टीने प्रयत्न करा. आज तुम्ही आत्मवि·ाासाने परिपूर्ण राहणार आहात. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. गरजेच्यावेळी शोधाशोध करायला नको. जंक फूड शरीरासाठी हानिकारक असतात. आज त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.


वृषभ : अचानक आनंद मिळेल


जसं एखादं संकट आकस्मिकरीत्या येतं, तसचं एखाद्या घटनेने आज आकस्मिक आनंद तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आपल्या घरात जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. शक्य तेवढे तडजोडीचे धोरण स्विकारा. त्यातच तुमचा फायदा आहे. अपचनाचा त्रास संभवू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन : विचारपूर्वक निर्णय घ्या


प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही यश मिळत नसल्याने आज प्रयत्नांची दिशा बदलावीशी वाटेल. मात्र हे करीत असतांना आपले प्रयत्न खरंच चुकीच्या दिशेने आहेत का? याचा विचारपूर्वक निर्णय घ्या. सांधेदुखीचा त्रास असणा-यांसाठी आजचा दिवस त्रासदायक आहे. सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. तसेच रक्तदाब असलेल्यांनी सुद्धा आज स्वत:ची काळजी घ्यायला हवी.


कर्क : लवचिकता वाढवा


प्रत्येक वेळी एकाच गोष्टीवर ठाम राहणे बरोबर नसते. कदाचित आपण चुकीचेही असू शकतो. म्हणून आज तुम्ही लवचिकता वाढवायला हवी. अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागेल. म्हणून सावध राहा. विरोधाने लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घ्या. संतती यश मिळवेल. म्हणून घरात आनंदी आनंद असेल. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका.


सिंह : शब्दांवर नियंत्रण हवे


उचलली जिभ लावली टाळ्याला असे न करता आज तुम्हाला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कुणाविषयी तडका - फडकी शेरेबाजी आज नको. एखाद्या विचारामधून बाहेर पडण्यासाठी आज मनोरंजनासाठी वेळ काढा. अतिविचार विचार घातक असतात. संतती सामाजिक कार्यात सहभागी होईल. त्यांचे कौतुक करुन प्रोत्साहन द्या.


कन्या : चिंतन करा


चिंता ही चितेला जाळत असते. म्हणून एकाद्या गोष्टीची चिंता करीत बसण्यापेक्षा चिंतन करायला हवे. त्यातून नवीन मार्ग सुचतील. आज आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. प्रकृती थोडी नरम-गरम राहू शकते. कुटूंबातील कोणताही निर्णय घेतांना धैर्याने व विचारपूर्वक घ्या. त्या निर्णयाचे स्वागत होऊ शकते.


तूळ : अतिविचार घातक


कोणत्याही गोष्टीवरील अतिविचार हे घातक असतात. म्हणून त्यातून बाहेर पडण्यासाठी जे करता येईल ते सर्व करण्यावर भर द्या. नाही तर भिती मनात घर करुन "भित्या पोटी ब्रम्हराक्षस' अशी तुमची अवस्था होऊ शकते. आज तुमचे आरोग्य उत्तम राहिल. ते सदैव असेच राहावे म्हणून प्रयत्न करायला हवे. घरातील शितयुद्ध वेळीच मिटविण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक : वैरभावनेचा त्याग करा


एखाद्याविषयी तुमच्या मनात वैरभावना असेल तर आज त्या भावनेचा त्याग करा. तुमच्यासाठी ते फायदेशीरच राहिल. पाण्यात राहून माशाशी वैर घ्यायचे नसते, ही बाब लक्षात घ्या. तुम्ही जर कुटुंबाची काळजी वाहणारे कुटूंबवत्सल असाल तर आज तुम्हाला अर्थलाभ होऊ शकतो. म्हणून घरात आनंदी आनंद असेल. जेष्ठ नागरीकांनी आज प्रकृतीला जपायला हवे.


धनु : मनस्वास्थ्य बिघडेल


आज घडणा-या काही घटनांमुळे मनस्वास्थ बिघडू शकते. म्हणून कुठलीच गोष्ट मनाला जास्त लावून घेऊ नका. कुणावर विसंबून तर आज अजिबात राहू नका. त्यात तुमचे नुकसान होऊ शकते. स्वत:कडे पर्याय तयार ठेवा. म्हणजे फसगत होण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता. लहान भावंडांची काळजी घ्या. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना आवश्यकता असेल.


मकर : आज निर्णय नको


महत्त्वपूर्ण प्रश्नांचे निर्णय आज शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करा. आज ते चुकीचे ठरु शकतात. संधीवाताचा त्रास असणा-यांसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. कारण त्रासामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. म्हणून आजच्या दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच तुमच्या हिताचे राहिल.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद