4 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार मुलांकडून आनंदवार्ता

4 फेब्रुवारी  2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार मुलांकडून आनंदवार्ता

मेष : आरोग्याकडे लक्ष द्या


जीवन जगत असतांना आपण आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे हे तुम्हाला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. म्हणून कुणाविषयी मत बनविण्याआधी किंवा समज होण्याआधी विचार करा. आकस्मिकरीत्या फक्त संकटच येत नाही तर आनंदही आकस्मिकरीत्या प्राप्त होऊ शकतो, याची प्रचिती आज तुम्हाला मिळू शकते.


कुंभ : जंक फूड टाळा


शरीरासाठी जंक फूड कधीही वाईटच. आज तुम्हाला जंक फूड टाळावे लागतील. नाही तर अन्नबाधेनचा त्रास होऊ शकतो. प्रयत्नांची पराकाष्टा करुनही एखादे काम होणार नाही. त्यामुळे आत्मवि·ाास कमी राहिल. तुमचे शत्रु वरचढ होऊ शकतात. प्रयत्नाची दिशा बदलावीशीही तुम्हाला वाटू शकते. म्हणून डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. विचलित होऊ नका.


मीन : आरोग्य चांगले


आज तुमचे तनासह मनाचेही आरोग्य सुदृढ राहणार आहे. ते कायम तसेच राहावे यासाठी प्रयत्न करा. सोबतच आजच्या दिवसाचा सदुपयोग करुन घ्या. तुमचा आत्मवि·ाास बघुन आज तुम्हाला अनोळखी लोकांकडून विरोध होऊ शकतो. त्यामुळे सांभाळून राहा. यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, ही सत्यता लक्षात घ्या.  


वृषभ : व्यायाम करा


शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे, हे शिकविणारा आजचा दिवस आहे. म्हणून व्यायामाला महत्त्व द्या व त्यामध्ये सातत्य ठेवा. आज तुमचे शत्रु पराभूत होऊ शकतात. म्हणून आज प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात कमी पडू नका. यश नक्की मिळेल. आकस्मिक पद्धतीने एखादा आनंद प्राप्त झाल्याने मनाला प्रसन्नता वाटेल.


मिथुन : अपचनाचा त्रास


आज अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आज तुमचा यश मिळवि­ण्याचा दिवस आहे. मिळालेल्या यशाच्या जोरावर तुम्ही शत्रूला नामोहरम करु शकाल. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. मनस्वास्थ बिघडवि-या घटनाही घडू शकतात. म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा.


कर्क : आरोग्याची काळजी घ्या


आज रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी काळजी करण्याचा दिवस आहे. त्रासामध्ये वाढ होऊ शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. आपल्या योग्यतेची उंची वाढविणा-या घटना आज घडू शकतात. त्यामुळे आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. एखाद्याविषयी मनात वैरभावना असेल तर ती आज दूर करा. कारण पाण्यात राहून माशाशी वैर करु नये, हे लक्षात घ्या.


सिंह : संततीला यश


आज तुमच्या संततीला यश मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांना शाबासकी व प्रोत्साहन द्यायला विसरु नका. पश्चातापाची वेळ येण्याआधी एखादं काम अपूर्ण असेल तर ते पूर्ण करण्यावर भर द्या. कोणत्याही गोष्टीचा विचार करीत असतांना चिंतन करण्यावर भर द्या, चिंता करु नका. अतिविचार घातक ठरु शकतात. त्याने मनात भिती निर्माण होऊ शकते.


कन्या : लहान भावंडांची काळजी


लहान भावंडांची काळजी घ्या. आस्थेने त्यांची विचारपूस करा. कदाचित त्यांना तुमच्या मदतीची गरज असेल. वाहन सावकाश चालवा. कुठे तातडीने पोहचायचे असेल तर वेळेच्या आधी निघा. मात्र घाई करु नका. जीवनात थोरांच्या आशीर्वादाची, प्रेमाची नितांत आवश्यकता असते. आज आशीर्वाद मिळवि­ण्यावर भर द्या.


तूळ : धैर्याने निर्णय घ्या


आज तुम्ही कुटुंबात एखाद्या महत्त्वपूर्ण गोष्टीविषयी निर्णय घेणार आहात. त्यावेळी तुम्ही धैर्य दाखवून विचारपूर्वक निर्णय घेतलात तर त्याचे स्वागतही होऊ शकतं. आज तुमचा प्रवासाचाही योग असून त्यात नुकसान होण्याचा संभव आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढे प्रयत्न करुन प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा.


वृश्चिक : संततीकडून आनंद


आज तुम्हाला संततीकडून आनंद प्राप्त होऊ शकतो. कारण ते आज सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांचा तुम्हाला अभिमान वाटेल. प्रयत्न करुनही यश मिळत नसेल तर कर्मात बदल करुन बघा. कदाचित तुमचे प्रयत्न चुकीच्या दिशेने असू शकतात. कर्मात बदल केल्याने भाग्याचीही साथ लाभेल. चिंता ही चितेला जाळत असते. म्हणून चिंता नको चिंतन करा.


धनु : मुलं त्रास देतील


आज तुमची मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. परिणामी त्यांच्या वागण्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून आजच्या दिवस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. अगोदर श्रम करा, निरंतर प्रयत्न करीत राहा नंतरच भाग्याची साथ तुम्हाला लाभणार आहे. स्वत:च्या प्रयत्नांवर वि·ाास ठेवा. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. तडका-फडकी कुणावर शेरेबाजी करु नका.


मकर : अन्नबाधेचा धोका


आहाराविषयीचे पथ्य पाळले नाही गेले किंवा त्यावर नियंत्रण नसले तर अन्नबाधेचा त्रास होतो. आज तो तुम्हाला होण्याचा धोका आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे. सोबतच शब्दांवरही नियंत्रण तुम्हाला ठेवावे लागणार आहे. बोलतांना तोल मोल के बोल हे धोरण तुम्हाला स्विकारावे लागेल. कोणत्याही एकाच गोष्टीवर अडून बसू नका. थोडी लवचिकता वाढवा.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद