05 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ , वृषभ राशीच्या लोकांना वास्तूलाभ होण्याची शक्यता

05 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ , वृषभ राशीच्या लोकांना वास्तूलाभ होण्याची शक्यता

मेष : जेष्ठांना त्रास


जेष्ठ नागरीकांसाठी आजचा दिवस काळजी करण्याचा असून त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. छोटे दुखणेही त्रासदायक होऊ शकते. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यातून संधी प्राप्त होऊ शकते. म्हणून संधीला ओळखून तिचा लाभ करुन घ्या. तुमच्या परिवारामध्ये जर संपत्तीचा वाद सुरु असेल तर आज तो मिटण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. गरज पडल्यास तडजोडीचे धोरण स्विकारा.


कुंभ : सासरच्या मंडळीसोबत वाद


आज तुमचा सासरच्यां मंडळींशी वाद होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये काळजीचे, तणावाचे वातावरण राहिल. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी स्वत:ची अवस्था होऊ देऊ नका. लेखक, कवी मंडळींसाठी आज यशदायक दिवस असून त्यांना आज लेखन कार्यात यश मिळू शकतं. जे न देखे रवी ते देखे कवी नुसार आज तुमच्या सृजनशीलतेला वाव मिळू शकतो. संधीवाताचा त्रास असलेल्यांनी आज काळजी घ्यायला हवी. त्यांचा त्रास वाढू शकतो.


मीन : घरात लक्ष द्या


आज तुम्हाला घरात लक्ष द्यायला हवे. घरात जर शितयुद्ध सुरु असेल तर वाद वाढून मने दुरावण्याआधी ते थांबवायला हवे. सरकारी कर्मचा-यांसाठी आज गोंधळाचा दिवस असून त्यांनी कोणताही निर्णय आज विचार करुनच घ्यायला हवा. आपल्याकडून कोणतीही चुक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आज तुम्ही जबाबदा-या टाळण्याचा प्रयत्न कराल.


वृषभ : वास्तूतून लाभ


आज तुम्हाला वास्तूतून लाभ होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करुन बघायला हरकत नाही. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडू शकतात. त्यामुळे आपल्याकडून काही चुकीचे काम होणार नाही, वरिष्ठांचा रोष आपल्यावर ओढावणार नाही याची काळजी त्यांना आज घ्यावी लागणार आहे. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी आजचा दिवस काळजी करण्याचा असून त्यांचा त्रास वाढू शकतो.


मिथुन : वडिलांशी वाद


परिवारामध्ये कुणाशीही वाद होणे कधीही वाईटच असते. आज तुमचा वडिलांशी संघर्ष होऊ शकतो. म्हणून शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. योग्य संवाद साधुन वाद टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांकडून आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. त्यांच्यासोबत तुम्ही आज एखाद्या गोष्टीचे नियोजन करु शकता. तुमच्या आत्मविश्वासामुळे अनोळखी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून सावध राहा.


कर्क : वैवाहीक सौख्य


आज तुमच्यासाठी वैवाहीक सौख्याचा दिवस असून वैवाहीक आयुष्यातील विविध रंग आज तुम्हाला बघायला मिळू शकतात. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे आज तुम्ही वागणार आहात. आपल्या कल्प व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकते. तुमच्या कल्पनेला वाव मिळू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. म्हणून काही मिळवायचे असेल तर सहन करावेच लागेल. कुणावर विसंबून राहू नका.


सिंह : सासुरवाडीकडून लाभ


आज तुम्हाला सासुरवाडीकडून लाभ मिळू शकतो. परिणामी दोन्ही परिवारांमध्ये आज आनंदाचे वातावरण राहिल. एखादे महत्त्वपूर्ण काम अपूर्ण राहिलेले असेल तर चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत राहा. आज तुम्हाला यश मिळू शकतं. चिकाटी कायम ठेवल्याने आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास वाढलेला असेल.


कन्या : मानसिक तणाव


आज विशेषत: स्त्रियांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टींमध्ये आवड असेल त्यात मन रमविण्याचा प्रयत्न करा. आज ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढण्याचे योग आहेत. त्यामुळे त्याचा लाभ घ्या.  आहार विहारादी पथ्य पाळा. नाही तर अपचनाचा त्रास होऊन आरोग्य बिघडू शकतं.


तूळ : स्त्री पक्षाकडून सहयोग


आज तुम्हाला स्त्री पक्षाकडून सहयोग मिळणार असल्यामुळे आज तुम्ही आनंदीत असाला. जोडीदाराच्या मर्जीप्रमाणे वागण्याकडे तुमचा कल असेल. भुतकाळात घडून गेलेल्या एखाद्या आनंददायी घटनेचा आज पुन्हा आनंद मिळू शकतो. त्यामुळे सर्वत्र आनंददायी वातावरण आज तुमच्यासाठी असेल. आज तुम्ही मनोरंजनासाठी वेळ काढणार आहात.


वृश्चिक : वडिलांचे मार्गदर्शन


आपण कितीही हुशार किंवा आपल्या क्षेत्रातले तज्ज्ञ असलो तर जीवनविषयक अनुभव जेष्ठांचा नेहमी आपल्यापेक्षा जास्त असतो. आज तुम्हाला वडीलांकडून मार्गदर्शन मिळेल. ते उपयोगात आणा. एखादे काम अपूर्ण असेल प्रयत्न सोडू नका. चिकाटी कायम ठेवा. हातात घेतलेले काम पूर्ण करा. एखाद्या विषयी मनात वैरभावना असेल तर त्याचा आज त्याग करा. जळात राहून माशाशी वैर करु नये, ही सत्यता लक्षात घ्या.


धनु : सासुरवाडीकडून लाभ


आज तुम्हाला तुमच्या सासुरवाडीकडून लाभ होऊ शकतो. त्यामुळे घरात, वैवाहिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहिल. जोडीदाराची मर्जी राखण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल. आज एखाद्या कामाला वेळ जास्त लागू शकतो. म्हणून हतबल होऊ नका. प्रयत्न करीत राहा. जे कुटुंबाची काळजी घेणारे कुटूंबवत्सल लोक असतील त्यांना आज अर्थलाभ होऊ शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा.


मकर : भावडांशी मदभेद


घरात योग्य संवाद नसल्यास वाद निर्माण होतात. आज तुमचे भावडांशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे शांत राहून योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करा. वाद झाल्यास तो वाढणार नाही याची काळजी घ्या. एका हाताने टाळी वाजत नाही ही सत्यता तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. तसे केल्यास घरात आज मानसिक सुखशांतीचे वातावरण राहिल. आज मनोरंजनासाठीही तुम्ही वेळ काढणार आहात.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद