7 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना मिळेल आज व्यवसायात नवीन संधी

7 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना मिळेल आज व्यवसायात नवीन संधी

मेष : स्वावलंबी बना


प्रथम स्थानातील राशीस्वामी तुम्हाला स्वयंपूर्ण बनवेल. त्याचा लाभ घेऊन आज स्वावलंबी बनण्यावर भर द्या. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहणार आहात. आरोग्यही उत्तम राहिल. ते कायम तसेच राहावे याची प्रयत्न करा. संतती यश मिळवेल. त्यामुळे त्यांचा अभिमान वाटेल. त्यांना प्रोत्साहन द्यायला विसरु नका. थोडक्यात आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी आहे.


कुंभ : व्यवसायाच्या संधी


राशीस्वामी दशमात असल्यामुळे आज तुम्हाला व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील. त्या संधींचा योग्य तो लाभ घेण्यात कमी पडू नका. मुलं आज तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत. त्यामुळे आज त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. वडीलांकडून मार्गदर्शन मार्गदर्शन मिळेल ते उपयोगात आणा. त्यात तुमचा फायदाच होईल.


मीन : आरोग्याची काळजी घ्या


अष्टमातील राशीस्वामीमुळे आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. विशेषत: रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आज काळजी घ्यायला हवी. त्रास वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यातील विविध रंगांचा आज तुम्ही अनुभव घेणार आहात. त्यामुळे घरात आनंदीआनंद व सुखशांतीचे वातावरण असेल.


वृषभ : आरोग्याकडे लक्ष द्या


जीवन जगत असतांना आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे हे शिकविणारा आजचा दिवस आहे. आरोग्याची हेळसांड करु नका. लहान भावंडाची काळजी घ्या. आस्थेने त्यांची विचारपुस करा. कदाचित तुमच्या मदतीची त्यांना गरज असेल. सासुरवाडीकडून आज तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दोन्ही परिवारांमध्ये अनांदाचे वातावरण राहिल.


मिथुन : व्यायाम करा


जीवनता तनासह मनही सुदृढ राखण्यासाठी व्यायामाचे महत्त्व सर्वश्रृत आहे. त्यामुळे वेळोवेळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. ते तुमच्यासाठी फायद्याचे राहिल. जेष्ठ नागरीकांसाठी आज काळजी करण्याचा दिवस असून त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. छोटे दुखणेही त्रासदायक ठरु शकते. स्त्रियांना आज मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे शांत राहून आवणा-या गोष्टींमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करा.


कर्क : जंक फूड टाळा


शरीरासाठी जंक फूड कधीही वाईटच! आज जंक फूड टाळण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नाही तर अन्नबाधा होऊ शकते. आज तुम्हाला वास्तुतून लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. स्त्री पक्षाकडून आज तुम्हाला सहयोग प्राप्त होऊ शकतो. म्हणून आज तुम्ही जोडीदाराच्या प्रभावात राहणार आहात.


सिंह : कर्जाचा विचार


षष्टातील राशीस्वामीमुळे आज तुम्ही कर्जाचा विचार कराल. घरातील सदस्यांसोबत वाद, संघर्ष होणे कधीही वाईटच असते. आज तुमचा वडिलांशी संघर्ष होऊ शकतो. म्हणून योग्य संवाद साधुन वाद टाळण्याचा प्रयत्न करा. वाद उत्पन्न झाल्यास तो वाढणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्ही वास्तुवर आनंदाने खर्च करणार आहात.


कन्या : संततीविषयी विचार


पंचमातील राशीस्वामीमुळे आज संततीच्या शिक्षणाचा, त्यांच्या भविष्याचा विचार करणार आहात. त्यामुळे विचार करुन योग्य तो निर्णय घ्या. सासरच्या मंडळींशी आज वाद होऊ शकतो. म्हणून शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग अशी स्वत:ची अवस्था करुन घेऊ नका. जोडीदारासोबत आज तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकता.


तूळ : आर्थिक ताण


आज तुम्हाला आर्थिक ओढातानाचा सामना करावा लागू शकतो. जो आवश्यक आहे तो खर्च करावाच लागेल मात्र अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न करा. दात आहेत तर चणे नाही. चणे आहेत तर दात नाही याची अनुभूती आज तुम्हाला लाभू शकते. भावंडांशी मतभेद होऊ शकतात. म्हणून शांत राहून योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करा. एका हाताने टाळी वाजत नाही, ही सत्यता लक्षात घ्या. आज तुमच्यावर जोडीदाराचा प्रभाव राहिल.


वृश्चिक : अपचनाचा त्रास


आहाराची पथ्य न पाळल्यामुळे आज तुम्हाला अपचनाचा त्रास संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. घरात जर एखाद्या गोष्टीवरुन शितयुद्ध सुरु असेल तर वाद वाढून मने दुरावण्याआधी त्यात वेळीच हस्तक्षेप करुन शितयुद्ध संपविण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य लाभणार आहे. सोबतच खर्चही होणार आहे. जो तुम्हाला टाळता येणार नाही.


धनु : संधी प्राप्त होतील


राशीस्वामी लाभात असल्यामुळे आज तुम्हाला लाभाच्या संधी प्राप्त होतील. त्या संधींचा योग्य फायदा करुन घ्या. कुटुंबात आज तुम्ही एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहात. तो धैर्याने विचारपूर्वक घेतला तर त्याचे स्वागतही होऊ शकते. आज प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता. त्यामुळे प्रेमविरांसाठी आज आनंदाचा दिवस असून मन प्रसन्न राहिल.


मकर : अन्नबाधेचा त्रास


आहाराची पथ्य न पाळल्यामुळे आज तुम्हाला अन्नबाधा होऊ शकते. परिणामी प्रकृतीही बिघडू शकते. म्हणून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. संतती सामाजिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा तुम्हाला अभिमान वाटेल. त्यांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन द्यायला आज विसरु नका. आज तुमचा जोडीदाराशी वाद होऊन मनमुटाव होऊ शकतो. घरोघरी मातीच्या चुली असतात, ही बाब लक्षात घ्या.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद


फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या