8 फेब्रुवारी 2018 चं राशीफळ, कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ

8 फेब्रुवारी 2018 चं राशीफळ, कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ

 


मेष : जोडीदाराबद्दल गैरसमज


आज कुठल्यातरी कारणाने जोडीदाराबद्दल गैरसमज होऊ शकतो. घरोघरी मातीच्याच चुली असतात ही बाब लक्षात घेऊन विषयाला ताणू नका. विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया, टीव्ही यापासून दूर राहणे कधीही चांगले. या गोष्टींच्या आहारी जावू नका. प्रयत्न करुनही जर यश मिळत नसेल तर कर्मात बलद करा. भाग्य आपोआप बदललेत.


कुंभ : उत्पन्न व खर्चावर नियंत्रण


पांघरुन बघुनच हातपाय पसरायला हवेत, हे लक्षात घेण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. कारण आज खर्च वाढू शकतात. म्हणून उत्पन्न व खर्च यांच्यात नियंत्रण ठेवा. अनाश्यक खर्चाला कात्री लावा. जीवनामध्ये मोठ्या आशीर्वाद नेहमी उपयोग पडत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. गुरुंचे आशीर्वाद घ्यायला विसरु नका.


मीन : खर्चावर लक्ष ठेवा


अनावश्यक किंवा अतिरीक्त खर्च हा नेहमीच डोकेदुखी ठरत असतो. काही खर्च टाळता येत नाहीत. मात्र अनावश्यक खर्चाला आपण कात्री नक्कीच लावून शकतो. म्हणून आज आपल्या खर्चाकडे लक्ष द्या. स्पर्धा परिक्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक असून आज त्यांना यश मिळू शकतं. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करा. वाहन सावकाश चालवा. घाई करु नका.


वृषभ : एखाद्याबद्दल गैरसमज


आज तुमचा एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. म्हणून कुणाविषयी मत किंवा समज बनविण्याआधी विचार करा. व्यापार, व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद आहे. त्याचा योग्य लाभ घ्या. कल्पक व सर्जनशील कार्यात आज प्रगती होऊ शकतो. आपल्या कल्पकतेला आज वाव मिळू शकतो. काही प्राप्त करायचे असेल तर सहन करावेच लागेल. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.


मिथुन : विद्यार्थी अभ्यास टाळतील


विद्यार्थी आज अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे इतर गोष्टींमध्ये आज मन रमलेले असेल. मात्र रोजचा अभ्यास त्याच दिवशी झाला पाहिजे, ही बाब लक्षात घ्या. आज तुम्हाला यश मिळणार आहे. त्याबळावर आज तुम्ही शत्रूंनाही नामोहरम करणार आहात. त्यामुळे यशाचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो. मित्र आनंद देतील. त्यांच्या बरोबर आज तुम्ही कुठल्यातरी गोष्टींचे नियोजन कराल.


कर्क : विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात 


आज विद्यार्थी संपूर्ण लक्ष अभ्यासात देतील. त्याची सवय लावून घ्या. काही प्राप्त करायचे असेल, मिळवायचे असेल तर सहन करावेच लागेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, ही बाब लक्षात घ्या. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. कारण आज तुम्ही शत्रूला नामोहरम करणार आहात. आज तुम्हाला मित्रांकडूनही आनंद प्राप्त होईल.


सिंह : संधीचा लाभ घ्या.


आज तुमच्यासाठी नोकरी व व्यवसायात संधी उपयलब्ध होणार आहेत. त्यांचा योग्य तो लाभ घ्या. तसे केल्यास तुमची योग्यता योग्य अशी अशी उंची गाठू शकेल. म्हणून आत्मवि·ाासही आज वाढेलेला असेल. सरकारी कर्मचा-यांसाठी आजचा दिवस गोंधळाचा असेल. म्हणून त्यांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा. कधी कधी ताकही फुंकून प्यावे लागते हे लक्षात घ्या.


कन्या : व्यवसायात यश


व्यावसायिकांसाठी आजचा दिवस यश मिळवून देणारा असेल. त्यामुळे आज प्रयत्नांची पराकाष्टा करण्यामध्ये कमी पडू नका. योग्य दिशेने योग्य प्रयत्न केल्यास "आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे' याची प्रचिती येऊन दैदिप्यमान यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. मात्र प्रयत्नांमध्ये कमी पडल्यास "अब पछताये क्या होत जब चिहिटा चुग गई खेत' याची प्रचिती येऊ शकते. आज तुमचे प्रवासाचेही योग असून त्यात नुकसान होण्याचा संभव आहे. म्हणून प्रवास टाळा.


तूळ : प्रॉपर्टीतून लाभ


आज तुम्हाला प्रॉपर्टीतुन लाभ मिळू शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा. यश मिळविण्यासाठी परिश्रम करावेच लागतात. आधी परिश्रम करा त्यानंतर भाग्याची साथही आपोआप मिळणार आहे. स्वत:वर, स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. आज तुम्ही प्रवासही करणार आहात. त्यातून तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकतात. म्हणून सजग राहा. संधीचा योग्य लाभ घ्या.


वृश्चिक : जोड व्यवसायाचा विचार


मुख्य व्यवसायाच्या सोबतच आज तुम्ही जोड व्यवसाय सुरु करण्याचा विचार कराल. त्यामुळे विचारपूर्वक व योग्य नियोजन करुन निर्णय घ्या़ हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे चुकीचे असेत, ही बाब लक्षात घ्या. तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे शत्रु वरचढ होऊ शकतात. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडतील. आपल्या हातून चुकीचे काम होणार नाही, याची काळजी घ्या.


धनु : जोड व्यवसायाचा विचा


मुख्य व्यवसायाच्या सोबतच आज तुम्ही जोड व्यवसाय सुरु करण्याचा विचार कराल. त्यामुळे विचारपूर्वक व योग्य नियोजन करुन निर्णय घ्या़ हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे चुकीचे असेत, ही बाब लक्षात घ्या. जोड व्यवसायाचा विचार. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे. तुमच्या योग्य निर्णयामुळे यश तर प्राप्त होईलच सोबतच शत्रु पराभुत होतील. त्यामुळे यशाचा आनंद द्विगुणीत होणार आहे. त्यामुळे मानसिक सुख शांतीचे वातावरणाचा तुम्ही अनुभव घेणार आहात.


मकर : नफ्याकडे लक्ष ठेवावे


आज विशेषत: व्यावसायिकांनी आपल्या नफ्याकडे लक्ष ठेवावे. आपले हित कशात आहे हे आज ओळखायला हवे. ज्यात हित नाही त्या गोष्टीत वेळ घालवू नका. अनोळखी लोकांच्या विरोधाचा आज सामना करावा लागू शकतो. त्यामुळे विचलित होऊ नका. चिकाटी कायम ठेवून हातात घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल.


फेब्रुवारी महिन्यात जन्म होणारे लोक नक्की कसे असतात, जाणून घ्या


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन केंद