9 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांची आज रखडलेली कामे होणार पूर्ण

9 फेब्रुवारी 2019 चं राशीफळ, वृश्चिक राशीच्या लोकांची आज रखडलेली कामे होणार पूर्ण

मेष : सामंजस्य वाढेल


आज तुमचे ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढणार आहे. त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये लाभ होऊ शकतो. म्हणून संबंध सुधरवून घ्या. एखाद्या मोठ्या संकटातून आज तुम्ही सुखरुप बाहेर पडणार आहात. त्यामुळे "देव तारी त्याला कोण मारी' याची प्रचिती येऊन ई·ाराचे आशीर्वाद असल्याची भावना आज मनात दाटून येणार आहे. कठोर परिश्रमानंतरच यश मिळतं, हे आज लक्षात घ्यायला हवे.


कुंभ : आनंद वाढेल


भुतकाळात घडून गेलेली एखादी आनंददायी घटना आज तुम्हाला पुन्हा प्राप्त करुन देऊ शकते. त्या आनंदाचा पुरेपुर लाभ करुन घेण्यासाठी तयार राहा. कारण आज तुमचा आत्मवि·ाास कमी राहणार आहे. तो वाढवि­ण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला उपयोगी पडेल. आज तुमचे मनस्वास्थही बिघडणार आहे. त्यामुळे शांत राहून आवडत्या गोष्टींमध्ये मन रमविण्याचा प्रयत्न करा.


मीन : नवीन ओळखी होतील


आज तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत. त्यामुळे सकारात्मक राहून आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा. भविष्यात तुम्हाला त्यांचा लाभच होणार आहे. आज तुम्ही कार्यातही व्यस्त राहू शकता. म्हणून ते कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्या किंवा राहिलेले कार्य आज पूर्ण करुन घ्या. मात्र महत्त्वपूर्ण प्रश्नाचे निर्णय आज नको.


वृषभ : नुकसान नको


लहान फायद्याचा विचार करीत असतांना आपलं मोठं नुकसान होणार नाही याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुम्हाला आज सल्ले खूप मिळणार आहेत. मात्र ऐकावे जनाचे करावे मनाचे, ही बाब लक्षात घेऊन आपल्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला आज ओळखता यायला हवे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला आनंदाची प्राप्ती होऊ शकते. प्रयत्न करुनही यश मिळत नसल्याने प्रयत्नांची दिशा बदलाविशी वाटेल.


मिथुन : प्रयत्न वाढवा


प्रयत्न करुनही जर एखादे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण होत नसेल तर हतबल, निराश होऊ नका. ते कार्य पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्न वाढवा. तुम्हाला यश नक्की मिळू शकतं. आध्यात्मिक कार्यातून आज तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्यात मन रमविण्याच प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपलेच म्हणणे रेटणे चांगले नाही. इतरांचेही ऐकून घ्या. लवचिकता वाढवा.


कर्क : आत्मविश्वास वाढेल


आज तुमचा आत्मविश्वास वाढणा-या घटना घडणार आहेत. वाढलेल्या आत्मवि·ाासाचा फायदा घेऊन कार्य पूर्ण कर­ण्याकडे लक्ष द्या. मात्र हे करीत असतानां आत्मवि·ाास जास्त होणार नाही हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपण बेसावध राहून नुकसान होऊ शकते. कुठल्याच गोष्टीचा जास्त विचार करु नका. ते भिती निर्मार करुन घातक ठरतात.


सिंह : कार्यात व्यस्त राहाल


आज संपूर्ण दिवस तुम्ही कार्यात व्यस्त राहणार आहात. म्हणून इतर गोष्टींवर लक्ष देऊ नका. आपले कार्य करीत राहा. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने होईल. कुठल्याच गोष्टींची चिंता करीत बसू नका. चिंता ही चिेतला जाळत असते. म्हणून चिंता सोडून चिंतन करण्यावर भर द्या. त्यातून तुम्हाला नवीन मार्ग सापडू शकतात. प्रयत्नांची नवीन दिशा सापडू शकते.


कन्या : एकांत शोधाल


आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी आज तुम्ही एकांत शोधण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आज चिंतन करण्यावर भर द्या. चिंता करीत बसू नका. शक्य तेवढे मुद्देसुद बोला. उगाच बडबड करीत उचलली जीभ लावली टाळ्याला असे करु नका. तुमच्यासाठी आज ते नुकसानकारक असेल. पैतृक संपत्तीचा वाद आज मिटू शकतो. म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करा.


तूळ : लहान नुकसान चालेल


भविष्यात जर मोठा फायदा होणार असेल तर आज झालेले लहान नुकसानही फायद्यायचे असेल. त्याला आज केलेली गुंतवणूक समजा. नाही तर मोठा फायदा तुम्ही गमवून बसाल. चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे असतात, ही बाब लक्षात घेऊन आपलेच म्हणणे रेटू नका. इतरांच्या मताचा आदर करा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. संध्याकाळपर्यंत एखादा आकस्मिक आनंद मिळू शकतो.


वृश्चिक : काम पूर्ण होईल


अधिकारी वर्गाच्या हातात एखादे काम अडकलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. म्हणून त्यादृष्टीने आज प्रयत्न वाढवायला हवेत. यश नक्की मिळेल. नाही तर हत्ती गेला आणि शेपूट राहिले, अशी याची अनुभूती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आज थोडीही बेशिस्त नको. एक ना धड भराभर चिंध्या अशी स्वत:ची अवस्था होण्यापासून वाचवा. मोठ्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन मिळविण्यावर आज भर द्या. ते तुमच्या फायद्याचे असेल.


धनु : संताप येईल


आज एखाद्या गोष्टीवर तुम्हाला विनाकारण संताप येईल. तो विनाकारण असल्यामुळे आज शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस कलाकारांसाठी यशदायक आहे. त्यामुळे कलाकारांनी आज त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. अतिविचार घातक ठरु शकतात. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा जास्त विचार करु नका. भित्या पोटी ब्रम्हराक्षस, ही बाब लक्षात घ्या.


मकर : कामात अडचणी


आजचा दिवस तुमच्यासाठी कामात अडचणी निर्माण करणार आहे. म्हणून विचलित होऊ नका. कारण अमर्याद सहनशीलता व उत्साह या दोन्ही गोष्टींनी तुम्ही आज परिपूर्ण राहणार आहात. त्या बळावर अडचणींचा सामना करा. एखाद्याविषयी मनात वैरभावना असेल तर आज तिचा त्याग करा. जळात राहून माशाशी वैर करु नये, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.


लेखिकेचा संपर्क करा : श्री ज्योतिष संशोधन कें