व्हॅलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तसंतशी ज्यांना एकमेकांना प्रपोज करायचं आहे त्यांच्या हृदयाची धडधड अजून वाढते. खरं आहे ना मित्रांनो? खरं तर प्रेम व्यक्त करायला कोणताही दिवस वा मुहूर्ताची गरज भासत नाही. आपल्याला हवं तेव्हा आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या मनातील भावना सांगू शकतो पण व्हॅलेंडाईन डे (Valentines Day) हा प्रपोज करण्याचा खास दिवस आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खरं तर कोणती व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही याचा अंदाज आपल्याला असतोच. कधीतरीच तो चुकतो. पण हिंमत करून ती व्यक्ती आपली होणार की नाही हे विचारण्यासाठी आपण संधी शोधत असतो आणि ती संधी हातात बऱ्याचदा येते ते व्हॅलेंटाईन डे ला. प्रत्येकाला वाटतं की, आपल्याला खास प्रकारे मुलाने प्रपोज करावं. अर्थात मुलांनाही हेच वाटत असतं. पण बऱ्याचदा मुलंच मुलींना प्रपोज करताना दिसतात. त्यामुळे मुलांसाठी आम्ही खास टीप्स घेऊन आलो आहोत की, मुलींना कशा प्रकारे प्रपोज केलेलं आवडतं आणि तुम्हाला त्यातून होकारच मिळेल अशी आशा.
तिलाही तुम्ही आवडता हे कसं ओळखाल
बऱ्याचदा एखाद्या मुलीला आपण आवडतो की नाही याचा मुलांना अंदाज असतो. पण तरीही जर तुम्हाला पूर्ण विश्वास नसेल तर तुम्ही आधी त्या गोष्टीची खात्री करून घ्या. अर्थात त्या मुलीकडून तुम्हाला योग्य ‘सिग्नल’ मिळतोय की नाही हे आधी नक्की करून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या मुलीला प्रपोज करणार आहात तिचा होकार लगेच मिळाला तर आनंदच आहे. पण तिने जर नकार दिला तर नक्कीच निराश होऊन जाऊ नका किंवा तिचा कधीतरी होकार येईल या भ्रमातसुद्धा राहू नका. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तिला विचारणारच नाही. कदाचित तिचंही तुमच्यावर प्रेम असेल आणि ती होकार देईल. काही वेळा मुली पटकन होकार देत नाहीत. तेव्हा तुम्ही संयम बाळगा आणि तिला विचार करायला हवा तितका कालावधी द्या.
वाचा - Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट
आपण कोणत्याही मुलीला आवडतो हे तुम्ही कसं ओळखाल? त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स देतो. एकतर तुम्ही तिला जास्त आवडत असाल तर ती तुमच्या मेसेजकडे कधीही दुर्लक्ष करत नाही आणि न चुकता कितीही उशीर झाला तरीही तुम्हाला रिप्लाय देते. तुम्ही तिच्याजवळ असाल किंवा अगदी फोनवरही बोलत असाल तिच्याशी आणि आता कुठलाही विषय नसेल तरीही ती दुसरा विषय कुठून ना कुठून तरी सुचवून तुमच्याशी बोलत बसते. गोष्ट लहान असो वा मोठी ती प्रत्येक बाब तुमच्याबरोबर शेअर करत असेल. इतर कोणाशीही बोलणं तिला आवडत नसेल तर नक्कीच तिला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि तिचंही तुमच्यावर प्रेम आहे हे नक्की. हे तुम्ही तिच्या वागण्यातून प्रपोज करण्यापूर्वी निरीक्षण करून नक्की जाणून घ्या. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता तुम्ही तिला प्रपोज करा आणि होकार तुमचाच आहे हे नक्की.
वाचा - Long Distance Relationship: कसा साजरा कराल यंदाचा व्हेलेंटाईन
बऱ्याचदा तुमची तिच्याशी खूप चांगली मैत्री असते त्यामुळे तिला प्रपोज करताना तुम्ही घाबरता की, आपण प्रेमाबद्दल विचारू आणि तिच्या मनात फक्त मैत्री असेल तर ती मैत्रीही तुटेल आणि आपण तिच्यापासून दूर जाऊ. आपलं नातं तुटायला नको ही भीती तुमच्या मनात असते. त्यामुळे हीच ती ‘योग्य वेळ’ आहे का? हा प्रश्न नेहमीच पडतो. मुलं भीतीमुळे सतत मनाला समजवत असतात की, योग्य वेळ आल्यावर तिच्यासमोर मन व्यक्त करेन. पण खरं तर असं काहीही नसतं. कारण तुम्ही योग्य वेळेचा विचार करत बसाल आणि तिच्या आयुष्यात कोणीतरी त्या वेळेत दुसराच येईल. त्यामुळे कधीना कधीतरी तुम्हाला तुमचं मन व्यक्त करायचं असतं तर त्यासाठी योग्य वेळ शोधू नका. तुम्हाला ज्यावेळी वाटेल तेव्हाच तुम्ही लगेच तिला तुमच्या मनातील भावना सांगून टाका. तुमच्या भावना तिच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतील यासाठी प्रयत्न करा.
प्रत्येक मुलगी ही वेगळी असते हे कायम लक्षात ठेवा. ही सर्वात महत्त्वाची खास टीप आहे. तुमच्या एखाद्या मित्राच्या मिश्किल स्वभावामुळे एखादी मुलगी पटकन हो म्हणाली किंवा फिल्मी स्टाईलने एखादी मुलगी खूष झाली तर तुम्हीही तसंच करू नका. तुम्हाला जी मुलगी आवडते तिला नक्की काय आवडतं याचा मुळात विचार करा. कारण प्रत्येक मुलीची आवड आणि निवड ही वेगळी असते. एखाद्या मुलीला मस्तीखोर मुलगा आवडतो तर एखाद्या मुलीला शांत स्वभावाचा. त्यामुळे तुम्ही ज्या मुलीवर प्रेम करत आहात तिला प्रपोज करण्यासाठी तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे किंवा कशाप्रकारात प्रपोज करायचं आहे हे कोणाचाही सल्ला न घेता तुमच्या मनाचं नीट ऐका आणि मगच तिला विचारा. उगाच इतर कोणाचीही नक्कल करणं टाळा आणि स्वतःच्या स्वभावानुसार जसे तुम्ही आहात तसेच तिच्यासमोर वागा. कारण तिला तुमचा मूळ स्वभाव आणि तुम्ही आवडणार असता आणि जन्मभर ती याचमुळे तुमच्याबरोबर राहणार असते.
वाचा - Valentines Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरा करा 'रोमँटिक' ठिकाणी
खरं तर प्रेम हे नजरेतूनच व्यक्त होतं. तिला तुमच्या नजरेतील प्रेम दिसत असतं. बऱ्याचदा तुमच्या तोंडातून तुमचं प्रेम व्यक्त होत नसलं तरीही तुमच्या नजरेतून ते व्यक्त होत असते. जेव्हा तुम्ही तिला प्रपोज करणार असाल तेव्हा तिच्या नजरेत नजर देऊन बोला. त्यामुळे तुमच्या मनातील भाव डोळ्यात उतरतात आणि तिला तुमच्या भावना स्पष्ट जाणवतात. तुम्ही तिच्या नजरेला नजर देत असताना तिने कोणतीही हरकत घेतली नाही आणि तीदेखील नजरेला नजर मिळवून उभी राहिली तर समजा तुमचं अर्ध काम झालं आहे. तिलादेखील तुम्ही आवडत आहात हे निश्चित. तिच्या नजरेला नजर देऊन तुम्ही प्रपोज केलंत तर तुम्ही तिच्यावर खरं प्रेम करत असून तिच्यामध्ये सिरीयस आहात हे तिला जाणवायला वेळ लागत नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तिच्या नजरेला नजर देऊन पाहिलं तर तिला तुमच्यातला विश्वास आणि आयुष्यभर तुम्ही तिला साथ द्यायला तयार आहात हा विश्वासही जाणवतो. त्यामुळे होकार द्यायला मुलीला जास्त वेळ लागत नाही किंवा ती विचार करण्यासाठी जास्त वेळ मागत नाही.
Also Read Valentines Day Plan In Marathi
प्रपोज करण्यापूर्वीपासूनच तिचा होकार असेल तर काय आणि नकार असेल तर काय हे विचार करून मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण येऊ देऊ नका. आपलं प्रेम खरं आहे आणि आपल्याला तिच्याकडून नक्कीच सकारात्ममक प्रतिसाद येईल हेच मनात ठेवून तिला मागणी घाला. मनावर दडपण असल्यास, मनात एक आणि ओठावर एक असं होण्याची शक्यता जास्त निर्माण होते. शिवाय तुम्हाला तिच्याशी बोलताना असलेलं दडपण सहजपणाने जाणवू शकतं. असं कधीही होऊ देऊ नका. त्यामुळे तुम्ही घाबरट असल्याचादेखील समोरच्या मुलीला वाटू शकतं. तुमच्याबद्दल तिच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण करू द्यायची नसेल तर असं कोणत्याही प्रकारचं दडपण तुमच्या मनावर येऊ देऊ नका. अर्थात असं होणं कठीण आहे. पण तरीही जर मनात दडपण असेल तर तुम्ही ते चेहऱ्यावर येऊ देऊ नये याची नक्की काळजी घ्या. कारण जर तुम्ही मनावर दडपण घेतलं तर समोरच्या मुलीचीदेखील चलबिचल होणार. तिला तुमच्याबद्दल अजिबात विश्वास वाटणार नाही. तुम्हाला निदान हे दडपण लपवता यायला हवं.
आम्ही तुम्हाला प्रपोज करताना नक्की काय करायला हवं आणि काय करू नये याच्या खास टीप्स दिल्या आहेत. या टीप्स तुम्ही ट्राय करण्याआधी एकदा नक्की नीट वाचून त्यावर विचार करा. आता लवकरच व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा आणि प्रपोज करायचा दिवस जवळ येत आहे. तर या टीप्स तुमच्या नक्की उपयोगी पडतील. त्यामुळे आता जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचं असेल तर चला लागा तयारीला!
फोटो सौजन्य - Instagram
You Might Like These:
प्रेमास रंग यावे! 20 हटके पद्धतींनी सेलिब्रेट करा व्हॅलेंटाईन डे