ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
प्रत्येक महिन्याचा पॉकेटमनी वाचवायचा असेल तर 7 सोपे उपाय (Money Saving Tips In Marathi)

प्रत्येक महिन्याचा पॉकेटमनी वाचवायचा असेल तर 7 सोपे उपाय (Money Saving Tips In Marathi)

पॉकेटमनी ही अशी गोष्ट आहे, जी हातात आल्यानंतर डोक्यामध्ये दहा गोष्टी चालू व्हायला लागतात. आज काय खरेदी करायचं, कोणत्या हॉटेलमध्ये खायला जायचं, बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला काय गिफ्ट घ्यायचं…लगेच आपल्या डोक्यामध्ये यादी सुरु होते. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही तुम्हाला मिळालेल्या पॉकेटमनीमधून खूपच चांगल्या तऱ्हेने पैशांची बचत करू शकता. तुम्हाला बाहेर जाण्याचा मोठा प्लॅन बनवायचा असेल किंवा आपल्या वाढदिवसासाठी काही मोठा प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही पैशांची बचत आरामात या पॉकेटमनीमधून करू शकता. तुम्ही तुमच्या महिन्याचं बजेट अगदी योग्यरित्या यातून पूर्ण करू शकता. याचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे आपण पैसे वाचवून स्वतंत्र तर होतोच पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा हेच पैसे आपल्या कामी येतात. या बचतीमुळे हवं तेव्हा आपल्याला आपणच जमवलेले पैसे उपयोगी पडतात आणि इतर कोणाहीसमोर हात पसरायची गरज भासत नाही. खरं तर इतर म्हणण्यापेक्षा सतत आई – बाबांजवळ पैसे मागण्याची आपल्यालाही लाज वाटत असते. जर आपल्याला मिळणाऱ्या पैशातून काही बचत करत गेलात तर नक्कीच ती वेळदेखील येणार नाही. कशी करायची बचत यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगतो.  हे उपाय अगदी सहजसोपे आहेत. त्यामुळे तुमची बचत आणि फायदा नक्की होईल ही आमची हमी आहे.

पैसे वाचविण्यासाठी 7 सोप्या परंतु प्रभावी मार्ग (Money Saving Tips)

1. जुन्या आणि नको असलेल्या गोष्टी करा ओएलएक्स (Sell Old and Unwanted Items On OLX)

1.-OLX1
घरात अशा अनेक वस्तू असतात ज्यांची आपल्याला गरज नसते. तरीही आपण बऱ्याचदा त्या तशाच ठेवून दिलेल्या असतात. अशा जुन्या आणि नको असलेल्या वस्तू तुम्ही बाजूला काढून ओएलएक्सवर विकू शकता. उदाहरणार्थ जुनी सायकल, जुनी गिटार वा पियानो अथवा नको असणाऱ्या कोणत्याही लोखंडाच्या वस्तू या विकल्यास, चांगले पैसे मिळतात आणि त्या पैशांची तुम्हाला बचत करण्यासाठी मदतही होते. हे वाचवलेले पैसे तुम्ही अन्यवेळी नक्कीच उपयोगी आणू शकता. शिवाय तुम्हाला सर्वात महत्त्वाचा फायदा हा होतो की, घरामधली घाण कमी होते आणि वस्तू फुकटही जात नाही. त्या वस्तूंचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत असतो. तुमच्या पॉकेटमनीमध्ये हा पैसा जोडून तुम्हाला चांगली बचत करता येते.

2.  पिगी बँक – पर्सनल बँक (Piggy Bank)

2.-PIGGY-BANK1

अगदी लहानपणीपासून आपल्याला पिगी बँक अर्थात पर्सनल बँकमध्ये पैसे कसे जमवायचे याचं एक बाळकडूच मिळालेलं असतं. जेव्हा तुम्हाला तुमचा पॉकेटमनी वाचवायचा असतो  तेव्हा तुम्ही तुमच्या पिगी बँकेमध्ये तो जमा करून ठेवा. पण हे लक्षात ठेवा की, पिगी बँक सतत तुमच्या समोर असली तरीही तुमचं तुमच्या मनावर नियंत्रण हवं. त्यामध्ये ठेवलेले पैसे सतत तुम्ही काढत राहिलात तर नक्कीच त्याचा काही उपयोग नाही. खरं तर अशी पिगी बँक वापरा ज्यातून तुम्हाला सतत पैसे काढता येणार नाहीत आणि पूर्ण पिगी बँक भरल्यानंतरच तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल. शिवाय गरज असेल तरच ती पिगी बँक फोडा नाहीतर ती बँक तशीच राहू द्या आणि दुसऱ्या पिगी बँकचा वापर पुन्हा आपले पैसे साठवण्यासाठी तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या पॉकेटमनीमधील रोज काही रक्कम तुम्ही तुमच्या पिगी बँकमध्ये टाका मग अगदी ते केवळ उरलेले दहा रूपये असले तरीही चालतील. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण तुम्हाला नक्कीच याठिकाणी अनुभव चांगला देईल. एकदा करून तर पाहा.

ADVERTISEMENT

3. एकच वस्तू सारखी खरेदी नका करू (Don’t Buy Similiar Things)

rebuy

बऱ्याचदा बाजारात गेल्यानंतर काही वस्तू खरेदी करण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आपल्याकडे बऱ्याच वस्तू असतात पण तरीही त्या वस्तू बाजारात दिसल्यानंतर आपल्याला त्या विकत घ्याव्या वाटतात. स्पेशली मुलींना हँडबॅग्ज, फोन कव्हर, कानातले, चप्पल्स या वस्तू कितीही असल्या तरीही सतत खरेदी करायची सवय असते. अशा सवयींना आवर घाला. केवळ तुम्हाला आवश्यक असतील त्याच वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा कदाचित तुम्हाला त्रास होईल. मनावर खूप नियंत्रण ठेवावं लागेल. पण एकदा तुम्ही ही सवय केलीत की, तुमचा पॉकेटमनी बऱ्याच प्रमाणात वाचू शकतो. बचत कदाचित छोट्या रकमेची असू शकते पण या सवयीमुळे ती नक्कीच एकदिवस मोठी रक्कम होते हे लक्षात घ्या. यामध्ये तुमचा स्वतःचा फायदा आहे. तुम्हाला जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा तुम्ही ही रक्कम वापरू शकता. उदाहरणार्थ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पिकनिकचा प्लॅन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडे अधिक रक्कम मागायची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या पॉकेटमनीच्या वाचवलेल्या पैशातून आरामात पिकनिकला स्वतःचे वाचवलेले पैसे वापरू शकता. एकदा नक्की या गोष्टीचा विचार करून पाहा आणि आजपासूनच तुमचा अवाजवी खर्च टाळा आणि पैशाची बचत करायला घ्या.

4. शॉपिंग लिस्टची एलओसी क्रॉस करू नका (Don’t Cross the LoC of Shopping List)

4.SHOPPING1

जेव्हा तुम्ही शॉपिंग करायला जाल तेव्हा तुम्ही केवळ त्याच वस्तूंची खरेदी करा ज्या तुमच्या यादीमध्ये आहेत. यादीच्या बाहेर जे समोर दिसतं ते खूप चांगलं आहे घ्यायला हवं असं मनात आणू नका. आपण जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शॉपिंगला जातो तेव्हा बऱ्याचदा हे हवं, ते हवं असं आपल्याला सर्वच घ्यावं वाटत असतं. पण जर तुम्ही अवाजवी उगाच खर्च करत गेलात तर तुमचा पॉकेटमनी तुम्हाला कधीही पुरा पडणार नाही. त्यामुळे अशावेळी स्वतःच्या मनाला समजावून केवळ शॉपिंग लिस्टमध्ये असलेल्या वस्तूंची खरेदी करून घरी या. त्यामुळे तुमची बचत व्हायला मदत होईल.

ADVERTISEMENT

5. जंक फूडवर जास्त खर्च करू नका (Don’t Spend Much On Junk Food)

5.-JUNK-FOOD1
आजकाल आपल्या सर्वांचंच फेव्हरेट फूड म्हणजे जंक फूड झालं आहे. कुठेही फिरायला गेलं तर भूक लागल्यावर जराही विचार न करता आपण जंक फूड ऑर्डर करतो. त्यातही जास्त ऑर्डर असते ती चायनीजची. त्यावेळी ना विचार करत पैशाचा ना आपल्या शरीराचा. तुम्ही जंक फूड बंद केल्यास, तुमचे पैसेही वाचतील आणि तुमच्या अंगावर वाढणारी चरबीदेखील नक्की कमी होईल. एकदा नीट विचार करून पाहा. कारण जंक फूड तुम्ही जितकं जास्त खाल तितकी तुमची जाडी वाढणार आणि डॉक्टरांचे खर्चही. त्यापेक्षा कधीतरी जंक फूड खाणं ठीक आहे. पण वरचेवर जर तुम्ही जंक फूड खात असाल तर बंद करा. त्यामुळे नक्कीच तुमचे पॉकेटमनीमधील पैसे वाचतील.

6. आपल्या कमाईपेक्षा अधिक खर्च करू नका (Don’t Spend More Than Your Earnings)

6.SPEND-LESS-THAN-YOU-EARN1
तुम्ही जर शिकत असाल तर तुम्ही शिकता शिकता एखादा पार्ट टाईम जॉब वा इंटर्नशिप करत असाल तर त्यातील पैसे वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्याला मिळणाऱ्या कमाईमधून किती उधळायचे आहेत याचा हिशेब आधीच करू नका. तर मिळणारे पैसे कमी जरी असले तरी त्यातले किती वाचवायचे आहेत याचा हिशेब करा आणि त्याप्रमाणे प्लॅन करा. यातून तुमच्या भविष्याचा चांगला विचारच तुम्हाला करायचा आहे. दुसरीकडे उगीचच पैसे उधळण्यापेक्षा योग्य गोष्टीसाठी पैसे साठवणं केव्हाही चांगलं. याचा नीट विचार करा. जर तुम्ही काही करत नसाल आणि केवळ पॉकेटमनीवरच अवलंबून असाल तर तुमचा पॉकेटमनी चांगल्या मार्गाने कसा वाढवता येईल याकडे लक्ष देत पार्ट टाईम जॉब करून स्वतःच चांगली बचत करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ना तुमच्या आईवडिलांवर कोणत्याही प्रकारचं बर्डन राहणार ना तुम्हाला प्रत्येकवेळी त्यांच्याकडे हात पसरावे लागणार. यामुळे तुम्हाला स्वावलंबनाचादेखील उत्कृष्ट अनुभव मिळेल.

7. ऑफर्सवर लक्ष द्या (Pay Attention To Offers)

rebate-dis.71

ज्या गोष्टी तुम्हाला सेलमध्ये स्वस्त मिळत आहेत त्या डिस्कांऊंटवर खरेदी करण्याचा प्रयत्न करा. जर अगदीच गरज नसेल तर शॉपिंगसाठी सीझन सेल यायची नक्की वाट बघा. सीझन सेलच्या वेळी किमती कमी असल्यामुळे तुमची पैशाची बचत जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे कमी पैशात तुम्ही जास्त खरेदीचा लाभ घेऊ शकता. तुमच्या पॉकेटमनीमधील जास्त पैसा वाचवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. याचा वारंवार उपयोग केल्यामुळे तुमचे पैसे तरत वाचतीलच शिवाय तुम्हाला अशा ऑफर्समध्ये चांगल्या वस्तूंचा उपभोग घेता येईल हेदेखील वेगळं सांगायची गरज नाही.

ADVERTISEMENT

Gifs: tumblr, Instagram 

हेदेखील वाचा – 

ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स

घराला कसं बनवावं ‘स्मार्ट होम’, काय आहे ‘स्मार्ट होम’

ADVERTISEMENT

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं

14 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT