ADVERTISEMENT
home / Dating
तुमचा बॉयफ्रेंड तुमची फसवणूक तर करत नाही ना?

तुमचा बॉयफ्रेंड तुमची फसवणूक तर करत नाही ना?

आधी तू मला प्रत्येक गोष्ट सांगत होतास? हल्ली साधा फोनसुद्धा करत नाहीस. तू माझ्यावर नक्की प्रेम करतोस ना? असे अनेत प्रश्न रिलेशनशीपमध्ये मुलींना पडतात. तुम्हालाही असं वाटत का की तुमचा बॉयफ्रेंड तुमच्यावर पूर्वीसारखा प्रेम करत नाही? त्याचे तुमच्याशी वागणे बदलले आहे. त्याच्या याच वागण्यामुळेच तुम्हाला असं वाटत आहे का तो तुम्हाला फसवत आहे. तो तुम्हाला सोडून दुसऱ्या कोणावर प्रेम करतो असे तुम्हाला सतत वाटते का? हे इतके प्रश्न मनात येऊन सतत दडपणाखाली राहाण्यापेक्षा तुम्ही आम्ही काढलेल्या काही गोष्टींतून तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला फसवत आहे की नाही ते ओळखू शकता.

दुर्लक्ष करणे

बॉयफ्रेंडने सतत तारीफ करणे, फोन करणे, चौकशी करणे कोणाला आवडत नाही. रिलेशनशीप नवीन असताना या गोष्टी सारख्या होतात. पण जसं जसं रिलेशन जुने व्हायला लागते तसं तसं सगळं कमी होऊ लागतं. दिवसभरातून होणारे १० ते १२ फोन १  किंवा २ वर जातात. पण त्याचा अर्थ तो तुम्हाला फसवत आहे असा होत नाही. तुमच्या नात्यात तेव्हा दुरावा येतो जेव्हा तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याकडे दुर्लक्ष करु लागतो. तुम्ही दिवसभरातून बऱ्याच गोष्टी त्याला सांगत आहात. पण हो किंवा नाही म्हणण्यापलीकडे जर तो काहीच उत्तर देत नसेल तर समजावं की, त्याला तुमच्यात काही रस नाही. (पण तो फसवत आाहे असा निकाल एक दोन घटनांमधून लगेच लागत नाही. तर हे सतत होत असेल तर मुलींनी काळजी घेणे गरजेचे आहे. एरव्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारा मुलगा जर असं वागत असेल तर थोडं संशयास्पद आहे असे समजा. कारण तो तुम्हाला जितके टाळता येईल तितके टाळत आहे. ही पहिला पायरी असते तुम्हाला ‘फसवण्याची’

ignorance

ADVERTISEMENT

उदा. बॉयफ्रेंडच्या नोकरी संदर्भातील चांगली बातमी तुम्हाला त्याच्याकडून नाहीतर कोणा दुसऱ्याकडून कळत असेल याचा अर्थ तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. महत्वाची गोष्ट अशी की, त्याला तुमच्यामध्ये आता काहीच स्वारस्य उरलेले नाही.

बॉयफ्रेंडला प्रपोझ करण्याचे काही हटके प्रकार

खोटं बोलणे

दुर्लक्ष करायचे म्हटले की, खोटे बोलणे आलेच. जर बॉयफ्रेंडला तुमच्यासोबत राहायचे नसेल तर तो नक्कीच अशा काही गोष्टी करायला सुरुवात करतो की त्या लगेच लक्षात येऊ लागतात.  सतत खोटे बोलणे आणि असे खोटे जे पकडले जाते. पण त्याचाही त्यांना फरक पडत नसतो.उलट खोटे बोलून त्यांना आहे ती वेळ मारुन न्यायची असते आणि आपण मुद्दामच खोटे बोलत आहेत हे गर्लफ्रेंडला दाखवून द्यायचे असते. बरेचदा या पायरीला प्रेम आल्यानंतर तुमच्यात बरेच अंतर आलेले असते. त्याच्या खोट्या बोलण्याला कंटाळून तुम्ही त्याला लवकर सोडाल अशीच अपेक्षा त्यांना असते आणि जर तसे झाले नाही तर ते तुम्ही स्वत:हून निघून जावे यासाठी खोटे बोलत राहतात.

ADVERTISEMENT

lie3

उदा. इतर मित्र- मैत्रिणींसोबत बाहेर जाण्यासाठी खोटे बोलणे. तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तिला वेळ देणे अशा काही गोष्टी ते करु लागतात. या गोष्टी ते तुम्हाला टाळण्यासाठी करत असतात. 

प्रेम करता पण घरी सांगायला घाबरता मग हे नक्की करा 

वेळ देण्यासाठी टाळाटाळ करणे

ADVERTISEMENT

कितीही भांडणे झाली की ती भांडणे एकमेकांना वेळ देऊन मिटत असतात. पण हाच अमूल्य वेळ तुमच्या बॉयफ्रेंडना तुम्हाला द्यायचा नसतो. तुम्ही एकमेकांना वेळ देण्यासाठी काही प्लॅन करत असाल पण त्याला तुमचे कोणतेही प्लॅन आवडत नसेल. तो सतत तुमच्यासोबत बाहेर जाणे टाळत असेल तर तो नक्कीच तो तुमची आणि तुमच्या नात्याची फसवणूक करत आहे.

no time

उदा. एखाद्चा वीकेंडला तुम्ही त्याच्यासोबत मुव्हीला जाण्याचा प्लॅन करता. पण त्याला फोन करुन हे सरप्राईज सांगितल्यावर ‘नाही ग आज माझा मूड नाही किंवा आज मी खूप थकलो, जायला कंटाळा आला आहे. अशी काही उत्तरे दिली जातात.

परफेक्ट बॉयफ्रेंड बनण्यासाठी हे नक्की करुन पाहा

ADVERTISEMENT

सतत भांडणे

नात्यात क्षुल्लक कारणावरुन चीडचीड व्हायला लागते. काही कारण नसतानाही बॉयफ्रेंड तुमच्याशी सतत भांडत राहतो. इतरवेळी समजूतदारपणे वागणारा तुमचा बॉयफ्रेंडच तुमच्याशी वाद घालतो. ते भांडण संपवण्याच्या कोणत्याही मन:स्थितीत नसतो. भांडणानंतर तुमच्याशी न बोलण्यात ते धन्यता मानतात.तुमच्याशी वाद घालताना इतरांशी मात्र त्याचे वागणे चांगले असते. अशावेळी साहजिकच मुलींना वाईट वाटते आणि त्या ती भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण खरचं आता हे नाते सोडवण्यापलीकडे निघून गेलेले असते हे समजायला हवे.

couple

उदा. तुला कितीवेळी सांगितले आहे की, ऑफिसमध्ये असताना फोन करत जाऊ नकोस. तुझे असे फोन करणे मला अजिबात आवडत नाही ( पूर्वी हेच फोन करणे त्याला आवडत असते. वेळात वेळ काढून तो तुमच्याशी बोलत असतो.)

ADVERTISEMENT

सारख्या चुका दिसणे

कोणतेच जोडपे परफेक्ट नसते. कारण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. पण आधी दोषही सांभाळून घेण्याची ताकद दोघांमध्ये असते. पण ज्यावेळी तुमच्या गुणांपेक्षा तुमचे दोष तुमच्या बॉयफ्रेंडला अधिक दिसू लागतात.त्यावेळी नात्यात एक ओढाताण व्हायला लागते. जर त्याला तुमच्यासोबत राहायचे नसेल तर तो तुमच्या जास्तीत जास्त चुका शोधू लागतो. बऱ्याचवेळा चुका या फार क्षुल्लक असतात. पण त्या काढून तो तुमच्यावर चीडत राहतो. तुमच्याशी बोलणे टाळतो.

taking out fault

 उदा. तुला एखाद्या गोष्टीवर ओव्हर रिअॅक्ट करायची सवय लागली आहे. तुझी सतत अशी ओव्हर रिअॅक्ट करण्याची सवय मला डोक्यात जाते. तुला बोलण्याचे मॅनर्स नाहीत. कशीही बोलतेस. ऐकून घेत नाहीस वगैरे 

ADVERTISEMENT

सतत दुसऱ्या मुलींबदद्ल बोलणे 

कोणत्याही मुलीला नात्यात कोणत्याही इतर मुलींची फारशी तारीफ केलेली आवडत नाही. पण तुमचा बॉयफ्रेंड जर दुसऱ्या मुलीबद्दल अचानक बोलू लागला असेल तर ते मुलींना कधीच आवडत नाही. पण जर तुमचे नाते हेल्दी असेल तर तुम्हाला या गोष्टींचे काहीच वाटत नाही. कारण तुम्हाला तुमच्या प्रियकरावर खूप विश्वास असतो. पण ज्यावेळी बॉयफ्रेंडचे वागणे बदलू लागते त्यावेळी तुम्हाला दुसऱ्या कोणाचेही नात्यात  येणे मुलींना आवडत नाही. पण तो सतत तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी सतत करत असेल तर तो  बॉयफ्रेंड नक्कीच तुम्हाला फसवत आहे असे समजावे.

taking doubt

उदा. हल्ली तर सोशल मीडियाचा काळ आहे. दुसऱ्या मुलीचे फोटो लाईक करणे, तिच्याबद्दल सतत बोलणे. एखाद्या अनोळखी मुलीसोबत तुम्हाला न सांगता बाहेर जाणे. त्या मुलीबद्दल तिच्या कामाबद्दल सतत तुमच्याकडे बोलत राहणे 

ADVERTISEMENT

आता काय कराल? 

तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला फसवत आहे अशी पूर्ण खात्री झाल्यानंतर त्याच्याशी भांडणे हा पर्याय नाही. कारण भांडून तुमचे नाते कधीच दुरुस्त केले जाऊ शकत नाही. 

अशावेळी दीर्घ श्वास घेऊन तुम्हाला आता या सगळ्यातून बाहेर पडायचे आहे हेच मनाशी ठरवायचे आहेत. 

तुम्ही या नात्यातून बाहेर पडण्याचे ठरविल्यानंतर ज्या भावना तुमच्या मनाशी दाटल्या आहेत त्या तुमच्या बॉयफ्रेंडसमोर बोलून दाखवा. त्यामुळे जरी तुम्ही भविष्यात एकमेकांना भेटलात तरी तो कडवटपणा तुमच्यात राहणार नाही. 

ADVERTISEMENT

तुम्ही ३ ते ४ वर्षे एकमेकांवर प्रेम करत आहात. पण आताच हे असे का व्हावे? याचा विचार करण्यापेक्षा आपले काय चुकले आणि भविष्यात आपल्याला काय टाळायचे आहे याचा विचार करा.

आयुष्य हे पुढे जाण्यासाठी असते. जे मागे राहिले त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे जा.

कोणत्याही नव्या नात्याची सुरुवात ही खरं बोलून करा. तुमच्या भावना, तुमचा स्वभाव, समोरच्याचा स्वभाव जाणून घ्या. शक्यतो तुमच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी एकत्र सांगणे टाळा. कारण त्याचा तुमच्या नात्यावर परीणाम होऊ शकतो.

 

ADVERTISEMENT

 

 

 

 

ADVERTISEMENT
04 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT