ADVERTISEMENT
home / Dating
Valentines Day : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ चा अर्थ तुम्हाला कळलाय का (Meaning Of Valentines Day In Marathi)

Valentines Day : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ चा अर्थ तुम्हाला कळलाय का (Meaning Of Valentines Day In Marathi)

व्हॅलेंटाईन्स डे हा फक्त आणि फक्त प्रेम साजरा करण्याचा दिवस. हा दिवस आणि प्रेमाचं गोडवे गाणारे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील नाही का? काही लोकं या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात (भलेही त्यांची कारण वेगवेगळी असोत), काहीजणांना या दिवसाचा राग येतो, तर काहीजणांना या दिवसाबद्दल काहीच वाटत नाही. पण मला स्वतःला या दिवसाबद्दल नेहमीच एक विलक्षण आकर्षण वाटत आलं आहे. कारण प्रेम ही गोष्टच अशी आहे आणि किती छान वाटतं जेव्हा आपण प्रत्येकाला त्यांच्या जवळच्यांना या खास दिवशी शुभेच्छा देताना पाहतो तेव्हा (अपवाद – काही सार्वजनिक ठिकाणी थिल्लर प्रेम करणारी कपल्स.. पण त्यांना दोष देण्यातही अर्थ नाही…ते वयच तसं असतं).

1. Celebrate Valentines Day In Marathi

खरंतर आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात अगदी रोज प्रेम साजरं करू शकतो. पण मग त्याच्यात काय मजा. नाही का.. असा एखादा हक्काचा दिवस असण्यात काय हरकत आहे. मलाही वाटायचं की, व्हॅलेटाईन्स डे हा दिवस खूप ओव्हररेटेड आणि ओव्हर सेलिब्रेट केला जातो. जणू हा दिवस मुलींना आपल्या बॉयफ्रेंडकडे बुके आणि ज्वेलरी यासारखे हट्ट पूरवून घ्यायचं कारण देणारा दिवस आहे किंवा ज्यांना बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आहे, त्यांना मिरवण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस कधीकधी खोटा वाटायचा. आपण प्रत्येक चित्रपटात पाहतो की, चॉकलेट्स, फुलं आणि रोमँटीक डिनर असं सगळं असतंच. मग प्रत्येक मुलीला ही वाटतं की, आपल्या बॉयफ्रेंडने किंवा आपल्या नवऱ्याने असं करावं. लग्नाआधी जर कोणी आयुष्यात नसेल तर निदान लग्नानंतर तरी असं प्रेम करणारा नवरा मिळावा. हाच विचार प्रत्येक मुलाच्या मनातही नक्कीच येत असणार नाही का? एवढंच कशाला संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी झटल्यावर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या आजीआजोबांनाही वाटत असेलच की.

Also Read Tips For Single People In Marathi

ADVERTISEMENT

तर प्रत्येकालाच आपल्यावर कुणाचं तरी प्रेम असावं, आपली काळजी घेणारं कोणी असावं असं वाटत असतं. मुलींना तर नक्कीच वाटत. कारण मुली नाही म्हटलं तरी थोड्या ‘एक लडकी थी दिवानी सी’ टाईपच्या असतात नाही का? त्यामुळे त्यांच्यासाठी व्हॅलेटाईन्स डे सेलिब्रेट करणं मस्ट असतं. या दिवशी कितीही नाही म्हटलं तरी कोणालाच एकटं राहावसं वाटत नाही. म्हणूनच हा डे सगळीकडे जोरदार साजरा केला जातो आणि आपल्या आयुष्यातली ती व्यक्ती आपल्यासोबत असेल तर क्या कहने. हा दिवस फक्त कौतुक करण्याचा नाही. हा दिवस आहे, आपल्या आयुष्यातील ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे आणि तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करण्याचा.

मी शाळेत होते तेव्हा तर नेमके शाहरूखचे सर्व प्रेमपट जसं दिल तो पागल है, कुछ कुछ होता है आणि मोहब्बते यांसारखे प्रेमाचं महत्त्व आपल्या बालमनावर बिंबवणारे चित्रपट आले होते. त्यामुळे शाळांमध्येही व्हायचे ते परिणाम झालेच. शाळेत किंवा आपल्या क्लासमधल्या क्रशला गूपचूप ग्रीटींग देणं किंवा त्याला गाठून माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं सांगणं आणि मग सगळं जमून आलं तर डेटवर जाणं. ‘डेट’ हा शब्दही तेव्हा अस्तित्वात नव्हता कदाचित. अगदीच असं नसेल तर मित्रमैत्रिणींबरोबर खास या दिवशी बाहेर जायचंच. उगाच छोटीशी पार्टी करायची (तेव्हाच्या पार्टीमध्ये पिणं वगैरे नसायचं) किंवा आपल्या बेस्टीला गिफ्ट द्यायचं, असे प्रकार असायचे. किती सोप्पं होतं सगळं तेव्हा.

आता मात्र हे तेवढं सोप्पं उरलं नाही. एकीकडे काही कपल्ससाठी हा दिवस तेवढा चांगला जाणार नाही. कारण जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमच्या पार्टनरला या दिवसांबद्दल काहीच वाटत नसेल तर कसला व्हॅलेंटाईन डे. तर काहींच्या गर्लफ्रेंडसनी महिन्याभर आधीच गिफ्ट आणि चांगल्या ठिकाणी डेटसाठी भूणभूण सूरू केली असेल. कारण या दिवशी सगळ्याच हॉटेल्स आणि मूव्ही थिएटर्सच्या किंमतीमध्ये वाढ होते. काही ऑफर्स असतात, पण त्या आपल्या उपयोगी पडतीलच असं नाही ना.

ते काहीही असो तरीही हा दिवस साजरा करण्याची काही खास कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बघा तुम्हालाही ती पटली तर हा प्रेमदिवस नक्की साजरा करा.

ADVERTISEMENT

वाचा – मराठीत हनीमूनचे कपडे (Honeymoon Dresses In Marathi)

2. Celebrate Valentines Day In Marathi

1. व्हॅलेंटाईन डे चा रंजक इतिहास (Colorful History Of Valentines Day)

मला वाटतं तुम्हा सगळ्यांना आत्तापर्यंत माहीत असेलच की, हा प्रेमदिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. या संत व्हॅलेंटाईन यांच्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. एका आख्यायिकेनुसार रोममधील या संतांनी घरच्यांचा विरोध असलेल्या अनेक जोडप्यांची गुप्तरितीने लग्न लावून दिली होती. जेव्हा तिथल्या राजाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने संत व्हॅलेंटाईनला अटक करून फाशीची शिक्षा सुनावली आणि अशाप्रकारे या संताने प्रेमासाठी आपला जीव दिला. तेव्हापासून त्यांच्या आठवणीत हा प्रेमदिवस साजरा केला जातो.

2. मस्त ड्रेसअप होण्याची आणि मित्रमैत्रिंणीबरोबर हँगआऊटची संधी (Dressing Up And Hanging Out With Friends) 

व्हॅलेंटाईन डे फक्त तुमच्या पार्टनरसोबत नाही तर तुमच्या मित्रमैत्रिंणीबरोबर किंवा अगदी आईबाबाबरोबरही सेलिब्रेट करू शकता. मस्त ड्रेसअप व्हा, मूव्हीला जा, व्हॅलेंटाईन डे ऑफर्सचा फायदा घ्या, डिनर करा आणि एन्जॉय करा. फ्रेंडेटाईन (मित्र-मैत्रिणींबरोबरचा) किंवा गॅलेंटाईन (बेस्टीबरोबरचा)डे साजरा करा.

ADVERTISEMENT

वाचा – व्हॅलेंटाईन डे साठी वेषभूषा

3. घरातच राहा आण रिलॅक्स करा (Stay In The House And Relax)

जर तुमचं असं काहीच करायची इच्छा नसेल किंवा तुमची बेस्टी तिच्या पार्टनरसोबत डेटला जाणार असेल नो चिंता. कॉलेजला मारा दांडी आणि घरीच राहा. टीव्हीवर छानपैकी व्हॅलेंटाईन डे स्पेशल मूव्हीज बघा आणि पॉपकॉर्न खा. स्वतःवर प्रेम करा. 

4. स्वतःच घ्या स्वःताला गिफ्ट (Buy Gift For Yourself)

आम्ही काही तुम्हाला बाहेर जाऊन खर्च करून तुमचं बजेट बिघडवण्याचं सूचवतं नाहीये. पण व्हॅलेंटाईन डे हा चांगला बहाणा आहे. स्वतःसाठी शॉपिंग करायचा. तसंही या दिवशी भरपूर ऑफर्स असतात. मग काय निकल पडो शॉपिंग को.

3. Celebrate Valentines Day In Marathi

वाचा – महाराष्ट्रात भेट देण्यासाठी रोमँटिक ठिकाणे

5. रिलेशनशिपमध्ये असल्यास पार्टनरला करा ट्रीट (Treat Your Partner In A Relationship)

जर तुमचा पार्टनर जगात भारी असेल तर तुम्हाला हा दिवस एक चांगली संधी आहे त्यांचं कौतुक करायची. कारण रोजच्या धावपळीत आपण कधीकधी एकमेकांना गृहीत धरतो. मग हळूहळू नात्यातील ते सुरूवातीचं थ्रिल संपत आणि सगळ्याच गोष्टी कशा फॉर्मेलिटी वाटू लागतात. त्यामुळ हा दिवस पुन्हा एकदा ते थ्रिल जगण्याची चांगली संधी आहे. त्याला किंवा तिला सरप्राईज द्या आणि आवडती गोष्ट गिफ्ट देऊन खूष करा.

ADVERTISEMENT

6. प्रेम करा सेलिब्रेट (Celebrate Your Love) 

प्रेमदिन असलेला व्हॅलेंटाईन डे ही आता व्यावहारिक आणि मटेरिअलिस्टीक झाला आहे. पण तरीही या दिवसाचा मुख्य गाभा आहे प्रेम साजरं करणं. तुम्ही प्रेमात आहात किंवा नसाल, अगदी तुमच्या प्रेमकहाणीचा अंत दुःखद झाला असेल पण तरीही शेवटी मानवी आयुष्यात प्रेम हे आजही तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रेमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आणि मिळत राहील. प्रेमामुळे नाती आहेत, कुटुंब आहेत, प्रेमामुळेच जगण्याला अर्थ आहे. कारण आजही पैश्याने प्रेम खरेदी करता येत नाही.

4. Celebrate Valentines Day In Marathi

सो… या व्हॅलेंटाईनला आपल्या पार्टनर, आईबाबा, बहीण-भाऊ, आजी-आजोबा, मित्रमैत्रिंणीबरोबर साजरा करा हा प्रेमदिवस.

Happy Valentines Day In Advance

ADVERTISEMENT

हेही वाचा 

Valentines Day: तुमच्या जोडीदारासाठी काय कराल सरप्राईज प्लॅन

Valentine Day: व्हॅलेंटाईन वीकमध्ये सेलिब्रेट करा हे ‘स्पेशल’ डेज

Valentine Day: व्हॅलेंटाईन डे हिंदी मध्ये कोट्स

ADVERTISEMENT

१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी

व्हॅलेंटाईन डे’ 20 पद्धतींनी कसा सेलिब्रेट करता येईल

06 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT