चेहऱ्यावर दिसणारे डाग आणि आपल्या त्वचेशी संबंधित समस्यांचा निपटारा करण्यासाठी आपण बरंच काही करत असतो आणि बरीच काळजी घेण्याचाही प्रयत्न करत असतो. पण जेव्हा अनावश्यक केसांची गोष्ट समोर येते, तेव्हा सगळेच हतबल होतात. नाही का? तुम्हा सगळ्यांनाही या गोष्टीला बऱ्याचदा सामोरं जावं लागलं असेल ना? या समस्येच्या समाधानासाठी तुम्ही बऱ्याचदा थ्रेडिंग अथवा वॅक्सिंग हा पर्याय निवडत असाल. पण हा पर्याय चेहऱ्यासाठी नक्कीच योग्य नाही. आम्ही तुमच्यासाठी काही खास नैसर्सिक उपाय घेऊन आलो आहोत. याचा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापर केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी होतील वा निघून जातील आणि इतकंच नाही तर हे उपाय नैसर्गिक असून तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर एक चमक अर्थात glow घेऊन येतील. त्यामुळे तुमच्याही चिंता दूर होतील. हे उपाय नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच चांगला पर्याय तर मिळेलच. पण बाहेर जाऊन अधिक खर्च करण्यापेक्षा तुमचे पैसेही वाचतील आणि कोणतीही केमिकल्स तुमच्या चेहऱ्याला न लागता अगदी नैसर्गिक सौंदर्याने तुमचा चेहरा उजळेल.
तांदळाचं पीठ आणि दही या दोन्ही गोष्टी त्वचेला अतिशय फायदेशीर असतात आणि तुमच्या चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी मदत होते. ½ टीस्पून तांदळाच्या पिठामध्ये ¼ टीस्पून दही मिक्स करा आणि त्याची जाडी पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही तुमच्या अनावश्यक केसांवर लावा आणि लावा अर्थात तुमच्या ओठांच्या वरील केसांवर. ती लावल्यानंतर तुम्ही पूर्ण सुकू द्यावे. व्यवस्थित सुकल्यानंतर स्क्रब करून हे काढून टाका आणि पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं आठवड्यातून दोन वेळा नक्की करा.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी टिप्स देखील वाचा
2-3 चमचे कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये एक चमचा साखर आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळून घ्या आणि हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या. ही पेस्ट तुम्ही अनावश्यक केसांवर लावा आणि सुकू द्या. त्यानंतर सुकल्यावर गोल गोल फिरवून स्क्रब करून काढून टाका आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील केस तर नाहीसे होतातच शिवाय चेहऱ्यावर एक वेगळी चमकदेखील येते.
अॅप्रिकॉट (apricot) हे फळ विटामिन आणि मिनरल्सयुक्त असते आणि यामध्ये lycopene मात्रा अधिक प्रमाणात असते. त्यामुळे चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी याचा चांगला उपयोग करता येतो. तर मध हे चेहऱ्यासाठी एक प्रकारे अमृतच.
अर्धा कप सुकलेल्या अॅप्रिकॉटची पावडर बनवून घ्या (ही पावडर जास्त जाडसर असू नये याची काळजी घ्या) या पावडरमध्ये एक चमचा मध घाला आणि मिक्स करून घ्या. हे मिक्स्चर तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि साधारण 5-10 मिनिट्स चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर सुकल्यावर हे गोल गोल फिरवून काढून घ्या आणि हलक्या हाताने स्क्रब करा. असं तुम्ही साधारण 10-15 मिनिट्स करत राहा. त्यानंतर कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवून घ्या. तुम्हाला जास्त चांगला परिणाम हवा असल्यास, ही प्रक्रिया तुम्ही दोन ते तीन वेळा करू शकता.
मेथीदाणे हे तर महिलांच्या अनेक समस्यांवरील एक उपाय आहे. त्याप्रमाणेच तुम्हाला चेहऱ्यावरील अनावश्यक केसांना हटवण्यासाठीदेखील हा चांगला आणि फायदेशीर पर्याय आहे. हा पर्याय इतका फायदेशीर आहे की, hirsutism मुळे चेहऱ्यावर आलेले केसही यामुळे निघून जाऊ शकतात.
2 चमचे मेथी दाणे आणि 2 चमचे हिरव्या मूगाची पावडर बनवून घ्या. या पावडरमध्ये पेस्ट होईपर्यंत पाणी मिसळा आणि पेस्ट करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकू द्या. त्यानंतर आता एक नरम आणि मुलायम सुके कापड घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने घासून पेस्ट काढून टाका. यामुळे तुमचा चेहरा अधिक तजेलदार दिसेल आणि अनावश्यक केसदेखील बऱ्याच कालावधीसाठी परत येणार नाहीत.
तेलकट त्वचेसाठी हे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात सी व्हिटामिन असते जे चेहऱ्याच्या त्वचेसाठी उत्कृष्ट समजले जाते. यासाठी तुम्हाला 2 चचे संत्र्यांच्या सालीच्या पावडरमध्ये एक चमचा मध घालायचं आहे. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर (मध असल्यामुळे पूर्ण सुकणार नाही) अगदी हलक्या हाताने चेहऱ्याच्या वरच्या दिशेने गोल फिरवून घासा. घासून ही पेस्ट काढून टाका आणि नंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या. असं तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास, तुम्हाला याचा अप्रतिम परिणाम दिसून येईल.
भारतीय पुदीन्याचा रस इतका फायदेशीर असतो की, त्वचेच्या आत जाऊन अगदी तुमच्या केसांना हटवतो. त्यामुळे नियमित स्वरूपात याचा वापर केल्यास, तुमच्या त्वचेवरील अनावश्यक केस मिटवून टाकू शकतो. याची पेस्ट कशी बनवायची ते वाचा -
मूठभर भारतीय पुदीन्याची पानं घ्यावीत आणि त्याची अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यावी. ताजी हळद वाटून त्याची एक चमचा पेस्ट करून घ्यावी. जर तुमच्याकडे ताजी हळद नसेल, तर हळद पावडरचादेखील तुम्ही वापर करू शकता. दोन्ही पेस्ट मिक्स करून अनावश्यक केसांवर लावा. साधारणतः 40-60 मिनिट्स ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर तुमचा चेहरा धुवा. तुम्हाला हवं असल्यास, रात्री झोपण्यापूर्वी हा लेप लावून सकाळी उठल्यावरदेखील तुम्ही धुवू शकता. याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. तुम्हाला अनावश्यक केस कायमचे काढून टाकायचे असतील तर रोज दोन महिने हा पर्याय नक्की तुम्ही करून पाहून शकता.
चेहरा हा सर्वांसाठीच शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस चांगले दिसत नाहीत. मुलींचा चेहरा नितळ जास्त चांगला दिसतो. पण बऱ्याच मुलींकडे बाहेर पार्लर अथवा सलॉनमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी करणं शक्य नसतं. अशा मुलींसाठी घरच्या घरी अशा तऱ्हेच्या पेस्ट बनवून त्यांचा वापर करणं हा सोपा आणि चांगला पर्याय आहे. शिवाय या सर्व गोष्टी घरातील आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. शिवाय तुमच्या खिशालाही परवडण्यासारख्या या वस्तू आहेत. बऱ्याचदा या वस्तू घरातच असल्यामुळे तुम्हाला केवळ पेस्ट बनवण्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने स्वतःच्या चेहऱ्याची नीट काळजी घ्यायला शिकायला हवं. बाहेर जाऊन कोणत्याही केमिकलयुक्त पेस्ट लावण्यापेक्षा आपल्या चेहऱ्याची आपण जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो हेदेखील तुम्हाला यातून नक्कीच जाणून घेता येईल.
फोटो सौजन्य : shutterstock
हेदेखील वाचा
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका - घरगुती उपाय, आहार आणि बरंच काही
उटणं हे आयुर्वेदाकडून मिळालेलं उत्कृष्ट मिश्रण