संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटासाठी सलमान-प्रियंका पुन्हा एकत्र

संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटासाठी सलमान-प्रियंका पुन्हा एकत्र

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमानसोबत पुन्हा एक लव्ह स्टोरीवर आधारित चित्रपट करत आहे. संजय भन्साळीच्या 'हम दिल दे चुके सनम' या प्रेमपटातमध्ये सलमानने काम केलं होतं. त्यानंतर आता जवळजवळ एकोणीस वर्षांनी संजय लीला भन्साळी आणि सलमान पुन्हा एकत्र काम करत आहेत. संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एक प्रेमपट निर्मित करत आहेत. सलमानसोबत या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याची चर्चा सध्या आहे. मात्र सलमानसोबत या चित्रपटात नेमकी कोणती अभिनेत्री असणार याबाबत हे अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. एका टीव्ही शो मध्ये प्रियंकाने तिचं संजय लीला भन्साळीसोबत बोलणं सुरू असल्याचं जाहिर केलं आहे. त्यामुळे भन्साळींच्या या नव्या प्रेमपटामध्ये सलमानसोबत प्रियंका चोप्रा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


sanjay leela bhansali


भन्साळींसाठी सलमान आणि प्रियंका पुन्हा येणार का एकत्र?


सलमान आणि प्रियंकाने आतापर्यंत अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यापूर्वी सलाम-ए-इश्क, गॉड तुझी ग्रेट हो आणि मुझसे शादी करोगी या चित्रपटातून ते दोघं एकत्र दिसले होते. मात्र काही काही दिवसांपूर्वी सलमानच्या भारत चित्रपटामध्ये काम करण्यास प्रियंकाने ऐनवेळी नकार दिला. भारत चित्रपटाच्या शूटिंग सुरू होण्याच्या अगदी दहा दिवस आधी तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सलमान तिच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं. शिवाय  एका कार्यक्रमात सलमानने प्रियंकाच्या अशा अनप्रोफेशनल वागण्याबाबत त्याने जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. भारतमध्ये सलमान आणि प्रियंका जवळजवळ दहा वर्षांनी एकत्र येणार असं चित्र दिसत होतं. मात्र प्रियंकाने नकार दिल्यामुळे चाहत्यांचं सलमान प्रियंकाला एकत्र पाहण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र आता प्रियंका लग्नानंतर पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवाय या चित्रपटात प्रियंका आणि सलमान एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. चाहत्यांना सलमान खान आणि प्रियंका चोप्रा या जोडीला एकत्र पाहण्याची ईच्छा असल्याने या बातमीने त्यांचे चाहते नक्कीच खूश झाले आहेत.


salman priynka


एकोणीस वर्षांपूर्वीच्या सलमानच्या ‘हम दिल चुके सनम’ला आजही चाहत्यांची पसंती


संजय लीला भन्साळींना सलमानसोबत काम करण्याची ईच्छा होती. मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. आता मात्र हे दोघं एकोणीस वर्षांनी पुन्हा एकत्र काम करत आहेत.सलमान खान सध्या  त्याच्या दबंग 3 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दबंगचं शूटिंग पूर्ण झाल्यावर भन्साळींच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. असं असलं तरी अजूनही या चित्रपटाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. भन्साळी सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत.एकोणीस वर्षांपूर्वी भन्साळींच्या हम दिल दे चुके सनममधून सलमानने त्याच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. सलमानच्या अभिनयासाठी आजही हा चित्रपट आवर्जून पाहिला जातो. समीर हवा का झोंका म्हणत या  चित्रपटातील डायलॉग अनेकांचे पाठ आहेत. या चित्रपटातील हीट गाणीदेखील आजही अनेकांच्या तोंडात रुंजी घालतात. त्यामुळे सहाजिकच आता भन्साळीच्या चित्रपटातून सलमान आणि प्रियंका ही हीट पुन्हा जोडी पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.


salman priynka 1


सिम्बा आता होणार जंगलचा राजा, आला ‘लायन किंग’चा नवा टीझर


अभिनेत्री स्मिता तांबेचं नवीन क्षेत्रात पदार्पण


‘टोटल धमाल’ ची बॉक्स ऑफिसवर धूम


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम