तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

तुमच्या नात्यात आणा स्पाईसी सेक्स रिझॉल्युशन्स

बरेच लोक सेक्सबद्दल बोलायला किंवा अगदी उघडपणे बोलायला लाजतात. पण कोणत्याही नात्यात सेक्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स ही अगदी सहज प्रक्रिया आहे आणि आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भागदेखील. पण बऱ्याचदा नात्यामध्ये सेक्सची कमतरता जाणवू लागते. आजच्या गडबडीच्या लाईफस्टाईलमध्ये बऱ्याचदा जोडीदार एकमेकांमधील चार्म विसरू लागतात. लॉन्ग टर्म रिलेशनशिप (long term relationship) मध्ये तर बऱ्याचदा सेक्स लाईफ अतिशय बोअरिंग होऊ लागते. तुमच्या रोजच्या आयुष्यात जर स्पार्क संपला असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जोडीदाराबरोबर काहीतरी नवं करण्याची गरज आहे. जसं दरवर्षी लोक नव्या वर्षात संकल्प करत असतात तसंच सेक्स लाईफ चांगलं करण्यासाठीसुद्धा काही सेक्स रिझॉल्युशन अर्थात सेक्ससंदर्भात संकल्प करण्याची आवश्यकता आहे.


पुस्तकांचे स्वप्नवत जग
आपण लहानपणी आपल्या आजी, आजोबा आणि आई - बाबांकडून अनेक गोष्टी ऐकत असतो. तेव्हा त्या गोष्टी ऐकताना त्या पऱ्यांच्या देशात जाण्यासाठी आपला जीव कसा वरखाली व्हायचा. आता पुन्हा एकदा अशाच गोष्टी पुन्हा एकदा आचरणात आणण्याची वेळ झाली आहे असं समजा. असं म्हटलं जातं की, सेक्शुअल अट्रॅक्शनची सुरुवात शरीराआधी सुरु होते ती मेंदूपासून. त्यामुळे तुमचा मेंदू सर्वात आधी उत्तेजित व्हायला हवा. जर तुम्हाला सेक्स करण्याचा मूड असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर अशा काही अॅक्टिव्हिटीज करा ज्यामुळे तुमच्या दोघांचाही मेंदू काम करू लागेल. त्यासाठी तुम्ही एरोटिक नॉव्हेल्स वाचन करू शकता किंवा एकत्र अॅडल्ड मुव्हीजदेखील बघू शकता. तुमच्या शरीराआधी जर तुमचा मेंदू उत्तेजित झाला तर सेक्स करताना मिळणारं समाधान तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. सेक्स करण्याचा हा एक खूपच चांगला आणि वेगळा पर्याय आहे. बऱ्याच लोकांना याची कल्पना नसल्यामुळे किंवा आपल्या जोडीदाराबरोबरही काही प्रमाणात संकोच असल्याने हे सर्व करण्याचा विचार जोडपं करत नाही. पण कोणताही संकोच न बाळगता जर एकत्र असे करून पाहिले तर नक्कीच तुम्हाला सेक्स करताना मिळणार समाधान वेगळंच असेल.


book
नेहमीची पोझिशन बदला


बऱ्याचदा तुम्ही एकाच प्रकारात अर्थात पोझिशनमध्ये सेक्स करण्यासाठी कम्फर्टेबल असता. त्यामुळे तुम्हाला त्या पोझिशनची सवय होते. त्यामुळे तुम्ही वेगळी पोझिशन करण्याचा विचारही करत नाही. पण असं करू नका. कारण तुम्ही एकाच पोझिशन्समध्ये सेक्स करत राहिलात तर तुम्हाला एका काळानंतर सेक्स करण्यात मजा येणार नाही. तुम्हाला अतिशय बोअर वाटायला लागेल आणि आनंदही मिळणार नाही. आपल्या आयुष्यात जर सतत रोमान्स ताजातवाना ठेवायचा असेल तर, सतत वेगवेगळ्या पोझिशन्स तुम्हाला ट्राय करायला हव्यात. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी स्पष्ट बोलायला हवं. कारण सेक्सच्या अनेक पोझिशन्स आहेत, ज्या तुम्हाला ट्राय केल्यानंतर त्यातून आनंद आणि समाधान नक्कीच लाभतं. तुमचं आयुष्य अधिक रोमांचक बनवण्यासाठी तुम्ही नक्कीच हे सेक्स रिझॉल्युशन करायला हवं.


sex-resolutions-to-make-life-happy-sex-position


Also Read Hot Ideas To Have Fun With Your Partner In Marathi 


प्रत्येक कोपऱ्यात करू शकता प्रेम
जगातल्या कोणत्याही पुस्तकात रोमान्स फक्त बेडरूममध्ये होतो असं लिहिलेलं नाही. घरात असे अनेक कोपरे अथवा ठिकाणं असतात जिथे तुम्ही प्रेम आणि सेक्स करू शकता. तुम्हाला जर तुमची एक्साईटमेंट लेव्हल वाढवायची असेल आणि काहीतरी वेगळं करायचं असेल तर बेडरूम सोडून घरातील इतर ठिकाणीही सेक्स नक्की ट्राय करा. तुम्ही कधी तुमचं स्वयंपाकघर (kitchen), लिव्हिंग रूम (living room) अथवा वॉशरून (washroom) मध्ये आपल्या जोडीदाराला सरप्राईज दिलं आहे का? नसेल तर नक्की हे एकदा करून पाहा. त्यामध्ये एक वेगळीच मजा असते.


sex-resolutions-to-make-life-happy-plan-something-new


हा विकेंड जर तुम्हाला दोघांनाही मोकळा असेल तर नक्कीच हे एकदा करून बघा. सेक्स एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही ट्रीपवर अर्थात बाहेर फिरायला गेल्यानंतर केलेल्या रोमान्सची मजा अजूनच वेगळी असते. कारण तिथे तुम्ही एकमेकांना खूप चांगला वेळ देता आणि त्यामुळे तुम्ही अजून एकमेकांवर प्रेम करू शकता आणि सेक्सच्या वेगवेगळ्या पोझिशन्सदेखील करून बघू शकता. शिवाय बाहेर गेल्यानंतर तुमच्या डोक्यात दुसरे कोणतेही विषय नसल्यामुळे तुम्ही एकमेकांसाठी जगता आणि जास्तीत जास्त एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असता. शिवाय तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोब बीच व्हेकेशन (beach vacation), स्पा टाईम (spa time) अथवा जकूझी बाथ (jacuzzi bath) या सगळ्याची योजनादेखील बनवू शकता.


ही वेळ फक्त तुमचीच असते


sex-resolutions-to-make-life-happy-sex-in-a-new-place
तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर खूपच इंटिमेट (intimate) होत असताना अचानक जर दोघांपैकी कोणाचा फोन वाजला तर? खरं तर आज दोघांमध्ये भांडणाचं सर्वात मोठं कारण हे फोन आहे. आपल्या आयुष्यात फोनचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे आहेत. पण अशा क्षणामध्ये जर तुमचा फोन वाजला तर, त्याइतकं वाईट काहीच नाही. आपल्या वैयक्तिक आयुष्यातून फोनने आपल्याला खूपच वेगळं केलं आहे. आपल्या नात्यांपासून फार दूर केलं आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर इव्हिंनिंग किंवा रात्र एकत्र घालवण्याचा प्लॅन केला असेल, तर तुम्ही सेक्स करण्यापूर्वी अर्धा तास आधी तुमचा फोन बंद करून ठेवा किंवा सायलेंटवर ठेवा. कारण ही वेळ फक्त तुमचीच असते. तुमच्या दोघांचा वेळ कधीही दुसऱ्या कोणालाही देऊ नका. तुम्ही एकमेकांबरोबर जितका जास्त वेळ घालवाल तितका तुमच्या आयुष्यातील सेक्समध्ये स्पाईस निर्माण होईल आणि तुम्ही एकमेकांना सुखी ठेऊ शकाल.


sex-resolutions-to-make-life-happy-sex-on-the-beach


फोटो सौजन्य - Instagram 


तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील: 


आपल्या बॉयफ्रेंडसह नक्की खेळा ‘हे’ सेक्सी ड्रिंक गेम्स


सेक्स करताना मनात हमखास येतात 'हे' प्रश्न, तुम्हालाही पडतात का?


१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी