ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार

अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार

आजही विश्वास बसत नाही की, अवखळ, गोड हास्य असणारी आणि आपल्या अदांनी लोकांना घायाळ करणारी श्रीदेवी आज आपल्यात नाही. तिने फक्त डोळ्यांतील भावांतून केलेला उत्तमोत्तम अभिनय असो वा तिच्या मनमोहक अदा श्रीदेवीने प्रेक्षकांचं मन खूप अल्पावधीत जिंकलं. श्रीदेवीने आपल्या फिल्मी करियरची सुरूवात वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून केली. तिच्या फिल्मी करियरमधील काही उत्तम चित्रपट, ज्यांनी ना फक्त प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली तर त्यांना श्रीदेवीचं अक्षरशः वेड लावलं. यापैकी टॉप दहा चित्रपटांबद्दल आम्ही आज सांगणार आहोत.

1.हिम्मतवाला

jeetendra1

ज्यूली आणि इतर काही चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर सोलहवा सावनपासून श्रीदेवीने अभिनेत्री म्हणून चित्रपटांना सुरूवात केली. पण श्रीदेवीला खरी ओळख मिळाली ती जितेंद्रसोबत केलेल्या हिम्मतवाला या चित्रपटामुळे. हा चित्रपट त्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटानंतर श्रीदेवीची गणती हिंदी सिनेमातील सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये होऊ लागली.  

ADVERTISEMENT

2. सदमा

%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%BE

सदमा या चित्रपटाच्या आधी श्रीदेवीने अनेक चित्रपट केले होते. पण सदमामध्ये श्रीदेवीच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं. सदमा या चित्रपटात श्रीदेवीने 20 वर्षाच्या मुलीची भूमिका केली होती. जी स्मृतीभ्रंश झाल्याने अचानक सात वर्षांच्या मुलीप्रमाणे वागू लागते. या चित्रपटातील शेवटचा सीन, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवर आपली स्मृती परत आल्यावर श्रीदेवी ट्रेनमध्ये बसलेली असते आणि कमल हसनला भिकारी समजते. तर कमल हसन तिच्यासोबत घालवलेले क्षण तिला पुन्हा आठवावेत म्हणून लहान मुलांसारखं वागू लागतो. ज्याने ज्याने हा चित्रपट पाहिला, तो हा शेवटचा सीन कधीच विसरू शकत नाही. श्रीदेवीला सदमा या चित्रपटासाठी पहिल्यांदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता.  

3. चांदनी

ADVERTISEMENT

%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%80

चांदनी हा श्रीदेवीच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. ज्यामध्ये प्रेम, रोमान्स आणि विरहाचे असे सगळे भाव तुम्हाला पाहायला मिळतील. रोमँटीक आणि ड्रामॅटीक चित्रपटातील चांदनी हा चित्रपट सुंदर उदाहरण आहे. या चित्रपटात श्रीदेवीने अवखळ आणि गंभीर असे दोन्ही अभिनय बरोबरीने केले आहेत. या चित्रपटातील गाणं मेरे हातों में नौ नौ चूडिया है आजही लग्नांसाठी लावण्यात येणाऱ्या वेडींग लिस्ट साँग्जमध्ये नक्की असतं. श्रीदेवीने या चित्रपटातील चांदनी ओ मेरी चांदनी या गाण्यासाठी आपला आवाजही दिला होता.    

4. लम्हे

%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82

ADVERTISEMENT

लम्हे या चित्रपटात श्रीदेवीचा डबल रोल होता. या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. हा एक असा चित्रपट होता, जो लोकांनी एकदा नाही वारंवार पाहीला होता. लम्हे चित्रपटांसाठी श्रीदेवीला दुसऱ्यांदा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिलं.

5. मिस्टर इंडिया

%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0 %E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE

मिस्टर इंडियाने बॉलीवूडमध्ये एक नवा ट्रेंड आणि यशाचा नवा रेकॉर्ड स्थापन केला. या चित्रपटात एका अदृश्य व्यक्तीसोबत रोमान्स करत सुंदर अभिनय केला होता. या चित्रपटातलं गाणं ‘काटे नही कटती ये दिन ये रात’ – आजही सेक्सी आणि इरोटीक गाण्यांच्या श्रेणींमध्ये गणलं जातं.

ADVERTISEMENT

6. नगीना

Nagina

इच्छाधारी नागिण या थीमवर आधारित असलेला चित्रपट नगिनामध्ये नागिणीच्या भूमिकेत श्रीदेवीने पुन्हा एकदा आपल्यातील उत्तम अदाकारी दाखवली आणि पुन्हा आपला उच्च दर्जा दाखवून दिला. हा चित्रपट त्या वर्षातील दुसरा सुपरहीट चित्रपट घोषित झाला होता. या चित्रपटातील गाणं में तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा हे एक आयकॉनिक गाणं मानलं जातं. या चित्रपटाचा दुसरा भाग ‘निगाहें’च्या रूपात आला. पण प्रेक्षकांनी ‘नगीना’ एवढी पसंती त्याला दिली नाही.

7. चालबाज

ADVERTISEMENT

%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C

हेमामालिनीचा चित्रपट  सीता आणि गीताप्रमाणेच श्रीदेवीचा डबल रोल असलेला चालबाज हा सिनेमा आला. पण चालबाजमध्ये श्रीदेवी प्रेक्षकांना हेमामालिनीची नक्कल करत आहे, असं अजिबात वाटलं नाही. या चित्रपटात श्रीदेवीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत सीता आणि गीताची कॉपी असूनही हा सिनेमा खूप चालला. श्रीदेवीला चालबाज चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

8.जुदाई

%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%88

ADVERTISEMENT

जुदाई चित्रपटात श्रीदेवीने एका अशा महिलेची भूमिका केली होती, जी पैशांच्या हव्यासापोटी आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत लग्न करण्यास भाग पाडते. पण नंतर तिला याचा पश्चाताप होतो. आपल्या हातात भरपूर पैसे घेऊन चेहऱ्यावर आनंदाचे भाव दाखवणाऱ्या श्रीदेवीचा अभिनय पाहण्यासारखा होता.

9.खुदा गवाह

%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE %E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9

या चित्रपटात श्रीदेवी मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याविरुद्ध दिसली होती. हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात श्रीदेवीने दोन भूमिका केल्या होत्या. एक योद्ध्याची आणि दुसरी मुलीची. काबूलमध्ये या चित्रपटाचं शूटींग करण्यात आलं होतं आणि याच कारणामुळे काबूलमध्ये हा चित्रपट सर्वात लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटात श्रीदेवीने आपल्या अभिनयाने भरपूर प्रशंसा मिळवली होती. खरंतर या भूमिकेत श्रीदेवीला फार काही करण्यासारखं नव्हतं पण तरीही तिने आपल्या भूमिकांना न्याय दिला आणि अभिनयाची छाप सोडली.

ADVERTISEMENT

10. तोहफा

tohfaa

तोहफामध्ये श्रीदेवीने जितेन्द्र आणि जयाप्रदासोबत काम केलं होतं. ज्यामध्ये श्रीदेवीने एका अशा बहिणीची भूमिका केली होती, जी आपल्या बहिणीचं आपल्या प्रियकरावर प्रेम आहे कळल्यावर दोघांचं लग्न लावून देते. हा चित्रपट श्रीदेवीच्या करिअरमधील चांगल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.

हेही वाचा – 

ADVERTISEMENT

जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी

श्रीदेवीचं पहिलं वर्षश्राद्ध चेन्नईमध्ये

प्रिया वारियर झळकणार हिंदी सिनेमा ‘Sridevi Bungalow’ मध्ये

19 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT