कुरळ्या केसांची स्टाईल करण्यासाठी वापरा 10 सोप्या टीप्स

कुरळ्या केसांची स्टाईल करण्यासाठी वापरा 10 सोप्या टीप्स

ज्या मुलींचे केस पातळ आणि सरळ असतात त्यांना कुरळ्या केसांचा मोह असतो आणि ज्या मुलींचे केस कर्ली अर्थात कुरळे असतात, त्यांना विचारा की, त्या केसांचं नक्की दुखणं काय असतं. तुमचे केसदेखील कुरळे असतील आणि तुम्ही आह आणि ओह यामध्ये फसून केसांमध्ये बोटं गुंतवून घेत असाल तर तुमच्या कुरळ्या केसांचं नक्की काय करायचं याचा उपाय आमच्याकडे नक्कीच आहे. तुमचे केस अगदी सरळ असतील आणि कुरळ्या केसांची आवड असेल आणि तुम्हाला कायमचे केस कुरळे करून घ्यायचे असतील आणि मुळातच जर तुमचे केस कुरळे असतील तर त्या सर्व महिलांसाठी आम्ही खास टीप्स देणार आहोत.


1. योग्य तऱ्हेचा केसांना कट द्या


haircut
केस कुरळे असतील तर त्या केसांना कोणताही कट देऊन चालत नाही. त्यासाठी तुम्हाला सूट होईल असा आणि कुरळे केस नीट वाढू शकतील अशा तऱ्हेचा योग्य कट द्यायला हवा. त्यामुळे लेअर कट दिल्यास तुम्हाला अधिक चांगला दिसेल. शिवाय जास्तीत जास्त लेअर्स करता येतील अशा स्वरूपाचा हेअर कट करून द्या. त्यामुळे तुमचे कुरळे केस अधिक खुलून दिसतील. तुमच्या केसांची लेंथ नेहमी मीडियम लाँग ठेवा. योग्य शेपमध्ये केस राहण्यासाठी साधारणतः 6-8 आठवड्यानंतर तुम्ही तुमचे कुरळे केस अर्थात त्याच्या कर्ल्स ट्रीम करून घेत राहा.


वाचा - #DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय


2. सॅट‌िनची उशी
सॅटिनच्या उशीवर तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागते शिवाय तुम्हाला अगदी तुम्ही राजकन्या असल्याचा फीलदेखील येतो. पण याचा खरा फायदा होतो तो कुरळ्या केसांना. इतर उशांवर तुमचे कुरळे केस हे झोपून उठल्यावर प्रचंड गुंततात अथवा उठल्यावर खराब दिसतात. पण सॅटिनच्या उशीच्या बाबतीत असं होत नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुरळ्या केसांमुळे नक्कीच त्रास होणार नाही. सॅटिनमुळे तुमच्या केसांचा गुंता होत नाही. ही कुरळ्या केसांना न गुंतवण्यासाठी महत्त्वाची टीप अर्थात मुद्दा आहे. तुमचे केस कुरळे असल्यास, हा प्रयोग नक्की करून बघा. तुम्हाला याचा फायदाच होईल.


3. केस विंचरण्याचा तुमचा कंगवा कसा आहे


hairbrush
तुमचे केस वेगळे अर्थात कुरळे आणि खास असतील तर तुमचा कंगवादेखील खास असायला हवा. नॉर्मल कंगव्यामुळे कुरळे केस अधिक गुंततात आणि गुंतल्यामुळे तुटतात. त्यामुळे मोठ्या दातांचा कंगवा तुम्ही तुमच्या कुरळ्या केसांसाठी वापरा. कुरळ्या केसांची स्टाईल करायची असल्यास, जेव्हा तुमचे केस ओले असतील, तेव्हाच ते विंचरून घ्या. सुक्या केसांवर तुम्ही कंगवा लावून विंचरण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचे कुरळेपणा खराब होतो आणि केस जास्त गुंततात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.


4. सारखं शँपू करणं
तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही आठवड्यातून तीन वेळा अथवा रोज केस धुवायला हवेत असा सल्ला तुम्हाला सतत मिळत असेल. पण असं करणं गरजेचं नाही. तुम्हाला नक्की काय वाटतं आणि तुम्ही ही गोष्ट करण्यासाठी किती कम्फर्टेबल आहात हे बघून मगच निर्णय घ्या. आठवड्यातून तुम्ही दोनदा केस धुणंदेखील चालू शकतं. पण तुम्हाला कुरळ्या केसांमुळे जर रोज केसांवरून आंघोळ करायची असेल तर तुम्ही चांगल्या कंडिशनरचा वापर करायला हवा. शँपू करताना स्कॅल्प नीट स्वच्छ धुऊन घ्यायला हवे आणि केसांचे मूळ अतिशय हलक्या हाताने साफ करायला हवे हे लक्षात घ्यायला हवं.


वाचा - पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय


5. स्टाईलसाठी


styling
ब्लो ड्राय अथवा स्ट्रेटनिंग केल्यामुळे तुमच्या अनमोल कर्ल्सचं नुकसानच होणार आहे हे तुम्हाला कळायला हवं. यामुळे केसांमधील जीव नाहीसा होतो. तुमचे मजबूत आणि चांगले केस नेहमी नैसर्गिकरित्या राहू दिले तर जास्त चांगलं आहे. तुम्हाला ड्रायर वापरायचा असेल तरत तो अशा सेटिंगवर ठेवा की, हिटचा वापर कमी पडेल. कुरळ्या केसांसाठी ही महत्त्वपूर्ण टीप आहे. कारण कुरळ्या केसांची शाईन असं केल्यामुळे निघून जाते. त्यामुळे अगदी गरज असेल तेव्हाच तुम्ही स्ट्रेटनिंग अथवा ब्लो ड्रायचा वापर करा. अन्यथा न केल्यास, जास्त चांगलं.


6. ड्रायरचा वापर टाळा


hair dryer
कोणत्याही स्टाईलसाठी सहसा तुम्हाला पटकन केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो. पण तसं करू नका. ड्रायरचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. केसांना नैसर्गिकरित्या सुकवण्याचा प्रयत्न करा. ड्रायर्समुळे केस अधिक खराब होतात. कुरळ्या केसांमध्ये असलेलं नैसर्गिक तेल ड्रायरमुळे नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जितकं ड्रायरपासून वाचता येईल तितकं वाचण्याचा प्रयत्न करा.


7. कंडिशनर
कुरळ्या केसांसाठी कंडिशनिंग अतिशय गरजेचं आहे. यामुळे तुमचे कुरळे केस हे हायड्रेटेड आणि हेल्दी राहतात. शिवाय चांगलं कंडिशनर वापरा. कोणतंही माहीत नसलेलं कंडिशनर वापरू नका. कुरळे केस हे नैसर्गिकरित्या मुळातच ड्राय अर्थात कोरडे असतात. त्यामुळे कुरळ्या केसांना हायड्रेटेड ठेवणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे योग्य कंडिशनर केस चांगले ठेवण्यास मदत करतात.


वाचा - त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया


8. केस सुकवण्याची पद्धत


काही लोकांना केस धुतल्यानंतर टॉवेलने खसाखसा चोळून पुसण्याची सवय असते. पण असं करू नका. केस धुतल्यानंतर हळूहळू पुसा. हळूहळू केस पुसल्यामुळे तुमच्या कुरळ्या केसांमध्ये गुंता होणार नाही आणि शिवाय केस एकमेकांमध्ये अधिक गुंतणार नाहीत. शिवाय झालेला गुंता पटकन सोडवता येईल. कुरळ्या केसांची काळजी खास तऱ्हेने करावी लागते याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं असतं.


9. हेअर बँडची कमाल


कुरळ्या केसांचा एक फायदा असा होतो की, केसांचा व्हॉल्युम खूप चांगला असतो. त्यामुळे अशा केसांवर स्टायलिश हेअरबँड खूप चांगला दिसतो. जेव्हा तुम्हाला कुरळ्या केसांची कोणतीच हेअरस्टाईल करता येत नसेल आणि कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुरळ्या केसांना स्टायलिश हेअरबँड लावलात की, सर्व एकदम सेट. अशा केसांवर टूथ कॉम्ब्सवाले हेडबँड्स जास्त चांगले दिसतात. त्यामुळे कुरळ्या केसांची हेअरस्टाईल करताना बऱ्याचदा त्रास होत असतो. तो त्रासही कमी होईल आणि तुमची स्टाईलदेखील होईल.


10. कुरळ्या केसांचा क्रेझीनेस


hairband


काही मुली केस कुरळे करून घेण्यासाठी खूप पैसे खर्च करतात. त्यामुळे ज्या मुलींकडे असे कुरळे केस आहेत त्यांनी त्यांचा चांगला वापर करून घ्यायला हवा. अगदी आत्मविश्वासाने तुमच्या कुरळ्या केसांची स्टाईल करा. कारण तुमच्या केसांमध्ये असणारे जी wave आणि बटा असतात त्या सरळ अर्थात पातळ केस असणाऱ्यांमध्ये नक्कीच सापडत नाहीत त्यामुळे ज्या मुलींचे कुरळे केस आहेत त्यांना ते चांगल्या तऱ्हेने फ्लाँट करता येतात.


फोटो सौजन्य : Instagram