ADVERTISEMENT
home / Dating
डेटवर गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड नेहमी करतात या १० चुका

डेटवर गर्लफ्रेंड/ बॉयफ्रेंड नेहमी करतात या १० चुका

आपल्या आवडत्या व्यक्तिला भेटायला जाताना प्रत्येक जण उत्साही असतं. अगदी काय घालू पासून डेटवर काय काय करु याचे भलेमोठे प्लॅनिंग आपण करत असतो. त्यातच जर ही डेट जर सगळ्यापासून दूर कुठेतरी छान बाहेर फिरण्याची असेल तर मग या प्लॅनिंगमध्ये भर पडत राहते. अगदी एखादा स्पॉट फिक्स करण्यापासून तिथे गेल्यानंतर काय काय करायचे असे सगळे त्यात येते. पण नेमकं डेटला गेल्यानंतर ज्या उत्साहाने तुम्ही जाता तो उत्साह तुम्ही परतताना नसतो कारण जे प्लॅनिंग केलेले असते त्यानुसार काहीच होत नाही आणि मग तुमचा हिरमोड होतो. डेटवर गेल्यानंतर तुम्ही नेमक्या काय चुका करता याची आम्ही एक यादी केली आहे. बघा तुम्हीसुद्धा या १० चुका करता का? जर या चुका करत असाल तर त्या तुम्ही आताच टाळा म्हणजे तुमची पुढची डेट तुम्हाला मस्त एन्जॉय करता येईल.

प्रेमात एकमेकांना गृहीत धरणे कितपत योग्य?

ट्रिंक ट्रिंक, फोनचा अति वापर 

फोन! फोन! सतत फोन! या फोनने खरचं सगळ्याचं आयुष्य खराब करुन टाकले आहे. म्हणजे तुम्ही ट्रेन, मेट्रो कुठेही प्रवास करत असाल तर एकदा आजुबाजूला नजर फिरवा. लोकं फोनमध्ये इतकी गुंग असतात की, विचारता सोय नाही. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्युब आणि काहीच नसेल तर मग युट्युब काहीना काही फोनमध्ये सुरुच असते. अनेकांना ही फोनची सवय इतकी लागलेली असते की, एखादी व्यक्ती आपल्यासोबत बाहेर आलेली आहे. हे देखील ते विसरतात आणि त्यांचा हात सतत फोनकडे जात राहतो. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिसोबत आहात त्याच्याशी फोनवर तासनतास बोलता आता ती समोर आहे मग तिच्याशी बोलायचे सोडून तुम्ही फोनवर का?

ADVERTISEMENT

phone checking

आता खूप जणांच्या कामाचे स्वरुप वेगळे असते. त्यांना खरचं ज्या दिवशी डेटवर कुठे बाहेर जाणार असाल तेव्हा काम असू शकते. पण तुम्हाला याचेही भान हवे की, समोरची व्यक्तिही रिकामी नाही. ती तिचा अमूल्य वेळ काढून तुमच्यासाठी आलेली आहे. तिला / त्याला तुम्ही तुमचा वेळ द्यायलाच हवा नाही का? त्यामुळे ही पहिली चूक तुम्ही टाळायला हवी.

 घोर रे देखो इस आदमी को…. डेटवर टीव्ही बघण्याची सवय

सग्ळ्यांनाच आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक डेट अपेक्षित असते. तुम्ही छान एखाद्या रिसोर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाता. ऑनलाईन  शोधाशोध करुन तुम्ही हे ठिकाण निवडलेले असते. तुम्हाला छान एकांतात दिवस घालवायचा असतो. पण कित्येकांना सवय असते ती म्हणजे रुममध्ये गेल्या गेल्या टीव्ही लावून बसण्याची. म्हणजे रुममध्ये पाय ठेवत नाही तोच अनेक जण टीव्हीचा रिमोर्ट शोधतात आणि टीव्ही लावून बसतात. झालं तुम्ही पुढे करु पाहणाऱ्या संवादात पहिला खंड पाडतो तो हा टीव्ही.

ADVERTISEMENT

watching tv

उदा. तुम्ही एका छान रिसोर्टमध्ये आहात. तुमच्या पार्टनरचा सगळा मूड सेट आहे आणि तुम्ही टीव्हीवर क्राईम पेट्रोल किंवा तारक मेहता का उलटा चश्मा लावून बसला आहात. आता विचार करा या डेटचे भविष्य काय असेल. म्हणजे एक दिवस तुम्ही टीव्हीपासून नक्कीच लांब राहू शकता.

तुमचा बेस्टफ्रेंडच असू शकतो तुमचा बॉयफ्रेंड.. कसे ओळखाल?

 नको मस्त झोपू ना!, रुममधून बाहेर पडण्याचा कंटाळा

ADVERTISEMENT

 डेटवर जाण्याचा उत्साह खूप जणांना असतो. पण बेड पाहिल्यानंतर अनेकांना पहिली दिसते ‘झोप’.खूप जण टीव्ही लावण्याआधी किंवा टीव्ही लावल्यानंतर बेडची साईड निवडतात आणि चक्क झोपून  जातात. त्यातच जर हॉटेल्स रुममधील बेड चांगला असेल तर ही झोप छान रजई घेऊन असते. तो/ती झोपल्यानंतर त्यांना झोपूनच गप्पा मारायच्या असतात. त्यांना त्यांचा बेड सोडायचाच नसतो. म्हणजे जेवणासाठीही त्यांना बेडच लागतो. बेड आणि टीव्ही असं मस्त कॉम्बिनेशन त्यांचे जुळलेले असते की,  आपण कोणासोबत आलो आहोत हे ते चक्क विसरुन जातात. त्यामुळे तुमच्या पार्टनरची निराशा होते.

sleepy time

 नेमकं काय बोलू? सुरुवात कशी करु?

आता जर तुमचे रिलेशनशीप अगदीच नवी असेल तर मग एकमेकांबद्दल पडणारा पहिला प्रश्न अरे आता सुरुवात कुठून करु? आता ही सुरुवात प्रत्येकवेळी इंटिमेट होण्याची नसते. कधी कधी एकांतात काय बोलायचे असा प्रश्न पडतो. काय बोलू हा विचार करण्यामध्ये इतकी शांतता होते की, टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल अशी परिस्थिती निर्माण होते. त्यातच जर तुम्ही वरील दोन चुका केल्या असतील तर मग समोरच्याचा मूड आधीच ऑफ झालेला असतो. की, तिची/ त्याची बोलण्याची मन:स्थिती नसते. अशी परिस्थिती आली की ती सावरण्यासाठी तुम्ही कसे भेटलात त्याच्या आठवणी. तुमच्या पार्टनरची तारीफ करुन चर्चेला सुरुवात करा.

ADVERTISEMENT

confusion

 काम काम काम ! कामाविषयी सतत बोलणे

 काम कधीच कुठे पळून जात नाही. तुम्ही खूप कामात असाल किंवा तुम्हाला खरचं खूप कामं असतीलही तरी प्रत्येकवेळी काम आहेत हे समोरच्याला दाखवून देणे चांगले नाही. काहींना सतत त्यांच्या कामाबद्दल बोलायला आवडते. जर समोरील व्यक्ती तुमच्या फिल्डमधील नसेल तर तिला/ त्याला खरंच त्यामध्ये काहीच रस नसतो.

work work
उदा. तुम्ही इंजिनीअरींग फिल्डमधील असाल. आता तुम्ही कोणत्या प्रोजेक्टवर काय काम करत आहात? तुमच्या ग्रुपमध्ये कोण आहे.? तुम्ही कशापद्धतीने काम करता हे सांगत राहिलात तर तो संवाद एकतर्फी राहील. समोरच्या व्यक्तिला होकारार्थी मान डोलावण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही.

ADVERTISEMENT

अपना टाईम आएगा! सतत वेळ बघत राहणे

काहींना डेटवर जाण्याची जितकी घाई असते तितकीच निघण्याचीही घाई असते किंवा कधी कधी काहीच नसते. पण घड्याळ पाहण्याची सवय झालेली असते. तुमच्या सतत घड्याळ आणि वेळ पाहण्याच्या सवयीमुळेही तुमच्या पार्टनरला सतत कसेतरी वाटत राहते. म्हणजे जर तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देण्यासाठी आला आहात तर घड्याळाची गरज  काय नाही का? तो वेळ फक्त तुमच्या दोघांचा आहे जगा मजा करा खूप बोला. एकमेकांचा वेळ चांगला घालवायला तुम्ही आला आहात नुसता वेळ एकत्र जावा म्हणून तुम्ही ही डेट ठरवली नाही.

whats the time

 अन्फर्टेबल वागणे

ADVERTISEMENT

जरा वेगळ्या ठिकाणी गेले की, अनेकांना कसेतरी व्हायला लागते. (एखादे ठिकाण खरेच खटकत असेल तर निघा) पण काहींना सगळ्याच गोष्टी परफेक्ट लागतात. सांगायचे झाले तर जर तुम्ही कोणासोबत कुठे बाहेरच्या शहरात फिरायला जात असाल तर काहींना बेडपासून ते खोलीच्या रंगापासून सगळेच परफेक्ट लागते आणि ते जरा इकडे तिकडे असेल तरी ते वेगळे वागायला लागतात.याचा परीणाम तुमच्या पार्टनरवर होतो आणि मग तुमची डेट वाया जाते असेच म्हणायला हवे.

मला हेच हवे, तडजोड न करणे

काहींना बाहेर गेल्यावर खूप फोटो काढायचे असतात त्यांना तो दिवस त्यांच्या प्रेमासोबत घालवायचा असतो. पण काहींना तो तसा घालवायचा नसतो. त्यावेळी काहीजण समोरच्याचे मन राखायलाही तडजोड करायला पाहत नाही. कारण त्यांचा तो स्वभाव नसतो. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसते. कधीकधी तिच्या मनाप्रमाणेदेखील वागायला शिका. नात्यात काही गोष्टींमध्ये तडजोड आली.

i want this 1

ADVERTISEMENT

उदा. एखाद्या ठिकाणी गेल्यावर एखाद्या ठिकाणी जाण्यावरुन किंवा काही खाण्यावरुन काहीजण आपला हेका सोडत नाही. त्यामुळे तुमचे नाते खराब होते. समोरची व्यक्तिही मग तिचा इगो घेऊन बसते.

प्रेम करता पण घरी सांगायला घाबरता ?, घरी सांगण्यापूर्वी वाचा या टीप्स

 अति घाई संकटात नेई

अति घाई संकटात नेई हे तुम्हाला माहीत आहे. डेटवरही काही गोष्टींची अति घाई करु नका. कारण तुमच्या रिलेशनशीपला किती काळ लोटला त्या नुसार तुमच्या पार्टनरचा कम्फर्ट ठरलेला असतो. काही जण पहिल्याच भेटीत बऱ्याच गोष्टींची अपेक्षा करतात  जे चुकीचे आहे. तुमच्या पार्टनरची मर्जी जाणून घेतल्याशिवाय काहीही करु नका.

ADVERTISEMENT

forceful kiss

कभी अलविदा ना कहना! चुकीचा शेवट

तुम्ही ज्यावेळी तुमच्या डेटवरुन निघता त्यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरला कसा सी ऑफ करता त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. रिलेशनशीपही अशी गोष्ट आहे जर ती तुम्हाला टिकवायचे असेल तर तो दिवस संपवताना तुम्ही तुमचे प्रेम, तुमचा विश्वास त्यांना दाखवणे गरजेचे असते.

bye

ADVERTISEMENT

उदा. तुम्ही तुमच्या घरी परतताना तिला/ त्याला ड्रॉप करत असाल तर  निघताना हातात हात घेऊन बाय करा. जमल्यास गाडीतून उतरा. पुन्हा लवकरच बाहेर जाऊ असे म्हणा. बघा तुमच्या प्रेमात नक्कीच वाढ होईल. पण जर तुम्ही गाडीतून उतरून बाय करत आहात. पुन्हा त्या व्यक्तिला फोनही करत नाही. ती व्यक्ती घरी पोहोचली की नाही याची साधी चौकशीही करत नसाल तर तुमच्या पार्टनरवर त्याचा विपरित परिणाम होतो.

 

या १० अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही तरुणांकडून ऐकल्या आहेत. कदाचित तुमच्यासोबत आणखीही काही वेगळे घडत असेल. आणखी कोणती चूक तुमच्या पार्टनरकडून होते आम्हाला नक्की कळवा.

11 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT