बदाम हे फक्त एक ड्रायफूट नसून याचा वापर सौंदर्य जतन आणि वाढवण्यासाठीही केला जातो. बदामात एखादं दुसरा नाहीतर ही आहे गुणांची खाण आहे. बदामामध्ये व्हिटॅमीन ई आणि ड, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यासारखे मिनरल्स आढळतात. जे आपल्या त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात.
त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे
बदामाच्या तेलाने असे करा घरगुती उपाय
बदाम रोगन काही वेगळं नसून हे तेल बदामापासूनच बनवण्यात येते. हे तेल बदामांना कोल्ड प्रेस करून काढलं जातं. या तेलाला बोलीभाषेत बादाम रोगन असं म्हटलं जातं. नुसते बदाम खाण्यापेक्षा या तेलाचे फायदे कैकपटीने जास्त आहेत. जे आधीपासून बदाम रोगन तेलाचा वापर करतात, त्यांना या तेलाचे फायदे चांगलेच माहीत असतील. पण काही जणांना बदाम रोगनचे फायदे माहीतच नाहीत. हेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार नाहीत. बदाम रोगननिगडीत सर्व माहिती सांगणार आहोत. महिलांशी निगडीत त्वचेच्या सर्व समस्यांवर बदाम रोगनने उपाय होऊ शकतो. विस्तारीतपणे सांगत आहोत.
बदामाच्या फायद्यांविषयी देखील वाचा
बदामामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त खजिना आहे, हे तर आपल्याला माहीत आहे. मग ते बुद्धी तल्लख करणे असो, रोग प्रतिकार क्षमता सुधारणे असो वा कॉलेस्ट्रोल कमी करणे असो बदामाचा प्रत्येक गोष्टीत वापर होतो. अनेक लोक बदामाच्या तेलाला बदाम रोगन तेल असंही म्हणतात. या तेलाचा वापर लोकं आवडीने करतात कारण या एक नाहीतर अनेक गुण आहेत. खरंतर, बदाम रोगन हे तांत्रिक उपकरणांचा वापर करून बदामातून काढलं जातं. यामुळे या तेलातील गुणवत्ता वाढते. या तेलामध्ये अनेक प्रकारची व्हिटॅमीन्स जसं व्हिटॅमीन ए, डी आणि ई अशी विटॅमीन्स आणि मिनरल्स असतात. तज्ञ सांगतात की, बदाम रोगन हे विशेषतः महिलासांठी फारच उपयोगी आहे.
बदामाचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. त्वचेसाठी बदाम तेल कसे गुणकारी आहे. पाहा.
बदामाच्या तेलाचे अगणित फायदे आहेत. तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आणि ग्लोसाठी बदाम हे फारच उपयुक्त आहे. हे त्वचेला पोषण देतं, ज्यामुळे त्वचा जास्त मुलायम होते. हे मॉईश्चरला त्वचेमध्ये लॉक करत आणि पोर्सही ब्लॉक होऊ देत नाही.
बदाम रोगनमध्ये असलेल्या अँटी ऑक्सीडंट्समुळे तुमच्या त्वचेला फारच उपयुक्त आहे. जर तुमची त्वचा काळवंडली असेल आणि त्वचेवर ग्लो आणायचा असेल तर रोज चेहऱ्यावर बदाम रोगन तेलने मालीश करा. यामुळे चेहऱ्यावरी ग्लो वाढेल.
रात्री झोपण्याआधी डोळ्यांच्या खाली या तेलाने हलकी मालीश केल्यास खूप फायदा होतो. रोज या तेलाचा वापर केल्याने डार्क सर्कल्स निश्चितच कमी होतात.
या तेलातील अँटी एजिंग इफेक्टचा फायदा सर्वात जास्त आहे. या तेलाचा वापर रोज केल्यास त्वचा फ्रेश आणि तारूण्यमय राहते. यात असलेल्या व्हिटॅमीन आणि फॅटी अॅसिड्समध्ये एजिंग रिव्हर्स करण्याची आणि स्कीन सेल्सला नावीन्य देण्याासाठी सहाय्यक आहे.
बदाम तेलाचे फायदे अनेक आहेत पण सगळ्यात चांगला गुण असा की, हे तेल नॅचरल सनस्क्रीन म्हणूनही काम करतं. हे त्वचेला टॅनिंग आणि सनबर्नपासूनही वाचवतं. तसंच सूर्याच्या किरणांचा वाईट परिणामही दूर करतं.
बदाम तेलाचा वापर करण्याने तारुण्यपीटीकांची समस्या दूर होते आणि तुम्हाला मिळते डागविरहीत त्वचा. हा एक वापरलेला आणि अनुभवलेला फॉर्म्युला आहे. हे त्वचेला खाजेपासूनही सुटका देतं आणि स्कीनला रिलॅक्स करतं.
जर तुमची त्वचा कोरडी, निर्जीव आणि खरखरीत झाली असेल तर बदाम रोगनने चेहऱ्यावर चांगला मसाज करा. हे तुमच्या स्कीनचा ड्रायनेस घालवतं आणि त्वचेला मुलायम बनवतं. खासकरून थंडीच्या दिवसांमध्ये बदाम रोगन त्वचेसाठी अगदी औषधांप्रमाणे काम करतं.
चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे हे तेल, कारण हे फारच हलकं आणि कमी चिकट असतं. हे पोर्स चांगल्या रीतीने उघडतं आणि मेकअपच्या सगळ्या खुणा दूर करतं. बदाम तेल हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे.
पतंजलिचं दिव्य बदाम रोगन तेल हे आंतरीक आणि बाहेरील दोन्ही प्रकारे वापरात आणता येतं. हे तेल तुम्ही औषधं म्हणूनही वापरू शकता. या तेलाचे एक नाही अनेक फायदे आहेत. जसं चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी, स्नायू मजबूत बनवण्यासाठी इ. पतंजलि दिव्य बदाम रोगन तेलाची किंमत फक्त 150 रुपये आहे. हे तेल तुम्हाला कोणत्याही पतंजलि दुकानात सहज विकत घेता येईल.
जर तुम्हाला त्वचेशी निगडीत कोणत्याही समस्येपासून सुटका हवी असल्यास बदाम रोगनने चेहऱ्यावर रोज मसाज करा. रात्रीच्या वेळी बदाम तेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने 5 मिनिटं मसाज करा. आता 15 ते 20 मिनिटं बदाम रोगन तेल चेहऱ्यावर तसंच राहू द्या.मग चेहरा पाण्याने धूवून चांगल्या कपड्याने तोेड पुसा. तुम्हाला काही दिवसातच चेहऱ्यांमध्ये फरक जाणवेल.
केसांसाठी बदामाचे तेल एखाद्या जादूई लिक्वीडसारखं काम करतं. याने मालीश केल्यास केसांची गळती थांबते आणि केसही चांगले होतात. या तेलातील मॅग्नेशिअम हे केसांसाठी फार आवश्यक असते.
हे डेड सेल्सना हटवून कोंड्यापासून सुटका देतं. हे केसांना निरोगी ठेवण्यासोबतच स्कॅल्पही स्वच्छ ठेवतं.
आजकालच्या लाईफस्टाईल आणि प्रदूषणामुळे केसांना फार नुकसान होतं. केसांना बदाम तेलासोबत ऑलिव्ह आणि एरंडेल तेल मिक्स करून लावल्यास खूप फायदा होतो आणि स्प्लीट एंड्सपासूनही सुटका मिळून केस मजबूत होतात.
Also Read: Health & Beauty Benefits Of Coconut Oil In Marathi
निरोगी राहण्यासाठी बदाम तेलाचा तुम्ही विविध प्रकारे उपयोग करू शकता. जाणून घ्या कसा करता येईल दैनंदिन जीवनात निरोगी राहण्यासाठी बदामाचा वापर.
बदाम तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असतात जे तुमच्या हृद्यासाठी खूपच फायदेशीर असतात. एक चमचा हे तेल जेवण बनवताना वापरल्यास तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं होईल.
हे तेल नियमितरित्या खाण्यात वापरल्यास शरीर बळकट होतं आणि कोणत्याही इंफेक्शनशी लढण्याची ताकत मिळते. हे तेल तुम्ही सॅलडमध्ये ड्रेसिंगच्या रुपातही वापरू शकता.
हे तेल थोडं गरम करून दुखणाऱ्या भागावर मसाज करा. सांधेदुखी आणि स्नायूदुखीवरही तेल उपयुक्त आहे.
बदाम तेलाचा तुम्ही पुढील प्रकारे घरगुती उपायांसाठी वापर करू शकता. पाहा काही सोपे घरगुती उपाय.
- छोट्या मुलांसाठी दूध किंवा पाण्यात बदाम रोगन तेलाचे काही थेंब मिसळून त्यांना पाजा. यामुळे बाळांची वाढ चांगली होते.
- जर तुम्हाला मुलायम आणि गुलाबी ओठ हवे असतील तर बदाम तेलापेक्षा चांगल अजून काहीच नाही. यामध्ये मॉईश्चर तत्त्व असल्याने तुमचे ओठ अगदी परफेक्ट होतात.
- जर तुमचे केस खूप पातळ आणि विरळ झाले असतील तर बदाम रोगनने तुमच्या केसांना मालीश करा. असं केल्याने केस लांब, दाट आणि मजबूत होतील.
- डोळ्याजवळील सुरकुत्यामुळे चिंतीत असाल तर रोज झोपण्यापूर्वी हलक्या हाताने डोळ्यांच्या चारी बाजूंना बदाम रोगन तेलाने मसाज करा.
- कोंडा किंवा स्प्लीट एँडच्या समस्येने त्रासलेले असाल तर बदाम रोगन तेलाने आठवड्यातून दोनदा केसांना मालीश करा. कोंड्याची समस्या दूर होईल.
- बदाम रोगनचे रोज सेवन केल्यास वजनही कंट्रोलमध्ये राहते.
- जर तुमचा कान दुखत असेल तर बदाम रोगन तेलाचे काही थेंब कानात घाला. कानाचं दुखणं कमी होईल.
- केस लवकर वाढवायचे असल्यास 2 चमचे बदाम रोगन तेलामध्ये 2 चमचे एरंडेल तेल मिसळा आणि आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा केसांना मालीश करा, केस लवकर वाढतील.
- त्वचा उजळण्यासाठी 2 चमचे बदाम रोगन तेलांमध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर चांगल्या पद्धतीने लावा. मग 30 मिनिटं तसंच ठेवा आणि मग पाण्याने चेहरा स्वच्छ पूसून घ्या. आठवड्यातून कमीतकमी दोन ते तीन वेळा हे केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.
बदाम रोगन तेलाचा वापर खूप काळापासून केला जात आहे. खरंतर काही खास साईड ईफेक्ट्स किंवा नुकसान नाही पण ज्यांना स्कीन रॅशेसची समस्या आहे, त्यांनी हे तेल वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. मग हे तेल वापरावे. वयस्कर किंवा लहान बाळांसाठी या तेलाचा वापर करताना मात्रा कमी असावी.
बदाम तेलाबाबत तुमच्याही मनात पुढील प्रश्न असल्यास त्याची उत्तरे नक्की पाहा.
हो. पतंजलि अल्मंड आईल हे फक्त बाहेरील प्रयोगाकरता वापरण्यात येतं. हे एक प्रकारचं हेअर केअर ऑईल आहे. तर बदाम रोगन हे गोड बदामांच कोल्ड प्रेस करून काढलेलं तेल असतं. हे तुम्ही पिऊ शकता आणि त्वचेसाठीही वापरू शकता.
हो. या तेलातील अनेक पोषक तत्त्वांमुळे हे तेल तुमच्या त्वचेला हेल्दी बनवतं.
तसं तर या तेलामुळे काहीही नुकसान होत नाही पण तरीही तुम्हाला काही स्कीन अॅलर्जी किंवा त्वचारोग असल्यास वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मगच बदाम रोगन तेल वापरा.
हाो, बदाम रोगन तेल हे एक प्रकारचं टॉनक आहे.
फोटो सौजन्य - Instagram
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
कोरफडाच्या ‘या’ 12 गुणांमुळे तुमचे सौंदर्य वाढेल
बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे
त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया