Olive Oil Benefits In Marathi - ऑलिव्ह ऑईलचे फायदे, प्रकार आणि ऑलिव्ह ऑईल ब्रँडस | POPxo

बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे  Health And Beauty Benefits of Olive Oil In Marathi

बहुगुणी ऑलिव्ह ऑईलचे आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदे  Health And Beauty Benefits of Olive Oil In Marathi

जर तुम्ही टीव्हीवरचा कोणताही कुकींग शो पाहिला तर तुम्हाला नेहमी ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्याचं आढळतं आणि मग आपल्या डोक्यात लगेच विचार येतो की, ऑलिव्ह ऑईल कसं आपल्या हृदयासाठी चांगलं आहे. आपणही त्याचा रोजच्या जेवणात वापर करायला हवा. खरंतर बऱ्याच आधीपासून जेवणात आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्याचं आढळतं. पण ऑलिव्हबाबत तुम्हाला काही शंका असतील किंवा कोणत्या प्रकारचं ऑलिव्ह तेल वापरावं आणि ते बॉडी, केस आणि त्वचेसाठी कसं वापरावं. तर तुम्ही हा लेख नक्की वाचा.


ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार
जेवणामध्ये ऑलिव्हचा वापर 
आरोग्यदायी ऑलिव्ह ऑईल 
त्वचेसाठी उपयुक्त ऑलिव्ह  
केसांसाठी उपयुक्त ऑलिव्ह    
भारतातील सर्वोत्तम ऑलिव्ह ऑईल ब्रँडस 


विकीपिडीयाच्या भाषेत ऑलिव्ह ऑईलला ऑलिया युरोपिया (Olea Europaea) असं संबोधल जातं. तर भारतात हिंदी भाषेत याला जैतून म्हणून संबोधलं जातं. हे तेल ऑलिव्ह फळापासून काढलं जातं. या तेलाचे अनेक फायदे आहेत.


ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार - Types


तसं पाहायला गेल्यास ऑलिव्ह ऑईलचे 5 प्रकार आहेत. जे तुम्हाला जेवणासाठी आणि लावण्यासाठी वापरता येतात.


एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (Extra Virgin Olive Oil)


बाजारात सर्वात शुद्ध आणि महाग असलेला हा प्रकार आहे. जे तुम्ही जेवणात आणि सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरू शकता. हे तेल कोल्ड प्रोसेस पद्धतीने काढलं जातं, ज्यामुळे हे ऑलिव्ह तेल सर्वात शुद्ध आणि महाग मिळतं. मंद आचेवर जेवण शिजवण्यासाठी या तेलाचा वापर करू शकता.  


व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (Virgin Olive Oil)


Olive oil- olive oil in a bowl


Also Read गुळवेल म्हणजे जणू अमृतच - Benefits of Giloy


व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे बाजारात लोकप्रिय असून ते सहज मिळतं. हे तुलनेने स्वस्त असल्याने दैनंदिन जेवणात तुम्ही याचा वापर करू शकता. पण हे तेल कोल्ड प्रोसेस पद्धतीने काढलेले नसल्याने ऑलिव्हची सर्व सत्त्व यामध्ये आढळत नाहीत. त्यामुळे हे तेल चेहऱ्यावर किंवा शरीराला लावण्यासाठी वापरण्यापेक्षा रोजच्या जेवणात वापरावे.  


रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल (Refined Olive Oil)


रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल हे ऑलिव्हवरील कोल्ड प्रोसेस झाल्यानंतर केमिकल प्रोसेस करून काढले जाते. यामध्ये जास्त उष्णता आणि फिल्ट्रेशन प्रोसेसचा समावेश असतो. त्यामुळे या रिफाईन्ड तेलात काही प्रमाणात अॅसिडीक पातळी आढळते, ज्यामुळे हे तेल जास्त काळ टीकते.


शुद्ध किंवा ब्लेंडेड ऑलिव्ह ऑईल (Pure Or Blended Olive Oil)


या प्रकाराला जरी शुद्ध असं म्हटलं जातं असलं तरी हे रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल आणि व्हर्जिन प्रोडक्शन ऑईलचं मिश्रण असतं.


पोमास ऑईल (Pomace Oil)


बाजारात ऑलिव्ह ऑईलचा मिळणारा हा अजून एक प्रकार आहे. ऑलिव्ह फळातील तेल काढून झाल्यावर उरलेल्या चोथ्यातून काढण्यात आलेल्या तेलाला पोमास ऑईल असं म्हटलं जातं. हे तेल साधारणतः जेवण बनवण्यासाठी वापरलं जातं.


जेवणामध्ये ऑलिव्हचा वापर - Uses For Cooking


Olive oil- oil in a jar


जगभरात मोठ्या प्रमाणावर जेवण बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करण्यात येतो. कारण हे तेल हृदयासाठी तर चांगले आहेच पण त्यासोबत आयुष्य वाढवणारेही आहे. पण या तेलाचा वापर तुम्ही तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी करू शकत नाही. याचा वापर शक्यतो सलाड किंवा मंद आचेवरील जेवणात केला जातो.  


पण तरीही हे तेल वापरायच्या अनेक पद्धती आहेत. पाहा कोणत्या ते?


वर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सलाड प्रेमी असाल तर तुमच्या सलाडच्या ड्रेसिंगसाठी तुम्ही ऑलिव्हचा वापर करू शकता. या तेलामुळे तुमच्या सलाडच्या चवीत नक्कीच भर पडेल.


मासे, चिकन किंवा भाज्यांना मेरिनेट करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. कारण हे तेल चांगल्या प्रकारे मुरते आणि पदार्थाची चव वाढवते.


कोणत्याही प्रकारचा पास्ता बनवताना तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. पास्ता शिजवताना थोडंसं ऑलिव्ह शिंपडा आणि तुमच्या पास्ताची लज्जत वाढवा.


एखाद्या स्टार्टरसाठी डीप बनवतानाही तुम्ही मार्गारीन किंवा बटरऐवजी ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. अगदी रोजच्या जेवणात मॅश्ड बटाटे किंवा बटाटे शिजवाताना बटरऐवजी पौष्टीक प्रकार म्हणून या तेलाचा वापर करून पाहा. टेस्टी आणि हेल्दी डीप बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलसोबत लसूण आणि हर्ब्सचा वापर नक्की करा


ऑलिव्हचे फायदे - Benefits of Olive Oil


Olive oil- girl holding olive oil


जेवणातील वापरासोबतच ऑलिव्ह ऑईलचा वापर गाडीवरील ग्रीस किंवा पेटींगचे डाग काढण्यासाठी किंवा अगदी फर्निचरला पॉलिश करण्यासाठीही तुम्ही करू शकता.


ऑलिव्ह ऑईल हे शरीर, त्वचा आणि केसांसाठीही फारच उपयुक्त आहे. वाचा ऑलिव्ह ऑईलचे विविध फायदे.


आरोग्यदायी ऑलिव्ह ऑईल (Health Benefits Of Olive Oil)


पुरातन काळापासून ऑलिव्ह ऑईलला लिक्वीड गोल्ड म्हणून संबोधल जाते. तुमच्या दैनंदिन जीवनात याचा समावेश करा आणि यातील गुणांचा वापराने तुमचे सौंदर्य वाढवा.  


ब्रेस्ट कॅन्सरवर गुणकारी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil Helps Prevent Breast Cancer)


एका सर्व्हेनुसार जी लोकं रोजच्या जेवणात ऑलिव्ह ऑईलचं सेवन करतात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. ओल्युअरपेन (oleuropein), या ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरपासून रक्षण करण्याची क्षमता असते. .


डायबेटीसपासून रक्षण (Olive Oil Helps Prevent Diabetes)


तुमच्या रोजच्या डाएटमध्ये ऑलिव्ह ऑईलचा समावेश केल्यास तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. ऑलिव्ह ऑईल हे फॅट्सविरोधी असल्याने भविष्यात तुमचं डायबेटीसही नियंत्रणात राहण्यास मदत होते.  


अल्झायमरपासून रक्षण (Olive Oil Helps Prevent Alzheimer's Disease)


एका अमेरिक संशोधनानुसार, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईलच्या उंदरावरील केलेल्या परीक्षणात त्याची बुद्धी वाढल्याचं आढळलं. त्यामुळे या थिअरीनुसार अल्झायमरच्या रुग्णांनी ऑलिव्ह ऑईलचं सेवन केल्यास त्यांचे या रोगापासून रक्षण होईल.


Olive oil- olive oil in a cup
हाडं बळकट करते (Olive Oil Strengthens Your Bones)


ऑस्टीओकॅल्सीन (Osteocalcin) हा ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणारा घटक हाडं बळकट करतो. त्यामुळे जी लोकं नियमितपणे ऑलिव्ह ऑईलचं सेवन करतात त्यांना ऑस्टिओपोरॉसिस होण्याचा धोका नसतो.


वजन कमी करतं (Olive Oil Helps In Weight Loss)


ऑलिव्ह ऑईल हे एक सुपर फूड आहे, जे तुमच्या शरीराला आवश्यक असं हेल्दी फॅट देतं. एका संशोधनानुसार, जर तुम्ही रोज ऑलिव्ह ऑईलचं सेवन केल्यास तुमचं वजन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं.


डिप्रेशन होईल दूर (Olive Oil Helps Treat Depression)


ऑलिव्ह ऑईल तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवतं, हे रसायन तुमच्या मूडवर परिणाम करतं. त्यामुळे ऑलिव्ह ऑईलचं नियमित सेवन केल्यास तुमचं एकूणच मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.


कॉलेस्ट्रॉल कमी होतं (Olive Oil Helps Lower Bad Cholesterol)


ऑलिव्ह ऑईलमध्ये 75 to 80% एवढ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड फॅट आढळतं जे तुमचं चांगलं कॉलेस्ट्रॉल आणि एचडीएल राहण्यास मदत करतं. त्यामुळे भविष्यातील हृदयविकाराचा धोका टळतो.  


बद्धकोष्ठता रोधक (Olive Oil Helps Relieve Constipation)


ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणाऱ्या मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमीन ई, क, लोह आणि ओमेगा- 3, 6 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे तुमचं पचन चांगलं होतं. जर तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास दिवसातून दोनदा एक चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रिकाम्या पोटी घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. पण या तेलाचं सेवन करण्याआधी तुम्ही चार तास काहीही खाल्लेलं नसावं, याची काळजी घ्या.  


हाय ब्लडप्रेशरपासून सुटका (Olive Oil Helps Prevent High Blood Pressure)


ऑलिव्ह ऑईलमधील  मोनोसॅच्युरेटेड फॅट्समुळे यात फॅटी अॅसिड ओमेगा - 3 असतं. ओमेगा-3 मुळे तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं, ज्यामुळे तुमचं हृदय हेल्दी ठेवतं. ज्याला EFA म्हणतात, कारण हे शरीरात तयार होत नाही. त्यामुळे अन्नामार्फतच घ्यावं लागतं.  


त्वचेसाठी उपयुक्त ऑलिव्ह - Benefits For Skin


Olive oil- hand lotion


वाचा - जायफळाचे घरगुती उपाय आणि जायफळाचे फायदे


कोणत्याही लक्झरी स्कीनकेअर प्रोडक्टपेक्षा जास्त गुणकारी आहे एक एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलची बाटली. हो..हे खरंय. ऑलिव्ह ऑईल हे इतकं समृद्ध आहे की, त्वचेला आवश्यक असणारे अँटी ऑक्सिडंट्स, फॅटी अॅसिड्स आणि त्वचेसाठी उपयुक सर्व व्हिटॅमीन्स यामध्ये आहेत. कदाचित म्हणून इजिप्त सुंदरी क्लिओपॅट्रासुद्धा याचा वापर करायची.


ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमीन ए, डी आणि क आढळतात, त्यासोबतच व्हिटॅमीन ई आणि अँटीऑक्सीडंट्सही असतात. एका संशोधनानुसार अल्ट्रा व्हॉयलेट किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरलाही ऑलिव्ह ऑईल रोखू शकते. जाणून घेऊया ऑलिव्ह ऑईलचा वापर तुम्ही त्वचेसाठी कसा करू शकता.


मॉईश्चराईजर (As A Moisturiser)


तुमच्या बॉडी मॉईश्चराईजर ऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. एक चमचा ऑलिव्ह ऑईल तेलाने तुमच्या ओल्या शरीराला मसाज करा. तुमची त्वचा नेहमी मऊ, हायड्रेटेड आणि चमकदार राहील. हे तेल चिकट नसल्यामुळे तुमच्या शरीरात सहज मुरते. या तेलाच्या काही थेंबानी रात्री चेहऱ्याला मसाज करा. तसंच हे तेल स्ट्रेच मार्क्सही कमी करतं. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सवरही हे तेल तुम्ही लावू शकता.  


फेसपॅक (As A Face Pack)


योगर्ट, मध आणि ऑलिव्ह ऑईल एका बाऊलमध्ये घ्या आणि घट्टसर पेस्ट बनवा. हा फेसपॅक चेहऱ्यावर आठवड्यातून एकदा लावा. तुमचा चेहरा सुंदर आणि चमकदार होईल.


Olive oil- girl cleaning face


ओठांशिवाय इतरही गोष्टींसाठीही होऊ शकतो व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीचा वापर


मेकअप रिमूव्हर (As A Makeup Remover)


तुम्ही कोणत्याही ब्युटी एक्सपर्ट विचारलंत तर ते तुम्हाला नक्की सल्ला देतील की, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईल मेकअप रिमूव्हर म्हणून वापरा. एक चमचा तेल तुमच्या हातावर घ्या आणि कापसाने तुमचा मेकअप काढा.
अगदी पटकन न निघणारा वॉटरप्रूफ मेकअपही या तेलाने सहज निघतो. जर तुम्ही हाताचा वापर करणार असाल तर या तेलाने चेहऱ्याला काही मिनिटं मसाज करा आणि नंतर माईल्ड क्लिन्जर आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.


बॉडी स्क्रब (As A Body Scrub)


काही चमचे ऑलिव्ह ऑईल ब्राऊन शुगर आणि कॉफी पावडरमध्ये मिक्स करा. मस्तपैकी स्क्रब तयार होईल.


फूट क्रीम (As A Foot Cream For Cracked Heels)


भरपूर प्रमाणात ऑलिव्ह ऑईल घेऊन त्याने पायांना चांगला मसाज करा. चांगले सॉक्स घाला आणि झोपून जा. दुसऱ्या दिवशी तुमचे पाय एकदम मऊ होतील. दोन-तीन वेळा हा उपाय केल्यास तुमच्या पायांवरच्या सर्व भेगा दूर होऊन पाय सुंदर होतील.


शेव्हींग क्रीम (As A Shaving Cream)


जर तुम्ही नियमितपणे तुमचे हात आणि पाय शेव्ह करत असाल तर शेव्हींग क्रीमऐवजी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. तुमचं रेझर अगदी सहज फिरेल आणि त्वचाही हायड्रेटेड आणि मऊ राहील.


क्युटीकल ऑईल (As Cuticle Oil)


जर तुमच्या क्युटीकल्सना काळजीची गरज असेल तेव्हा ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. यामुळे तुमचे क्युटीकल्स होतील सुंदर आणि नखंही चांगली वाढतील.


डायपरमुळे रॅशवर ट्रीटमेंट (Diaper Rash Treatment)


हे समृद्ध तेल लहान मुलांसाठीही उपयुक्त आहे. लहान बाळांना डायपरमुळे रॅश आल्यास हे तेल लावू शकता. रॅश कमी होईल.


केसांसाठी उपयुक्त ऑलिव्ह - Benefits Of Olive Oil For Hair


Olive oil- hair oil


कमी वेळात चमकदार त्वचा हवी असल्यास वापरा बदामाचं तेल


ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांचं खोलवर जाऊन पोषण करते. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा, कोंडा आणि रफ एंड्स कमी होतात. हे तेल तुमच्या केसांची वाढ जलद करतं आणि स्काल्पही हेल्दी ठेवतं. जर तुम्हाला केस लांब आणि घनदाट हवे असल्यास तुम्ही आठवड्यातून किमान एकदा ऑलिव्ह ऑईलने मसाज करायला हवा.  


स्कॅल्पसाठी (Olive Oil Enriches Your Scalp)


कोमट एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलच्या काही चमचे तेलाने केसांना आणि स्कॅल्पला मसाज करा. काही तासांसाठी तसंच ठेवा आणि नंतर केस धुवा. रात्रभरही तुम्ही ठेऊ शकता. हे तुमच्या केसांसाठी चांगलं कंडीशनर म्हणून काम करतं.  


उत्तम हेअर मास्क (Olive Oil Is A Good Hair Mask)


झटपट हेअर मास्क हवा असल्यास तुम्ही काही चमचे ऑलिव्ह ऑईल आणि कोरफड जेल मिक्स करा. चांगलं घोटल्यावर या मिश्रणाचा रंग बदलतो. हे मिक्श्चर केसांना आणि स्कॅल्पला लावा. हा एक चांगला DIY हेअर मास्क आहे. कोरफड जेल हे हलकं असल्याने ते केसांमध्ये चांगलं मुरतं आणि केसांचं चांगल पोषण होतं.  


सेरम (Olive Oil Can Be Used As A Hair Serum)


ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब तुमच्या स्प्लीट एंड्सना सेरमऐवजी लावा. यामुळे तुमचे स्प्लीट एंड्स जाऊन केसं चमकदार होतील.


Olive oil- gair and olive oil


कोंड्यापासून सुटका (Olive Oil Helps Get Rid Of Dandruff)


केसांतील कोंड्यावर ऑलिव्ह ऑईल हा सर्वोत्तम उपाय आहे. दोन प्रकारे तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा कोंडा घालवण्यासाठी वापर करू शकता. एक, ऑलिव्ह ऑईलने कोरड्या स्कॅल्पवर मॉईश्चराईज केल्यास कोंडा जातो. दुसरा उपाय म्हणजे हे तेल लगेच शोषलं जातं आणि त्यामुळे कोंडा होत नाही. आंघोळीला जायच्या आधी दहा मिनिटं हे तेल लावल्यासही उपयोग ठरतं.


केस करतं बळकट (Olive Oil Makes Your Hair Stronger)


ज्यांना केसगळतीपासून सुटका आणि बळकट केस हवे असतील त्यांनी वेगवेगळे शॅम्पू किंवा कंडीशनर वापरण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल लावावं. दहा दिवसांतून एकदा ऑलिव्ह ऑईल लावावं तुम्हाला आपोआपच फरक दिसून येईल.


लांबसडक केसांसाठी (Olive Oil Makes Your Hair Grow Longer)


ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यास तुमचे केस जलदगतीने वाढतील. सिबम हा घटक ऑलिव्ह ऑईल दूर करतं. सिबम हा घटक तुमच्या केसांची वाढ रोखतो. जर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा नियमितपणे वापर केला तर तुमचे केस झटपट वाढतील.  


भारतातील सर्वोत्तम ऑलिव्ह ऑईल ब्रँडस - Best Olive Oil Brands In India


हेल्दी खा आणि हेल्दी राहा. तुमच्या रोजच्या आयुष्यातील काही छोट्या सवयी बदलल्याने मोठा फरक पडू शकतो. त्यातीलच एक बदल म्हणजे ऑलिव्ह ऑईलचा वापर. हे आहेत भारतातील काही चांगले ऑलिव्ह ऑईल ब्रँड्स ज्याचा तुम्ही वापर करू शकता.


जेवणातील वापरासाठी - Olive Oil For Cooking  


बोर्जेस ऑलिव्ह ऑईल (Borges Olive Oil)


Borges Olive Oil Benefits Of Olive Oil


बोर्जेस एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे सर्वात जेवणात वापरण्यासाठी सर्वात चांगलं ऑलिव्ह ऑईल आहे. हे तेल कोल्ड एक्सट्रॅक्शन प्रोसेसने काढलं जातं. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची केमिकल्स नसतात. तुम्ही याचा वापर रोजच्या जेवणात किंवा सलाड ड्रेसिंग म्हणूनही करू शकता.


Buy it here.


बर्टोली ऑलिव्ह ऑईल (Bertolli Olive Oil)


Bertolli-Olive-Oil-benefits-of-olive-oil


हे ऑलिव्ह ऑईल तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. स्वयंपाकासाठी, सलाड डेकोरेशन, केसांसाठी किंवा अगदी त्वचेवर लावण्यासाठीही. हे तेल तळण्यासाठी, भाजण्यासाठी किंवा परतण्यासाठी ही वापरू शकता. हे तेल कोणत्याही प्रकारच्या भारतीय जेवण पद्धतीसाठी उपयुक्त आहे. हे प्रत्येक डीशची चव आणि सुवास वाढवतं. 


Buy it here.


लिओनार्डो ऑलिव्ह ऑईल (Leonardo Olive Oil)


Leonardo-Olive-Oil-benefits-of-olive-oil


भारतीय पाककृतीसाठी हे तेल अगदी योग्य आहे. हे तेल ट्रान्स फॅट फ्री आणि कॉलेस्ट्रॉल फ्री असतं. हे तुम्हाला 3 ग्रेड्समध्ये उपलब्ध आहे. एक्स्ट्रा व्हर्जिन, क्लासिक आणि पोमॅस ऑलिव्ह ऑईल या ऑलिव्ह ऑईल व्हरायटीज तुम्हाला मिळतील. 


Buy it here.


डेलमाँटे ऑलिव्ह पोमॅस ऑईल (Delmonte Olive Pomace Oil)


Delmonte-Olive-Pomace-Oil-benefits-of-olive-oil


डेलमाँटे ऑलिव्ह पोमॅस ऑईल हे बाजारातील सर्वात नामांकित तेल आहे. हेही तुम्ही रोज जेवण बनवण्यासाठी वापरू शकता. या तेलात कोणत्याही प्रकारचे प्रीझर्व्हेटीव्ज आढळत नाहीत.


Price: Rs 499. Buy it here.


फिगारो ऑलिव्ह ऑईल (Figaro Olive Oil)


Olive oil- Figaro


फिगारो ही ऑलिव्ह ऑईल बनवणारी सर्वात जुनी कंपनी आहे. त्यामुळेच हे तेल भारतात प्रसिद्ध आहे. हे रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही मिळू शकतं.


Price: Rs 150. Buy it here.


त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी For Hair And Skin


अरोमा मॅजिक ऑलिव्ह ऑईल (Aroma Magic Olive Oil)


Aroma-Magic-Olive-Oil-benefits-of-olive-oil


अरोमा मॅजिक ऑलिव्ह ऑईल हे नामांकित ब्युटीशिअन असलेल्या डॉ ब्लोस्सम कोच्चर यांनी भारतात 1992 साली अरोमा थेरपी म्हणून आणलं. हे तेल बजेट फ्रेंडली असून याचे अनेक उपयोग आहेत. तुम्ही हे तेल स्कॅल्प आणि हाताला लावण्यासाठी वापरू शकता.


Price: Rs 157. Buy it here.


नेचर्स अब्सॉल्यूट ऑलिव्ह कॅरिअर ऑईल (Nature’s Absolutes Olive Carrier Oil)


Nature%E2%80%99s-Absolutes-Olive-Carrier-Oil-benefits-of-olive-oil


कॅरिअर ऑईल हे तुम्ही कोणत्याही इन्सेशिअल ऑईल्ससोबत मिक्स करू शकता. हे तेल तुम्ही त्वचेसोबतच केसांसाठीही वापरू शकता. हे तेल केसात चांगलं शोषलं जातं. तसंच हे चांगलं क्लींजर आणि मेकअप रिमूव्हरही आहे.


Price: Rs 247. Buy it here.


सोलफ्लॉवर ऑलिव्ह ऑईल (Soulflower Olive Oil)


Olive oil- Soulflower Oil
सोलफ्लॉवर ही इन्सेशिअल ऑईल बनवणारी सर्वोत्तम कंपनी आहे. हे तेल केसांना मॉईश्चराईजर आणि कंडीशनर म्हणून वापरू शकता. हे तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. या तेल व्हिटॅमीन्स आणि अँटीऑक्सीडंट्सनी युक्त आहे.


Price: Rs 215. Buy it here.                                                                  


डाबर अल्मंड ऑलिव्ह ऑईल (Dabur Almond Olive Oil)


Dabur-Almond-Olive-Oil-benefits-of-olive-oil


डाबर अल्मंड ऑलिव्ह ऑईल हे केसांना बळकटी आणि चमक देऊन केसगळती कमी करतं. तसंच हे तेल चिकट नसल्याने केस सिल्की, चमकदार आणि बाऊन्सी होतात.


Price: Rs 2,634. Buy it here.


जॅक ऑलिव्ह बॉडी ऑईल (Jac Olive Body Oil)


Olive oil-Jac Olival


जॅक ऑलिव्ह बॉडी ऑईल हे अनेक वर्षांपासून महिलांच्या स्कीनकेअर रूटीनमधला भाग आहे. तुमच्या डोळ्याभोवती असणाऱ्या डार्क सर्कल्स कमी करण्यासठी तुम्ही याचा वापर करू शकता.


Price: Rs 210. Buy it here.


आता तुम्हाला कळलं असेलच ऑलिव्ह ऑईल किती गुणकारी आहे, मग लवकरच याचा वापर करून पाहा.


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


गुळवेल म्हणजे जणू अमृतच