ADVERTISEMENT
home / Acne
Oily Skin Care Tips In Marathi

तुमच्या तेलकट चेहऱ्यावर घरगुती उपाय (Home Remedies For Oily Skin In Marathi)

प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसायला हवी असते. त्वचा चांगली दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उत्पादन वापरून अथवा घरगुती उपाय करून प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. काही जणांची त्वचा कोरडी असते तर काही जणांची त्वचा ही तेलकट असते. तेलकट त्वचेमध्ये तुमच्या चेहऱ्यावर सतत थोड्या वेळाने तेल जमा होत राहतं. त्यामुळे त्वचेला जास्त त्रास होतो. त्यावर पुळ्या येणं अथवा सतत चेहरा तेलकट दिसणं यासारख्या समस्या उद्भवतात. तेलकट त्वचा ही महिलांसाठी खूप मोठी समस्या आहे. यामुळे महिलांच्या मेकअप आणि मॉईस्चराईजरला नुकसान पोहचवते. त्यामुळे तुमच्या तेलकट त्वचेसाठी घरगुती उपाय काय करायला हवेत हे आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला नक्की तेलकट त्वचा म्हणजे काय आणि त्यापासून काय नुकसान होतं हेदेखील आम्ही सांगणार आहोत. त्याशिवाय यावर घरगुती उपाय काय करता येतील हे आपण पाहू.

त्वचा तेलकट का होते? (What Causes Oily Skin)

तुम्ही नित्यनियमाने जर प्रत्येक ब्युटी टीप्सचं पालन करत असाल. शिवाय तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेपासून वाचण्यासाठी सर्व प्रयत्न करत असूनही तुमची त्वचा तेलकट राहात असेल तर तुम्हाला ही समस्या अनुवंशिक आहे. जेव्हा असं कारण असतं तेव्हा तुम्ही स्वतःची जास्त काळजी घ्यायला हवी. तुमच्या शरीरामध्ये तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथी जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमची त्वचा तेलकट होते. शिवाय या ग्रंथी जास्त प्रमाणात असल्यामुळे सतत तुमच्या चेहऱ्यावर तेल येत राहतं आणि तुमची त्वचा त्यामुळे अधिक तेलकट दिसते.

याशिवाय तुमची त्वचा तेलकट का होते ते जाणून घेऊया :

1. स्किन केअर उत्पादनांचा अधिक वापर (Extra Use Of Skin Care Products)

Skin Care Products

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये आलेली बरीच क्लिंझर, एक्लोलिएट आणि स्क्रबचा नको तितका वापर करता. त्यामुळे या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रांवर दबाव पडतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे तुमची त्वचा अधिक तेलकट होते.

ADVERTISEMENT

2. वातावरणातील बदल (Climate Change)

आपल्याकडे ऋतू बदलांमुळे बऱ्याचदा त्वचेवर परिणाम होत असतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात वातावरणामध्ये दमपटपणा येतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अधिक तेलकटपणा दिसू लागतो. तसंच हिवाळ्यामध्ये तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा आणि पोषण कमी प्रमाणात होतं. हा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुमची त्वचा अधिक प्रमाणात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

3. औषधं (Medicines)

medicine

महिलांना अनेक समस्या असतात. त्यापैकी एक म्हणजे हार्मोनल बॅलेन्स. यासाठी तुम्हाला देण्यात येणाऱ्या औषधांमुळे तुमच्या त्वचेमध्ये अधिक प्रमाणात तेल निर्माण होत असतं. याशिवाय काही औषधांमुळे त्वचेमध्ये कमी ओलावा निर्माण होत असतो. पोषणाच्या या असमतोलाशी लढा देण्यासाठी त्वचेमध्ये अधिक प्रमाणात तेल निर्माण केलं जातं. ज्याची तुम्हाला कल्पना येत नाही.

4. चुकीच्या उत्पादनांचा वापर (Use Of Wrong Products)

आपल्या त्वचेला सूट न होणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्यास, तुमच्या त्वचेमध्ये अधिक प्रमाणात तेल निर्माण होतं. तुमची त्वचा जर मिश्रित असेल आणि तुम्ही ऑईली स्किन मॉईस्चराईजरचा वापर केला अथवा क्लिंझर वापरलं तरत तुमच्या त्वचेमध्ये तेल अधिक प्रमाणात तेल निर्माण होतं. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कारण ठरतं.

5. तणाव (Stress)

stress

तणाव हे तेलकट त्वचेसाठी सर्वात मुख्य कारण आहे. जेव्हा कोणतीही व्यक्ती तणावामध्ये असते तेव्हा शरीरामध्ये एंड्रोगर्न्स हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते. त्यामुळे तुमची त्वचा तेलकट होते.

ADVERTISEMENT

वाचा – उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा ‘हे’ बेस्ट सनस्क्रिन लोशन 

तेलकट त्वचेने काय होतं नुकसान (Cons Of Oily Skin)

तुमची त्वचा तेलकट असेल तर घराबाहेर निघाल्यानंतर सतत तुमच्या चेहऱ्यावर धूळ आणि माती चिकटून राहते. शिवाय तुम्हाला सतत चेहऱ्यावर एका स्वरुपाचा चिकटपणा जाणवत राहतो. तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हादेखील तुमचा चेहरा अधिक तेलकट आणि त्यावर धूळ जमलेली दिसून येते. शिवाय तुम्ही जर मेकअप करत असाल तर तेलकट चेहऱ्यावर तो मेकअप जास्त काळ टिकत नाही. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांना दिवसभरात खूप वेळा मेकअप करावा लागतो. शिवाय धूळ आणि मातीचे कण त्वचेला चिकटून राहतात त्यामुळे तुम्हाला नेहमी अॅक्ने आणि पुळ्यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा तऱ्हेने नक्कीच तुमच्या तेलकट त्वचेमुळे चेहऱ्याचं बरंच नुकसान होत असतं.

तेलकट त्वचेसाठी काय करायला हवं – घरगुती उपाय (Home Remedies To Take Care Of Oily Skin)

तेलकट त्वचा सांभाळणं ही खूपच कठीण गोष्ट आहे. त्यामुळे तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी नक्की काय करायला हवं हे जाणून घेऊया –

1. दिवसातून दोन वेळा चेहरा धुणं (Wash Your Face Twice A Day)

Wash Your Face Twice A Day

तेलकट त्वचेमध्ये चेहऱ्यावर सतत तेल दिसतं. त्यामुळे निदान दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. पण त्वचा तेलकट आहे म्हणून अतिवापर करू नका. दोन वेळा चेहरा धुणं तुमच्यासाठी पुरेसं आहे. तसंच चेहरा धुताना सौम्य साबणाचा वापर करा हे लक्षात ठेवा.

ADVERTISEMENT

2. मधाचा वापर (Honey)

मध हे तुमच्या त्वचेसाठी सर्वात चांगली वस्तू आहे. मधामध्ये अँटीसेप्टीकल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यामुळे तुमच्या तेलकट त्वचेसाठी हे उपयुक्त ठरतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मधाचा एक हलकासा लेअर लाऊन थोड्या वेळाने काढून टाकू शकता.

वाचा – तेलकट त्वचेसाठी फेस वॉश 

3. कॉस्मेटिक क्ले (Cosmetic Clay)

तुम्ही यापासून मास्क तयार करून लावल्यास, तुमच्या तेलकट त्वचेसाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हा मास्क कसा बनवायचा ते पाहू –

  • एक चमचा कॉस्मेटिक क्लेमध्ये तुम्ही गुलाबपाणी अथवा फिल्टर्ड पाणी घालून थोडं पुडिंग स्वरूपात भिजवा
  • तुमच्या चेहऱ्यावर हे मिक्स्चर लावा आणि सुकेपर्यंत तसंच ठेवा
  • गरम पाण्याने तुमचा चेहरा धुवा

4. ओट्स (Oats)

ओट्स हे तुमच्या चेहऱ्यावरील अधिक तेल शोषून घेतात. त्यामुळे ओट्सचा वापर तेलकट त्वचेसाठी करणं हे तुमच्यासाठी नक्कीच चांगला आहे.

ADVERTISEMENT
  • अर्धा कप ओट्स गरम पाण्यात भिजत घाला आणि त्यानंतर त्याची पेस्ट करा
  • त्यामध्ये एक चमचा मध घाला
  • हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला साधारणतः तीन मिनिट्स लाऊन ठेवा. त्यानंतर तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुवा

5. अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबू (Egg White And Lemon)

अंडं आणि लिंबू हे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र भरण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. लिंबामध्ये असणारं अॅसिड तुमच्या चेहऱ्यावरील तेल शोषून घेण्यास मदत करतात. तसंच यामध्ये अँटीबॅक्टिरियल क्षमता असल्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार राहतो.

  • तुम्ही एका भांड्यामध्ये एक अंड्याचा पांढरा भाग आणि १ चमचा ताज्या लिंबाचा रस घेऊन मिक्स करा
  • तुमच्या चेहऱ्यावर हे मिश्रण लावा आणि सुकेपर्यंत वाट पाहा
  • त्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुवा

6. बदाम (Almond)

Almond

बदामामुळेदेखील तुमच्या चेहऱ्यावरील येणारे तेल हे शोषून घेतलं जातं. शिवाय बदामाचा फेस स्क्रब म्हणूनदेखील उपयोग होतो.

  • तीन चमचे पावडर होईल इतके बदाम वाटून घ्या
  • त्यामध्ये 2 चमचे कच्चा मध घाला
  • हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये लावा
  • त्यानंतर गरम पाण्याने तुमचा चेहरा धुवा आणि मग कोरडा करा

7. कोरफड (Aloe-Vera)

कोरफड हा त्वचेसाठी उत्कृष्ट उपाय आहे. तुम्ही याचा विविध प्रकारे उपयोग करू शकता. कोरफडची जेल तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला लावा आणि रात्रभर तशीच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तुमचा चेहरा बघा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल. फक्त हे करण्यापूर्वी तुम्ही एकदा तुम्हाला याची अलर्जी नाही ना याची खात्री करून घ्या. हे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कपाळावर काही तासांसाठी ही कोरफड जेल लाऊन ठेवा. म्हणजे तुमच्या चेहऱ्याला हे सूट करत आहे की नाही याचा अंदाज तुम्हाला येईल. हा प्रयोग तुमच्या तेलकट त्वचेसाठी एक चांगला उपाय आहे.

8. टॉमेटो (Tomato)

tomato

टॉमेटो या भाजीमध्ये तुम्हाला सॅलिसालिक अॅसिड सापडतं. त्यामुळे तुमच्या तेलकट त्वचेमधील तेल शोषून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. मास्क बनवण्यासाठी याचा कसा उपयोग करायचा ते पाहू –

ADVERTISEMENT
  • एका टॉमेटोच्या पल्पमध्ये 1 चमचा साखर मिसळा
  • हे मिश्रण सर्क्युलर मोशनमध्ये तुमच्या चेहऱ्यावर चोळा
  • त्यानंतर साधारण 5 मिनिट्स चेहऱ्यावर तसंच ठेवा
  • गरम पाण्याने चेहरा धुऊन कोरडा करा
  • तुम्ही तुमच्या त्वचेवर केवळ टॉमेटो पल्प वा टॉमेटोचा कापदेखील लाऊ शकता. याचा परिणामही तितकाच चांगला होतो.

9. जोजोबा ऑईल (Jojoba Oil)

तुमच्या तेलकट चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांसाठी जोजोबा ऑईल हा एक चांगला उपाय आहे. तुम्ही आठवड्यातून निदान दोन ते तीन वेळा या तेलाचा वापर केल्यास, तुमच्या त्वचेवरील पुळ्या निघून जातात. अगदी काही थेंब जोजोबा ऑईल तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं. तुमच्या हातावर जोजोबा ऑईलचे काही थेंब घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज करा आणि नंतर तुमचा चेहरा कसा दिसतो, याचा परिणाम नक्की कसा होतो ते बघा. काहीच दिवसात तुम्हाला चांगला फरक झालेला जाणवेल.

10. ब्लोटिंग पेपर्स (Bloating Papers)

तुमच्या त्वचेवर तेल जमा होत असल्यास, या ब्लोटिंग पेपर्सचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावरील तेल काढून टाकून तुमचा चेहरा तजेलदार दिसण्यासाठी या पेपर्सचा खूप चांगला उपयोग होतो.

वाचा – चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

तेलकट त्वचेसाठी उपाय आणि टीप्स (Oily Skin Care Tips In Marathi)

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी अतिशय संयम आणि वेळेची गरज असते. शिवाय तुम्हाला तेलकट त्वचा असल्यास, बऱ्याच गोष्टी जपाव्या लागतात. आम्ही तुम्हाला इथे काही ब्युटी टीप्स देत आहोत. ज्या तुम्ही घरच्या घरी करून तेलकट त्वचेच्या समस्येपासून स्वतःला दूर ठेऊ शकता.

ADVERTISEMENT

1. क्लिन्झिंग (Cleansing)

cleansing

आपली त्वचा क्लीन करण्यासाठी सर्वात पहिला नियम म्हणजे त्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल काढून टाकणे. दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा धुऊन घ्या. तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा तरी तुम्ही तुमचा चेहरा नीट व्यवस्थित धुवायला हवा. पण म्हणून सतत चेहरा धुऊ नका. याची काळजी घ्या. दोन वेळा धुतल्याने तुमच्या त्वचेला योग्य पोषण मिळतं. शिवाय तुम्ही महिन्याच्या महिन्याला अगदी घरीदेखील स्वतःच्या चेहऱ्यावर फेशियल करून चेहरा क्लिन करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या फळांचा उपयोग करू शकता. त्याचा उपयोग कसा करायचा यासाठी तुम्ही आमचा हा लेख वाचू शकता. यामध्ये तुम्ही कॉफीचा उपयोग करून घेऊ शकता. कॉफी चे फायदे अनेक आहेत.

वाचा – घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

2. मेकअप काढून टाकावा (Remove Makeup)

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मेकअप लावायल खूप आवडत असेल आणि दिवसभर तुम्ही मेकअप लुकमध्येच असाल. तरीही तुम्ही घरी आल्यानंतर तुमचा मेकअप काढायला विसरू नका. झोपायच्या आधी तुम्ही व्यवस्थित क्लिन्झरने तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप काढा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. त्याशिवाय तुम्ही झोपायला जाऊ नका. मेकअप रिमूव्हिंग क्रिम आणि ऑईली फेसवॉशचा वापर करा. ज्या फेसवॉशमध्ये सेलिसिलिक अॅसिड आहे अशा फेसवॉशचाच वापर तुम्ही चेहरा धुण्यासाठी करा. कोणत्याही वेगळ्या साबणाचा वापर करू नका. तुमची चेहऱ्याची त्वचा ही अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे ती जपण्यासाठी योग्य उत्पादनांचा वापर करा.

3. अॅक्नेसाठी लागणारी क्रिम्स (Creams For Acne)

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्यावर अॅस्ट्रिंगजेंट लावा. पण हे लावताना ते अल्कोहोलिक नाही या याची खात्री करून घ्या. तसंच दिवसातून एकच वेळ याचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही दिवसातून दोन वेळा अॅक्नेसाठी लागणारी क्रिम्स वापरू शकता.

ADVERTISEMENT

A. Oriflame Pure Skin Spot SOS Gel Deep Action  

Oriflame Pure Skin Spot SOS Gel Deep Action

नैसर्गिक हर्ब्सने तयार करण्यात आलेलं हे क्रिम साधारण हे क्रिम लावल्यानंतर आठ तासामध्ये तुमचे अॅक्ने गायब होतात असा दावा हे क्रिम करतं. यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड असल्यामुळे तुमच्या त्वचेला याचा चांगला उपयोग होतो.

किंमत – रू. 195/-

B. Acne Sealing Gel 

Acne Sealing Gel

तुमच्या चेहऱ्यावरील पुळ्या कमी करण्यासाठी आणि डाग घालवण्यासाठी हे क्रिम अगदी योग्य आहे. यामध्ये असलेलं सल्फर आणि सॅलिसिलिक अॅसिड तुमची त्वचा चांगली ठेवण्यासाठी उपयोगी असतं. हे बाजारामध्ये कोणत्याही केमिस्टकडे तुम्हाला मिळू शकतं. तेलकट त्वचा असल्यास, अशा क्रिम्सचा वापर करावा.

किंमत – दोन पॅककरिता 490/-

ADVERTISEMENT

C. Kaya Purifying Spot Corrector 

Kaya Purifying Spot Corrector

तुम्हाला जर पिंपल्स आणि त्याच्या डागांचा खूपच त्रास असेल तर तुम्ही घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. तेलकट त्वचेमुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सना जर तुम्हाला घालवायचं असेल तर या क्रिमचा वापर करावा. कारण यामध्ये तुमची त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करणारी पोषक तत्व असतात.

किंमत – रू. 764/-

D. Neutrogena On-The-Spot Acne Treatment

Neutrogena On-the-spot Acne Treatment

तुमची त्वचा संवेदनशील आहे आणि तेलकटही आहे तर त्यासाठी हे क्रिम उपयुक्त आहे. या क्रिमचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर तेलकटपणामुळे आलेल्या पुळ्या नक्की घालवू शकता. या क्रिममुळे फक्त तुमचे अॅक्नेच निघून जातील असं नाही तर तुमची त्वचा ही अगदी मऊ आणि मुलायम होईल.

किंमत – रू. 1,299/-

ADVERTISEMENT

E. Derma E Very Clear Spot Treatment Cream 

Derma E Very Clear Spot Treatment Cream

बऱ्याचदा तुमच्या त्वचेवर तेलकटपणामुळे रॅश येतात. त्यामुळे त्याचे परिणाम तुमच्या चेहऱ्यावर डाग पडण्याचे होतात. पण हे डाग घालवायचे असतील आणि तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवायचा असेल तर हे क्रिम तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

किंमत – रू. 1,599/-

4. मॉईस्चराईजर (Moisturizer)

तुमची त्वचा तेलकट असल्यामुळे तुमच्या त्वचेसाठी मॉईस्चराईजर हा महत्त्वाचा घटक आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं मॉईस्चराईजर तुमच्यासाठी विकत घेता तेव्हा नीट काळजीपूर्वक ते निवडा. तुमच्या त्वचेसाठी योग्य असणारं मॉईस्चराईजर तुम्ही विकत घ्या. तुमची त्वचा नेमकी किती कोरडी आहे त्यावर तुम्ही किती मॉईस्चराईजर तुमच्या त्वचेवर लावायचं आहे हे अवलंबून आहे. ज्या मॉईस्चराईजर मध्ये कोको बटर आणि मिनरल ऑईल आहे असं उत्पादन वापरू नका. ते तुमच्या त्वचेसाठी जास्त हानिकारक ठरू शकतं. नॉन – कॉमेडोजेनिक मॉईस्चराईजर तुमच्या त्वचेसाठी जास्त चांगले ठरतील. त्यामुळे खरेदी करत असताना अशा तऱ्हेचं उत्पादन तुम्ही खरेदी करा. जेणेकरून तुमच्या त्वचेला कोणतंही नुकसान पोहचणार नाही.

5. सनस्क्रिन (Sunscreen)

तुमची त्वचा तेलकट असल्यामुळे अगदी पावसाळ्यातही तुम्ही सनस्क्रिन लावल्याशिवाय बाहेर पडू नका. तुमच्या सनस्क्रिनमध्ये कमीत कमी 15 एसपीएफ असलेलं सनस्क्रिन लावावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तेलकट त्वचेसाठी तुम्ही अशाच सनस्क्रिनचा वापर करायला हवा असं नाही.

ADVERTISEMENT

वाचा – तजेलदार त्वचेसाठी दूध

तेलकट त्वचेसाठी सोपे घरगुती उपाय (Easy Home Remedies)

आपल्या तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही अगदीच घरगुती उपायदेखील करता यायला हवेत. त्यासाठी अगदी स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. या गोष्टी केवळ तुमची त्वचाच तेलमुक्त करतात असं नाही तर, तुमच्या त्वचेवर आलेले डागही यामुळे निघून जातात.

मध आणि सफरचंद (Honey And Apple)

सफरचंद कापून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. त्यामध्ये थोडंसं मध घाला. हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर साधारतः 20 मिनिट्स लाऊन ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या.

बदाम तेल (Almond Oil)

बदाम तेलाचे काही थेंब तुम्ही लिंबाच्या रसामध्ये मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हा प्रयोग कमीत कमी महिनाभर तरी करा. तुमच्या तेलकट त्वचेवर बघा कसा परिणाम होईल. तुमची त्वचा अतिशय चमकदार आणि टवटवीत दिसेल.

ADVERTISEMENT

पपई (Papaya)

पपई मॅश करून त्याचं नीट मिक्सअप करू घ्या. हे मिश्रण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर साधारणतः 15-20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर गार पाण्याने तुमचा चेहरा धुऊन घ्या. तुम्ही लवकरच तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक पाहू शकाल.

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:

मुरुमांसाठी फेस वॉश (Best Face Wash For Pimples In Marathi)

26 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT