यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi)

Success Quotes In Marathi

प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात यशाचं सर्वाेच्च शिखर गाठावं, असं ध्येय असतं. तर काहीजण खरोखरच यशाचं शिखर गाठतात. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर प्रत्येकाला यश मिळेलच असंही नाही. पण जो खरा प्रयत्न करतो त्याला यश हे मिळतंच. या लेखात आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत यश आणि त्यावरील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचे विचार.


यशाची खरी व्याख्या


सक्सेस कोट्सचं आयुष्यातील महत्त्व काय


स्वामी विवेकानंदा यांचे सक्सेस क्वोट्स


नेल्सन मंडेला यांचे काही सक्सेस कोट्स


डॉ.अब्दुल कलाम यांचे विचार आणि सक्सेस कोट्स


सोशल मीडियावरील सक्सेस कोट्स


यश म्हणजे काय? (Success Meaning In Marathi)


marathi thoughts on success


यश म्हणजे काय? यशाची व्याख्या काय?(How to become Successful), असे प्रश्न वारंवार विचारले जातात किंवा यशस्वी होण्याचा मार्ग कोणता? साधारणतः यशाचा मापदंड म्हणजे पैशाची श्रीमंती किंवा भौतिक सुख-सुविधांशी जोडला जातो. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुमचं नाव यशस्वी व्यक्तींमध्ये घेतलं जातं. पण हे खर यश (Success) नाही, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार यशाची परिमाणं बदलतात


उदाहरणार्थ


एका संन्यासी व्यक्तीसाठी यश म्हणजे ईश्वर मिळणे


एका विद्यार्थ्यासाठी यश म्हणजे पास होणे


एका गरीब व्यक्तीसाठी यश म्हणजे भूक भागवणे


एका आजारी व्यक्तीसाठी यश म्हणजे आजारावर मात करून बरं होणं.


आपापल्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शक्ती अनुसार आपल्या आयुष्यातील ध्येय ठरतं आणि जेव्हा आपण ते प्राप्त करतो तेव्हा आपल्याला जिंकण्याचा आनंद मिळतो. जे आपल्याला खरं सूख देतं आणि त्यालाच यश म्हटलं जातं.  


यशाची खरी व्याख्या (Defination Of Success In Marathi)


defenition of success in marathi


तोच व्यक्ती यशस्वी आहे, ज्याच्याकडे पैसा, नाव (समाजात प्रसिद्धी) आणि मनःशांती आहे. यश मिळवण्यासाठी आनंदी राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आनंदामध्ये सकारात्मक उर्जेचा संचार असतो आणि यशाचा अंतिम परिणामही आनंदच असतो. म्हणूनच आपल्याला खूष राहून आपलं प्रत्येक कार्य करायला हवं.


सक्सेस कोट्सचं आयुष्यातील महत्त्व काय (Importance Of Quotes On Success In Marathi)


यश हे जरी आपल्याला आपण केलेल्या कृतीमुळे मिळतं, हे खरं असलं तरी सकारात्मक विचारांचा आपल्यावर नेहमी चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे यशावरील अनेक दिग्गजांचे विचार आपल्याला यश मिळवण्याच्या प्रवासात नेहमी प्रेरणा देतात आणि अपयश आलं तरी पुढे जाण्याची दिशा दाखवतात.


प्रसिद्ध व्यक्तींनी सांगितलेले सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi By Famous Personalities)


Best Success Quotes In Marathi By Famous Personalities


काही महान व्यक्तीमत्त्वांनी यशाबद्दल व्यक्त केलेले काही सक्सेस क्वोट्स आपण पाहूया. जे वाचून तुम्हालाही जीवनात यश मिळवण्याची प्रेरणा प्राप्त होईल.


- जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा - बिल गेट्स.
- डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही - बिल गेट्स.
- कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की, ते काम आवडीने करा - स्टीव्ह जॉब्स
- जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात - शिव खेरा.
- आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त - पंडीत जवाहरलाल नेहरू.
- नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो - अब्राहम लिंकन.
- कार्य हाच यशाचा पाया आहे - पाब्लो पिकासो.
- वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे - विंस्टन चर्चिल.
- यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे - जॉर्ज बर्नार्ड शॉ.
- जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका - जॉन आर वुडेन.
- या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते - ओप्रा विनफ्रे.
- तुमचं यश यावरून ठरवा की, तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे - दलाई लामा.
- मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं - थॉमस जेफरसन.
- या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं - अज्ञात.
- आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे - अज्ञात


स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस भारतात युवा दिन म्हणून साजरा केला जातो. जाणून घ्या स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार, जे तुमच्या जीवनाची दिशा बदलतील.


- जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.
- जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल.
- शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष. लक्ष केंद्रित करूनच आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो.
- पवित्रता, धैर्य आणि उद्योग- हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत.
- उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
- ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे, मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो.
- एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा.
- जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.
- ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव.  
- लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.


नेल्सन मंडेला यांचे काही सक्सेस कोट्स (Nelson Mandela Quotes On Success In Marathi)


Nelson Mandela Quotes On Success In Marathi


नेल्‍सन मंडेला यांंना शांती दूत म्हटलं जातं. नेल्‍सन मंडेला हे जगभरातील लोकांसाठी ते प्रेरणादायी आहेत. ज्यांच्या विचाराने तुम्हाला एक नवी दिशा मिळेल. जर तुम्ही त्यांची विचारधारा फॉलो केलीत तर तुम्हीही यशाचं शिखर सर कराल.


- जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.
- गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.  
- एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते.
- एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे.
- मी हे ओळखलं आहे की, कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे.


पाहूया दिवंगत यशाबद्दल डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार आणि सक्सेस कोट्स (Dr APJ Abdul Kalam Marathi Thoughts On Success)


पूर्ण नाव अबुल पकिर जैनुलाअबदीन अब्दुल कलाम. मिसाईल टेक्नोलॉजीच्या अब्दुल कलाम यांचं महत्त्वपूर्ण कार्य असल्यामुळे त्यांना मिसाईल मॅन असंही म्हटलं जायचं. भारत रत्न ए पी जे अब्दुल कलाम भारताचे पूर्व राष्ट्रपती, प्रसिद्ध वैज्ञानिक आणि इंजीनियरच्या रूपात ओळखतात. अब्दुल कलाम यांचं बालपण खूपच गरीबीत गेलं, एवढं की एकेकाळी त्यांना पेपरची विक्रीही करावी लागली होती. जाणून घेऊया त्यांचे यशाबाबतचे खास क्वोट्स.


- तीन सर्वोत्तम उत्तर


1. यशाचं रहस्य काय आहे


उत्तर - योग्य निर्णय


2. तुम्ही योग्य निर्णय कसा घ्याल


उत्तर - अनुभव


3. तुम्हाला अनुभव कसा प्राप्त होईल


उत्तर - चुकीच्या निर्णयातून


Dr APJ Abdul Kalam Marathi Thoughts On Success


- प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.
- प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.
- स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.
- सगळं नीट होईल कदाचित आज नाही पण येत्या काळात.
- जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.
- लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.
- जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही.
- यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.
- आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.  


सोशल मीडियावरील सक्सेस कोट्स (Success Status In Marathi For Whatsapp)


Success Status In Marathi For Whatsapp


 • मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यशच आवाज करेल .

 • हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

 • जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता.

 • गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.

 • जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की, आपल्या आईबाबांची ईच्छा पूर्ण करता येईल.

 • जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही.

 • यशाचं परिमाण तुमच्या विचारांची उंची ठरवते

 • यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

 • भाग्यसुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं.

 • यशांमध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा.

 • काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.

 • आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.

 • जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

 • यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

 • यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे.

 • संधी मिळत नाही ती मिळवावी लागते.

 • तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागेमागे येईल.

 • यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास आहे, उत्साह कमी न करता.

 • रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता.

 • जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, पण नाहीतर न करण्याचं कारण मिळेल.

 • काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.

 • यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा.

 • यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही.

 • मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही, मी त्यासाठी काम केलं.

 • कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं, सत्यात नाही.


Quotes on success in marathi


यशाची व्याख्या काहीही असली तरी तुम्ही आयुष्यात ते मिळवण्यासाठी सतत झटत राहा. कारण प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही. संत रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, अर्थात जर तुम्ही धीर ठेवून प्रयत्न केले तर वाळूच्या कणांमधूनही तेल गळू शकतं. मग प्रयत्नांचं सातत्य ठेवा आणि मग बघा यश आपोआप मागेमागे येईलच. मग मेहनत करत रहा आणि यश मिळवत रहा. 


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


Best Ukhane In Marathi


वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा


लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश


जागतिक मराठी भाषा दिन


15 ऑगस्टला ठेवा हे खास स्टेटस