आकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो

आकाश अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटी पाहुण्यांचा थाट, पाहा फोटो

नव्या वर्षात आणखी एका लग्नाची चर्चा होती ती आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाची. काहीच तासांपूर्वी त्यांचा हा शाही सोहळा मुंबईच्या जीओ गार्डनमध्ये सुरु झाला आहे. अंबानी म्हटले की थाट हा आलाच. त्यामुळे अंबानीच्या लग्नासाठी जीओ गार्डनची सजावटही तशी खासच करण्यात आली आहे. फुलांनी केलेले हे डेकोरेशन अगदी पाहण्यासारखे आहे. पण या थाटासोबतच अंबानींचे लग्न खास असते. कारण ईशाच्या लग्नाला परदेशी कलाकारांची हजेरी होती. आता या लग्नाला कोणाची हजेरी लागणार ही उत्सुकता संपली आहे कारण या लग्नासाठी सेलिब्रिटींनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. पाहुयात या लग्नातील काही खास क्षण


 रणबीर एकटाच ?


सध्या आलिया आणि रणबीरला एकत्र पाहिल्यानंतर या लग्नातही हे नवं कपल एकत्र येईल असे वाटले होते. पण या लग्नाता आलिया कुठेही दिसली नाही. किमान रणवीर कपूरसोबत तरी ती या फोटोफ्रेममध्ये पाहायला मिळाली नाही. तर करण जोहर, अयान मुखर्जीसोबत रणबीर फोटो काढताना दिसला. त्यामुळे रालियाच्या फॅनला मात्र नक्कीच निराशा झाली असेल.

पिग्गी विथ फॅमिली 


निक जोनसला घेऊन काहीच दिवसांपूर्वी प्रियांका भारतात आली आहे. ती निकला या लग्नाला घेऊन येईल असे वाटले होते. पण ती या लग्नाला आई आणि तिच्या भावासोबत दिसली. त्यामुळे निकला या लग्नाला पाहण्याची इच्छा असणाऱ्यांची नक्कीच निराशा झाली असेल.


priyanka family


परफेक्ट शाहरुख आणि गौरी


बॉलीवूडमधील परफेक्ट कपल म्हणून ज्यांची ओळख आहे. ते शाहरुख आणि गौरीदेखील या शाही विवाहसोहळ्यासाठी आले आहे. शाहरुखने लग्नासाठी पांढराशुभ्र डीझायनर कुडता घातला आहे तर गौरी पेस्टल ग्रेमधील फॅन्सी साडीत दिसत आहे. ही दोघं यामध्ये पिक्चर परफेक्ट दिसत आहे.


gauri shaharukh


बच्चन आर ऑलवेज बेस्ट


कोणत्याही शाही सोहळ्यात बच्चन कुटुंबियांचा थाट हा वेगळाच असतो.काहीच वेळापूर्वी लग्नासाठी अभिषेक, ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या दिसली. या तिघांनाही रॉयल लुक कॅरी केला आहे. अॅश निळ्या रंगाच्या डिझायनर लेंहगामध्ये आहे. अभिषेक त्याच्या पेंटट कुडता स्टाईलमध्ये तर आराध्या पेस्टल पिंक ड्रेसमध्ये लिटल प्रिन्सेस दिसत आहे.


bachchhan family


मास्टर ब्लास्टरची हजेरी


लग्नात आणखी कोणी लक्ष वेधून घेतलं असेल तर ते मास्टर ब्लास्टरने वाईन कलरचा कुडता गोल्डन पायजमा आणि कोल्हापुरी चप्पला असा साधा पण आयकॅची लुक केला होता. तर अंजलीने मल्टीकलर सिल्क साडी परिधान केली होती.


sachin tendulkar anjali
हार्दिक,युवराज, झहीरही उपस्थित


आकाशच्या लग्नासाठी युवराज सिंग, हार्दिक पांड्या, झहीर खान आणि सागरीकादेखील दिसले. कॉफी विथ करणमधील हार्दिकच्या बेताल वक्तव्यानंतर वादळ उठले होते. त्या सगळ्या प्रकरणानंतर तो आज सगळ्यांना दिसला आहे. हार्दिकने फ्लोरल स्लिवलेस जॅकेट आणि कुडता घातला आहे. ज्यात तो नक्कीच पिक्चर परपेक्ट वाटत आहे. 

(फोटो, व्हिडिओ सौजन्य- Instagram)