ADVERTISEMENT
home / Natural Care
स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’

स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’

धावपळीचे जीवन आणि वाढते प्रदूषण यामुळे वयाच्या आधीच अनेकींच्या चेहऱ्यावर एंटी एजिंगच्या खुणा दिसू लागतात. शिवाय बदलेल्या जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर काळे डाग, सुरूकुत्यांचे प्रमाण वाढू लागते. वाढणाऱ्या वयोमानानुसार त्वचा सावळी होणे, त्वचा सैल पडणे अशा अनेक गोष्टींना प्रत्येकीला सामोरं जावं लागतं. तुम्ही तुमचं वाढणारं वय नक्कीच कमी नाही करू शकत मात्र काही उपाययोजना करून तुमच्या चेहऱ्यावरील एंटी  एजिंगच्या खूणा मात्र नक्कीच लपवू शकतो. यासाठी आजकाल बाजारात अनेक उपचार उपलब्ध आहेत. ब्युटी एक्स्पर्टच्या सल्लानुसार हॉट कॅंडल वॅक्स मसाज (hot candle wax massage) यावर एक उत्तम उपाय ठरू शकते. यामुळे तुमच्या शरीरावरील बाळंतपणातील खूणा अर्थात स्ट्रेच मार्क्स देखील कमी होऊ शकतात.

hot-candle-wax-massage-therapy-1

हॉट कॅंडल वॅक्स मसाज म्हणजे काय (What Is Hot Candle Wax Massage)
बदलेल्या जीवनशैलीमुळे आजकल तुमच्या चेहऱ्यावर वयाच्या आधीच एजिंगच्या खूणा दिसू लागतात. या समस्येबाबत लवकर विशेष काळजी न घेतल्यास पुढे त्या वाढतच जातात. तिशीनंतर अनेकींच्या चेहऱ्यावर सुरूकुत्या दिसतात. तर बाळंतपणानंतर प्रत्येक आईला पोटावरील स्ट्रेच मार्क्सच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तुम्ही देखील अशा समस्यांनी बेजार झाला असाल तर हॉट कॅंडल वॅक्स मसाज तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरेल. त्यासोबतच वाचा Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क

हॉट कॅंडल वॅक्स मसाज कसे करतात-

ADVERTISEMENT
  • हॉट कॅंडल वॅक्स मसाजसाठी मेणबत्ती वितळवून त्याचे मेण पातळ केले जाते
  • वितळवलेले मेण तुमच्या शरीरावरील विविध भागांवर स्क्रब प्रमाणे लावले जाते.
  • स्क्रब केल्यावर एका गरम पाण्यात बुडवलेल्या टॉवेलने शरीराला स्टीम देण्यात येते. स्टिमिंगमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते.
  • सर्वात शेवटी त्वचेवर एखादा ब्राइटनिंग पॅक (brightening pack) लावला जातो. या पॅक मध्ये कॅंडल, जोजोबा तेल (zozoba oil), कोकोबटर (coco butter), व्हिटॅमिन ई (Vitamin E) तेलांचे मिश्रण असते.
  • hot-candle-wax-massage-therapy

हॉट कॅंडल वॅक्स मसाजचे फायदे Benefits of Hot Candle Wax Massage
प्राचीन काळापासून या मसाजचा वापर करण्यात येतो आहे. अनेक राण्या सौंदर्य वाढविण्यासाठी शरीरावर मेणाने मसाज करत असत. आजकाल अनेक स्पा आणि पार्लरमध्ये या सौंदर्य उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. या मसाजमुळे अनेक आरोग्य आणि सौंदर्य समस्या कमी होतात. यासाठी या मसाजचे फायदे अवश्य जाणून घ्या.

रक्तप्रवाह सुधारतो (Improves Blood Circulation)

तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह जर सुरळीत सुरू असेल तर तुमच्या शरीरातील सर्व आरोग्य आणि सौंदर्य समस्या आपोआप कमी होतात. रक्त प्रवाह सुधारल्यामुळे तुमची त्वचा नितळ होते , त्वचेवरील सुरुकुत्या कमी होतात. वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. या मसाज मुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते. तसेच केशराचे काय आहेत फायदे आणि दुष्परिणाम (Benefits and Side Effects of Saffron in Marathi) हे ही वाचा

स्किन टाइटनिंग

ADVERTISEMENT

हॉट वॅक्स कॅंडल मसाजमुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होतात. कारण या मसाज मुळे तुमची त्वचा पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे तुमची त्वचा जर सैल पडली असेल तर त्या भागावर हॉट कॅंडल वॅक्स् जरूर करा.

चेहऱ्यावर ग्लो येतो

चेहऱ्यावरील त्वचा मऊ दिसण्यासाठी योग्य काळजी  घेणं फार गरजेचं आहे. कॅंडल मसाजमुळे चेहरा मऊ राहण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील केमिकल्सयुक्त उत्पादने वापरण्यापेक्षा कॅंडल वॅक्सचा नक्कीच चांगल फायदा होऊ शकतो. या मसाजमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन निघून जाते.

स्ट्रेच मार्क्स कमी होतात

ADVERTISEMENT

hot-candle-wax-massage-therapy-4

प्रेगन्सीनंतर महिलांच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसू लागतात. हे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता. अनेक प्रयत्न करूनही हे स्ट्रेच मार्क्स दूर करणं फार कठीण असतं. मात्र कॅंडल वॅक्स मसाजच्या तीन ते चार सिटिंग्स घेतल्यावर तुमच्या स्ट्रेच मार्क्समध्ये चांगला फरक दिसून येतो.

त्वचा समस्या कमी होतात

कॅंडल वॅक्स मजासमध्ये मसाज टेकनिकसोबत अनेक साधने वापरण्यास येतात ज्यांचा तुमच्या त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे जर तुम्हाला त्वचा समस्या असतील तर कॅंडल वॅक्स मजास अवश्य करा. मात्र लक्षात ठेवा काहीही असलं तरी त्वचा समस्यांसाठी तुम्ही dermatologist चा सल्ला घेणं फार गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

चेहऱ्यावर कॅंडल वॅक्स मसाज कसा करावा? (How To Do Candle Massage on Face)

हॉट कॅंडल मसाज चेहऱ्यावर अगदी सहज पद्धतीने करता येतो. शिवाय या मसाजमुळे तुमचा चेहरा नितळ दिसू लागतो. मात्र त्यासाठी तुम्हाला याच्या काही सिटिंग्स घ्याव्या लागतील. मात्र घरी हा हॉट मसाज करण्यासाठी या सोप्या टीप्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

हॉट वॅक्स मसाजच्या स्टेप्स

hot-candle-wax-massgae 3

ADVERTISEMENT
  • हाताच्या पहिल्या तीन बोटांवर कॅंडल वॅक्स लावा
  • कॅंडल वॅक्स लावलेली बोटे तुमच्या डोळ्यांच्या खाली ठेवा. दहा सेंकद तो भाग प्रेस करून मग बोटे तिथून काढा.
  • ही स्टेप कमीत कमी दोन वेळा करा. दिवसातून दोन वेळा हा व्यायाम केल्यामुळे तुमच्या डोळ्याखालील त्वचा नैसर्गिक पद्धतीने ओढली जाते. ज्यामुळे तुमच्या डोळ्याखाली सुरूकुत्या दिसत नाहीत.
  • तुमच्या एका बोटावर वॅक्स घ्या आणि त्याने तुमच्या भूवयांवर प्रेशर द्या. कमीत कमी असे  सात सेंकद केल्यामुळे डोळ्याच्या वरील त्वचेवर चांगला परिणाम दिसून येतो.
  • या दोन्ही स्टेप्समुळे तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूचे रक्ताभिसरण सुधारते आणि डार्क सर्कल्स दिसत नाहीत.
  • हाताच्या दोन्ही अनामिकेवर वॅक्स घ्या आणि डोळ्यांच्या दोन्ही टोकांना ते लावून थोडं स्ट्रेच करा.
  • असे कमीत कमी तीन सेंकद प्रेशर दिल्यामुळे तुम्हाला सुरूकुत्यांपासून मुक्ती मिळेल
  • हाताच्या पहिल्या आणि मध्या बोटांना ताणून व्ही शेप द्या. आता या बोटांना वॅक्स लावून डोळ्यांना खालच्या दिशेने प्रेशर द्या. असे कमीत कमी 3 सेंकद करा ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. त्यानंतर तीन बोटांनी अशाच प्रकारे प्रेशर द्या या दोन्ही स्टेप्स तीन तीन सेंकद करा.
  • या  मसाज मुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन कमी होते, रक्ताभिरसण सुधारते. ज्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश दिसू लागतो.

कॅंडल वॅक्सने करा मेनीक्युअर आणि पेडीक्युअर (Candle Wax Manicure- Pedicure)

manicure

  • हॉट कॅंडल वॅक्सने चेहऱ्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हाता-पायाचा मसाजदेखील करू शकता. घरीच मेनीक्युअर आणि पेडीक्युअर करण्यासाठी तुम्ही या वॅक्सचा वापर करू शकता.
  • या थेरपी मध्ये तुम्ही तुमच्या नखांना फाईल करून त्यांना योग्य शेप देऊ शकता.
  • क्रीम लावून तुमच्या हाता-पायाची क्युटीक्ल्स स्वच्छ करा
  • हॉट कॅंडल वॅक्सने हाता-पायांना मजास करा
  • या वॅक्स मजास मुळे तुमच्या हाता-पायांची त्वचा मऊ आणि मुलायम होते
  • कोणत्याही वयोगटाच्या महिला हॉट वॅक्स मसाजने मेनीक्युअर आणि पेडीक्युअर करू शकतात.

pedicure

FAQs
हॉट कॅंडल मसाज कोणी करावा?

ADVERTISEMENT

कोणत्याही वयोगटाच्या महिला अथवा पुरूष हॉट वॅक्स मसाज करू शकतात. शिवाय कोणत्याही त्वचा प्रकारासाठी हा मसाज उपयुक्त असतो.

हॉट कॅंडल मसाजने स्किन टाईट होते का?

होय, हॉट वॅक्स कॅंडल मसाज मुळे skin tightening होणे शक्य आहे.

प्रेगन्सीनंतर होणारे स्ट्रेच मार्क्स हॉट कॅंडल मसाज मुळे कमी होतात का?

ADVERTISEMENT

बाळंतपणानंतर होणारे  स्ट्रेच मार्क्स कमी करणे तसे कठीणच  आहे. मात्र हॉट कॅंडल वॅक्सने ते नक्कीच कमी होऊ शकतात. मात्र त्याच्या काही सिटिंग्स तुम्हाला घ्याव्या लागतात.

हॉट कॅंडल मसाज करताना काय काळजी घ्यावी?

कोणताही मसाज करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. जसे की तुम्हाला या वॅक्सची अॅलर्जी आहे का हे तपासून पहा. शिवाय मसाज केल्यावर लगेच कोणत्याही केमिकल उत्पादनाचा वापर करू नका. शिवाय पहिल्यांदा कोणताही मसाज हा एखाद्या प्रोफेशनल थेरपिस्ट कडुन करून घ्या.

Morning Beauty Care Routine: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फॉलो करा हे ‘मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन’

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

 

27 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT