केवळ ५ मिनिटात हे व्यायामप्रकार तुम्हाला देतील आकर्षक स्तन

 केवळ ५ मिनिटात हे व्यायामप्रकार तुम्हाला देतील आकर्षक स्तन

महिलांचे शरीर आकर्षक दिसण्यासाठी त्यांचा सुडौल बांधा हा महत्वाचा असतो. त्यातल्या त्यात महिलांच्या परफेक्ट बॉडीतली आकर्षक भाग म्हणजे स्तने. स्तनांना चांगली उभारी असेल तर त्याचे नेहमीच कौतुक केले जाते. पण जर त्यांना योग्य ती उभारी नसेल तर तुमचे शरीर कितीही फिट असले तरी तुमचा बांधा आकर्षक वाटत नाही. त्यातच जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमची स्तने लवकर सैल पडू लागतात. त्यांचा आकार बदलतो. त्याला आपण ब्रेस्ट सॅगिंग असे म्हणतो. एकदा आरशात तुमची स्तने नीट निरखून पाहा. तुम्हालाही त्यांचा आकार सैल झाल्यासारखा वाटत आहे का? मग तुम्हाला तुमच्या स्तनांकडे योग्य लक्ष देण्याची वेळ आली आहे. तुम्हाला तुमच्या मौल्यवान वेळेपैकी केवळ ५ मिनिटे तुमच्या स्तनांच्या व्यायामासाठी काढायची आहेत. तसंच स्तनांचा आकार वाढण्यासाठी घरगुती उपायही करू शकता.


breast 1


अजूनही कळत नाही परफेक्ट ब्रा कशी निवडायची?, मग हे नक्की वाचा


वॉल पुशअप


तुम्हाला एका भिंतीसमोर उभे राहायचे आहे. नॉरमल पुशअप्सप्रमाणे तुम्हाला भिंतीसमोर अंतर घेऊन उभे राहून पुशअप्स करायचे आहे. हे पुशअप्स करत असताना तुम्हाला तुमच्या छातीवर ताण आलेला जाणवेल.पुशअप्स करताना तुम्हाला तुमच्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत.  हा व्यायाम तुमच्या स्तनांभोवती असलेले अतिरिक्त फॅट कमी करेल, त्यांना चांगला आकार देईल शिवाय तुमच्या दंडावरील फॅटवरही परिणाम करेल.


wall pushups


साधारण पहिले काही दिवस दहा वॉल पुशअप्स करा. नंतर हा आकडा वाढवल्यास हरकत नाही. तुम्हाल तुमच्या वेळेनुसार हे सगळे व्यायाम करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला वेळा पाळून आकडा वाढवायचे आहे. 


आर्म सर्कल


हात लांब करुन तुम्हाला गोलाकार दिशेत फिरवायचे आहेत. पहिले दहा आकडे घड्याळाच्या दिशेने तर पुढील दहा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला गोलाकार हात फिरवायचे आहेत. सुरुवातीला लहान गोल आणि मग असे करत करत मोठा गोल तुम्हाला तुमच्या हाताने करायचा आहे. असे करताना तुम्हाला तुमच्या दंडावर ताण येईल. शिवाय स्तनांवर देखील हलकासा ताण जाणवेल. जसजसे तुम्ही हात जास्त गोलाकार फिरवाल तस तसा तुम्हाला अंडरआर्म्समध्ये तुम्हाला ताण जाणवू लागेल. पर्यायाने छातीपर्यंत हा ताण जातो. 


arm circle


 आर्म्स सीझर


हात तसेच लांब ठेवून आता तुम्हाला हाताची कैची करायची आहे. पण ही कैची करताना तुम्हाला आलटून पालटून हात खालीवर करायचा आहे. असे करताना तुम्हाला तुमची स्तनांवर दाब आल्यासारखा वाटेल. तुमच्या स्तनांभोवती साचलेल्या फॅटवर हा व्यायाम परिणाम करतो. आर्म्स सीझर करताना फार थकवा येत नसला तरी तुमच्या स्तनांवर काम करणारा असा हा व्यायाम प्रकार आहे.


चेस्ट प्रेस किंवा बॉल प्रेस


जीममध्ये हा प्रकार तुम्ही केला असेलच. घरी हा प्रकार करता येणं शक्य आहे. तुम्हाला तुमचे पाय गुडघ्यात दुमडून वज्रासनामध्ये बसायचे आहे. हात जवळ करुन हाताची मूठ करुन तुम्हाला तुमचा हात छातीकडे ओढायचा आहे. हे करताना तुम्हाला तुमचे दोन्ही कोपरे एकमेकांना चिकटलेले हवे. यावेळी तुम्ही तुमच्या हातात बॉलही ठेवू शकता. हात खाली ओढताना तुम्हाला तुमच्या दोन्ही स्तनांमध्ये ताण आलेला जाणवेल.


chest press


बेली फॅटही वाढलयं, मग तुमच्यासाठी सोपे उपाय


अंडरचीन


अंडरचीन व्यायाम प्रकार करताना तुम्हाला तुमच्या हनुवटीखाली दोन्ही हात घ्यायचे आहेत. हात हनुवटी खाली आल्यानंतर तुम्हाला अंडरआर्म्स आणि छातीवर ताण आलेला जाणवेल. शिवाय छाती वरच्या दिशेला ओढलेली वाटेल. हा व्यायाम प्रकार करताना तुमचे हात, खांदा आणि छाती काम करत असतात. तुमचे इतर अवयव त्यावेळी रिलॅक्स असतात.


 बुक एक्सरसाईज


आपण घरच्या घरी व्यायाम प्रकार पाहात आहोत. त्यामुळे आपण हातात वजन घेणे टाळत आहोत. हा व्यायामप्रकार तुम्ही घरी करताना तुम्हाला हातात काहीतरी वजन हवे आहे. म्हणून आपण हातात एकाच वजनाची दोन पुस्तके घ्यायची आहेत. हात आधी बाजूला आणि मग एकत्र समोर आणायचे आहे. असे तुम्हाला सुरुवातीला १० वेळा करायचे आहे  आणि मग हा आकडा आणि वजन दोन्ही तुम्हाला वाढवायचे आहेत. आर्म सीझरसारखाच हा प्रकार आहे. पण तुमच्या हातात वजन असल्यामुळे त्याचा परीणाम तुमच्या स्तनांवर होतो.


book exercise


स्विमर अँड सुपरमॅन


पोटावर झोपून तुम्हाला सुपरमॅन सारखा एक हात वर करायचा आहे. जो हात वर केला त्याच्या उलट पाय तुम्हाला हवेत उचलायचा आहे. एकाचवेळी तुम्हाला हात आणि पाय वर करायचे आहेत.  असे करताना तुमच्या पोटावर ताण येईलच. पण हात हवेत उचलल्यानंतर तुमची अपर बॉडीही ताणली जाईल.


swimmer superman


कोब्रा स्ट्रेच


स्विमर पोझीशनमध्येच राहून तुम्हाला हात डोक्यामागे घ्यायचा आहे आणि अंग वर मागे उचलायचे आहे. असे करत असताना जर तुम्हाला हात वर ठेऊन उठणे कठीण असेल तर हात जमिनीवर टेकूनही तुम्ही हा व्यायाम करु शकता. यामध्ये तुमच्या ओटीपोटावर आणि छातीवर ताण येतो.


cobra strech


हँड स्ट्रेच


सगळ्या व्यायामानंतर स्ट्रेचिंगही तितकीच महत्वाची असते. हा व्यायाम प्रकारही आपण अनेकदा केला असेल. डावा हात मागे नेऊन तो उजव्या हाताने पकडून ठेवणे. एखाद मिनिटासाठी हात पकडून ठेवा आणि पुन्हा ही क्रिया करत राहा. साधारण १० वेळा तरी असे करायला काहीच हरकत नाही. या व्यायामाने तुम्हाला रिलॅक्स वाटतेच शिवाय तुमच्या स्तनांजवळील त्वचेलाही स्ट्रेच मिळतो. त्यामुळे त्या ठिकाणी साचलेली अतिरिक्त चरबीही  कमी होण्यास मदत होते.


hands up


स्तन सैल होण्याची  कारणे 


अनेकांना स्तन फक्त लग्न झाल्यानंतरच सैल पडतात असे वाटते. पण तसे काहीच नाही. तुमचे लग्न झाले नसेल तरी तुमच्या स्तनांची त्वचाही सैल पडू शकते. यामागील प्रमुख कारणे काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.


  • वजनात सतत बदल


अनेक जणांच्या व्यायामामध्ये सतत खंड पडत असतो. साहजिकच त्यामुळे त्यांच्या शरीररचनेत सतत बदल होत राहतो. सततच्या व्यायामाचा परिणाम तुमच्या स्तनांजवळील त्वचेवरही होत असतो.तुमची त्वचा सतत स्ट्रेच होऊनही सैल पडू शकते.


  • चुकीची ब्रा 


स्तन प्रत्येकांना त्यांच्या कपड्यातून परफेक्ट दिसावी असे वाटतात. अनेकदा क्विवेज दाखवण्यासाठी खूप जणी स्वत:च्या साईज सोडून तंग ब्रा घालतात. तर काही जणी अगदीच सैल ब्रा वापरतात.परफेक्ट ब्रा न घातल्यामुळेही तुमची स्तनांजवळील त्वचा सैल पडत असते. 


sagging


  • वयात आल्यावर इनरवेअरची निवड


प्रत्येक लहान मुलीला तिच्या समोर मोठ्या होणाऱ्या ताईप्रमाणे दिसायचे असते.त्यासाठी त्या तसे कपडे घालण्याचा नटण्याचा प्रयत्न करतात. पण मासिक पाळीच्या आधी जेव्हा शरीरात बदल होऊ लागतात आणि आई पेटीकोट घालू नकोस अमूक एक घाल असे सांगते तेव्हा अनेक जणी ऐकत नाही. छाती थोडी दिसू लागली की मग त्या ब्रा नको शाळेत इतर मुली काय म्हणतील म्हणून स्पोर्ट्स ब्रा वगैरे घालतात. त्यामुळे ज्या वाढीच्या काळात तुमच्या स्तनांना योग्य उभारी आणण्यासाठी योग्य ब्राची गरज असते नेमक्या त्याचवेळी ब्रा घातली जात नाही. सैलसर स्पोर्ट्स ब्राची सवय झाल्यानंतर ब्रा नकोशा वाटतात. तुमच्या स्तनांना उभारी नसण्यामागे हे देखील कारण असू शकते.


परफेक्ट फिगरसाठी करा हा परफेक्ट डाएट


  • वयपरत्वे होतात बदल 


तुमच्या शरीरात वयपरत्वे बदल होत असतात. तुम्ही कधीच कोणतीच शारिरीक हालचाल करत नसाल तर तुमचे शरीर थकू लागते. साहजिकच तुमची स्तनांकडील त्वचाही सैल पडू लागते.जर तुमची स्तन खूप मोठी असतील तर हा बदल अधिक जाणवू लागतो. स्तनाग्रेही दोन विरुद्ध दिशेला गेलेली दिसू लागतात. 


  • हार्माेन्सचाही होतो परिणाम


महिलांमध्ये हार्माेन्सचा सर्वाधिक परिणाम होत असतो.मासिक पाळी,लग्न, गर्भधारणा या सगळ्यावेळी तुमचे हार्माेन्स बदलत असतात. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. दूध पाजणाऱ्या महिलांमध्येदेखी ही समस्या प्रकर्षाने दिसून येते. 


 


*व्यायामासोबतच महिलांनी मसाज करुन घेणेही आवश्यक असते. ज्याप्रमाणे तुम्ही सुंदर चेहऱ्यासाठी मसाज करता तसाच मसाज तुमच्या शरीराला, तुमच्या स्तनांनाही आवश्यक असतो. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मसाज करुन घ्या.


(सौजन्य-Giphy,Instagram)