तुम्ही जर वेबसीरिजचे रेग्युलर फॉलोअर असाल तर मिथिला पालकर हे नाव तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. खरंतर वेबसीरिजसोबतच मिथिलाने आता मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही चांगलंच नाव कमवलंय.
कर्ली हेअर, नेहमी हसतमुख दिसणारी, दादरची मराठमोळी मुलगी म्हणजे मिथिला. जिला आपण गर्ल इन ज सिटी, लिटील थिंग्स, लिटील थिंग्स 2, मुरांबा आणि कारवा या वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये पाहिलंय.
स्कीनी पॅंट फॅशनबद्दल देखील वाचा
View this post on Instagram
तसंच #bhadipa च्या अनेक कार्यक्रमात तिची उपस्थिती असते. खरंतर मिथिलाच्या अॅक्टींग करियरला सुरूवात झाली ती कटी-बट्टी या सिनेमाने. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती तिच्य वेबसीरिजने. मग ती गर्ल इन द सिटीमधली पॅशनेट फॅशन डिझाईनर मीरा सहगल असो वा लिटील थिंग्समध्ये लिव्ह इन मध्ये राहणारी करिअर ओरिएंटेड काव्या असो.
शॉर्ट हाइट गर्ल्ससाठी फॅशन टिप्सही वाचा
तिच्या वेबसीरिजच्या प्रत्येक सिझनला भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला. एवढंच काय तर तिने बनवलेल कप साँगही युट्यूब बरंच व्हायरल झालं होतं.
उंच मुलींसाठी मॅक्सी ड्रेस देखील वाचा
खूप कमी वेळात मिथिलाने फोर्ब्स इंडियाच्या 30 अंडर 30' यंग अचिव्हर्स लिस्टमध्ये ही आपलं स्थान मिळवलं.
'गर्ल इन द सिटी' मध्ये एका स्ट्रगलर फॅशन डिझाईनरच्या भूमिकेत दिसलेली मिथिला पालकर ही खऱ्या आयुष्यातही एखाद्या फॅशन आयकॉनपेक्षा कमी नाही. वेस्टर्न असो वा टेड्रीशनल मिथिला प्रत्येक स्टाईलमध्ये स्वतःला परफेक्टली मोल्ड करते.
तिच्या वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये मिथिला नेहमीच आपल्याला शॉर्ट्स- टीशर्ट आणि ड्रेसेसमध्ये दिसली आहे. पण मिथिला साडीसुद्धा तेवढीच सुंदररित्या कॅरी करताना दिसते. ब्लू आणि ग्रीन रंगाच्या या कॉटन साडीमध्ये मिथिला फारच वेगळी आणि सुंदर दिसत आहे.
क्रीम कलरच्या या सिल्क सलवार सूटमध्येही मिथिला खूपच स्टाईलिश दिसत आहे. या आउटफीटमध्ये मिथिलाने गोल्डन कलर घातलेल्या इयररींग्ससुद्धा परफेक्ट आहेत.
View this post on Instagram
जर तुम्हाही मिथिलाच्या कर्ल्सचे फॅन असाल तर हा फोटो मात्र तुम्हाला थोडासा निराश करेल. व्हाईट कलरचा या एम्ब्रॉयड्रेड ड्रेस मिथिलाने फिल्म "कारवां" च्या प्रमोशनदरम्यान घातला होता. या लुकमध्ये मिथिलाने आपल्याला कर्ल्सना स्ट्रेट लुक दिला आहे.
View this post on Instagram
मस्टर्ड कलरच्या पँट सूटमध्ये मिथिला फारच एलिगंट दिसत आहे. मिथिला पालकरचा हा लुक एका फोन लाँच इव्हेंट दरम्यानचा आहे. या लुकला स्टाईल केलं आहे स्टायलिस्ट वर्षाने.
"गर्ल इन द सिटी" मध्ये भलेही मिथिला पालकरने कॉर्पोरेट लुक आणि त्याला साजेशी ज्वेलरी घातली असेल पण खऱ्या आयुष्यात मात्र या मराठमोळ्या मुलीला नथ घालायला फारच आवडते. मिथिला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनर मराठी नथ कॅरी करताना दिसते.
View this post on Instagram
मग या युथ आयकॉन मराठी मुलीला तुम्हीही फॅशन लुक्स इन्स्पिरेशनसाठी नक्की फॉलो करा.
इमेज सोर्सः Instagram
हेही वाचा -
अभिनेत्री दीप्ती सतीचा फॅशन आणि फिटनेस मंत्रा
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री