*परफेक्ट इनरवेअरची निवड* करणे अजूनही जाते कठीण, मग वाचाच

*परफेक्ट इनरवेअरची निवड* करणे अजूनही जाते कठीण, मग वाचाच

'इनरवेअर' हा महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. अमूक एक भाग झाकले पाहिजेत म्हणून इनरवेअर घालण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. कारण बाहेरच्या कपड्यांपेक्षाही हल्ली इनरवेअरला जास्त महत्व दिले जाते. पण हे झाले काही महिलांच्या बाबतीत पण खरचं सगळ्या महिला या परफेक्ट इनरवेअर निवडतात का? आम्ही केलेल्या एका सर्वेक्षणानुसार आजही मुली आणि महिला त्यांच्या इनरवेअरच्या साईजबाबत साशंक असतात. पण त्या इनरवेअरची अचूक साईज कोणती याचा अधिक शोध घ्यायला जात नाही. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच तुम्हाला परफेक्ट इनरवेअर निवडणे आवश्यक असते. जर तुम्हालाही तुम्ही वापरत असलेले इनरवेअर परफेक्ट वाटत नसतील तर हे नक्की वाचा. कारण या काही टीप्स तुम्हाला परफेक्ट इनरवेअर निवडण्यासाठी मदत करु शकतील.


perfect innerwear


 अचूक साईज म्हणजे नेमकं काय?


समस्त महिलांना इनरवेअर बाबतीत पडणारा पहिला प्रश्न म्हणजे माझी परफेक्ट साईज कोणती?.. १०० पैकी ९५ महिलांना आपली परफेक्ट साईज कधीच कळत नाही. त्यांनी घेतलेले इनरवेअर घातल्यानंतर त्यांनाच अवघडल्यासारखे वाटते आणि त्या पुन्हा गोंधळात सापडतात. इतके पैसे खर्च करुन इनरवेअर घेतले खरे पण मला माझी परफेक्ट साईज मिळणार कधी असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो.    


bra fitting


 आता ब्रा आणि पँटीच्या बाबतीत सांगायचे झाले तर तुमच्या बॉडीला घट्ट बसणारे इनरवेअर म्हणजे तुमची परफेक्ट साईज नाही. तर परफेक्ट फिटींगच्या इनरवेअर तुमच्या अंगालगत असल्यातरी त्यांचे वळ शरीरावर उठत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी जर काही तपासायचे असेल तर या पासूनच सुरुवात करा. घरी असलेले इनरवेअर घालून बघा आणि तुम्हाला त्या कुठे कुठे लागत आहेत. याचा अंदाज घ्या.  कारण अनेकांना ब्रा आणि पँटी घातल्यानंतर त्या कधी काढून टाकते असे होऊन जाते याचे कारण असते त्यांची चुकीची साईज.


  • अशी असते परफेक्ट ब्रा


 ब्राच्या बाबतीत सांगायचे झाले तर तिचे बेल्ट,पाठिवरील हुक लावल्यानंतर तुमच्या त्वचेला काहीच त्रास होता कामा नये. काही जणींना ब्रा काढल्यानंतर पाठिवर मोठमोठे वळ आलेले दिसतात. छाती आणि पाठिकडील भाग अधिक लाल दिसू लागतो. पट्टे लागून लागून तो भाग अधिक सुजलेलाही दिसू लागतो. तर काहींना कपसाईज नुसार  उदा. अनेकींच्या कप साईज लहान असतात.अशावेळी तुम्हाला कपसाईजच्या पर्यायानुसार ब्रा मिळतात. म्हणजे तुम्हाला ३४ ची ब्रा लागत असेल पण तुमची कपसाईज लहान असेल तर तुम्हाला कपसाईजमधील लहान पर्याय निवडणे महत्वाचे असते. A,B,C,D असे कपसाईजनुसार पर्यायही सगळ्या ब्रामध्ये मिळतात. 


तुमची ब्रा साईज अगदी परफेक्ट असेल तर ती मागे तुमच्या कंबरेच्या सुरुवातीच्या भागापर्यंत येते. पाठीवर नाही. कारण अनेक जणींच्या ब्रा या पाठीवर आलेल्या असतात. त्यामुळे आपोआपच पाठिला पोक येतो. अशी ब्रा अधिक त्रासदायक असते. त्याने तुमच्या शरीराचा आकार बदलतो.तुमच्या ब्रेस्टही खाली झुकलेल्या दिसतात. त्यामुळे ज्या उभारीसाठी तुम्ही ब्रा घेत आहात ते उद्दिष्टय साध्य होत नाही. त्यामुळे जर एखादी ब्रा तुमच्या पाठिवर येत असेल तर ती घेऊ नका.


 ब्रा घालण्याचे मुख्य कारण असते तुमच्या स्तनांना उभारी देणे. म्हणजे तिने तुमच्या स्तनांना योग्य आकार देणे आवश्यक असते. एखादी ब्रा घातल्यानंतर जर तुमच्या स्तनांना आराम मिळत असेल. तर अशी ब्रा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पण जर तुमचा सतत हात ब्राचे पट्टे खाली ओढण्यात जात असेल तर अशी ब्रा तुमच्या फायद्याची नाही. त्यामुळे अशी ब्रा निवडूच नका.


नेमकी कोणती ब्रा कशावर घालायची? 


पँडेड की पुशअप?


 छातीला उभारी आणण्यासाठी आलेले हे प्रकार वापरायला खरेच खूप चांगले आहेत. पण ते तुम्ही रोजच्या वापरात घालू शकता का? असा प्रश्न खूप महिलांना पडतो. पँडेड आणि पुशअप या दोन्ही प्रकाराचे ब्रा तुमच्या रोजच्या वापरासाठी चांगल्या आहेत. पण त्यात असणाऱ्या 'वायर' वापरणे तुम्ही टाळा. कारण त्या वायर लागून तुम्हाला जखमा होऊ शकतात.


pushup bra 


*तुम्हाला रोजच्या वापरासाठी पॅडेड ब्रा हवी आहे मग Enamor मधील अशी ब्रा वापरुन पाहायला हरकत नाही


 पँटी निवडताना


ब्रा प्रमाणेच महत्वाची असते ती पँटी. पँटीच्या बाबतीत अनेक महिला या सजग नसतात. म्हणजे काहीही घातले तरी चालेल असे त्यांचे म्हणणे असते. पण ब्रा प्रमाणे पँटीही तितक्याच महत्वाच्या असतात. तुमच्या मासिक पाळीच्या काळात त्या तुम्हाला कितीतरी आधार देतात. मग या पँटी इतरवेळी पण चांगल्याच हव्यात नाहीत का?


परफेक्ट पँटीची निवड


ब्रा प्रमाणे पँटीच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. पूर्वी स्त्रिया साड्या नेसत होत्या त्यावेळी त्यांचा तो भाग हवेशीर राहत होता.त्यामुळे त्याची साईज थोडी मागे पुढे झाली तरी चालत होते.  पण आता टाईट पँटस, हॉट पँटस, शॉर्ट स्कर्ट असे कितीतरी प्रकार आल्यानंतर पँटीचे वेगवेगळे प्रकार आले. त्यामुळे अशा कपड्यांवर पँटी  निवडताना तुम्हाला दोन पायांच्यामध्ये पँटी अडकता कामा नये. ती इतकी तंग असू नये की, तुमच्या व्हजायला ती चिकटून राहिल. शिवाय तिचे पट्टे कंबरेला लागतील. त्यासाठी सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे नेहमी खरेदीसाठी गेल्यावर तुमच्या कंबरेचा आकार मोजून त्या मापात बसणाऱ्या पँँटी तुम्ही निवडा.


perfect panties


तुम्ही रोजच्या वापरासाठी पँटी निवडत असाल तर jockey चा हा प्रकार अगदीच कम्फर्टेबल आहे.


 फँन्सी ब्रा-पँटी निवडताना


ब्रा आणि पँटीमध्ये अनेक प्रकार हल्ली मिळतात. ब्रामध्ये सांगायचे झाले तर हॉल्टर नेक, क्रिस क्रॉस,ट्युब तर पँटीमध्ये सिमलेस पँटी,बॉय शॉर्ट्स बिकीनी, थाँग असे तुम्ही घ्याल तसे वेगवेगळे प्रकार तुम्हाला सध्या आहेत.. पण ते सगळेच प्रकार इतर जण घालतात म्हणून तुम्ही घालायला जाऊ नका. कारण अनेकदा आम्ही महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा घालताना पाहिले आहे. पण त्या त्यात कधीच कम्फर्टेबल नसतात असेच दिसून आले आहे. त्यामुळे तुमच्या बॉर्डरोबमध्ये तुम्हाला अशा इनरवेअरचे कलेक्शन करायला काही हरकत नाही. पण त्या वापरण्याचा सल्ला आम्ही देणार नाही.


स्टिक ऑन ब्रा वापरायची आहे, मग तुम्हाला हे माहीतच हवे


 इनरवेअरचे मटेरिअल निवडताना


अनेकदा अँड पाहून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इनरवेअर ट्राय करायला जातो. पण त्याची तुम्हाला खरचं गरज आहे का? कारण नेहमीच्या वापरासाठी वेगवेगळ्या मटेरिअलचे इनरवेअर वापरणे कधीच चांगले नाही.  रोजच्या वापरासाठी ‘कॉटन’ इनरवेअर हाच एक उत्तम पर्याय आहे. रोजच्या वापरासाठी या ब्रा निवडा.


  • सिंथेटिक मटेरिअल निवडताना


कॉटनचे इनरवेअर वापरा असा सल्ला देताना सिंथेटिक मटेरिअल वापरुच नका असे नाही. पण  एखादया पार्टीसाठी तुम्ही दोन ते तीन तासांसाठी जाणार असाल तर अशा ठिकाणी या ब्रा आणि पँटी वापरणे ठिक आहे.


sexy panties


सगळ्यांसाठीच चांगला असा कपड्याचा पर्याय म्हणजे कॉटन आणि होजिअरी. अशा ब्रा पँटी तुम्हाला जे कम्फर्ट देतात ते कोणत्याच प्रकारचे मटेरिअल देऊ शकत नाही.


ब्रेस्ट कॅन्सरबाबत तुम्हाला हे माहीत हवे


 दर ६ महिन्यांनी बदला इनरवेअर 


दर ६ महिन्यांनी तुम्ही तुमचे इनरवेअर बदलायला हवे. कारण इनरवेअर ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या शरीरालगत असते आणि बरेच तास ती तुमच्या शरीरावर असते. त्यामुळे दर ६ महिन्यांनी इनरवेअर बदलाच, असा सल्ला आम्ही देऊ. जर तुमचा वापर अगदीच चांगला असेल तर १ वर्ष काढायला हरकत नाही. पण फाटलेले, आकार बदललेले इनरवेअर घरी ठेवूच नका. 


इनरवेअर धुताना 


इनरवेअरच्या किंमती चांगल्याच असतात. त्यामुळे त्या धुताना वेगळ्याच धुवा. असे कपडे तुम्ही अंगाच्या साबणाने धुतले तरी चालतात. अंगासाठी वापला जाणारा साबण हा माईल्ड असतो. म्हणूनच माईल्ड साबण वापरण्याचा आम्ही सल्ला देतो. त्यामुळे ब्रा-पँटीचे आयुष्य तर वाढतेच.शिवाय तुम्हालाही त्याचा त्रास होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही हे कपडे कधीच मशीनमध्ये लावू नका. तर ते तुम्ही तुमच्या हातानेच धुवा. तरच त्या चांगल्या टिकू शकतात.    


इनरवेअर महिला आरोग्यासाठी महत्वाचे


महिलांना त्यांचे आरोग्य जपणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही ब्रेस्ट फिंडींग करणारे असाल किंवा प्रेग्नंट असाल तर अशा दिवसात इनरवेअर कोणत्या घालायच्या याचा योग्य सल्ला तुम्ही डॉक्टरांकडून घ्यायला हवा. आहे त्या इनरवेअरमध्ये तुम्ही सगळे मॅनेज करायला गेलात तर त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात. त्यामुळे तुमच्या इतर खरेदीसोबत इनरवेअरची खरेदीही तितकीच महत्वाची आहे. 


(सौजन्य-Instagram)